ग्राहक न्यायालय

Submitted by सुहृद on 2 August, 2018 - 21:18

मी पुण्यात राहते,मला एक मदत हवी आहे, आम्ही सध्या जिथे राहत आहोत त्या घरासंबंधी थोडी अडचण आहे.
बिल्डरने अजून पजेशन लेटर दिलेले नाही पण फ्लॅट तयार असल्याने आम्ही सर्व फ्लॅट मालक राहायला आलो. मूळ जागा मालक आणि बिल्डर यांच्यातील वादामुळे लेटर मिळू शकले नाही कोणालाही. आता बिल्डरने ऍग्रिमेंटमध्ये लिहिलेल्या काही गोष्टी पूर्ण केलेल्या नाहीत(some personal and some common amenities). त्यामुळे काही फ्लॅट धारकांनी वन टाईम मेंटेनन्स दिलेला नव्हता, त्यात आम्ही सुद्धा होतो करण मग बिल्डर काम पूर्ण करणार नाही याची खात्री. एरवी मंथली असणारा सोसायटी मेंटेनन्स आम्ही व्यवस्थित देत आहोत. गेल्या मासिक सभेत झालेल्या चर्चेतून आम्ही सोडून सर्व उरलेल्या जणांनी वन टाईम मेंटेनन्स दिला.
आम्ही एका एनजीओशी बोललो तर ते म्हणाले की वन टाईम मेंटेनन्स बेकायदेशीर आहे, अस घेऊ शकत नाही. आम्हाला यासाठी ग्राहक न्यायालयात जायचे आहे कारण नोटीस देऊनसुद्धा बिल्डर ऐकत नाही, इतर फ्लॅटधारकांना यासाठी तोशीस घ्यावी असे वाटत नाही.
हे प्रकरण बहुदा मुख्यत्वे मला हाताळावे लागेल, कोणाला काही माहिती असल्यास कळवा, काही कॉन्टॅक्ट माहीत असल्यास द्या, डुज आणि डोंट्स सांगा, अनुभव शेअर करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे (त्रोटक) वकिली सल्ला मिळू शकेल.
२ याबद्दल माहिती घेतली आहे का? https://maharera.mahaonline.gov.in/
३. अन टाइम मेंटेनन्स बेकायदेशीर आहे याची खात्री आहे का? इथे काही वेगळंच म्हटलंय.

धन्यवाद भरत, वन टाईम मेंटेनन्स बद्दल खात्री नाही, आम्ही तो द्यायला तयार आहोत पण शिल्लक कामे बिल्डरने करावीत असा आमचा आग्रह आहे, किमान जी कामे केलीच नाहीत त्याचा वजावट कशी करणार हे तरी व्हायला हवे असे मला वाटते

वन टाईम मेंटेनन्स हा सुरुवातीला बिल्डर आपल्याकडुन जमा करुन घेतो व जेव्हा आपल्याला पझेशन मिळुन आपण रहायला जातो तेव्हा ते सोसायटीच्या कमिटीकडे सुपुर्द केला जाते. मग तोच पुर्ण पैसा बँकेत एफ्डी करुन ठेवुन त्यावर मिळणार्या व्याजावर सोसायटीच्या मेंटेनंसचा खर्च चालतो, जर ते व्याज, खर्च चालवायला पुरेसे नसेल तर मग मेंबर्स कडुन महिन्याला काही एक रक्कम ठरवुन ती घेतली जाते.

जेम्स बॉन्ड, वन टाईम मेंटेनन्स हा काय आहे आणि कशासाठी घेतला जातो ते माहीत आहे पण कायदेशीर की बेकायदेशीर ते माहीत नाही. त्यातूनही वर लिहिल्याप्रमाणें मला वन टाईम मेंटेनन्स द्यायला हरकत नाही, पण पेंडिंग कामे बिल्डरने पूर्ण केला पाहिजेत. किंवा न केलेल्या कामाचा खर्च वजावट मिळावा असे मला वाटते, ऍग्रिमेंट मधल्या गोष्टी न करता, फक्त पैशाचा तगादा लावणे मला चूक वाटते

लेखावरून असे समजतेय की आपल्या बिल्डिंगला occupation certificate मिळालेले नसावे. अशावेळी बिल्डर आपणांस घरात फर्निचरचे काम करू देण्याच्या बहाणान्याने (कायद्यातील पळवाट) घराचा ताबा देत असतो. एक प्रश्न, O. C. नाही तर आपल्या घराची सोसायटी कशी बनली? की Ad-hoc सोसायटी बनलीय.

जेम्स बॉण्ड यांनी वर लिहिल्याप्रमाणे वन टाइम मेंटेनन्स (Corpus fund) हा आपण बिल्डरबरोबर केलेल्या ऍग्रिमेंटनुसार द्यावा लागतो. ही गोष्ट वेगळी, की बिल्डर तो फ़ंड सोसायटीला हँडओव्हर करताना मोठा हिस्सा खर्च झालेलाच दाखवतो.

बिल्डरने काही कामे पूर्ण केली नसतील तर तो एक स्वतंत्र विषय आहे.