एयर फ्रायर मासा

Submitted by आ.रा.रा. on 3 June, 2018 - 13:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. मासा (हवा तो. साफ करून.) मी लोकली मिळणारा - फिश फार्ममधला- गोड्या पाण्यातला आमच्या कोळ्याने 'पिंक परी' असलं महान नांव सांगितलेला जिवंत मासा माझ्यासमोर टबातून काढून दिलेला सुमारे पाव किलो वजनाचा आणला होता.

२. हळद, लिंबू, मीठ : लावून ठेवण्यासाठी.

३. मसाले
तिखट
मिठ
आलं लसूण पेस्ट
जिरेपूड
धणेपूड
गरम मसाला
लिंबाचा रस
अन थोडा लोणच्याचा मसाला (केप्र)

चहाचा चमचाभर तेलात मिक्स करून.

४. बचकभर चिरलेली कोथींबीर

५. काकडी, टमाटा, बटाट्याचे काप.

क्रमवार पाककृती: 

सोप्पी आहे. संपूर्ण रेस्पि इथे लिहिण्याचा पॉईंट म्हणजे एयर फ्रायर नामक यंत्रात इतके सुंदर तळल्याच्या चवीचे मासे चमचाभर तेलात होतात, हे सांगणे असा आहे.

माशाला ३ पाण्यातून स्वच्छ धुवून हळद मीठ लिंबू लावून ठेवायचं. मग एक २-५ मिन्टांनी वरचे सगळे मसाले मिक्स करून चांगले चोळून लावायचे.


धीर धरवेल तितका वेळ मॅरिनेट होऊ द्यायचं.

एयर फ्रायर सेटिंग्ज :

३ मिनिटे, किंवा हिटरचा लाईट बंद होई पर्यंत १८० डिग्रीला चालू करा. याआधी मधल्या नॉनस्टिक भांड्याला हाता/ब्रशने ८-१० थेंब तेल चोपडुन घ्या.

त्यानंतर भांडे बाहेर काढून त्यात आधी बटाटे, टमाटे, कांदे, ढोबळी, झुक्किनी इ. जे असेल ते माशाच्या उरलेल्या मसाल्यात घोळून खाली पसरा. त्यावर मासा/तुकड्या ठेवा, अन भांडे एयरफ्रायरमधे घाला. हवे तर थोडे तेल ब्रशने लावा/स्प्रे करा.

टोटल टाईम २० मिनिटे. (पाव किलो मासा प्लस शे दीडशे ग्रॅम भाज्यांसाठी)

१० मिनिटांनी (अर्धा कुकिंग टाईम) पॅन बाहेर काढून मासा उलटवा. हवे तर ब्रशने तेल लावा.

२० मिनिटात चांगला कडक तळला जातो.
पुरेसा तळल्यासारखा नाही वाटला तर पुन्हा भांडं आत ढकलून दोन पांच मिनिटे अजून तळा. हाकानाका!

वाढणी/प्रमाण: 
डिपेंड्स. हा इतका मी एकट्याने खाल्ला.
अधिक टिपा: 

याला म्हणतात एअर फ्रायर.

या यंत्रात कमीत कमी तेलात तळल्यासारख्या चवीचे पदार्थ बनवता येतात. आम्हाला (फुकट) भेट मिळालेल्या चायनामेड एयरफ्रायरमधे वरील पाकृ बनवलेली आहे. बेसिकली एक शेगडीची कॉईल, पंखा, अन बंद तंदूरटाईप भांड्यात एक जाळीदार नॉनस्टिक भांडे अशी अ‍ॅरेंजमेंट असते.

माबोवर या प्रकारे कुकलेल्या रेस्पिज फारशा नाहीत म्हणून ही एक टाकली.

माहितीचा स्रोत: 
मी.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पा, समोसा, कचौडी असे सुके आवरण असलेले पदार्थ एफ्रा मध्ये नीट होतेत. पण तर्‍हेतर्‍हेचे वडे, भजी, मेदूवडे, पुर्‍या हे ओले प्रकार भर तेलात तळून काढलेलेच चांगले लागतील; आणि फटाफट होतीलही.
आप्पेपात्रातले साबुवडे हा एक वेळखाऊ वर बेचव प्रकार. साबुदाण्यात काहीही वाखाणण्याजोगं नाही.
साबु वडा शेंगदाणा तेलात तळून खत्तरनाक चविष्ट लागतो...

प्रासंगिक खाणं आहे तर फॅट कंटेट चा बाऊ न करता खावेत.
आरारा, मासा चविष्ट आणि खरपूस दिसतोय ब्र का! Happy

अहो आ.रा.रा.,माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही. केप्रचा कोणता लोणचं मसाला वापरला? कैलोम, लिंलोम का मिलोम ?

