पाटील v/s पाटील - भाग ६

Submitted by अज्ञातवासी on 26 May, 2018 - 13:40

पाटील v/s पाटील - भाग ५
https://www.maayboli.com/node/66216#new

अंबाच्या मोठ्या हॉलच्या पुढेच अण्णा पाटलांच ऑफिस होतं. ऑफिस म्हणजे अण्णांची सर्व प्रकरणे चघळण्याची व मिटवण्याची जागा होती.
पाटलांचा विश्वासू ड्रायवर महादू गेल्याच आठवड्यात घरातल्या मोलकरणीबरोबर गाडीत चाळे करताना आढळल्याने तो इतका विश्वासू राहिला नसल्याचे पाटलांनी अनुमान काढले. म्हणून त्याच डीमोशन होऊन त्याला कारखान्याच्या उसाच्या ट्रकवर पिटाळण्यात आले. आणि मोलकरणीचे प्रमोशन होऊन तिची रवानगी अण्णा पाटलांचे सख्खे बंधू शामराव पाटलांकडे करण्यात आली.
ड्रायव्हर शोधण्यासाठी पेपरात बातमी देण्यात आली. आणि गावातले सगळे वळू याज अ ड्रायव्हर काम करण्यासाठी मुलाखतीला झाडून हजर होते.
मात्र या मंडळींना तिथे पोहोचल्यावर कोणतीतरी पाटील स्टील नावाची कंपनी ड्रायव्हर भरती करत असून इथल्यापेक्षा पाचपट पगार देतेय, आणि ही सुवर्णसंधी आजच आहे, हे समजलं, आणि त्यांनी पळ काढला.
अण्णा पाटलांचे कारभारी जाधव यांना ही बातमी कळताच ते हादरले. पण अजूनही बाहेर एक उमेदवार बसलाय, हवं ऐकुन ते मोठ्या उत्सुकतेने बाहेर आले.
तर मंडळी, मोहनला बघून पवारांना क्षणभर विश्वासच बसला नाही, की हा माणूस ड्रायव्हर असू शकतो....
...आणि म्हणूनच त्यांनी मोहनला पाटलांसमोर उभे केले.
कुठल्यातरी महान माणसाने लिहिलंय, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन....
...आणि अण्णा पाटीलवर हे इम्प्रेशन जराही पडलं नव्हतं. फक्त मनात अनेक प्रश्न होते.
...आणि मुलाखत चालू झाली....
आता ही मुलाखत पटापट व्हावी म्हणून प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात देत आहे (लई कंटाळा आलाय टायपायचा) .

१. नाव?
उ. मोहन
आपल्या नावासमोर बापाच आणि आडनाव लावायला लाजू नये...
उ. मोहन कृष्णा पाटील

२. राहणार?
उ. कोल्हापूर

३. आधी कुठे होतात, कामाला?
उ. घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट.

४. मग कोल्हापुरातून सरळ पाटीलवाडीत?
उ. हो, लहानपासून इच्छा होती, आपल्या नावाच्या गावात राहायला जावं.

५. जुनी नोकरी का सोडली.
उ. घाटगे पाटलांनी मला दुसऱ्या कंपनीत पाठवलं कामाला.

६. मग?
उ. आमची खानदानी परंपरा आहे, आपल्या आडनावाच्या लोकांसाठीच काम करायची.
आणि या वाक्यावर अण्णा क्लीन बोल्ड...

७. म्हणून तू बाकीच्या लोकांबरोबर गेला नाहीस?
उ. अपने भी कूच उसुल हे पाटीलसाब...

