पैसा आला धावुण.......!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आज रात्रो ठिक साडे बारा वाजता भारतीय लोकशाहीचे एक भयनाट्य सुरु होईल. प्रचंड प्रमाणात पैसा, दारु अन ई.ई. चा पुर येउन त्यात लोकशाहीचे प्रेत वाहुन जाईल.
तर तम्माम नागरिकांनो, आज आत्ता ताबडतोब, दोन मिनिटे शांत बसुन, आपण आपल्या लोकशाहीला आदरांजली वाहु!

अन उद्या सकाळी तिची अंत्ययात्रा काढायला सकाळी ७ वाजता पुन्हा हजर राहु!

वेळ- सकाळी ७ ते संध्याकाळी ५.
ठिकाण- गावची पडकी शाळा.
साहित्य- निळे रंगीत पाणी.
कृती- कळ दाबणे.

प्रकार: 

चम्प्या , तू निवडलेल्या उमेदवाराचा पक्षच असा आहे की त्याला हे असलं अ‍ॅन्टीसिपेटरी विव्हळायची सवय आहे..... त्यामुळे तो गुण तुलाही लागलेला दिसतोय. Happy

आज दुपारी मिळालेल्या बातमीत तुझ्या उमेदवाराची स्थिती बरीच सुधारले असून तो आता निवडून येऊ शकतो या लीगमध्ये आला आहे.... (आता मात्र लोकशाही एकदम परिपक्व वाटत असेल तुला. ढोंगी कुठला...! :))

अ‍ॅन्टीसिपेटरी विव्हळायची >>> मराठी प्रतिशब्द काय> Happy

दुपारपर्यंत सगळे ठिक च असते, गोंधळ रातीलाच होतो! १००० च्या रेट ची बातमी होती मग आरडु नको त काय करु!

यंदा इअक्डुन पण बर्‍यापैकी तयारी आहे,,,,, सो , नो - विव्हळणे!!! Happy

श्री....... उम्मीद पे दुनिया काय्म है! जै हिंद! Happy

अ‍ॅन्टीसिपेटरी = घटनापूर्व
विव्हळण्याला 'इवळणे' हा अत्यन्त अर्थवाही शब्द आहे माझ्या गावाकडे आणि तुझ्याही.. Happy

आता तुला इवळण्याचे पार्श्वसंगीतही मनातल्या मनात ऐकू येईल बघ...
QV44K9CA30ZERBCAQI87IYCAD79K7QCAPX9KPRCAL9VMXTCAGE4YDFCAWY1CQ0CA4KNOVNCAY9W6M7CA41LP3NCA6WJNRMCACGF33VCAKYY8PZCAO0NNBHCAJALWOLCAORB5U1CAQP1FQNCAR0N0Z2.jpg

१००० ची पुंगी सोडुन दिली अन प्रत्यक्षात २०० अन ३०० ने वाटप केले गेले.. हा अन्याय हे Happy
किमान ५०० तरी?.... दिवाळी हाय का नाह्य?

आमचे १०० बरे मग! Happy किमान लोकांना खोटी स्वप्नं दाखवुन भ्रमनिरास तरी केला नाही!

... १००० चे पुंगी आम्ही च वाजवली होती.... मधल्यांनी ७००-८०० खाल्ले असं बेमालुम पसरवलं! जै हो!

भेटु २२ ला......! Happy