Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे


विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नी मला फॅट्स बद्दल काही इश्यु
नी मला फॅट्स बद्दल काही इश्यु नाही. मुळात ती खूप सुंदर वगैरे नाही वाटली असं सांगतेय. पण मी आता तिचे फोटो पाहिले, (बाळंतपणापुर्वीचे असावेत) चांगली दिसतेय त्यात. कालच का मग मला इतकी खास नाही वाटली
आस्तादचा बाबा बोलतोय तुम्ही
आस्तादचा बाबा बोलतोय तुम्ही सगळे त्याच्याविरुद्ध गेलात. आपल्या मायबोलीवरच्या कमेंट्स वाचून गेला की काय तिथे कारण सध्यातरी तिथे कोणी विरोधात नाही त्याच्या. त्यात भरीस भर म्हणजे स्त्रियांशी व्यवस्थित वागणं त्याला आवडत नाही असं काहीतरी बोलला तो. हे म्हणजे सरळ सरळ चुकीच्या गोष्टींना समर्थन केलं त्याने. आता दिवसातून दोन चार सिगरेटी ओढल्यावर तब्येत कशी चांगली राहते हे ऐकवलं नाही म्हणजे झालं.
पुष्करची बायको छान आहे.
पुष्करची बायको छान आहे. त्याची मुलगी पण मस्त.
स्मिताची आई बोर वाटली मात्र. बाकी ति सईशी तिचे केस पाठीमागे वळवून बोलत होती तेव्हा कसली डेन्जरस वाटली मला.
भुषणने जेव्हा मुलाला मिठीत घेतल तेव्हा नेमक्या त्याच वेळी big boss ने त्याला फ्रिझ व्हायला सान्गितल तो क्षण तर मस्तच होता.
मेघा आणि तिच्या मुलीच्या वेळीच सुद्दा असच केल होत big boss ने.
सई आणि आऊ एकदोन वेळा फ्रिझ व्हायला विसरल्या. आऊ भुषणच्या मुलाला लाडू देत होती ते तर क्यूट होत.
बादवे,आऊ आणि किशोर परवा किचनमध्ये चक्क एकत्र काम करताना दिसले? भान्डण मिटल का?
स्मिता फ्रिझ होते तेव्हा बाहुलीसारखी दिसते. काल ती Bobby मधल्या डिम्पल कपाडियासारखी दिसत होती. भूषणसुद्दा तेच म्हणाला होता.
त्यात भरीस भर म्हणजे
त्यात भरीस भर म्हणजे स्त्रियांशी व्यवस्थित वागणं त्याला आवडत नाही असं काहीतरी बोलला तो. >> आँ? म्हणजे नक्की काय?
आणि स्मिताची आई, स्मिताचे
आणि स्मिताची आई, स्मिताचे डोळे किती खसखसून पुसत होती, म्हटलं मेकप घालवती वाटतं आता सगळा
(स्मिता पण मनात तेच म्हणत असावी)
हा पहा आजचा टास्क. टास्कच
हा पहा आजचा टास्क. टास्कच नाव 'हेल्थी स्माईल' आहे, मग रन्गपन्चमी कशाला खेळतायत हे?
https://www.youtube.com/watch?v=xrQpdPUX5Lo
https://www.youtube.com/watch?v=XPwppQCFax8
भाषा प्रेम पण खूप दृढ झालं.
भाषा प्रेम पण खूप दृढ झालं. >>>> दक्षे, भाषा प्रेम कि आस्ताद प्रेम?
सुलू माबोवर येऊन काय घडलं आहे
सुलू माबोवर येऊन काय घडलं आहे ते लिहिलं आहे.
)
अस्त्या बद्दल बदाम बिबॉ पहायला लगल्यावर झालंय.
तु म्हणजे माझा सावन का अंधा करून टाकलास... (सगळीकडे हिरवं अस्त्यामुळे
आस्ताद च्या वडिलांची एक क्लिप
आस्ताद च्या वडिलांची एक क्लिप बघितली , ते एवढंच म्हणालेत की सतत "मुलींशी नीट वागा, मुलींशी नीट बोला" असं का सांगितलं जातं. सगळ्यांशी नीट वागा हे म्हटले तर ठीक आहे, पण मुलींना मुली म्हणून काही स्पेशल ट्रीटमेन्ट अपेक्षित असेल तर स्पर्धेत ते योग्य नाही. पॉइन्ट आहे! पूर्ण काय ते एपिसोड बघितल्यावर कळेल आता.
