रेड ( लघूकथा)

Submitted by मी चिन्मयी on 29 June, 2018 - 15:05

( शतशब्दकथा वाचून वाचून inspire झाले खरी पण लिहायला गेल्यावर काही आटपली नाही शंभर शब्दांत. पहिलाच प्रयत्न. गोड मानूनी घ्यावा. )

घामाने निथळणारा तो. आत गेला खरा. पण समोर उभे चौघे-पाच जण. खरंतर त्याच्यापेक्षा दणकट. त्याच्या डोक्यात एकच विचार. जीवदान. पण वेळच शिल्लक नाही..
त्याच्यापासून काही अंतरावर ती उभी. तिचा श्वास रोखलेला. हात-पाय थंड पडत आलेले. परत येईल का तो. की तिकडेच....अरे देवा...काय होणार. डोळ्यात जीव आणून पाहण्यापलीकडे ती तरी काय करणार..डु ऑर डाय सिच्युएशन होती ती...त्याने एक क्षणभर डोळे मिटले. उघडले. आणि चाल करून गेला त्यांच्यावर. त्यांनीही पूर्ण ताकदीने त्याला पकडायचा प्रयत्न केला. पण तो...शिताफीने सटकला आणि त्यातल्या एकाला सोबत घेऊन आला...तिने आनंदाने टाळ्या पिटायला सुरूवात केली आणि तिच्यासोबत आणखी खूप जणांनी. मॅचच्या शेवटच्या रेडमध्ये तो एक पाॅइंट घेऊन आला होता. मॅच जिंकली होती. ती डु ऑर डाय रेड होती.

ता.क.- कबड्डीची फॅन म्हणून मॅच संपल्यावर हे सुचलं. म्हटलं लिहून बघू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शतशब्दकथा वाचून वाचून inspire झाले खरी पण लिहायला गेल्यावर काही आटपली नाही शंभर शब्दांत
>> कोणी मोजून बघत नाही ओ☺️ खपून गेली असती शशक म्हणून.

छान आहे कथा.

छान