बळी

Submitted by सेन्साय on 2 June, 2018 - 22:45

बळी
(शतशब्द कथा)
______________
.

आज संध्याकाळ पासून तिची शोधक नजर भिरभिरत होती. गेल्या अख्ख्या आठवड्यात एकही कामाची गोष्ट न मिळाल्याने ती उपाशी होती. शारीरिक स्तर केव्हाच ओलांडलेली भूक आज तिला शांत बसु देत नव्हती. तेवढ्यात तिने सावज टिपले. शिकार आटोक्यात होती. त्याच्या मरण्याने कोणी दुःखीही होणार नव्हता.

होय ! तोच ज्याच्यावर दूसरीतल्या आसिफाची छेड़ काढल्याचा आरोप होता. अखेरचा पाश आवळण्यापूर्वी खात्रीसाठी समोरून पुन्हा पाहुन आली. हेतुपुरस्सर वाकत सर्व उभार दाखवल्याने सावज अलगद गळाला लागले.

बळीची जागा निश्चित होती ― तिचा मास्टर बेड अन् अखेर वेदनादायक मृत्यु ! आज अजुन एक नराधम एचआयव्ही पॉझिटिव्ह बनणार होता.

जे बक्षीस समाजातील विकृतीने तिला दिले होते त्याची आज परतफेड होणार होती.

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा म्हणून कायच्या काय आहे !!
रोगापेक्षा ईलाज भयंकर. म्हणजे जोवर तो जगेल तोवर अजून निरापराध लोकांना संसर्ग करीत राहील.
मस्तं छान ?? Uhoh - अवघड आहे.

ईलाज ? ― Lol हे कोणी ठरवलं.
प्रतिशोध म्हणजे निव्वळ खोलवर उमटलेला आक्रोश तात्पुरता शमवायच्या मार्गापैकी एक.

म्हणूनच हां बळी दोन्ही बाजुन आहे. तिच्यासाठी त्याचा. त्याच्यासाठी स्वतःचा. समाजाने घेतलेला कोणा एकाचा किंवा कोणी एकाने घेतलेला आख्ख्या समाजाचा बळी !

प्रतिसादाकारिता धन्यवाद हायझेनबर्ग Happy