रिक्त

Submitted by मोहना on 4 July, 2018 - 21:10

ऋत्विक आणि पर्णिका ही माझी दोन रत्न नऊ महिन्यात कबूल केल्याप्रमाणे भूतलावर प्रकटली. दिवसांच्या बाबतीत केलं दोघांनीही थोडं मागे पुढे पण पहिल्यांदाच असं करत होते म्हणून केलं दुर्लक्ष! पुस्तकाचा जन्म म्हणजे मात्र कायमचंच गर्भारपण की काय असं वाटायला लागलं होतं. गर्भारपण निभावणार्‍या प्रकाशकांना इतकी पुस्तकं जन्माला घालायची असतात की त्यामुळे वर्ष सहा महिने मागेपुढे होत असावेत. मी मात्र पुस्तकाने ’मी येत आहे’ असं म्हटलं रे म्हटलं की, 'आलं, आलं' करत पुस्तकाचा एकेक अवयव, म्हणजे मुखपृष्ठ मग मलपृष्ठ असं जे माझ्यापर्यंत पोचत होतं ते सर्वांना दाखवत होते. मुलांना नाच करता यायला लागला, ती गाणं म्हणायला शिकली की कसं आपण त्यांना पाहुण्यांसमोर करुन दाखवायला लावतो तसं मी माझ्या मुख आणि मलपृष्ठाला सर्वांसमोर नाचवलं. करता करता चक्क पाना आणि अक्षरांसकट माझं नविन बाळ भूतलावर अवतरलं आहे. तुमच्या सहकार्यानेच ते वाढेल. तेव्हा नक्की वाचा आणि मला कळवा पुस्तकाबद्दल तुमचं मत.

माझा ’रिक्त’ कथासंग्रह मेहता प्रकाशनने आज प्रसिद्ध केला. मायबोलीकरांची मला नेहमीच मदत झाली आहे त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार. माझ्या मनोगतात मी तसा उल्लेख केला आहे.

Rikta.jpgRiktaManogat.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अभिनंदन!
मला आवडातात तुमच्या कथा!

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.
ननि- धन्यवाद. हो, साप्ताहिक, मासिकं आणि दिवाळी अंकात माझ्या कथा असतात. लोक्ससत्ता, साप्ताहिक सकाळ मध्ये लेख.