तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय कोणता होता??

Submitted by कटप्पा on 18 July, 2018 - 23:08

आज गप्पा चालल्या होत्या, आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय कोणता होता( best decision in your life).
माझे मन भूतकाळात गेले - इंजिनिरिंग 2010 मध्ये पास झाल्यानंतर मला एका मोठ्या आयटी कंपनीत जॉब लागला होता. बंगलोर ला पोस्टिंग, 25 हजार पगार - माझ्यासारख्या गावाकडे 10वी पर्यंत शिक्षण झालेल्या मध्यम वर्गीय मुलासाठी स्वप्न सत्यात उतरल्या सारखे होते.
2011 पर्यंत स्वप्नांना तडा गेला असे वाटू लागले, काम ते नव्हते जे मला अपेक्षित होते. गाणी ऐकत दिवस दिवस कोडींग वगैरे माझ्या अपेक्षा होत्या पण मी इथे एक्सेल शिटा भरत होतो.डेटा मॅपिंग करत होतो.
कॅन्टीन मध्ये जायचो लोक म्हणायचे, लकी आहेस हा प्रोजेक्ट मिळाला, या प्रोजेक्ट मधून 2 वर्षात onsite मिळते म्हणजे मिळतेच.
काही मित्र आधीच मास्टर्स करायला तिथे गेले होते, फोटो टाकत होते, पार्ट टाईम जॉब करून पैसे कमवत होते. अमेरिकेत जायला मिळेल, डॉलर्स मिळतील आणि मी अशा प्रोजेक्ट मध्ये होतो.
2011 च्या ऑक्टोबर मध्ये मॅनेजर म्हणाला पुढच्या वर्षी साठी तुझा व्हिसा प्रोसेस आपण सुरू करणार आहोत.

आणि दोन आठवड्यात मी पेपर टाकले ( राजीनामा दिला).

का?? कारण US ला जायचे म्हणजे हे काम बंगलोर मध्ये 1 ते 2 वर्षे करा आणि नंतर onsite जाऊन पुढची 2 ते 4 वर्षे हेच काम. म्हणजे 6 वर्षे मी फक्त एक्सेल मध्ये, आणि मग अडकून रहा आणि असे रोल करत रहा.

तर मी onsite नको म्हणालो, US ला नको म्हणालो आणि मी एक स्टार्ट अप जॉईन केली. जिथे मला रोज नवीन चॅलेंजिंग काम होते,इंटरेस्टिंग होते आणि मला आवडणारे होते.

तर अशा प्रकारे मी 1 लाख + एम्प्लॉयी वाली कंपनी सोडून टोटल 15 जण असणाऱ्या स्टार्ट अप ला आलो. 30% पगार कट घेतला( कमी पगारावर आलो). सगळे म्हणाले मी चुकीचा निर्णय घेतला आहे. पण तोच निर्णय मला 2016 मध्ये अमेरिकेत घेऊन गेला आणि ते देखील मला आवडणाऱ्या कामात , जवळजवळ तिप्पट पगार जो मला जुन्या onsite position मध्ये ऑफर झाला होता आणि अशा कंपनीत जिथे माझा resume जुन्या स्किल्स वर कधीच सिलेक्ट नसता झाला.

आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय - पैशाच्या मागे न धावता, आवडत्या क्षेत्रात जाणे.

तुमच्या आयुष्यातील( करियर, लाईफ कशातीलही) सर्वोत्तम निर्णय कोणता होता???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सज्ञान झाल्यापासूनचे सगळे निर्णय माझ्या मनाने घेतलेत, घरच्यांचा/ नातलगांचा /परिस्थितीचा दबाव झुगारून. आनि त्यातल्या कोणत्याही निर्णयाबद्दल पश्चात्ताप करण्याची वेळ आलेली नाही. कसोटीच्या क्षणी मला माझ्या तत्त्वांना चिकटून राहता आलं, याचा मला अभिमान आहे.

अ‍ॅमी, तुमचं खरंच कौतुक. तुम्ही घेतलेला निर्णय प्रोअ‍ॅक्टिव्ह होता. आता विचार करताना लक्षात आलं की मी असे खुप कमी निर्णय प्रोअ‍ॅक्टिव्हली घेतलेत. निवड करायची वेळ आली, तेव्हाच केलीय. गेल्या साताठ वर्षांत मात्र यात बदल झालाय. काही गोष्टी प्रोअ‍ॅक्टिव्हली केल्यात. त्यातही लोक काय म्हणतील याचा विचार झुगारून दिलाय. या निर्णयांनी माझ्या जगण्यात अमूलाग्र असा नाही, तरी मोठा फरक पडला.
अ‍ॅमी, तुम्ही ते पंचविशीत केलं, म्हणून कौतुक.

