बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अस्ताद जसा मेघा सईवर ओरडतो मोठ्यानं बोलतात म्हणून तसा कधी राजेश, सुशांत, चौघुलेवर का नाही ओरडला मग? >>>> + १००००००
सुशांतने सई ला धमकी दिली, चौगुले नी आउंना असह्य त्रास दिला तरी यांचे आस्ताद बाळ अगदी शांत होते. पुरुषांसमोर त्याची काही बोलायची हिम्मत होताना दिसत नाही.
सई नी थोडा आवाज चढवला, मेघा नी जरा बकबक केली, विरोधी टीम मधे जाऊन स्मिता चुकीच्या मराठीमधे बोलली कीच आस्ताद बाळाला कंठ फुटतो. बळी तो कान पिळी , असो.

कर्रेक्ट डेलिया.

आणि आपल्या मुलाचे कान उपटण्याऐवजी हे काका आख्ख्या घराला धारेवर धरतायत आणि लेक्चर देतायत. अति आहे हे.

अस्ताद जसा मेघा सईवर ओरडतो मोठ्यानं बोलतात म्हणून तसा कधी राजेश, सुशांत, चौघुलेवर का नाही ओरडला मग? >>>>
सुशांतने सई ला धमकी दिली, चौगुले नी आउंना असह्य त्रास दिला तरी यांचे आस्ताद बाळ अगदी शांत होते. पुरुषांसमोर त्याची काही बोलायची हिम्मत होताना दिसत नाही. >>>हो, याला +१११

मी जेवढी ओळखते त्यांना त्याप्रमाणे तरी ते अश्या अर्थाचं म्हणतील ही शक्यता दिसत नाही. पुण्यातले गेल्या २० वर्षातले नाटकवाले लोक किंवा त्यांचे कटारियामधले विद्यार्थी इथे असतील कुणी तर तेही हेच सांगतील तुम्हाला. >>
आस्ताद चे वडील शो मधे जे बोललेले दाखवतील त्यावरूनच लोक त्यांची पारख करणार. ते एरवी कसे आहेत हे समजून घ्यायला सगळ्या महराष्ट्रातील या शो चे प्रेक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना, त्यांना ओळखणार्या लोकांना शोधत फिरणार नाहीत .
खरेतर या शो मधल्या सगळ्याच पार्टीसिपंट्स्ना व त्यांच्या नातेवाईकांना हे कळायला पाहिजे. कोणावर काहीही आरोप झाले की प्रत्येक जण व त्याचा नातेवाईक 'खर्या' आयुश्यात हा/ ही असा नाहीच्चे , कीत्त्ती चांगला आहे असे सांगत बसतात. ह्याचा काहीच उपयोग नाही. लोक जे बघतायेत त्यावरूनच मत बनवणार.

ते एरवी कसे आहेत हे समजून घ्यायला सगळ्या महराष्ट्रातील या शो चे प्रेक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना, त्यांना ओळखणार्या लोकांना शोधत फिरणार नाहीत .<<
मी त्यांची वकील नाही. तुम्ही तुमचे त्यांच्याबद्दलचे मत काहीही करा. ते माझ्या घरचे नाहीत की मला त्यांच्याबद्दल तुम्ही काय मत करून घेताय याने काही फरक पडेल.
तुम्ही कुणाबद्दल काय मत करून घ्यावे हे मी तुम्हाला सांगायला आलेली नाही.
मी कुणालाही खर्‍या आयुष्यात कोण किती चांगला वाईट वगैरे सांगत बसलेले नाहीये. तुम्ही तुमची मते सांगताय. मी माझे सांगितले इतकेच आहे.

आख्खा महाराष्ट्र वगैरे आदळ आपट बघून मनोरंजन मात्र झाले.

आख्खा महाराष्ट्र वगैरे आदळ आपट बघून मनोरंजन मात्र झाले. >> तुम्ही हे वैयक्तिक घेऊन त्रागा करायचे काही कारण नाही. माझे कोणाशी काहीच वैयक्तिक संबंध नसल्याने मी आदळ आपट करण्याचा प्रशन्च येत नाही. एकट्या तुम्हीच नाही तर सगळ्या मुलाखतीतून सर्वच लोक अशी मते माण्डत आहेत व प्रेक्षकांना चूकीचे ठरवत आहेत, म्हणुन लिहिले.
रच्याकने, वादाचे मुद्दे संपले की फ्रस्ट्रेट होऊन तुम्ही त्रागा करू लागता असे दिसतेय. जोपर्यंत माझे मुद्दे मला बरोबर वाटतात, ते मी मांडत रहाते. पुढे वैयक्तिक तूतूमैमै करण्यात मला रस नाही.

