बी.इ. (मेकॅनिकल) नंतर परदेशात (अस्ट्रोलिया जर्मनी इ.) SCM मध्ये शिक्षण आणि नोकरीच्या संधी संदर्भात

Submitted by अतुल. on 18 June, 2018 - 01:26

भाचा नुकताच बी.इ. (मेकॅनिकल) झालाय. येत्या जुलैमध्ये निकाल हाती येईल. यानंतर सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टीक मध्ये परदेशात शिक्षण आणि नोकरी बाबत निर्णय घेण्यासाठी माहिती गोळा करत आहोत.

नेटवरून माहिती काढली आहे तसेच जे परिचित आहेत त्यांना विचारले आहे. उपलब्ध माहिती अशी:

राहण्याचा/शिक्षणाचा खर्च अस्ट्रोलियापेक्षा जर्मनीमध्ये बराच कमी आहे अशी माहिती मिळाली आहे. पण नंतर जॉब आणि पीआर साठी जर्मनीपेक्षा अस्ट्रोलियामध्ये जास्त स्कोप आहे अशी पण माहिती मिळाली आहे. शिवाय अस्ट्रोलियामध्ये दोन वर्षात टेक्निकल आणि एमबीए असे दोन्ही पदव्या देणारे कोर्सेस आहेत असेही कळते आहे. अमेरिकेत मेकॅनिकल नंतर भारतीयांना नोकरीच्या फार संधी नाहीत असेही सांगण्यात आले आहे. शिवाय भविष्यात ट्रम्प प्रशासन याबाबत अजून कठोर निर्णय घेणार आहे असेही मत ऐकायला मिळाले. कॅनडा व इतर देशांबाबत अद्याप फार माहिती मिळालेली नाही.

इथे कुणाला याबाबत माहिती असेल (विशेषतः परदेशात जे स्थायिक झालेत त्यांना) तर शेअर केल्यास आभारी राहीन. विशेषकरून खर्च, शिक्षण व नोकरीच्या संधी यांचा विचार केल्यास प्राधान्य कोणत्या देशाला द्यावे व प्रयत्न करताना काय दिशा असावी असे प्रश्न आहेत. एज्युकेशन लोन उपलब्ध होईल का? तसेच या व्यतिरिक्त इतर कोणत्या देशांत याबाबत संधी आहे?? सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टीक व्यतिरिक्त अजून कोणत्या क्षेत्रात करीयर आणि नोकरीच्या संधी आहे? इत्यादी विषयी सल्ला दिलात तरीही उत्तमच. याबाबत माहिती लिंक्स संपर्क इत्यादी दिल्यास अत्यंत आभारी राहीन Happy

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अमेरिकेत मेकॅनिकल नंतर भारतीयांना नोकरीच्या फार संधी नाहीत" - हे कुठल्या देशाच्या कंपॅरिझन मध्ये? ऑस्ट्रेलियात मेकॅनिकल इंजिनियर्स ना अमेरिकेच्या ५% सुद्धा नोकरीच्या संधी नाहीत. ऑस्ट्रेलियात खूप म्हणजे खूपच कमी गोष्टींचं उत्पादन होतं. गेल्याच वर्षी फोर्डने सुद्धा इथलं उत्पादन बंद केलं. सरकार आत्मनिर्भरतेच्या विरुद्ध असल्याप्रमाणे वागतं. इथे त्यातल्या त्यात आय टी क्षेत्राला स्कोप आहे असं दिसतं.
जर्मनी मध्ये चांगली परिस्थिती असू शकते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

थोडक्यात मला वाटतं अमेरिकेचा पर्याय बंद करू नये. ऑस्ट्रेलिया बद्दल डिस्करेज करत नाही, पण इतर पर्याय देखिल सोडू नका असं सुचवावंसं वाटेल. शिवाय शिक्षण एका ठिकाणी घेऊन नोकरी वेगळ्या देशात - हा सुद्धा पर्याय आहे. तिथे अमेरिकेच्या शिक्षणाला किंमत आहेच की!