निर्णयांबद्दलचा अधिक तपशील देणं खूप पर्सनल होईल, त्यामुळे लिहीत नाही.

मी आतापर्यंत स्वतः घेतलेला जवळपास प्रत्येक निर्णय चुकीचाच होता! Happy आंधळ्याच्या गायीप्रमाणे मला देव राखतो, म्हणून तगलोय.
इन द वर्ड्स ऑफ परोपकारी गंपू, "आजचे माझे यश" हे केवळ (आकाशातल्या) बापामुळे आहे Lol

mi_anu आणि भरत दोघांचे आभार Happy

पण एवढं कौतुक करण्यास मी पात्र नाहीय. कारण सांगते:
मी पूर्वी एका कुठल्यातरी धाग्यात माझ्या एका मैत्रिणीचा उल्लेख केलेला. पोस्टात काम करणाऱ्याच्या पाच मुली+सहावा मुलगा यांपैकी ही चौथी मुलगी. बरंचसं शिक्षण स्वतःच स्कॉलरशीप मिळवून केलेल. दोनचार कपडे आणि हजार रुपये घेऊन पुण्यात आलेली. इकडे येऊन सिम्बितुन MBA केलं. तिला स्वतःच घर, कार वगैरे सगळं स्वतः करायचं होत. मग ती मला पकडून घेऊन जायची सोबत. ती नसती तर मी स्वतः एकटीने हे केलं असतं का शंका आहे कारण माझी मूळ प्रवृत्ती materialistic नाही. एकंदर बरेचसे नशीब आणि थोडेफार प्रयत्न याचा परिपाक होता तो घर घेण्याचा निर्णय माझ्यासाठीतरी.

मी माझ्या काही कलीग मुलींना ओढून घेऊन जायचे घरं बघायला पण त्यांनी काही ते केलं नाही. त्या मुलींपेक्षा मी बरी पण या मैत्रिणीपेक्षा कमीच.

परत एकदा आभार _/\_

आता आठवलं, शाळेत असतानाही अनेक निर्णय स्वतःच घ्यायचो. म्हणजे स्पर्धा परीक्षांना बसायचं, सहलीला जायचं की नाही, क्लास लावायचा की नाही, गाइड हवीत की नकोत. आईवडिलांनी कोणतीही गोष्ट लादली नाही किंवा मी तेव्हापासूनच फार दगड असेन याबाबतीत.

काही कथा खरंच प्रेरक आहेत. धागाकर्त्याने लिहिलेला स्वत:चा अनुभवही आवडला. तरूण वयात हे सर्वांना जमतंच असं नाही.

धागा सुरू झाल्या झाल्या पाहिला होता. तरी अजून आपला सर्वोत्तम निर्णय कोणता हे ठरवता आलेलं नाही. कदाचित अजून ती वेळ यायचीय; किंवा कदाचित आजवरचे सगळे निर्णय चांगलेच ठरलेत.

वरती कुणीतरी म्हटलंय तसं, आपल्या निर्णयांची २०० टक्के जबाबदारी घेण्याची तयारी असली की सर्व निर्णय चांगलेच ठरतात,; कारण निर्णय घेण्यापूर्वी त्यावर २०० टक्के विचार झालेला असतो; हेच माझंही मत आहे.

धागा वाचत राहणार.

माझ्या लग्नानंतर एक महिन्यातच वडिलांची तातडीने अँजिओप्लास्टी करावी लागणार होती. डॉक्टरांनी ३ लाखाचे बजेट सांगितले होते. लग्नामध्ये बरेच पैसे खर्च झाले होते आणि मेडिक्लेमचे महत्व न कळल्यामुळे पॉलिसी सुद्धा नव्हती. तेव्हा मित्राने कंपनीमध्ये जॉईन झाल्याझाल्या पूर्ण कुटुंबाला मिळणाऱ्या मेडिक्लेम पॉलिसी बद्दल सांगितले. ज्याच्याकडे मी नेहमीच कानाडोळा करत आलेलो. त्या पॉलिसी मुळे कोणाकडे सुद्धा पैशांसाठी हात पसरावे लागले नाहीत. सर्वे पेमेंट कॅशलेस ने केले. MNC मध्ये जॉब करण्याचा निर्णय सर्वोत्तम असलेल्या निर्णयांपैकी एक होता.