मला सुद्धा आस्तादच्या बाबांचा मुद्दा पटला. पण इथे काय आहे, आस्तादचे "हितचिंतक" इतके झालेले आहेत कि प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी बिग्बॉसच्या घरात येउन आस्तादचं समर्थन केलं, तर त्याला हि पिटाळुन लावतील... Proud

मी कुणालाही चुकीचे बिकीचे ठरवत नाहीये. तुम्हीच उगाच आख्खा महाराष्ट्र वगैरे सुरू केलेत.
वादाचे मुद्दे संपायला वाद चालू होता हेच मला माहिती नाही आणि त्रागा तर तुम्हीच करताय.
तुम्हाला मी तुमचे मत मांडू नका, मत बदला यातले काहीही सांगितलेही नाहीये.
तुमची तडतड वाचून मला मात्र अशक्य हसायला येतेय. प्लीज तुम्ही तुमची मते मांडतच रहा. शक्य तितक्या तिखटपणे. मज्जा येतेय.

राज Lol

अस्तादच्या वडिलांचं वक्तव्य मी अजूनी खुद्द ऐकलं नाहिये (रिपिट पाहणार आहे) पण एक जरूर नमूद करू ईच्छिते की त्यांचं म्हणणं समजायला एक वेगळ्या प्रकारची बुद्धीमत्ता हवी.

आस्ताद दुसरी जुई बनण्याच्या मार्गावर आहे. कित्ती कित्ती जळतोय तो मेघावर आणि सईवर. त्यांना , त्यांच्या ग्रुप ला कमी दाखवण्याची एकही संधी तो सोडत नाहीये. जिथे तिथे तो मेघाबद्दल गॉसिप करतोय. बायकांनाच सगळे गॉसिप करण्याबद्दल नावे ठेवत असतात पण अता आस्ताद ,पुरुषही या क्षेत्रात बायकांइतकेच सक्षम आहेत हे दाखवून देत आहे.

अस्त्या आज चिक्कार मार खाणार आहे सगळीकडे. ऑलरेडी सोमि वर प्रचंड कल्ला झालाय सुरू.

बाप येऊन खड्डा खणून गेला आणि अस्तादनं आज गॅस बंद करण्यावरून जी अत्यंत हस्यास्पद भुमिका घेतली त्यामुळे पोरगं एक दोन आठवड्यात एक्झिट मारणार असं दिसतंय. गॅस बंद करण्यासाठी एकजुट दाखवा म्हणे. बSSSSSSरं.

भूक लागली म्हणून स्मिता, भूषण, चौघुले आणि अस्ताद ऑमलेट बनवत होते. चौघुले ऑलरेडी ऑमलेट घेऊन खात होते आणि स्मिता दुसरं बनवत होती. त्याचवेळी तिला फ्रीज केलं. तिला गॅस बंद करायला वेळ मिळाला नाही. भूषणनं येऊन तिच्या हातून ऑमलेट पुढे करायला सुरूवात केली तर त्यालाही फ्रीज केलं. मग अस्ताद पुढे झाला आणि त्यानं झालेलं ऑमलेट उलटलं आणि पॅन उचललं तर त्यालाही फ्रीज केलं. फ्रीज झाला असतानाही त्यानं चौघुलेला गॅस बंद करायला सांगितला. इथवर सगळं ठीक चाललं होतं. म्हणजे अस्तादच्या मनासारखं चाललं होतं.

मग स्मिताला अनफ्रीज केलं आणि तिनं अस्तादच्या हातातून पॅन काढलं (तिला हे करायला आतून सई-मेघानंच सुचवलं), गॅस पेटवून दुसरं ऑमलेट टाकलं तर ती पुन्हा फ्रीज झाली. हा सगळा प्रकार मेघा, सई, शरा आणि आउ आतून बघून हसत होत्या. सगळे चारही फ्रीज झाले म्हणून गॅस सुरू असेल तर बंद करावा म्हणून सई उठत होती तेव्हा त्या सगळ्यांना वाटलं की गॅस ऑलरेडी बंद आहे. तो बंद आहे की नाही याची चर्चा सुरू असतानाच शरा उठली आणि किचनकडे धावली जेणेकरून जर बंद नसेल गॅस तर बंद करावा. बिग बॉस तिला रस्त्यातच फ्रीज करणार असं आउ म्हणाली आणि तसंच झालं. शरा मधेच फ्रीज झाली. एखाद मिनिटांनी अनफ्रीज झाल्यावर ती (गॅस बंद आहे असं समजून) ती पुन्हा बेडरूमकडं पळाली.

