गुलाबजाम....मुरलेल्या नात्याचा

Submitted by राजेश्री on 16 May, 2018 - 01:05

गुलाबजाम

तुझं वय किती आहे?त्याचा प्रश्न, तुझं किती आहे वय?तिचा प्रतिप्रश्न...माझं होय माझं सत्तावीस,मग माझंही असेल की तेवढंच,या संवादानानंतर आदित्यच राधाकडे भांबावून बघणे म्हणजे आपल्याही मनातील घालमेलीच चित्रण होतंय असं वाटायला लागण्याजोग..मुलींना कायम वय विचारलं जात आणि ९९% मुली आपलं वय विचारलं की चेहेऱ्यावर जे भाव आणतात अगदी तसेच भाव राधाच्याही चेहेऱ्यावर पण ती नेमकं वय का सांगत नाही याचं कारण मात्र त्या ९९% मुलींसारखं नाहीच ते वेगळं आहे.काय आहे हे सिनेमा बघून अनुभवणं हे जास्त चांगलं होईल.
गुलाबजाम,पाककलेच्या पुस्तकावर पडत जाणाऱ्या नावांपासून आपलं वेगळेपण जपत जातो.हळुवार उलघड जातो.एक्कलकोंड्या आणि स्वतःच्या ध्येयाच्या विश्वात गुंग असणाऱ्या माणसांना आपल्या मनातील भावना व्यक्त करायला जिती जागती माणसंच लागतात अस काही नाही आदित्य मासळीबरोबर बोलतो,शेंगदाण्याचे कूट करण्यापूर्वी टरफले काढता ,काढता शेंगदाण्यांबरोबर बोलतो.तेंव्हा त्याच्याबद्दल,त्याच्या स्वभावाबद्दलचे एक एक कंगोरे आपल्याला माहीत होतं जातात.
राधा आणि आदित्य या प्रमुख व्यक्तीरेखांसोबत आपण गुलाबजाम चा रसास्वाद घेत जातो.पाककला हा मुख्य विषय...जगातील सर्वात आवडती भावना काय तर भूक आणि भूक आहे म्हणून पाककला, स्वयंपाक ही चिरंतन आहे असे संवादांचे स्वगत. पदार्थ बघून भूक चाळविली जाते आणि समोर उलघडणारा पट बघून आपल्या आयुष्यात नात्यांच्याही पार असणारे जिवलग असू शकतात याची जाणीव होत जाते.
आठवणी नाहीत म्हणून रडू येत नाहीत,पण तू का रडतोयस अस राधा, आदित्य ला विचारतेय की आपल्याला अस वाटणारे आणि हळवं करणारे प्रसंग..संवादही कधी खमंग फोडणी दिल्यासारखे आणि कधी साखरपेरणी म्हणजे काय असते हे जाणवून देणारे तर कधी एखाद्या आवडत्या व्यक्तीसाठी त्याला आवडता पदार्थ करीत असताना चेहेऱ्यावर जे कोणत्याही व्याख्येत बसणार हासू असत ना तस अगदी तसच हासू आणणारे संवाद, देवाने माझ्याकडून फार मोठी किंमत चुकवून मला आठवणीतून मुक्त केलं आहे हे ऐकल्यावर आपल्याला आठवणी आहेत म्हणून आनंदी व्हायचं की त्या बोचतात म्हणून हळवं काही कळत नाहीच.
चव आणि अभिरुची या व्यक्तिपरत्वे बदलत जाणाऱ्या संकल्पना पदार्थात कुणाला भरपूर मसाले घातलेले ,खमंग ,तिखट, दणदणीत फोडणी घातलेले पदार्थ खायला जास्त आवडतात तर कुणाला वरण भात प्रकारातील पदार्थ जास्त आवडतात.पदार्थाची एखाद्या विशिष्ट भाजीची मूळ चव आवडणं हे मला वाटत अभिरुची संपन्न व्यक्तीच वैशिष्टय आहे.या दोन्ही गोष्टींनी समृद्ध असणं हे समृद्ध आयुष्याचहीं गमक असत अस मला वाटत.
राधाच्या मेसच्या डब्यातील गुलाबजाम जेंव्हा आदित्य पाहिल्यादा तोंडात टाकल्यावर डोळे मिटून लहानपणी आईने चारलेला घास आठवत राहतो तिथेच हा सिनेमा ओढ लावतो चविष्ट खायला आणि खिलवायला आवडणाऱ्या सर्वांनी बघावा असा चित्रपट अस एका वाक्यात परीक्षण करणंच योग्य होत खरतर .पण हा चित्रपट आहेच इतका रसाळ की शब्दांचे गुऱ्हाळ घालावेच लागले.. असो गुलाबजाम बघून येता येता गुलाबजाम आणलेत तेवढे खाऊन घेते आता...

राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलेय.
मला पण तो 'मला आठ्वणी नाहीत, म्हणून मी रडत नाही' वाला सीन आवडतो.
मायबोलीवर गुलाबजाम वर २ प्रदीर्घ धागे आहेत, तेही पहा.मजा येईल.

खायला आणि खिलवायला आवडणाऱ्या सर्वांनी बघावा असा चित्रपट >> मी या गटात येत नसल्याने चित्रपट बघणार नाहीच पण

"देवाने माझ्याकडून फार मोठी किंमत चुकवून मला आठवणीतून मुक्त केलं आहे" हे ऐकल्यावर आपल्याला आठवणी आहेत म्हणून आनंदी व्हायचं की त्या बोचतात म्हणून हळवं काही कळत नाहीच. << हे काय आहे? मेमरी लॉस का?