मस्त धागा ..
आम्ही रहात असलेल्या जागेचं टायटल आमच्याकडे नव्हतं, पण तरी ही मी ती आमची असच समजत होते. ज्या दिवशी हे मला समजलं की ती जागा माझी नाही त्या दिवशी जास्त भानगडीत न पडता ती सोडायचा मी निर्णय घेतला. मी टेक देऊन तिथे राहू शकत होते . मी रहात होते तो पर्यंत मला तिथून कोणी ही घालवून देऊ शकत नव्हतं तरी ही मी मोह न ठेवता तिथे चिकटून राहिले नाही हा मला माझ्या आयुष्यातला सर्वात योग्य निर्णय वाटतो. आज अशा जागेच्या मोहापायी कितीतरी जणांचं आयुष्य ruin झाल्याचं मी बघते तेव्हा तेव्हा माझा निर्णय किती बरोबर होता हे मला पुन्हा पुन्हा पटत.

मी आतापर्यंत स्वतः घेतलेला जवळपास प्रत्येक निर्णय चुकीचाच होता! आंधळ्याच्या गायीप्रमाणे मला देव राखतो, म्हणून तगलोय.
इन द वर्ड्स ऑफ परोपकारी गंपू, "आजचे माझे यश" हे केवळ (आकाशातल्या) बापामुळे आहे >>>>

Happy Happy सहमत.
माझे सगळेच चुकलेय... पण आता या टप्प्यावर पोचल्यावर वाटते की चुकले ते बरेच झाले. हे शब्दात नीटसे मांडता येणार नाही.

मी घेतलेला एकमेव चांगला निर्णय म्हणजे सरकारी नोकरीची चालून आलेली संधी सोडून जे आवडते होते ते केले, घरात सुद्धा जास्त विरोध झाला नाही, तुला आवडत नाही तर नको म्हणून त्यांनी विषय संपवला.

२५ वर्षांची असताना, बाकी कोणताही फायनांशिअल बॅकअप नसताना एकटीने पिंचिंत घर विकत घेणे. >>> अ‍ॅमी, सही!
(मी साधारण २५ चा असताना माझा एक तज्ञ मित्र मला आमच्या कंपनीजवळ एका नवीन स्कीम मधे घर घ्यायला सांगत होता आणि मी ते घेतले नाही. तो सल्ला किती योग्य होता हे नंतर लक्षात आल्याने तुमचा निर्णय ही कळतो Happy )

धन्यवाद फारएण्ड Lol

पुण्यात आयटी आणि प्रॉपर्टी बूमला नुकतीच सुरुवात झाली होती तेव्हाचा काळ होता हा. एक-दोन वर्ष ऑनसाइट राहून परत येणारे पटकन रोहाऊस किंवा 3bhk घेत होते. मोठमोठाली luxurious अपार्टमेंट बनण्याचा काळ. नंतर दोनेक वर्षातच एकट्याने घर घेणं सर्वसामान्याला जवळपास अशक्य झालं.
आमचा कॉस्मो शेजार बघून लक्षात येतं की बऱ्याच मराठी माणसांनी हि संधी घेतली नव्हती. नंतर मग त्यांना अजून लांब जावं लागलं किंवा खूप जास्त पैसा मोजावा लागला.

अ‍ॅमी एकदम खरं.
सध्या पुण्यातला बूम नोकरी वाल्या माणसाच्या हाताबहेरचा आहे. बालेवाडी हाय स्ट्रीट समोर २.४ करोड ला घर आहे.कितीही मोठे पगार, २ जण कमावणारे असले तरी इतक्या रकमेचे पहिले घर आणि त्याचे इ एम आय ही मोठी रिस्क ठरते.अशी घरं पहिलं पुणे सिटी तलं घर विकून पाउण करोड हातात आलेले लोक घेऊ शकत असावेत.
(म्हणून बहुधा आमचे 'कल्पतरु जेड मध्ये किंवा बालेवाडी हाय च्या समोर फ्लॅट घेतला' सांगणारे कोणीच मित्र नसावेत Happy )

पुण्यात amenities पण काही ही-fi नसतात. >>> खरंय. वेडे आहेत ते लोक. इतर ठिकाणी बघा. दूधासाठी सोसायटीची स्वतःची म्हैस असते. शेणापासून गोबर गॅस, कच-यापासून बायो गॅस, सोनखताचा प्लाण्ट अशा अ‍ॅमेनिटीज असतात. शेणापासून गव-या सोसायटीतच थापून वाळवाण्यची सोय असते. त्यामुळे चुलीसाठी इंधन उपलब्ध होते. सकाळी सकाळी प्रत्येक बिल्डींगच्या खाली बंब पेटवतात. त्यात गव-या घातल्या की अंघोळीसाठी गरम पाणी मिळते. ज्याला हवे त्याने बादली घेऊन यायची आणि घेऊन जायचे.