सिंगापूर , चायना चेक केले आहे का? सिंगापुरी शिक्षण घेउन चीन हाँग काँग वीएत्नाम कंबोडिआ थायलँड व ऑफकोर्स जपान मध्ये - जिथे जगात मँन्युफॅक्चरिंग बेसेस आहेत तिथे नोकर्‍या उपलब्ध राहतील. भारतात देखील. एज्युकेशन फेअर ला उपस्थित राहुन चांगले पर्याय मिळतील.

"सप्लाय चेन" मधेच करायचं असेल तर स्पेनमधे झारागोझा (Zaragoza) येथे एमआयटी चा अभ्यासक्रम आहे. "mit zaragoza international logistics program" गुगल करा सगळी माहिती मिळेल. खूप रेप्युटेड कोर्स आहे.

सप्लाय चेन मॅनेजमेंटच का? काही खास कारण? येत्या काही वर्षात यात बर्‍यापैकी ऑटोमेशन होणार. सुरवात झालीच आहे. तेव्हा याच क्षेत्रात शिक्षण घ्यायचे असल्यास भविष्यातील आव्हानांशी सुसंगत असा अभ्यासक्रम आहे ना हे बघा.

जॉबची श्वास्वती कुणी देणे शक्य नाही. फार थोड्या काळात परिस्थिती बदलते. सर्व देशातुन लोक येत आहेत, निव्वळ Mech. Engg. आहे म्हणुन नोकरी विनासायास मिळणार नाही.

खटाटोपी करणारा स्वभाव असेल तर कॅनडा मधे तग धरणे कठिण नाही आहे. कालच एका सिरियन व्यक्तीने सितियन रेफ्युजी महिलान्ना (कुठल्या परिस्थिती मधुन ते येत आहे हे तुम्ही बातम्यान्मधे बघत असालच) जॉब मिळवुन दिल्याचे एक वेगळे उदा बघितले.

शंतनु +1
ऑस्ट्रेलिया मधील काही युनिव्हर्सिटीज मात्र जागतिक दर्जाचे शिक्षण देतात.

तरी इथे मला वाटतं L SCM ला स्कोप असावा. या कोर्समध्ये बरीच आंतरराष्ट्रीय मुलं दिसतात. तसेच बरेच भारतीय मुलं MBIT master of business IT हा कोर्स करण्यासाठी आमच्या युनिमध्ये येतात. पुढे जाऊन या दोन्ही कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय होते याची मला कल्पना नाही. तुम्हाला या कोर्सबद्दल माहिती हवी असल्यास देते.
शंतनु, मेलबर्न मध्ये कुठे असता तुम्ही?

@शंतनू: हो आपला मुद्दा पटला आणि ते योग्य आहे. आपणहून पर्याय बंद करणे योग्य नाही. आपल्या फीडबॅक नंतर अमेरिकेतील कोर्सेस फीज आणि राहण्याचा खर्च वगैरे माहिती पण आता संकलित करत आहोत. ऑस्ट्रेलिया मध्ये student साठीच्या व्हिसा वर किती काळ राहता येते, तिथे जॉब मिळेपर्यंत हा व्हिसा एक्स्टेंड होऊ शकतो का याविषयी बाय एनी चान्स काही माहिती आहे का?

@अमा: हो. कालच यावर चर्चा झाली. सिंगापोर युनिवर्सिटी आंतरराष्ट्रीय रेप्युटेशन आहे. त्याआधारे APAC रिजन मध्ये अनेक देशांत प्रयत्न करता येईल. चीनचा सुद्धा एक फायदा असा ऐकायला मिळाला कि तिथे Mandarin ट्रेनिंग देतात ज्यामुळे चीन, सिंगापोर, हॉंगकॉंग मध्ये जॉब मिळवण्यासाठी त्याचा खूप फायदा होईल.

@मनीष: बरोबर आहे. जो प्रयत्न करतोय त्याला विचारले तेंव्हा त्याला Zaragoza बाबत आधीच माहिती होती. अर्थातच हा रेप्युटेड कोर्स असणार.

