फिश इन फॉइल

Submitted by इब्लिस on 21 September, 2014 - 00:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मासे पाव किलो.
१ इंच आले. (बटाट्याच्या वेफर्स पाडणार्‍या किसणीवर किसून घेतले. भारी शेफ्स नाईफ असेल तर कापून घेणे)
४ तिखट सुक्या मिर्च्या / पिझ्झ्यासोबतच्या चिलीफ्लेक्सची ७-८ पाकिटं. (मिर्च्या जाड कुटून घेणे.)
खडे मीठ (इंग्रजीत सी सॉल्ट) ३ चिमूट (म्हणजे अंदाजे)
लिंबू : अर्धा. रस काढून घेणे.
चमचाभर व्हाईट वाईन. (हौस म्हणून. वाईन नसेल घालायची तर लिंबाचा रस थोडा वाढवणे)
बचकभर कोथिंबीर.
१ चहाचा चमचा तेल. (दृष्ट लागू नये म्हणून)
आल्मुनियम फॉइल.

क्रमवार पाककृती: 

अ‍ॅल्युमिनियम फॉईलची डबल घडी करून तिची एक पाऊच बनवावी. डबल असली तर तव्यावर भाजताना जळत्/फाटत नाही. बेसिकली आतली वाफ निघून जाणार नाही अशाप्रकारे फिश रॅप करणे अपेक्षित आहे. तुमच्याकडे मासे किती, त्यावर किती फॉईल पाकिटे बनवायचीत ते ठरवावे. Wink एका पाकीटात १-२ तुकडे.

आलं, मीठ, चिली फ्लेक्स, मासे, लिंबाचा रस, वाईन, जाड चिरलेली कोथिंबीर एकमेकांत मिसळावे.

fish01.jpg

हे मॅरिनेशन लावलेले मासे अ‍ॅल्युमिनियम फॉईलच्या पाकिटात भरावे. (ही पाकिटे फ्रिजात ठेवून द्यावीत अन हवी तेव्हा कुकून खावीत. फ्रिझरमधे अठवडाभर टिकू शकते.)

पाकीट सील करून प्रीहीट ओव्हनमधे १२ मिनिटे २०० डिग्री सेल्सिअसला ठेवावे. (या ऐवजी ६-८ मिनिटे तव्यावरही मध्यम आचेवर भाजता येईल. ३-४ मिनिटे एका साईडने.)

थोडा धीर काढला, की तय्यार!

fish02.jpg

या जेवायला!

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी.
अधिक टिपा: 

हवे असल्यास माशांसोबतच भाज्या : उदा. बटाटे, कांदे, गाजर, कोबी इ. जुलियन करून (सहज शिजतील इतपतच्या जाडीवर लांबट कापून.) पाकिटात भरता येतात.

भाताऐवजी सोबत मॅगी नूडल्सही चालतील Wink

माहितीचा स्रोत: 
फिश इन फॉइल : खाना खजाना.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.

अस्सल तांदळाच्या रव्यात तेलात फ्राय करण्यास चवीचे नाना पर्याय हवेतच आता!

तेल कमी खायचे, तांदूळ कमी खायचा मग चव आणायची कुठून? असा प्रश्न पडायला नको.

तोळामासा 21.gif

मरळ आहे तो. गोड्या पाण्यातला. फ्रेश वॉटर ईल. मिनिमम काटे असतात. फिश फार्म्समधे कॉमनली मिळतो. मार्गशीर्ष महिन्यात याच माश्याच्या पिल्लांत 'दम्याचं औषध' भरून गिळायला देतात Wink

शिवाय धिका, डाएट रेस्पि आहे. माशातलं गुड कोलेस्ट्रॉल हवं तर तळणातलं बॅडवालं टाळलं पाहिजे. गुटगुटीत बाळांना तोळामासा तब्येतीचा आदर्श ठेवूनही नॉनव्हेज चवीने खाता यायला हवं म्हणून रेस्पी टाकलिये Wink

*

डिविनीता,
आपल्याकडचे नॉनव्हेज खाणे म्हणजे जास्तकरून प्रचण्ड तेलात भाजले/तळले/शिजवलेले मसाले, पोळी/भाकरी/भाताच्या स्टार्चमधे मिसळून खाणे असं असतं. 'पिसेस नकोत. रस्सा द्या',वाले लोक भरपूर असतात आपल्याकडे. स्टार्च्/प्रोटीन्/फॅटचा बॅलन्स, प्लस चव असं जमवलं, तर मजा येते. आधी जीभ थोडी नरम पडू द्यावी लागते मात्र. कारण तितक्या तीव्र चवी चाखण्याची सवय झालेल्या जिभेला सुरुवातीला अशा सटल(subtle) चवी बेचव लागतात.

अरे वा रेसेपी तर मस्त आहे मग की वर्ड्स मधे कन्फ्युजन का आहे :)) डॉक्टर सांगताहेत म्ह्णुन नक्की करणार..

रेसिपीची कल्पना नवी नसली तरी फॉईल वापरून तव्यावर करायची आयडिया आवडली. योग्य व्यक्तींपर्यंत पोचवण्यात येईल Happy
घरी बरेचदा मॅरिनेशन मधे लिंबाऐवजी कांदा किसून त्याचा रस वापरला जातो

छान आणि सोपी आहे कि. आम्ही पण तेलात तळलेले चिकन ६५ वगैरे प्रकार सोडून हेल्धी ऑप्शन्स शोधत होतो. सटल टेस्टचा मुद्दा बरोबर आहे. शिवाय रविवारी पाकिटे बनवली कधी पण खाल्ली असे करता येइल.

हो हो तेच तर म्हणतेय कुठलाही वार चालतो माशाना व आपल्याला, इथे भेदभाव, श्रद्धा, अंधश्रद्धा, कर्मकांड असे नाही. गणपती असो कि नवरात्र, मासे असतातच आमच्याकडे..याच आता!

१) मासे कसे खावेत?
२) मासे कसे खाउ नयेत?
३) मासे कशासोबत खावेत?
४) मासे कशासोबत खाउ नयेत?
५) मासे किती प्रकारचे आहेत?
चांदोबात एकदा माशाचा काटा एका माणसाच्या घशात अडकून तो बेशुद्ध पडला व त्याचे पुढे काय काय झाले अशी एक कथा लहानपणी वाचली होती. तो मेला असे समजून त्या ती ब्याद प्रत्येक जण कसा दुसर्‍याकडे पास करत होता? शेवटी एका हकीमाने त्याच्या घशातील माशाचा काटा काढला व तो जिवंत झाला असा काहीशी ती कथा होती. तेव्हापासून माशाची जरा भीतीच वाटते. एकदा मित्राच्या घरी एक पदार्थ खायला दिला.मी तो आवडीने खाल्ला. छान आहे असे सांगितले. नंतर त्याने तो सुरमाई असल्याचे सांगितले. मग कळले की आपण समजतो तसा मासा काही वाईट नाही. (बोंबील सोडून)

मी करुन पाहिले ली तेव्हच फ्क्त इथे लिहिले नाही/ मासा चवीला चांग्ला झाला पण फॉइलमध्ये पाणी खुप गोळा झाले होते. अर्थात ते मुलीने भाताबरोबर खाल्ल्ले म्हणा, पणं वरच्या फोटोत काही तसे पाणी गोळा झालेले दिसत नाही.