पुण्यात काय तर येऊन जाऊन ते स्विमिंग पूल, एक मंदीर, जिम, बाग, मुलांसाठी खेळणी, जॉगिंग ट्रॅक, क्लब हाऊस, जिम, टेटे, बॅडमिंटन, ओपन ऑडीटोरीयम, पाइप्ड गॅस, व्हिडीओ बेल, इंटरकॉम, केबल कनेक्शन, कॉमन फिल्टर, सिक्युरिटी, वाय फाय कनेक्शन, सीसीटीव्ही, लेव्हल्ड पार्किंग किंवा मोटराईज्ड पार्किंग, फायर फायटिंग सिस्टम आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या शिवाय पुढे मजल जात नाही हो... तुमच्याशी शंभर टक्के सहमत !

तुमचे घर कुठे कोल्हापूर, ट्रंप कॉलनी की लातूर ?

Swimming pool has two categories: indoor and outdoor. Indoor is usually temperature controlled heated swimming pool.
Badminton court should be indoor with wooden flooring.
Squash court with viewing galary.
Atm kiosk,
mini-mart,
banquet hall,
restaurant,
library room,
Snooker and pool tables
Card room
100% power backup with auto on-off
Customers care with helpers at least plumbers, electricians on call
These should be for exclusive usage of residents.
Some complex has community vegetable garden patch.
If so much money is being paid then sky should be the limit for amenities

Blue ridge had marina and golf course (not sure?) But they weren't exclusive for residents. Paid membership to outsiders was provided.

केबल कनेक्शन, कॉमन फिल्टर, सिक्युरिटी, वाय फाय कनेक्शन, सीसीटीव्ही, लेव्हल्ड पार्किंग किंवा मोटराईज्ड पार्किंग, फायर फायटिंग सिस्टम आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग, बाग, मुलांसाठी खेळणी, ----' these are necessities of big complex not amenities. Builders sell those as amenities but it's not so.

Any famous Bangalore builders give these. And any B grade builder offer what is mentioned in your post. So the statement about 2+cr price and not enough exclusive amenities.

राजसी पुन्हा एकदा सहमत. तुम्ही खूप अचूक लिहीता.

पण अंतर्गत बुलेट ट्रेन, फाईव्ह स्टार हॉस्पिटल, क्लस्टर लेव्हल थ्री स्टार हॉस्पिटल, जलवाहतूक, अंतर्गत हेलीकॉप्टर सर्व्हिस, व्हिसा पासपोर्ट ऑफीस, पोस्ट ऑफीस, पावर जनरेशन, मॉल्स, मल्टीप्लेक्स हे राहीलं

प्राईड वर्ल्ड सिटी म्हणून आहे बघा प्रोजेक्ट लोहगाव च-होलीला. ४०० एकरात आहे. फक्त किंमती तुम्ही म्हणता तशा जास्त आहेत. पाच लाखाच्या आत रो हाऊस हवे अशा ठिकाणी.
https://www.prideworldcity.com/

Done Happy

भरत +१

स्वत:च्याच गर्लफ्रेंडशी लग्नाचा निर्णय Happy

कारण एक क्षण असा होता की खरेच मी मनाला कि मनाने मला, की दोघांनी एकमेकांना प्रश्न विचारलेला.. का? खरेच गरज आहे का याच मुलीशी लग्न करायची?

एकतर तुझे तिच्यावर प्रेम आहे की नाही याचा तुला पत्ता नाही. फक्त आपल्यावर मनापासून प्रेम करणारी कोणीतरी मिळतेय म्हणून खुश होतोय. पण ते प्रेम आयुष्यभर राहील का याची ग्यारण्टी नाही. ते प्रेम तुझ्याही मनात उत्पन्न होईल का याची कल्पना नाही. मग जातपात, प्रांतप्रदेश, रंगरूप, वजनऊंची, आवडीनिवडी, आचारविचार, ईतकेच नव्हे तर स्वभाव आणि जोडीदाराकडून असणारया अपेक्षा ईत्यादी काहीच जुळत नसताना, घरचेही नाराज असताना, आणि हे देखील काय कमी म्हणून पत्रिका जुळवल्यावर मृत्युयोग असताना त्याच मुलीशी लग्न करायचा अट्टहास का?