कैलोम @ शुगोल

परवाच्या लोणाच्यानंतर थोडा उरला होता ते पाकीट रिकामं केलं Lol

योकू, १००% शमत

कधितरीच तळुन खायचे प्रकार निगुतिने करुन कॅलरी वैगरेचा विचार सोडुन मनसोक्त खावे .
<<
अहो, मासा नावाचा हेल्दी प्रोटीन मी अठवड्यातून किमान २ वेळा खातो. त्यामुळे कधीतरीच नसतं हे.
बहुतेकदा बेक करून/फॉईल रॅप करून/पाथ्रानी मच्च्छी टाईप केला जातो, पण तळल्याची चव भारीच असते. म्हणून हा प्रकार.

अहो, मासा नावाचा हेल्दी प्रोटीन मी अठवड्यातून किमान २ वेळा खातो. त्यामुळे कधीतरीच नसतं >>> अहो ! ते पुरी,ब.वडे, मेदुवडे यासाठी होत हो, योकु म्हणतो तस भर तेलातच करायच्या गोस्टी.
तुमची रेसिपी आवडलेली आहेच!

मोठ्या कष्टाने अगदी कोरडं पीठ होईल इतपत भिजवून खेकडा भजी केली होती एकदा. बरी जमली होती.
नवीन Submitted by आ.रा.रा. on 5 June, 2018 - 13:37
>>>
आम्ही कांदा उभा चिरून त्या कांद्याच्या रसात भिजेल इतपत पीठ घालून खेकडा भजी करतो. चवही खरपूस येते. वेळ जास्ती लागतो भिजायला.

छान लिहीले आहे व फोटो पण मस्त. मी काहीच तळ त नाही. व मसाले पण इतके वापरत नाही एका वेळी. अनलेस बिर्या णी व चिकन ६५ करायचे असेल तर. ६५ साठी चिकन तळावे लागते ते ह्याच्यात करून घेता येइल कदाचित. फिश चे मला काही ज्ञान नाही. पण मी सॉल्ट पेपर, ओरेगानो व स्पाइस मिक्स करून लेमन बटर सॉस मध्ये बनवून खाईन. माझ्याकडे ग्रिल पॅन आहे त्यातच. स्पेशल उपक र णी भांडी पार कमी करून टाकलीत. समोसे खाउन सहा महिने झाले. इतक्या मसाल्याने माशाची ओरिजिनल चव दबली जाते का?

बहोत अच्छे आ रा रा

लगे रहो

कधी ससा बनवलात तर ते पण इथे टाका, असे ऐकले आहे की ससा खड्ड्यात ठेवून वरून भाजतात

ह्या माशाचा वास उग्र असतो का

{{{ कधी ससा बनवलात तर ते पण इथे टाका, }}}

ते ससा बनवणार कसा? त्या सशाची आई त्याला (काही काळ गर्भात ठेवून, नंतर पालन पोषण करुन) बनविणार. आरारा तर त्याला संपवणार.

इतक्या मसाल्याने माशाची ओरिजिनल चव दबली जाते का?
<<
घटक जास्त असले तरी अ‍ॅक्चुअल मसाला क्वांटिटी फार कमी आहे. स्टफ नव्हता केलेला. I love experimenting with spice combinations. वर दिलाय तो पॉकेट फिश फक्त आलं, मीठ, चिलिफ्लेक्स अन लिंबू इतक्यातच केलेला आहे.

बहुतेक ठिकाणच्या परंपरागत पद्धतीनुसार कोणताही मासा घेऊन त्याला फक्त तेल मीठ तिखट लावून रवा/तांदळ्याच्या पिठात बुचकळून तळल्याने माशाची चव टिकते असे मला अजिब्बात वाटत नाही. असंख्य ठिकाणी त्या कचवट रवा अन आतून ओल्या तिखट मिठाची सालपटं बाजूला काढून आतला ओव्हरकुक्ड मासा खावा लागलेला आहे.
*
बेफि,

सशाचे मटन भरपूरच तेलकट असते. अन उग्रही. करण्याची शक्यता कमी आहे, पण केला तर नक्की टाकेन इथे.
खड्ड्यात बनवलेल्या कोंबडीची रेस्पी तिकडे मिपावर टाकली आहे. खड्डा कोंबडी, बांबू बिर्याणी असल्या गोष्टी आजकाल फेमस होत आहेत.

गोड्या पाण्यातले ताजे मासे ऑल्मोस्ट बिन वासाचे अन चवीला भरपूरच ब्लँड असतात. बटाट्यासारखे. Wink त्यामुळेच मसाले..
*
अतुलजी,
धन्यवाद!
*
पाफा,
त्या भज्यांत कांद्यासोबत उभा कापलेला गड्डा कोबी, अन बेसनासोबत थोडी तांदळाची पिठी अ‍ॅड केली तर क्रंच खूपच वाढतो.

रवा/तांदळ्याच्या पिठात बुचकळून तळल्याने माशाची चव टिकते असे मला अजिब्बात वाटत नाही. <>>>>>>>> तांदळाचे पीठ भज्यांसारखे कालवून त्यात बुडवून मासा तळला तर तो हॉरिबल लागतो.मालवणला मुद्दाम घरगुती खानावळ कम हॉटेलमधे हा प्रकार पाहिला.तुम्ही म्हणता तशी फोलपटे निघालेली कोलंबी खाऊ शकले नाही.तिखटमीठ लावलेला मासा,तांदळाच्या पिठात (रवा ऑप्शनल) घोळवून तव्यावर फ्राय केला तर झकास लागतो.

