भोपळ्याचा रवा केक

Submitted by कुंद on 28 June, 2018 - 14:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भोपळा,
रवा,
मैदा,
दही दूध,
साखर
( प्रमाण :
एक मोठा चमचा मैदा अधिक अर्धी वाटी रवा,
साखर अर्धी वाटी,
दूध अधिक दही अर्धी वाटी,
पीठ दोन तास भिजल्यावर
भोपळा शिजवून लगदा एक मोठा चमचा, आणि अर्धा टिस्पून सोडा मिसळून केक भांड्यात ओतणे.)

क्रमवार पाककृती: 

भोपळ्याचा केक

(बिन अंड्याचा रवा केक, लाल भोपळा वापरून.)
आपण नेहमी रवा केक तव्यावरती करतो तसाच आहे फक्त यामध्ये लाल भोपळ्याचा उपयोग केलेला आहे.

साहित्य :
लाल भोपळ्याचे तुकडे, बारीक आणि मोठे,
भोपळ्याच्या बिया सोलून,
खायचा सोडा,
दही,
साखर,
रवा,
मैदा,
दूध,
( प्रमाण
एक मोठा चमचा मैदा अधिक अर्धी वाटी रवा,
साखर अर्धी वाटी,
दूध अधिक दही अर्धी वाटी,
पीठ दोन तास भिजल्यावर
भोपळा शिजवून लगदा एक मोठा चमचा, आणि अर्धा टिस्पून सोडा मिसळून केक भांड्यात ओतणे..)

- फोटो आणि कृती -
फोटो १

भोपळ्याच्या मोठ्या फोडी उकडून लगदा करून ठेवायच्या. बिया केकमध्ये घालण्यासाठी.

भोपळ्याच्या मोठ्या फोडी उकडून ठेवायच्या.

फोटो २

फोटो ३

फोटो ४

कढई तापवून थोडी साखर घालून वितळवून थोडे तांबूस पातळ कॅरमल केले.

त्या कॅरमलमध्ये भोपळ्याच्या बारीक फोडी किंचित शिजवायच्या. गॅस बंद ठेवल्याने कॅरमल काळे होणार नाही.

फोडी थोड्या शिजल्यावर त्या वेगळ्या ठेवायच्या, पाक नंतर केकवर घालायचा. पाकालाही छान चव येते

फोटो ५

सर्व साहित्य. मध्यभागी कॅरमल केलेल्या बारीक फोडी, उरलेला पाक.

रवा, थोडा मैदा, दही, दूध आणि साखर ( रवा मैदा मिश्रणाएवढी साखर लागते, अर्धा वाटी ) साधारणपणे दोन तास भिजवायचे.

उकडलेल्या भोपळ्याचा गर पिठात मिसळायचा. थोडासा खायचा सोडा टाका.

केकच्या भांड्याला तळाला तुपाचा हात लावून बटर पेपर ठेवून पीठ ओता. तवा गरम करून त्यावर हे भांडे झाकून ठेवा. गॅस मंद ठेवायचा.

फोटो ६

केकचे पीठ अर्धवट शिजल्यावर असे दिसेल.

साधारण दहा मिनिटांनी पीठ अर्धवट शिजेल तेव्हा झाकण उघडून कॅरमल केलेल्या फोडी आणि बिया पेरल्या. आणखी दहा मिनटांनी गॅस बंद करा. केक शिजला असेल.

थोडे गार झाल्यावर भांड्यातून काढून वरची बाजू वर ठेवल्यावर त्यावर कॅरमलचा पाक टाकता येईल.
फोटो ७

फोटो ८

कॅरमल पाक वर घालून.

भोपळ्याच्या गरामुळे केक हलका होतो आणि रंग येतो.

------------------------------------------------------------------
लेखिका - कुंद

वाढणी/प्रमाण: 
चारजण
अधिक टिपा: 

भोपळ्याच्या गरामुळे केक हलका होतो आणि रंग येतो. बियांचाही उपयोग होतो.

माहितीचा स्रोत: 
स्वत: केलेला.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच.

अगदी अश्याच पद्ध्तीने मी स्विट पोटॅटो घालून केक केला पण एक अंडे घातले.

~~~तव्याकडची बाजू छान खरपूस झाली असेल ना?~~

- हो. फार खरपूसही करायची नाही, जळकट वास लागू शकतो. कारण हे तव्यावर करतो आपण.

एक मोठा चमचा मैदा अधिक अर्धी वाटी रवा,
साखर अर्धी वाटी,
दूध अधिक दही अर्धी वाटी,
पीठ दोन तास भिजल्यावर
भोपळा शिजवून लगदा एक मोठा चमचा, आणि अर्धा टिस्पून सोडा मिसळून केक भांड्यात ओतणे.

मस्तय.
कुंद ताई, धागा एडिट करून वर प्रमाण अ‍ॅड करा की. जास्त सोपं जाईल.

साहित्य प्रमाण धाग्यात घेतलं आहे.
१) बिया आणि कॅरमल फोडी कुणाचं नाव लिहिण्यास उपयोगात आणता येतील. वाढदिवस असणाय्रांनी स्वत: एक मोठा केक दुकानातून आणलेला असतोच त्यास जोड म्हणून हा छोटासा चालेल.
२) तवा आणि त्यावरचं छोटं भांडं याचा विचार करता एकावेळी दुप्पट साहित्य घेता येईल.

++रव्याचा दह्यादुधाचाकरते .++ अनघा.

हो. त्यात खूप पिकलेलं केळं वापरून मऊ होतो. यावेळी भोपळ्याचा प्रयोग केला तो सहज जमला.

++अजून काही रेसिपी असतील तर सांगा नक्की++ चिन्नू.
- हो.
पाककृती करताना फोटो काढून ठेवायचे जमलं आहे.