मग पुन्हा भूषण अनफ्रीज झाला, त्यानं गॅस बंद केला. आपलं ऑमलेट घेऊन तो टेबलवर गेला. चौघुले अनफ्रीज झाला. त्यानं मागिल अंकावरून पुढे या तत्त्वावर तोंडावरची माशीही न हलवता फक्त तोंडातला अर्धवट चावलेला घास पुढे चावायला सुरूवात केली. बाकी शरीर अजिबात हलवलं पण नाही. हा क्षण निव्वळ महान होता. शेजारी भूषण येऊन बसल्यावर चौघुले म्हणाला " छोटे छोटे घास घे. मी मोठा घास घेतला तर बघ काय झालं."

मग यथावकाश अस्ताद, स्मिता अनफ्रीज झाले. अस्ताद बेडरूममधल्या लोकांवर जाम भडकला. म्हणे फ्रीज होऊ या भितीनं हे आलेच नाहीत. काय हरकत होती यायला? सगळे एकत्र मिळून फ्रीज झालो असतो. गेले तीन दिवस इमोशनल टर्मॉईलमधून गेलो, इतके जवळ आलो पण आता मला बर्‍याच जणांचे स्वभावाचे पैलू दिसले. हे सगळं त्यानं बागेत फिरणार्‍या रेशमला सांगितलं. रेशमकडून त्यानं ही सामुहिक फ्रीज होण्याची अपेक्षा अर्थातच केली नाही.

त्याच्यामते या चार जणांना भूक लागली आहे हे इतरांनी समजून घेऊन फ्रीज होण्याच्या शक्यतेवर मात करून ऑमलेट बनवण्याचा सोहळा पार पाडायला हवा होता.

अस्तादचे रुलबुक :

१. माझ्या पोटात भूक आहे हे लोकांनी समजून घेऊन त्वरित त्याप्रमाणे कृती करावी.
२. मी काम करत असताना अथवा फ्रीज झालो असताना किंबहुना मी जे काही दहा पंधरा मिनिटं अजगरासारखा पसरलेला नसतो तेव्हा इतरांनाही बेडवर बसून भंकस करण्यास मनाई आहे. विशेषतः माझ्यावर हसण्यास तर सक्त मनाई आहे. मग मी रागावलो तर ते लॉजिकलच असणार.
३. मला अन्न आणि इंधन वाया घालवलेलं आवडत नाही म्हणजे नाही. त्यामुळे इतरांनी धावून धावून माझं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घेणं इतरांवर बंधन कारक आहे. पण मी सिगारेटी फुकून हवेत प्रदुषण करू शकतो. मी म्हणीन तेच नियम.
४. रेशमताई इज अबुव्ह ऑल नियम. ती माझी फिलॉसॉफर आणि गाईड असल्यानं तिला काहीच नियम लागू नाहीत. पण ती या नियमभंगांबद्दल इतरांना जाब विचारू शकते.
५. स्मिताला काही कळत नाही त्यामुळे मी तिला कसंही ओरडू शकतो आणि तिला दरवेळी दोष देऊ शकतो. कारण मी हुषार आहे कारण मी अस्ताद आहे.
६. हे माझे नियम पाळले नाहीत तर मी त्यांना खोचक टोमणे मारणार. तेच मुद्दे मला लागू असले तरी ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.

आस्तादची खरच दुसरी जुई झालीय.... आज जे काही ते अन्न आणि इंधनाच्या नासाडीवरुन केले ते अशक्य ओढूनताणून होते!
मेघाने जशी काल फ्रीज व्हायचा आत इस्त्री उचलली तसा गॅस बंद करायचा ना तू चपळाईने!
उगीच काहीतरी कारणे काढून किरकिरत होता!

आज एकदाची स्मितानं तिची सुप्रसिद्ध बिकिनी घातली. त्याबरोबर शरानं देखिल घातली आणि स्मिताकडून पाण्यात सूर मारायला शिकत होती. पुष्कर म्हणाला देखिल की हे नॉमिनेशन स्पेशल दिसतंय. भूषणला बिकीनी घालण्याची सोय नसल्यानं आणि त्यानं घातली असती तरी कोणी त्याच्याकडे न बघण्याची शक्यता प्रबळ असल्यानं त्यानं त्याऐवजी ओटा साफ केला. त्याबद्दल सगळे त्याची खेचतही होते.

