Submitted by बेफ़िकीर on 8 June, 2018 - 11:05
गझल - माणसे तोडणे चांगले
माणसे तोडणे चांगले
की मने मोडणे चांगले
ही न राहू शकत एकटी
ओळ ही खोडणे चांगले
जे तुला पाळणे साधते
ते गुपित फोडणे चांगले
तू मला सोडण्याहूनही
मी मला सोडणे चांगले
अर्ज पाहो न पाहो कुणी
दाखला जोडणे चांगले
-'बेफिकीर'! (०८ जून २०१८)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलंय बेफिजी! मनाला
छान लिहिलंय बेफिजी! मनाला भावलं! अगदी सुरेख आहेत ओळी.
छान गझल.
छान गझल.
जे तुला पाळणे साधते
ते गुपित फोडणे चांगले >>> हा शेर नाही कळाला
वाह! वाह! मस्तच
वाह! वाह! मस्तच
खूप आवडली गझल.
तू मला सोडण्याहूनही
तू मला सोडण्याहूनही
मी मला सोडणे चांगले>> हे खुप छान वाटलं
कमी शब्दात!
कमी शब्दात!
खुप दिवसानी कमी शब्दातली गझल - मस्त
'ही न राहू शकत एकटी
ओळ ही खोडणे चांगले'
हे खास