अजून एका क्लिप मधे ते म्हणालेत की आस्ताद ला मराठी भाषेचा अभिमान आहे, पण उलट शुद्ध मराठी बोलतो म्हणून त्याची टिंगल केली जाते.
(किशोर आणि अजून पण कुणीतरी) भाषेवरून त्याची खिल्ली उडवली जाते हे मी पण ऐकलेय आधी. अर्थात तो कुणी हेल्पलेस मनुष्य नाहीये, तो समर्थ आहे उलटी उत्तरे द्यायला.
त्याचा मुलगा गोड आहे एकदम. तो
त्याचा मुलगा गोड आहे एकदम. तो आत आला आणि भूषण ला काय करावे सुचले नाही ते क्यूट होते एकदम. बिचारा बाबाला रडताना बघून कसनुसा होऊन रडायला लागला.
, भूषण काल प्रथमच आवडला.
<<
हो सर्वात क्युट मोमेंट ती होती काल
‘कोणी त्रास तर देत नाहीना ‘ हे कोणी घेणेकरी मागे लागले आहेत अशा अर्थाचं वाटलं मला, होप त्याची फॅमिली लवकर बाहेर पडेल , जो काही त्रास आहे त्यातून !
बाकी मराठीच्या बाबतीत उषा ताई सुध्दा मी आली मी गेली , व्याकरणात बसत नाही असं मराठी बोलतात.
भाषेचा लहेजा वेगळा असणे वेगळं अर्थात!
आस्ताद, भूषण, सुशान्त आणि हो चौघुलेचही मराठी चांगलं आहे, म्हणूनच त्याला आस्तादचा रोल झेपला पण इन जनरलच तो भांडण ड्रामा सोडला तर चौघुलेचे शब्द ऐकत जा, बर्यापैकी वाचन असलेल्या माणसा सारखं चांगलं मराठी बोलतो.
जुई एलिमिनेट झाली तेंव्हा म्हणे ते इंग्रजाळलेले मिंग्लिश बोलणारे झोपाळ्यावर बसतात आम्ही मराठी लोक बाकड्यावर.
आस्त्तदच्या वडिलांचे महान
आस्त्तदच्या वडिलांचे बोलने एकुन मी तर चाटच पडलो..
आस्त्तदचे वडिल : "सर्वांशी सर्वानी चांगल वागाव हे मान्य, पण स्त्रीयांशी सर्वानी चांगल वागाव हे मला मान्य नाही झाल. !!! "
सिरियसली
... परिस्थीती काही असो पण स्त्रीयांशी सर्वानी चांगल वागायलाच हव या मताचा मी आहे.. अशा वेळी, वडिलधार्या मंडळी कडुन असे विचार .?
अस्तादचे वागणे त्याच प्रमाणे आहे मग, बायकंवर ओरडणे, दादागीरी..इ इ.
स्मिता असते की बाकड्यावर
स्मिता असते की बाकड्यावर मिंगलीश बोलणारी हे चौगुलेच्या लक्षात नाही आलं, पण तिची मातृभाषा कन्नड असून ती सई पुष्की इतपत मराठी बोलते की चांगलं.
आस्त्तदच्या वडिल : "सर्वांशी
आस्त्तदच्या वडिल : "सर्वांशी सर्वानी चांगल वागाव हे मान्य, पण स्त्रीयांशी सर्वानी चांगल वागाव हे मला मान्य नाही झाल. !!! "
<
रिअली ???
कठिणच आहे असे म्हंटले असतील तर मग.
सैराट मधे आर्चीचा बाप म्हणतो आधी आपल्या बायका सांभाळा म्हणावं , इथे यांना सांगावं लागेल “कोणाचं मराठी कसं आहे हे आम्हाला चागलं माहित आहे, मराठीचं सोडा आधी आपला पोरगा सांभाळा म्हणावं‘
मी वेगळे इन्टरप्रेट केले
मी वेगळे इन्टरप्रेट केले त्यांचे ते वाक्य. त्यामुळे खटकले नाही (वर लिहिलेय) असो. कळेलच आज.