कॅप्टन्सीच्या नॉमिनेशनकरता स्पॉन्सर्सचा एका फुटकळ टास्क झाला रंगवारंगवीचा. त्यात मेघा, पुष्कर आणि अस्तादची टीम जिंकल्यानं ते तिघे आता कॅप्टन पदासाठी लढतील. काहीतरी झेंड्याचा खेळ आहे. अस्तादचं लगेच प्लॅनिंग सुरू झालं.

आज अस्तादनं एक अत्यंत मजेशीर असा पिवळ्या रंगाचा टिशर्ट घातला होता आणि त्यावर चमकदार बुट्ट्या होत्या. तो पूर्वीचे मावळे ठेवायचे तशी काहीतरी दाढी ठेवण्याचा प्रयास करतोय.

आज अस्तादचा बाबा आणि चौघुलेची पत्नी आले होते. अस्तादच्या बाबाविषयी मी काही लिहिण्याऐवजी इथे बघा : https://www.facebook.com/BBMarathi/

चौघुले पत्नीची भेट ठीकठाक झाली.

बिगबॉसला सई मेघा पुष्कीची टीम तोडायचीय आता असे दिसतेय!
आज कॅप्टन्सीच्या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये त्यांनी मस्त गेम केली.... टास्कमास्टर स्मिता आणि सईला सर्वात passive ग्रूपमध्ये टाकले.... रेशम, आउ आणि भूषण या झेपेल तितकच टास्क खेळणाऱ्यांना एक ग्रूपमध्ये टाकून त्यांच्याविरुद्ध आस्ताद. मेघा आणि पुष्की अशी सहज जिंकणारी टीम खेळवली की जेणेकरुन आता कॅप्टन्सी साठी मेघा आणि पुष्कीमध्ये फाईट होइल..... वाह रे गॅम प्लॅन!

आस्तादची अपेक्षा असणं की कुणितरी उठून यायला हवं होतं ही अपेक्षा म्हणून ठिक गोष्ट आहे.
पण ती पुर्ण झाली नाही म्हणून केलेला त्रागा आणि इतकी चर्चा खूप इरिटेटीन्ग होती.

आस्तादची खरच दुसरी जुई झालीय.... आज जे काही ते अन्न आणि इंधनाच्या नासाडीवरुन केले ते अशक्य ओढूनताणून होते!
<<
या बाबतीत तर जुई त्याच्या पेक्षा बरीच म्हणायची, स्वयंपाक उत्तम करायची म्हणे !

नाही नाही...
या बाबतीत जुईचा हात कोणीच धरु शकत नाही... अस्ताद तसा प्रामाणिक प्रयत्न करतोय खरा...

एखाद्यावर जळणे (सई वर व नन्तर मेघावर) याचा जुई ने जो बेन्चमार्क सेट केलाय, तो खुपच उच्च आहे..

मामी अगदी अगदी. ते आॅम्लेट स्मिताने भूषणला दिल्यावर तो का एवढा शहाणपणा दाखवत होता. स्मिताने ते हिसकावून घ्यावे आणि त्याला सांगावे की एवढा शहाणा आहेसना तर स्वत:चं स्वत: घे, असं मला प्रकर्षाने वाटलं. तो का तिला काय वाट्टेल ते बोलत होता. शराला माहित होतं की चारही गॅस बंद आहेत म्हणून ती आत गेली. तसंच मेघाला आतून दिसलं की गॅसच्या नाॅबचे लाल बाण ज्या दिशेला आहेत त्यावरून गॅस बंद आहेत, ह्यासाठी मेघाला सलाम. मला असं वाटतं की नुकतीच चौघुलेने मेसै आणि पुष्करची जी तारीफ केली, विशेषत: मेघाची की ती नंबर वन खेळाडू आहे ते आस्तादला अजिबात सहन झालं नाही आणि ती जळजळ त्याने अशा प्रकारे बाहेर काढली. तेच जर चौघुले रेशमबद्दल म्हणाले असते तर आस्तादने स्वत: सगळ्यांसाठी आम्लेटं बनवली असती. इंधन आणि अन्नच का वाचवायचे आहे आस्तादला, सिगरेटचे पैसे वाचवले त्याने तर त्यात अनेक गरीब लोक जेवू शकतील आणि मुळात बीबाॅच्या प्रत्येक खेळात कसली ना कसली नासाडी होतेच (रंग, शाम्पू, डिओ, पाणी,कपडे वगैरे) हा विचार आधीच करून त्याने ईथे यायलाच नाही पाहिजे होते.