देवकीतै
तुम्हाला प्रतिसाद द्यायचा राहून गेला.

काही फूड काँबिनेशन्स डिव्हाईन असतात हे बरोबर आहे. मासा अन सोलकढी अतीशय परफेक्ट जातात एकमेकांसोबत.

"घोळवलेला"च मासा तव्याला चिकटू नये म्हणून अती जाड लेप लावला जातो अन अल्टिमेटली सुरमईदेखील बोगस लागतो हो Sad

"घोळवलेला"च मासा तव्याला चिकटू नये म्हणून अती जाड लेप लावला जातो >>>>
कदचित अती जाड लेप लावलेला मासा खाल्ला नाही.जाऊ दे.पसंद अपनी अपनी.

@आ.रा.रा.
नक्की ट्राय करेन. तसेही आम्ही घासफूस वाले आणि पहील्या पावसाची वाट बघतोय चहा पकोड्यांसाठी.


पाव किलो कारल्याच्या चकत्या हवे असल्यास मीठ लावून पाणी काढून. त्याला तेल-मीठ-तिखट लावून घेणे.

एयर फ्रायर सेटिंग्ज

तयार कारल्याच्या चकत्या.

बाकी बेफि आणि आरारा यांना एकाच पाणवठ्यावर समजूतदार पणे चर्चा करीत पाणी पिताना पाहून ड्वाळे निवले.
असो रं पा. या विष्यावरही दोघांचे असेच आदान प्रदान होउ शकते Proud

ड्वाळे निवले
>>>
तुम्हाला अन झककीना पाहून लोकांचे निवले होते तशे?

Kiti vel lagla?
<<
फोटो दिलाय की एअर फ्रायर सेटिंग्जचा. २०० डिग्रीला १५ मिन्टं सेट करायचा. ३-४ मिनिटांत प्रिहिट होतो. मग चकत्या टाकायच्या. ५-६ मिनिटांनी थोडं हलवायचं, मग १६०-१७० डिग्री टेम्परेचर करून उरलेली ५-६ मिनिटं.

मस्त दिसतोय मासा. आमच्याकडे एअर फ्रायरचा आग्रह सुरु आहे पण भर तेलातले तळण नाही असे म्हणत कार्ब्ज खाणे वाढेल अशी भीती वाटतेय. सध्या मासा फॉईलमधे किंवा ड्राय रब वापरुन ब्रॉईल करुन भागतयं. लोणच मसाला वापारायची आयडीया आवडली आहे. खरे तर कोलंबीचे लोणचे केले जाते पण तोच मसाला माशासाठी वापरावा हे कधी डोक्यात आले नाही.

मी एकाकडे ए. फ्रा. मध्ये खालेल्ला मासा खूपच ड्राय होता. आपण तेलात तळतो तेव्हा मासा आतून मॉइस्ट पण बाहेरून खरपूस तळतो हाय टेंपरेचरला. त्याचे मॉईस्ट्पणा सील होतो.

हा पंखा डिहाड्रेटर पणे काम करतो व ड्राय करून टाकति.
माझ्या मैत्रीणीने सफरचंदाच्या फोडी वगैरे ड्राय केल्यात.
भजी कुरकुरीत पेक्षा सांडगे टाईप लागत होती.
समोस्यात पातीत भरमसाठ तेल घातलं कीच बरा झालेला.
फक्त काबुली चणे भडंगासाठी भाजलेले तिने, ते बरे झालेले.
वाळवणं साठवणं होतील ह्यात ज्यातले पाणीच काढायचेय व कोरडे हवेय.
पापड वगैरे मावे सारखाच लागला.
उरलेल्या ब्रेडचे सूप क्रस्टी मध्ये घालायला.

हे इतकं बघून माझा निर्णय बाद झाला.

पापड होत नाही एअरफ्रायरमधे. पंख्याच्या वार्‍याने वर उडून बसतो आणि जळतो. ज्याला स्वतःचे थोडे तरी वेट आहे असा पदार्थ होतो असा माझा अनुभव आहे.

डोनट पापड करायचा ; मध्ये वेट ठेवायचं आणि मग कच्चा भाग कापून/तोडून टाकायचा Wink

>> पंजाबी सामोसे कधीतरी बेक करुन खाऊन पहा. मस्त लागतात. आमच्याकडे आता तळलेले सामोसे खाववत नाहीत.
सायो, तू बेक्ड पंजाबी सामोशाची रेसिपी लिही की. बाहेरचं कव्हर कशा प्रकारे वेगळं करावं लागत असेल बेक करण्याकरता त्याचा अंदाज येत नाही (पाय क्रस्ट सारखं करायचं का?) - मी फार ऐटीत विचारतेय खरी पण एव्हढे कष्ट करण्यापेक्षा बाहेर २$ देऊन च तळलेले सामोसे आणले जातील मोस्ट लाईकली.

Pages