Btw, हे वाक्यं कुठे दाखवले
Btw, हे वाक्यं कुठे दाखवले प्रोमो मधे ? मला फक्त ते मराठीच्या आग्रहा विषयी आणि उषा ताईंना बोलताना दिसले.
रात्री नीट कळेल काय झालं
रात्री नीट कळेल काय झालं नक्की, मी प्रोमो बघितला नाहीये. मिन्स काल मराठी वर काही बोलणार असं दिसलं पण स्त्रियांबद्दल काय वक्तव्य ते नव्हतं त्यात.
ते अश्या प्रकारचं विधान करणार
ते अश्या प्रकारचं विधान करणार नाहीत असं मला तरी वाटतं. मै ने लिहिलेलं जास्त बिलिव्हेबल आहे.
मला दर वेळेला ममां ते त्या मुली असून तुम्हाला भारी पडतायत, बांगड्या भरा वगैरे म्हणतायत ते अशक्य डोक्यात जातंय.
त्यापेक्षा मुली म्हणून स्पेशल ट्रीटमेंट नको हे नक्कीच बरे आहे.
अर्थात सुशांत आणि राजेश ज्या प्रकारे माझ्यासमोर आवाज करायचा नाही टाइप दादागिरी करत होते आणि स्पेशली दुसर्या ग्रुपातल्या मुलींवर ते वाईटच होतं.
सई व मेघा टिम मध्ये पुष्कर
सई व मेघा टिम मध्ये पुष्कर सुरवातीपासुनच आवडत नाही. ( त्याची मेघाच्या बाबतीतली बॅकस्टॅब वृत्ती ).
काल तर कहरच केला, अरे ती मेघा व सई पाहुन घेतील ना त्याना काय करायच ते. मुर्खापणाचा कहर आहे तो.
मेघा नसताना, सर्वा समोर मेघाला बोलने हे चुकीचे आहे... ( नंतर मेघा समोर गुळमुळीत बोलायला गेला तेच).
आस्त्तद पेक्षा हा जास्त घातकी आहे सई व मेघा साठी, कारण अस्ताद उघड पणे तरी विरोध करतो.
एकतर सुरवातीपासुन याला स्वःता कस वागायच, कस खेळायच कळत नाही.
जवळपास प्रत्येक वेळी सई, मेघा व रुतुजा ने त्याला वाचवलय.
प्रेक्षक त्याला योग्य वेळ येताच हाकलुन देतील या घरातुन...
ते वाक्य कलर्स मराठीची क्लिप
ते वाक्य कलर्स मराठीची क्लिप आहे फेबु वर त्यात आहे.
मला दर वेळेला ममां ते त्या मुली असून तुम्हाला भारी पडतायत, बांगड्या भरा वगैरे म्हणतायत ते अशक्य डोक्यात जातंय. >>>> अगदी अगदी . +१००
ते अश्या प्रकारचं विधान करणार
ते अश्या प्रकारचं विधान करणार नाहीत असं मला तरी वाटतं. मै ने लिहिलेलं जास्त बिलिव्हेबल आहे.
नवीन Submitted by नीधप on 14 June, 2018
>>>>>>
स्वःताच पहा. शेवटी काय म्हणाले ते..
https://twitter.com/BiggBossMarathi/status/1007215915811737600
अर्थात सुशांत आणि राजेश ज्या
अर्थात सुशांत आणि राजेश ज्या प्रकारे माझ्यासमोर आवाज करायचा नाही टाइप दादागिरी करत होते आणि स्पेशली दुसर्या ग्रुपातल्या मुलींवर ते वाईटच होतं. >> +१
राजेश असताना त्याचा चमचा असल्याप्रमाणे आस्ताद देखिल त्याच्याच सारखा ओरडायचा , वागायचा. लोक त्यामुळे आस्ताद वर चिडले होते , ते न समजून घेता ( आपला तो बाब्या) किन्वा त्याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करून आस्ताद च्या बाबांनी वेगळाच स्त्री पुरुष समानतेचा सूर आवळलाय . जो एरवी योग्य असला तरी आस्ताद च्या आधीच्या वागण्याला अजीबात लागू होत नाही.
