अभिनंदन मेघा धाडे - पहिली मराठी बिगबॉस विजेती.

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 July, 2018 - 00:26

बिग बॉस कसे जिंकावे
हे मेघा धाडेकडून शिकावे !

ती जिंकायला आली होती,
आणि जिंकूनच गेली ..

तिने नेमके काय केले आणि कशी जिंकली हे आपण आता बघूया ..

1) तिने शोला टीआरपी मिळवून दिला - सकाळी उठल्यापासून नाचणे असो ते मोठ्याने गूड मॉर्निंग बिगबॉस बोलणे असो वा स्वयंपाकघरातील कामे असो, तिने स्वत:चा एक दिनक्रम आखून घेतला होता ज्यात कॅमेरयाचा फोकस आपल्यावर कसा जास्त राहील हे पाहिले.
मग तिने आपल्या बोलण्याने आणि पुढे पुढे करण्याच्या सवयीने कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायला सुरुवात केली. नव्हे ईतरांच्या कॉन्ट्रोव्हर्सीतही लुडबुड करायला सुरुवात केली. प्रत्येक राड्यात, लफड्यात आपण लाईमलाईटमध्ये राहू हे बघतानाच आपणच त्याला जबाबदार राहू हे देखील पाहिले.

बिगबॉसच्या प्रेक्षकांना नेमके हेच हवे असते. राडे आणि लफडे. त्यामुळे असा टीआरपी मिळवून देणारया सदस्याला 100 दिवसांच्या आधी बाहेर काढायचा मूर्खपणा कोणतेही चॅनेलवाले करणार नव्हतेच. थोडक्यात तिने आपली फायनलची सीट कन्फर्म करून टाकलेली.

2) बिगबॉसच्या घरात सारा जमाना एक तरफ और मेघा धाडे एक तरफ -
असे चित्र तिने वेळोवेळी मोठ्या अक्कलहुशारीने उभे केले. आणि अर्थातच तितक्याच ताकदीने आणि हिंमतीने त्या परिस्थितीला निभावूनही नेले.
पण यात गंमत अशी असते की जेव्हा एक व्यक्ती एकटी दहा लोकांशी वाद घालत असते तेव्हा भले ती चुकीची का असेना, पण बघणारयांना त्या एकट्या व्यक्तीचेच कौतुक वा किमान आकर्षण तरी वाटते. तिने नेमके हेच आणि याचसाठी केले.

3) पटकन सॉरी बोला, मोकळे व्हा -
जिथे कुठे प्रकरण अंगाशी येतेय असे तिला वाटले तेव्हा ती पटकन सॉरी बोलून मोकळी झाली. जिथे निगेटीव्ह पब्लिसिटी मिळेल अश्या गोष्टी ताणून धरल्या नाहीत.

4) ईतर सदस्यांना बिथरवले पण स्वत: शेवटपर्यंत बिथरली नाही -
जसे की तो एक पुष्कर नामक ईसम बिथरला होता. शेवटच्या आठवड्यात आता मेघाच जिंकणार आणि आपण ईथवर येऊन थोडक्यासाठी हरणार या भितीने वेड्यासारखा बरळू लागलेला. नव्वद दिवस ज्या मेघाच्या खांद्याला खांदा लाऊन खेळत होता तिच्याबद्दलच वाईटसाईट बरळू लागलेला. काय तर म्हणे ही मुलगी मला पहिल्यापासूनच पटली नाही. आणि हा साक्षात्कार त्याला शेवटच्या आठवड्यात झाला. हास्यास्पद होते सारे त्याचे बोलणे.
सई देखील त्याच्या हो ला हो मिळवत होती आणि आस्तादही. तो आस्ताद तर नेहमी मेघा काही बोलताच कुत्सितपणे हसायचा.
जसा खेळ जवळ जात होता तसे मेघाच जिंकणार या भितीने सारेच तिच्याविरुद्ध बोलत होते, तिची ईमेज डागाळायचा एकत्रित प्रयत्न करत होते. ही वेळ त्यांच्यावर मेघानेच आणली होती आणि तिलाही तेच पाहिजे होते. कारण जेव्हा सारे एकाच व्यक्ती विरोधात बोलतात तेव्हा त्याला सपोर्ट करायला पब्लिक येते. तसेच ईतर सर्वांचे असे वागणे त्यांच्यामतेही मेघा धाडेच विजयी होण्याची सर्वाधिक शक्यता आहे यावर शिक्कामोर्तब करत होते.

