Submitted by सुप्रिया जाधव. on 12 July, 2018 - 03:46
तुझ्यासाठी तिथे व्याकूळ नजरा पावसा
इथे का मारतो आहेस चकरा पावसा ?
भरवश्यावर तुझ्या निर्धास्त केली पेरणी
बळीचा बनवला आहेस बकरा पावसा
तुझ्या येण्यामुळे येते कुणाची आठवण
नको देऊ असा आनंद दुखरा पावसा
तुला झिरपायचे असल्यास संततधार ये
कधी कोसळ तुझा सोडून नखरा पावसा
तिला किंवा तिला भिजवायचे आॅप्शन तुला
तुझ्याविण ना मला पर्याय दुसरा पावसा
कधी डोळयात मुरलेला, कधी ओठांमधे
सहजतेने तरी म्हणतोस विसरा पावसा ?
प्रतिक्षेने तुझ्या कोमेजली आहे धरा
तिच्या वेणीत जा माळून गजरा पावसा
महानगरात माणुसकी भयानक तुंबली
मनांचा व्हायचा नाहीच निचरा पावसा
सुप्रिया
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच!
छानच!
वाह् व्वावा छान गझल!
वाह् व्वावा छान गझल!
दुखरा,नखरा,दुसरा... शेर खासंच!
तुझ्यासाठी तिथे व्याकूळ नजरा
तुझ्यासाठी तिथे व्याकूळ नजरा पावसा
इथे का मारतो आहेस चकरा पावसा ?
>>>>> व्वाह
शाली, सत्यजित, आसा धन्यवाद
शाली, सत्यजित, आसा धन्यवाद सर्वांना