Submitted by सेन्साय on 28 June, 2018 - 07:15
सावज (शतशब्दकथा)
______________________
.
त्या संपूर्ण खोलीत अमावस्येलाही लाजवेल असा गडद अंधार होता. फक्त एका ठिकाणाहुन उजेडाची हलकी तिरिप येत होती. अश्याच प्रकाशात अचानक ते सामोरं आले. प्रचंड हिडीस ओंगळवाणे रूप होतं. कुठेही त्वचा अशी नव्हतीच, त्यातच ते रक्त ओकणारे बटबटित डोळे जणु फक्त त्याच्यावरच नजर रोखून असल्यासारखे वाटत होते. कसलातरी चीकट द्रव सतत झिरपणाऱ्या तोंडातील ते दोन वखवखलेले भले मोठे सुळे ! सावज टिपायला आसुसलेले पोलादी पंजे कोणाच्याही उरात धड़की भरवतील असेच होते.
अवघ्या फुटभराच्या अंतरावर असलेला तो राक्षसी देह पाहुन फक्त एकच व्यक्ति घाबरली नव्हती. सगळी निरीक्षणे बारकाईने नोंदवत कृषि अधिकाऱ्याने माइक्रोस्कोपखालील स्लाईड बदलली आणि ही खोड पोखरणारी उपद्रवी अळी नसल्याची ग्वाही दिली.
― अंबज्ञ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीच हा योगेशकाका....
भारीच हा योगेशकाका....
मस्तच
मस्तच
कुठेतरी काहीतरी गडबड आहे. I'm
कुठेतरी काहीतरी गडबड आहे. I'm not being able to appreciate. (गडबड माझ्यातही असू शकते!
)
धन्यवाद आदि, वावे आणि पद्म
धन्यवाद सिद्धी, वावे आणि पद्म
-------------
I'm not being able to appreciate>> regarding which part/point of the story ?
मस्त लिहिलंय ! आधी वाटलं भूत
मस्त लिहिलंय ! आधी वाटलं भूत असावं!
Mastch . . .
Mastch . . .
भारीच एकदम.
भारीच एकदम.
भयकथा लिहा एखादी दिर्घ.
जुई, अधांतरी आणि शाली
जुई, अधांतरी आणि शाली
सर्वांचे आभार.
----------------
शाली,
भय कथा लिहायला घेतली आहे. लवकरच पोस्ट करेन.
फक्त एकच व्यक्ति घाबरली
फक्त एकच व्यक्ति घाबरली नव्हती>>>> बाकीचे घाबरले होते का?
माइक्रोस्कोपखालील स्लाईड बदलली आणि ही खोड पोखरणारी उपद्रवी अळी>>> अळीचं निरीक्षण माइक्रोस्कोपखाली नाही करत. (अळी दिसणारच नाही)
.......... आणि अळीच्या रुपाच्या वर्णनात अतिशयोक्ती थोडी जास्त झालीये. (पण हे सर्व माझं वैयक्तिक मत......)
प्रेरणास्त्रोत क्रमांक १
>> बाकीचे घाबरले होते का? = हो = सामान्य शेतकरी (पिकावरील किड हे भितीचे कारण)
http://www.journal-news.net/life/home-and-garden/2017/02/wood-boring-cat... प्रेरणास्त्रोत क्रमांक १
https://youtu.be/8-oCZ_JEgbM
प्रेरणास्त्रोत क्रमांक २― ह्यातील क्रमांक ४ची क्लिप
नाही आवडली. ही नै न चोरलेली
नाही आवडली.
ही नै न चोरलेली