@च्रप्स: भारतात SCM कोर्सेस आहेत. पण इथे शिक्षण घेतले आहेच आतापर्यंत. इथून पुढे प्रगत देशात राहून शिक्षण केले तर व्यक्तिमत्व विकासात त्याचा हातभार लागेल, वैचारिक प्रगल्भता येईल (केल्याने देशाटन) आणि दुसरे म्हणजे SCM मध्ये अंतरराष्ट्रीय स्तरावर जसे प्रगत देशातील विद्यापीठांचे रेप्युटेशन आहे तितके भारतातील कोर्सेसचे नाही. Resume stand out होईल.

@स्वाती२:
>> सप्लाय चेन मॅनेजमेंटच का? काही खास कारण?
त्याचे ओरिएंटेशन आवड आणि जॉबच्या संधी यांचा विचार करून त्यानेच हा निर्णय घेतला आहे. BE Mech नंतर बहुतेक जण डिजाईन कडे वळतात. पण डिजाईन मध्ये आता जॉबच्या दृष्टीने फार संधी नाहीत असे तो म्हणत आहे. मी त्याला सोफ्टवेअरचा पण पर्याय सुचवला पण त्यात त्याचा फारसा रस दिसला नाही. अजून कोणते पर्याय सुचवू शकत असाल तर उत्तमच.

>> येत्या काही वर्षात यात बर्‍यापैकी ऑटोमेशन होणार.
अगदी अगदी. काल ज्यांना भेटलो त्यांनी हेच मुद्दे उपस्थित केले. ऑटोमेशन मुळे (आणि त्यातल्यात्यात ए. आय. कि जे अजून बाल्यावस्थेत होते पण आता जोमाने पुढे येत आहे) मॅन्युएल जॉब्स येत्या काही वर्षात नामशेष होतील. पण SCM मध्ये पूर्णतः ऑटोमेशन व्हायला अजून बराच अवधी आहे हा पण एक भाग आहे. शिवाय अजून अनेक कंपन्या स्पेसिफिक डोमेन मर्यादा अथवा अन्य कारणे यामुळे मानवी जॉब वर अजून काही वर्षे तरी अवलंबून असतील.

@उदय: कॅनडा मध्ये BE नंतर SCM सारखा एखादा पीजी कोर्स आणि नंतर जोब मिळेपर्यंत राहण्यासाठी साधारण वर्षाला किती खर्च येऊ शकेल याबाबत आपणास काही माहिती आहे का? सध्या विविध देश, तिथला शिक्षण+राहण्याचा खर्च अशी माहिती गोळा करणे सुरु आहे. निर्णय घ्यायला बरे होईल.

@वत्सला: MBIT विषयी चाचपणी केली नेटवर. मला फारसे डेप्थ मध्ये कळले नाही पण जितके कळले त्यानुसार प्रोफेशनल लोकांसाठी Add on डिग्री म्हणून हा कोर्स आहे (Analytics Track for IT professionals आणि Financial Services Track for T&O professionals). पण आपणास जर याविषयी अजून माहिती मिळाल्यास प्लीज शेअर करा.

सर्व प्रतिसाद करणाऱ्यांचे आभार Happy

ऑस्ट्रेलिया स्टुडंट व्हिसा - मागच्या वर्षी अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे नक्की माहिती नाही. परंतु असं ऐकून आहे की डिग्री मिळाल्यावर पुढे ६ महिने की काहीतरी एक टेंपररी व्हिसा मिळतो. तेव्हा लोक जॉब शोधतात.

वत्सला, मी मोनॅश युनिमध्ये आहे. तुम्ही कुठे असता?

परदेशात शिक्षण घेण्यासाठी सर्वतोपरी मदत करणाऱ्या बऱ्याचशा एजन्सीज आहेत पुण्यात (अर्थातच व्यवसायिक) असा शोध कालच लागला. त्यातल्या काही नामांकित आहेत. नंतर कोणी वाचलाच हा धागा तर माहिती म्हणून लिहिले आहे.