5) तिने टिकाकार जमवले -
चाहते भले शंभर जमवा, पण टिकाकार पंधरावीस हवेतच.
एक म्हणजे ते तुमच्यावर टिका करायच्या नादात तुम्हाला सतत चर्चेत ठेवतात जे काम शंभर चाहतेही करू शकत नाहीत.
आणि दुसरे म्हणजे तुमच्यावर अशी टोकाची टिका होऊ लागल्यास तुमचे सारे चाहते तुमच्या समर्थनार्थ एकवटतात. पब्लिक वोटींगमध्ये याचा नेमका फायदा होतो.

...

तर हा आहे एकंदरीत ठोकताळा. बिगबॉसच्या घरात यानुसार वागणारी मेघा धाडे एकमेव असल्याने ती निर्विवादपणे विजेती ठरणार यात मला जराही शंका नव्हती !

.... आणि अखेर तीच जिंकली Happy

अभिनंदन मेघा धाडे

तुझ्या या गेमप्लानमुळे आता पुढच्या सीजनला फार्र फार्र मजा येणार आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता मेघा जिंकल्यानंतर तिच्या प्रवासातून काहीतरी पॉइंटस काढून त्यामुळेच ती जिंकली आणि आपण कसा सखोल अ‍ॅनालिसिस केलाय हे दाखवणे अत्यंत हास्यास्पद आहे.

बाकी कोणीही जिंकले असते तरीही असा लेख येऊ शकला असता.

आणि शो सुरू असतानाच जर तुम्ही हे पॉइंट्स शोधून त्यातून मेघाच कशी विनर ठरेल हे सांगितलं असतं तर त्या गोष्टीला काहीतरी अर्थ होता.

शिवाय, मेघाचे हे पॉइंट्स म्हणजे बिग बॉस जिंकण्याचा जालिम फॉर्म्युला आहे असा तुमचा भाबडा गैरसमज असेल तर तो तोच आहे - भाबडा गैरसमज. तिथे अनेक डायनॅमिक्स असतात.

हे म्हणजे एखादी गोष्ट घडून गेल्यावर मीच भविष्यवाणी केली होती असं म्हणण्यासारखं आहे.

तात्पर्य काय, तर चिरविश्रांतीसाठी गेलेल्या आयडीला पुन्हा उगाच कामाला लावू नका.

मामी ,च्रप्स (कस टाईप करता हे नाव मोबाईलवरून ? मी कॉपी पेस्ट केलेय ) +१००

हे म्हणजे एखादी गोष्ट घडून गेल्यावर मीच भविष्यवाणी केली होती असं म्हणण्यासारखं आहे.>>>> Perfect !

बटाट्याच्या चाळीतल्या अण्णा पावशेच्या भविष्यकथनाची आठवण झाली Lol Proud

ऋन्मेष is back.
बाकी तुला ऋन्मेष, अभिषेक हिच नावे शोभतात. भास्कर नाव एखाद्या प्रौढ व्यक्तीचे वाटते.

आता मेघा जिंकल्यानंतर तिच्या प्रवासातून काहीतरी पॉइंटस काढून त्यामुळेच ती जिंकली आणि आपण कसा सखोल अ‍ॅनालिसिस केलाय हे दाखवणे अत्यंत हास्यास्पद आहे.
>>>>

मामी तुम्ही क्रिकेट पाहता का?
त्यात सामना संपल्यावर सुद्धा एनालिसिस करतात. जर हे हास्यास्पद असेल तर हे हास्यास्पद काम गावस्कर, गांगुली, शास्त्री, हर्षा भोगले आदी मंडळी करतात.