मग? मै ने जे लिहिलंय तोच तर
मग? मै ने जे लिहिलंय तोच तर अर्थ आहे त्याचा. शब्द वेगळे इतकेच.
बाई म्हणून स्पेशल ट्रीटमेंट का? हा अत्यंत योग्य प्रश्न विचारला त्यांनी.
बायकांची चांगले वागू नका असे ते नक्कीच म्हणालेले नाहीत. मी जेवढी ओळखते त्यांना त्याप्रमाणे तरी ते अश्या अर्थाचं म्हणतील ही शक्यता दिसत नाही. पुण्यातले गेल्या २० वर्षातले नाटकवाले लोक किंवा त्यांचे कटारियामधले विद्यार्थी इथे असतील कुणी तर तेही हेच सांगतील तुम्हाला.
हो हीच ती क्लिप . ती बघूनच तर
हो हीच ती क्लिप . ती बघूनच तर माझं ते वर लिहिलेय तसे इम्प्रेशन झाले
मला तो प्रश्न आवडला. घरातल्या स्त्रिया कसे उत्तर देतात ते बघायला आवडेल. अर्थात कॉन्टेक्स्ट काय ते इथे कळत नाहीये. आस्ताद च्या एखाद्या वागण्याचे चे समर्थन म्हणून आहे की कसे ते माहित नाही.
सुशांत नी तर चक्क चेहरा मारून
सुशांत नी तर चक्क चेहरा मारून मारून खराब करण्याची धमकी दिली होती सईला. आणि आश्चर्य म्हणाजे यावार कोणीही फारसे काहीही बोलले नाही. बांबाच्या लाडक्या , सुसंकृत आस्ताद नी सुद्धा त्याला विरोध केला नाही.
स्त्री पुरुषांना समान वागवायच्या न्यायानी विरोधी टीम मधल्या मुलाला धक्का बुक्की केलेली चालत असेल तर मुलींना सुद्धा पुरुषांनी केलेली धक्का बुक्की चाललीच पाहिजे म्हणण्यासारखे आहे हे.
माझी गंमत अशी आहे की मला
माझी गंमत अशी आहे की मला बाहेर पडलेले लोक सोडले तर कुणी एकच ग्रुप किंवा एकच व्यक्ती चूक वाटत नाहीये. सगळे आता मास्कस ऑफ मोडमधे आलेत. आपला सेलेब ऑरा बाजूला टाकून माणसे झालेत ते आता. त्यामुळे मजा येतेय त्यांना बघायला.
अर्थात कॉन्टेक्स्ट काय ते इथे
अर्थात कॉन्टेक्स्ट काय ते इथे कळत नाहीये. <<< +१००००
ते वडील धारे आहेत व त्यांचा
ते वडीलधारे आहेत व त्यांचा मान राखुन...
मी स्वःता त्याना प्रथमच पाहिल, किंबहुना अस्ताद हा कलाकार आहे हे मला बि. बॉ सुरु झाल्यावर कळलेल.
"पण स्त्रीयांशी सर्वानी चांगल वागाव हे मला मान्य नाही झाल." ह्यातुन कोणाला काय बोध होतो हे ज्याने त्याने पहाव. पण मला ते खटकल इतकच.
मराठी वर प्रभुत्व असनार्या व्यक्तीकडुन योग्य शब्दात मांडल गेल नाही अस म्हणन पण कितपत ग्राह्य धरायच.
स्पेशल ट्रिटमेंटच्या बाबतीत त्यांची बाजु योग्य असेलही पण, ति त्यानी योग्य शब्दात मांडायला हवी होती इतकच..
यावर सई, मेघा वा आउची प्रतीक्रिया काय हे जाणुन घ्यायची उत्सुकता नक्किच आहे.. आजचा एपिसोड पहायाला हवा..!!