घरी आईने बोलणे टाकलेय, वडिलांना सांगायची हिंमतच नाही, तिच्या वडीलांनी आपल्याला रागच दिलाय, तिच्या भावाच्या तर हे प्रकरण कानावरही नाही, तिच्या आईने सौम्य भाषेत लग्नातले अडथळेच दाखवले आहेत, बहिणींनी तिला स्पष्ट सांगितले आहे की हा पोरगा तुझ्या टाईपचा नाही, आपल्या ज्या जवळच्या खास मित्रांना हे माहीत आहे त्यांचेही हेच मत, ऑनलाईन पोरीने गंडवलेय तुला...

पण माझ्यासाठी नेमकी हिच तेवढी जमेची बाजू. ऑनलाईन चॅटींगमध्ये जुळलेली केमिस्ट्री आणि त्यातून आपल्याला झेलू शकेल अशी ही एकव मुलगी या जगात आहे हा आलेला विश्वास. बस्स याच्याच जीवावर हे धाडस.

रजिस्टार ऑफिसमध्ये एक महिन्याची नोटीस देतानाही एक महिन्यात काय तो फायनल निर्णय घेऊया हाच विचार डोक्यात...

आणि मग असे काही घडले की बस्स ठरवले!
त्या स्थितीत तो निर्णय प्रेमापेक्षा वा कुठल्याही स्वार्थापेक्षा माणुसकीचा होता.
त्यानंतर एक काय दोनदा लग्न केले मग त्याच मुलीशी. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. आयुष्यात एकाही, अगदी रागाच्या क्षणालाही वाटले नाही की आपला निर्णय चुकला.. उलट दिवस वर्ष महिने सरत आहेत, दोनाचे तीन, तीनाचे चार होत आहेत तसे हाच आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता या विचाराला बळकटी मिळत आहे Happy

पण अंतर्गत बुलेट ट्रेन, फाईव्ह स्टार हॉस्पिटल, क्लस्टर लेव्हल थ्री स्टार हॉस्पिटल, जलवाहतूक, अंतर्गत हेलीकॉप्टर सर्व्हिस, व्हिसा पासपोर्ट ऑफीस, पोस्ट ऑफीस, पावर जनरेशन, मॉल्स, मल्टीप्लेक्स हे राहीलं>> आंतरराष्ट्रीय विमानतळ? डिरेक्ट नूवर्क फ्लाइट राहिल. बघा तेव्ढ अ‍ॅड करा.

मी सहा सात वर्शांपूर्वी हैद्राबादचा चांगला चालता धंदा सोडून मुंबईला बॅग बॅगेज किड डॉग्स शिफ्ट झाले. हा एक बेस्ट निर्णय. मुंबई लाइफ ला कॉर्पोरेट लाइफला अ‍ॅडजस्ट होताना खूपच हाल झाले वैयक्तिक लेव्हलवर पण धंदा करणे हे दुसृया कोनाचे तरी स्वप्न होते त्यात मी अडकल्याने काही फरक पडत नाही ते सोडावे आपल्याला जीवनात नक्की काय हवे आहे त्याचा शोध घ्यावा असा प्रयत्न होता. खूप मोठी अंतर्गत विचार प्रक्रिया पूर्ण केली. धंद्यातल्या लायबिलिटीज एकटीने पूर्ण करून स्वाभिमा न कायम ठेवला, मुलीला उत्तम दर्जाचे शिक्षण, मराठी समाजाचे एक्स्पोजर व ग्लोबल एक्स्पोजर द्यायचे एक पालक म्हणून प्रयत्न केले. हैद्राबादला सुरक्षितता होती पण स्टॅग्नेशन होते. मुंबईत असुरक्षितता आहे पण कामाच्या अन बिलीव्हेबल संधी आहेत.

जन्म घालवला त्या सेल्स मधून बाहे र पडून उलटा प्रवास सुरू केला. एस ए पी शिकले पन्नाशीत. प्रत्येक टर्न वर
लढत, नवी स्किल्स नव्या सिचुएशन्स शिकत आत्मसात करत स्वतःचा स्वभाव समजून घेत एकट्या स्त्रियांबद्दलच्या
अ‍ॅटिट्यूडचा सामना करत पुढे जात राहिले. बट आय स्टिक थिंक इट वॉज द बेस्ट डिसिजन आणि मी तो एकट्याने घेतला. आई बाप नवरा कोणाचा इमोशनल पण आधार नाही. हा बरोबर आहे का ह्याचे मलाच खरे तर टेन्शन होते.
ह्या निमित्ताने लिहिले. हॅपी वीकेंड.

Pages