असो, मी ईथे तिथे यन नंबर ऑफ टाईम्स मेघा जिंकणार हे लिहिले होतेच.
मायबोलीवरचा बिगबॉसवरच्या पहिल्याच धाग्यातही हेच लिहिलेले होते. बहुधा संक्षिप्त रुपात हे कारणही लिहिले असावे.

<<< तिथे अनेक डायनॅमिक्स असतात >>>> मला आपल्या पोस्टमधील हे टिपिकल वाक्य वाटतेय जे कुठेही वापरता यावे. कुठले डायनॅमिक्स, त्यांचे वेटेज काय, ते कसे काम करतात वगैरे लिहाल तर मजा येईल Happy

{{{ तिने शोला टीआरपी मिळवून दिला - सकाळी उठल्यापासून नाचणे असो ते मोठ्याने गूड मॉर्निंग बिगबॉस बोलणे असो वा स्वयंपाकघरातील कामे असो, तिने स्वत:चा एक दिनक्रम आखून घेतला होता ज्यात कॅमेरयाचा फोकस आपल्यावर कसा जास्त राहील हे पाहिले.
मग तिने आपल्या बोलण्याने आणि पुढे पुढे करण्याच्या सवयीने कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायला सुरुवात केली. नव्हे ईतरांच्या कॉन्ट्रोव्हर्सीतही लुडबुड करायला सुरुवात केली. प्रत्येक राड्यात, लफड्यात आपण लाईमलाईटमध्ये राहू हे बघतानाच आपणच त्याला जबाबदार राहू हे देखील पाहिले.

पण यात गंमत अशी असते की जेव्हा एक व्यक्ती एकटी दहा लोकांशी वाद घालत असते तेव्हा भले ती चुकीची का असेना, पण बघणारयांना त्या एकट्या व्यक्तीचेच कौतुक वा किमान आकर्षण तरी वाटते. तिने नेमके हेच आणि याचसाठी केले.

ईतर सदस्यांना बिथरवले पण स्वत: शेवटपर्यंत बिथरली नाही -

तिने टिकाकार जमवले -
चाहते भले शंभर जमवा, पण टिकाकार पंधरावीस हवेतच.
एक म्हणजे ते तुमच्यावर टिका करायच्या नादात तुम्हाला सतत चर्चेत ठेवतात जे काम शंभर चाहतेही करू शकत नाहीत.

}}}

म्हणजे थोडक्यात ती बिगबॉसमधील ऋन्मेषा आहे तर...

मेघासाठी (मेघा to award) तुझ्या आवडत्या शाखाचा डायलॉग :

इतनी शिद्दतसे तुम्हे पाने की कोशिश की
के हर लम्हे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की

<<,म्हणजे थोडक्यात ती बिगबॉसमधील ऋन्मेषा आहे तर...<<<

ऋन्मेष हा मेघा धाडेचा माबो आयडी आहे की काय? Uhoh

मनिल हो, या धाग्याची त्या धाग्यासोबत तुलना करता खरेच आवश्यकता नव्हती असे बोलू शकता.
झाले काय, तर आमचा बिगबॉसचा व्हॉटसपग्रूप होता. आम्ही म्हणजे ऑर्कुट काळापासूनचे नेट फ्रेंडस. साधारण पन्नाससाठ आहोत. तर जेव्हा आम्हाला असा घमासान चर्चेचा विषय मिळतो तेव्हा आम्ही त्याचा वेगळा ग्रूप काढतो जेणेकरून ईतर ईंटरेस्ट नसलेल्यांना त्रास होऊ नये.

