गुंतवणूक किती आणि कुठे करावी?

Submitted by गुलबकावली on 28 June, 2018 - 03:10

नमस्कार,

मला गुंतवणूक किती आणि कुठे करावी ह्याबद्दल माहिती हवी आहे. म्हणजे जर माझे वय ४५ असेल तर माझी गुंतवणूक मी कशी करावी? सोन्यात, म्यूचलफंड, बँकेत एफडी, जमीन जुमला ह्यामघे काय प्रमाणात असावी.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंपन्यांचे एफ डी हे पूर्णपणे अनसेक्युअर्ड असतात. कंपनी बुडाली तर पैसे परत करायला यांचा नंबर शेवटचा.
रिस्क जास्त त्यामुळे व्याजदर ही जास्त. याचा व्यत्यास ही खरा आहे. व्याज दर जास्त म्हणजे रिस्क जास्त. मल्ल्याच्या कंपन्या इतरांपेक्षा २-३ % जास्त व्याज द्यायच्या.

Ppf is best.

ते सोडून अजून उरले तर बॅंकेत एफ एफ डी म्हणून ऑप्शन असतो, म्हणजे 25 की 50 हजारच्या वरची सेविंग ची अमाउंट आपोआप एफ डी व्याजदरात कन्व्हर्ट होते,

काय कागद नाहीत , सारखे ब्यांकेत जायचे नको , ए टी एम ने पैसे काढले तर आपोआप तितकीच रक्कम लिक्विदेत होते,
वर्षाच्या शेवटी इंटरेस्ट सर्टिफिकेट घेतले की व्याज किती आले समजते

हो. पण जेटलीं नी एक बिल आणलेलं. बँक अडचणीत आ ली तर त्या डिपॉझिटवरही घाला पडणार होता.

शेअर बाजारातील जोखमींना लक्षात ठेवूनच शेअर मध्ये गुंतवणूक करावी हे एक सूत्र काहीतरी फायदाच करून देईल. किंवा नुकसान कमीत कमी होईल ह्याची खात्री राहील. शेअर बाजारातील काही चुका खालील लेखात दिलेल्या आहेत. नवीन असणाऱ्यांना त्याचा निश्चितच लाभ होईल.

शेअर बाजारातील संभाव्य नुकसान कसे टाळावे?
https://akshargaane.blogspot.com/2019/12/blog-post_24.html?m=1

कसला टुकार ब्लॉग आहे. पहिलीतलं पोरगं पण जास्त चांगलं सांगेल या ब्लॉगपेक्षा.

Pages