अहो.. त्याला अस वाटत की असले मुद्दे मांडुन आपण सई मेघा ग्रुपची नसलेली वाईट बाजु प्रेक्षकां समोर मांडु. अस करताना त्यांची स्वःताचीच तकलादु बाजु समोर येते....
आठवत का मागे अस्ताद, स्मिता, जुई यानी स्ट्रेटर्जी केलेली अस करायची ( आणि कहर म्हणजे ते वरुन म्हणत होते आम्ही नाही बाबा काही स्ट्रेटर्जी वगैरे आखत)

आस्तादच्या बाबांचा मराठीचा मुद्दा बरोबर होता कारण ते म्हणाले तसं bb चा पण रूल आहे आणि कोणी पाळत नाही पण एकमेव मराठी बोलणारा आस्ताद आहे हे चूक आऊ आणि भूषण पण मराठीत बोलतात. त्यांची नावं त्यांनी घ्यायला हवी होती, भले त्यांचं प्रमाण मराठी नसेल.

स्त्रियांना स्पेशल ट्रीटमेंट का, सर्वांना समान रिस्पेकट हवा हे बरोबर पण आस्ताद माणूस म्हणून तरी कुठे देतो रिस्पेकट बरेचदा खेकसतो, ओरडतो, शांतपणे सांगावं त्याने. हे त्याला सांगायला हवं होतं बाबांनी. त्याच्या मराठी बोलण्याचा मला आदर आहे, मागे कॅप्टनसी मध्ये लॉयल होता. इंधन आणि अन्न वाया जाऊ नये हे त्यांचं बरोबर.

हे सर्व मी आदरार्थी भाषेत लिहून आले, bb fb वर. वाचतील बाबा त्याचे.

म मा जसे रेशमला बोलत नाहीत तसे आस्ताद पण काही बोलत नाही, फुकत असतो तेव्हा किती प्रदूषण होतं हे मनात असून तिथे नाही लिहिलं.

चौगुले ची बायको छान बोलली पण त्या प्रसंगाला खोडकरपणा म्हणणे हे चूक होतं, त्याबद्दल नवऱ्याला बोलायला हवं होतं. हे पण लिहिलं मी तिथे. ती जाम बडबडी आहे आणि ओळखते बरेच जणांना.

आस्ताद अ‍ॅक्चुअली खातो बोलणी म.मां ची.
बॅक्स्टॅबर, डिसलॉयल, व्हिलन, बैल , फॉक्स, स्वतःच्या घराची राखण करायचे नाटक करून चोरांना सामील होणारा कुत्रा अशी बरीच टाय्टल्स दिलेली आहेत त्याला.

हो म मा त्याला बोलतात, रेशमला नाही. रेशमला म मा जसे काहीच बोलत नाहीत तसा आस्ताद पण रेशम चुकत असेल तर बोलत नाही, बाकीच्यांना बोलतो.

चौघुलेची बायको मुळात त्याला काही बोलूच देत नव्हती ते फार मजेशीर होतं. त्या दोघांनी एकांतात जाऊन बोलायला हवं होतं. चौघुले फार मिसळत नसला तरी निरीक्षण व्यवस्थित करतो (तिथे दुसरं काही नाहीचे तसंही) आणि मराठी चांगलं आहे त्याचं. पुष्कर जिंकला नाही तरी त्याचा आणि बायकोचा बाॅन्ड खूप स्ट्राॅंग झाला आहे बीबाॅमुळे असं दिसलं, त्यांना एकमेकांची किंमत कळली Wink
शराचं फार वाईट वाटलं की तिला आता मुल हवं आहे पण लग्न करायची तिला फार भिती वाटते आता. मेघा तिला म्हणाली की तू बाहेर पडल्यावर मुलांची लाईन लागेल. तसंच व्हावं आणि तिला योग्य साथीदार मिळावा.

श रा चं एकदम काय झालं, निवड चुकली वगैरे म्हणत होती. पण अगदी मागच्यावर्षीपर्यंत मुलाखत देत होती विशेषतः गणपतीत वगैरे, दोन वर्षांपूर्वी बघितलं तर सासर खूप चांगलं आहे, नवरा चांगला आहे, असं म्हणालेली. साधारण दोन तीन मुलाखती आठ नऊ वर्षात मी बघितल्या, वाचल्या तिच्या तर खूप कौतुक करत होती, नाशिकला सासर, सगळे कसे चांगले वगैरे. एनिवे असतील कारणे तसं मला नाही म्हणायचं काही, कारण आपण नाही सांगू शकत . रिस्पेकट करते मी. आज पुष्करचं बाळ बघितल्यावर तिला जे वाटलं ते बघून डोळ्यात पाणी आलं मात्र आणि आधीच्या तिच्या मुलाखती आठवल्या.

Pages