तर या ग्रूपातही साधारण तीसेक जण होते. आणि त्यात मी एकटाच मेघा धाडेचा समर्थक होतो. गंमत म्हणजे बाकी कोणाचेही समर्थक असोत, तिच्या विरोधातच बोलायचे. मलाही शिव्या घालायचे. त्यांच्यामते आम्हा दोघांची मेंटेलिटी सेम आहे, कारण मी सुद्धा त्या ग्रूपवर सतत वादच घालत असतो. अर्थात माझे ईकडचे रूप वेगळे आहे आणि तिकडचे वेगळे आहे, तिकडे सारे माझे जिगर के छल्ले आहेत, त्यामुळे मनसोक्त वाद घालतो त्यांच्याशी.
असो, तर काल जेव्हा ती जिंकली तेव्हा मी आता येऊन धिंगाणा घालणार या भितीनेच सारे बिथरले होते. रात्रभर एकेकाची तडफड चालू होती. मी ती मूकपणे बघत होतो. सकाळी जेव्हा सारे फडफडून शांत झाले तेव्हा वरची पोस्ट लिहिली. दोनचार मेघा धाडे समर्थक पुढे सरसावले आणि वा वा म्हणून ही पोस्ट फॉर्वर्ड केली. त्यामुळे मलाही जरा बळ आले आणि त्याच जोशात ती पोस्ट जशीच्या तशी उचलून ईथे धागा काढला.

मात्र मुद्दा एकूण एक न्यूटन लॉव ऑफ मोशन सारखा तंतोतंत आहे !

मेरिटमध्ये आलेल्या पोरांचे फोटो छा/ढापून क्लासेस स्वतःची जाहिरात करतात, त्यातला प्रकार.
>>>

एका वाक्यात तीन Happy

बाकी तुला ऋन्मेष, अभिषेक हिच नावे शोभतात. भास्कर नाव एखाद्या प्रौढ व्यक्तीचे वाटते.
>>>>>>>
Happy
अपघातानेच ईथून धागा काढावा लागला.
वर म्हटल्याप्रमाणे व्हॉटसपोस्टनंतर ईथे धागा काढायला गेलो तर माबोवर झालेल्या नवीन बदलाने भास्कर लॉग आऊट झालेला. आणि पासवर्ड सेव्ह दाखवत नव्हता. तोंडपाठ नसल्याने आठवत नव्हता. मग ईथून लॉगिन झालो. आपली मेघा जिंकली आहे आणि कशी जिंकली आहे हे आजच्या आज टाकायचे होते. त्यामुळे घरी जाऊन रात्री भास्करचा पासवर्ड शोधा आणि मग त्यातून धागा काढा ईतका वेळ नव्हता.

म्हणजे थोडक्यात ती बिगबॉसमधील ऋन्मेषा आहे तर...
>>>>
नाही बराच फरक आहे.
मुळात मायबालो वा तत्सम सोशलसाईट आणि बिगबॉससारखा रिअ‍ॅलिटी शो यांची तुलना चुकीची आहे.
तिथे दिसते तसे असते. ईथे तसे असेलच याची खात्री नसते.
ईथे आपण मनोरंजनासाठी येतो, ते करतो, आणि जास्त डोक्याला त्रास झाल्यास निघून जातो.
ईथे लॉगिन लॉग आऊट करता येते.
तिथे ती सोय नसते.
तुमच्या डोक्यात जाणार्‍या माणसांसोबतही तुम्हाला राहायचेच असते.
म्हणूनच एखादा प्लान डावपेच करून तिथे येणे आणि त्याबरहुकूम शेवटपर्यंत टिकून राहणे हे प्रत्यक्षात अंमलात आणायला फार कठीण आहे. मेघाने ते करून दाखवले म्हणून मला तिचे कौतुक आहे Happy

अरे 2 आयडी ची गरज काय?
>>>>>
वेगळे कारण आहे. वेळ आल्यावर उत्तर देईन किंवा समजेल. बाकी ईथे गरज नाहीये मला दोन आय्डींची. नियमात बसत नसेल् तर वेमांशी बोलून एक कुठलातरी ब्लॉक करेन. नो प्रॉब्लेम Happy