स्मिता जेव्हा स मे टीम कडून
स्मिता जेव्हा स मे टीम कडून खेळली होती एक गेम तेव्हा आस्ताद तिच्याशी पण फार वाईट वागला होता. तिच्या अंगावर तूला मराठी येत नाही , बोलू नकोस असे फारच तिला कमी लेखून /humiliate करून ओरडत होता. इथे स्त्री/ पुरुष संबंध नाही , पण स्मिताला तिच्या मराठेवरून त्याने इतके घालून पाडून बोलण्याचे काही कारण होते असे वाटले नाही. विशेष करून जेव्हा ती त्याच्या टीम मधे असते तेव्हा त्याने इतका आरडा ओरडा केल्याचे दिसले नाही. मला वाटते तो/ त्याची टीम खेळात मागे पडायला लागली की तो अस्वस्थ होऊन संधी मिळताच विरोधी टीम मेम्बर्स वर ओरडाय्ला लागतो.
अस्तादचा बाबा म्हणाला की
अस्तादचा बाबा म्हणाला की स्त्रियांना स्पेशल स्टेटसची का अवश्यकता भासते असा माझा खूप मोठ्ठा प्रश्न आहे. आपल्याला वेगळं वागवलं जावं (असं इथल्या स्त्रियांना का वाटतं)? शारीरिक पातळीवर मान्य आहे. तसं कोणीच इथं वागणार नाही. पण भावनिक आणि बौध्दिक पातळीवरसुद्धा आपल्याला वेगळ्या पद्धतीची वागणूक मिळावी अशी तुमची का इच्छा आहे ?
वर वर पाहता हा प्रश्न योग्य वाटतो. पण तो तसा नाहीये. एकतर भावनिक आणि बौद्धिक पातळीवर समानता कोणीही आणि कधीच अमान्य करत नाही आणि घरातही केलेली नाही. किंबहुना घरातल्या बायका या दोन्ही मुद्द्यांवर घरातल्या अनेक पुरुषांपेक्षा नक्कीच उजव्या ठरतील.
इतकंच काय शारीरिक शक्तीच्या खेळांतही स्त्रियांनी हिरीरीनं भाग घेतलाय पण शक्ती एकाच गटाकडे जास्त असल्याने मेघाचा गट मागे पडत राहिला. त्याबद्दलही राग आला तरी तक्रार करता येणार नाही. फारतर यात बिग बॉसची चुकी आहे असं म्हणता येईल.
आणि .... शारीरिक पातळीवर मान्य आहे. तसं कोणीच इथं वागणार नाही. ????? सिरीयसली? काकांनी एपिसोड्स पाहिलेले दिसत नाहीत.
पण राजेश, अस्ताद, सुशांत, चौघुले आणि खुद्द मांजरेकर जेव्हा केवळ बायकांवर मोठ्या मोठ्या आवाजात ओरडतात, धमक्या देतात आणि अत्यंत घाणेरडेपणे भांडतात तेव्हा त्यात ही असमानता दिसते. आणि ती पुरुषांकडून होतेय आपोआप.
अस्ताद जसा मेघा सईवर ओरडतो मोठ्यानं बोलतात म्हणून तसा कधी राजेश, सुशांत, चौघुलेवर का नाही ओरडला मग?
ते काका फुकटचे लेक्चर देतायत चुकीचा अँगल पकडून. हे प्रकरण त्यांच्याच पोरावर शेकणार.
एक निरीक्षण:
एक निरीक्षण:
टीव्हीवरच्या एपिसोड्स मध्ये मेघा आणि रेशममध्ये (आणि त्यांच्या ग्रूप्समध्येही) जितकी टशन/खुन्नस दिसते तितकी ती अनसीन अनदेखा किंवा कटलेस च्या क्लिप्समध्ये दिसत नाही..... त्या क्लिप्समध्ये जरा बरे वागताना दिसतात सगळेच एकमेकांशी!
निदान मनमोकळ्या गप्पा तरी मारत असतात!
रेशम आणि मेघा त्या सॅंडीबद्द्ल बोलत असतात त्या क्लीपमध्ये तर मला प्रकर्षाने जाणवल हे!
(का हा बदलत्या equations चा परिणाम आहे)
Pages