...क्लीन बोल्ड होऊनही अजूनपर्यंत मैदानात उभे असलेल्या पाटलांनी आता पवेलियन ची वाट धरली.
"जाधव, उरलेलं काय असेल ते ठरवा, जरा आत या आता... " अण्णा उठता उठता म्हणाले, आणि हॉल मध्ये गेले. जाधव त्यांच्या मागोमाग गेलेत.
"जाधव, हा माणूस राहायला हवा. बोलणी करा. सगळं सांगा. दुप्पट पगार द्या. माणूस राहिला पाहिजे."
"जी अण्णा," जाधव म्हणाले.
जाधव बाहेर आले. मोहन मस्त खुर्चीवर रेलून बसलेला होता.
"जरा नीट बस, पाटील साहेब चिडलेत तुझ्यावर..."
का?
"जरा जास्तच शूरवीर बनत होतास ना, म्हणून." जाधव म्हटले.
थोडे क्षण शांततेत गेलेत.
"पाटील साहेब खरंच पाटीलच आहेत ना?"
"काय?" जाधव अविश्र्वासाने मोहनकडे बघू लागले...
"जाधव......." वीज कडाडावी तसा आवाज झाला!
मागे अंबा उभी होती.
"जाधव.... आधि तुला चिरला पाहिजे, आतापर्यंत हा इथे बसलेला आहे म्हणून, आणि मग याला... माणसं बोलावं, आणि कापून काढ याला."
जाधव अर्धमेला झाला होता. एकतर अंबा कुठून उगवली हे कळत नव्हत, आणि दुसरं, तिने जे ऐकलं, ते तिने ऐकायला नको होतं...
"ऐकलं का, उठ आता... " जाधव कसाबसा म्हणाला.
"जातोय, पण या बाईंना सांगा, पाटील शूरवीर जन्मतःच असतो, आणि ज्या पाटलाला हे माहीत नाही, तो पाटील म्हणायच्या लायकीचा नाही. मोहन ताडकन उठून म्हणाला..."
...अंबाच्या डोळ्यात डोळे घालून मोहन बघत होता.
त्याच्या डोळ्यात आग होती, अंगार होता. किळस होती, तुच्छतेची भावना होती.
अंबा क्षणभर चपापली, आणि नंतर तिने जे केलं त्याला तोड नव्हती...
"...अण्णाला सांग, आजपासून हा आपला ड्रायवर."
जाधव भोवळ यायचाच बाकी होता. त्याने फक्त मान डोलावली.
मोहनराव पुन्हा खुर्चीवर रेलले...
"काय रे ये हिरो, जरा जास्तच अभिनय जमतो तुला..."
"अय्या, तुम्हाला कसं कळलं" मोहनने हे बोलताना जे हावभाव केलेत ना, ते बघून जाधव अक्षरशः लाजला.
"ओ महाराज, अभिनय आहे फक्त. राज्यस्तरीय नाटक स्पर्धेत माझं नाटक सादर झालं. त्यात मी मुख्य अभिनेता होतो."
"नाटक कोणतं होतं?"
"गाढवाचं लग्न"
"अच्छा तू सावळा कुंभार होतास का?" जाधवांनी विचारले.
"नाही... मी गाढव बनलो होतो..." मोहन लाजत म्हणाला.
जाधवांनी कपाळावर हात मारला.
"ये बाबा, उद्यापासून कामावर ये. आपण सगळं ठरवू... आता पाया पडतो तुझ्या...."
मोहन उठला...
...आणि...
... तिकडून सोनाली उर्फ सोनी आत येत होती...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अच्छा तू सावळा कुंभार होतास का?" जाधवांनी विचारले.
"नाही... मी गाढव बनलो होतो..." मोहन लाजत म्हणाला.---- Lol
पु.भा.प्र. Happy

भारी जमलाय हा भाग. विनोदी शैलीत छान लिहिला आहे.

आमची खानदानी परंपरा आहे, आपल्या आडनावाच्या लोकांसाठीच काम करायची>>>> Lol हे भारीय!

छान चालुय.

पवन कल्याण नाव पहिल्यांदाच ऐकलं. कोणीतरी हिरो आहे वाटतं...

धन्यवाद अॅमी!

पवन कल्याण हा तेलगू ऍक्टर आहे. त्याचे atarintiki darredi आणि agnyaathvasi चित्रपट नक्की बघा. एकसे एक आहेत.

सर्व वाचकांची मी मनापासून माफी मागतो.
काही महत्वपूर्ण कामांमध्ये अडकल्याने पुढचा भाग प्रकाशित करू शकलो नाही.

लवकर पुढचा भाग प्रकाशित करण्यात येईल.