नोकरी मिळवताना १ ) जॉब कन्सल्टन्ट

Submitted by विचारजंत on 5 May, 2018 - 14:26

नोकरी संबंधी क्षेत्रात नोकरी केल्यामुळे अनेकांनी नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावे लागते हे मला अनेक लोकांनी विचारले . स्वत: वर हि नोकरी शोधायचा प्रसंग अनेकदा आल्याने अजून भरपूर अनुभव हि होताच. अगदी चांगल्या संस्थेत शिक्षण झाले तरी नोकरी कशी शोधावी हे कोठेच शिकवले जात नाही. त्यामुळे अनेक गोष्टी चुकत माकतच शिकाव्या लागल्या. त्या साठी काही लेखांची मालिका लिहिण्याचा विचार आहे . ( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल. )

जॉब कन्सल्टन्ट / रिक्रुटिंग एजंट / प्लेसमेंट कन्सल्टन्सी / सर्च कन्सल्टन्ट

नोकरी मिळवून देण्याचे काम आजकाल जॉब कन्सल्टन्ट / रिक्रुटिंग एजंट / प्लेसमेंट कन्सल्टन्सी / सर्च कन्सल्टन्ट कडून केले जाते . इतरही काही शब्द आहेत . आपण याला कन्सल्टन्ट असा शब्द वापरूया. या व्यवसाया विषयी आणि या लोका विषयी बरेच गैरसमज झाले आहेत आणि पसरवले जात आहेत . मी स्वात: या क्षेत्रात ३ काम वर्षे केले असल्याने या विषया वरून सुरुवात करीत आहे .

कोठल्याही कम्पनी मध्ये नोकरी देण्याची एक प्रक्रिया असते .
१) वेगवेगळी खाती ( डिपार्टमेंट्स ) कोणत्या माणसांची कोणत्या पदावर गरज आहे हे शोधतात
२) गरज हि वेवेगवेगळ्या कारणाने निर्माण होते - माणसे निवृत्त होतात , सोडून जातात, मरण पावतात किंवा वाढणाऱ्या कंपनीला अधिक माणसांची गरज लागते . लेखक - हेमंत वाघे
३) हि गरज वरिष्ठ अधिकारी मान्य करतात आणि ती नंतर मानव संसाधन ( Human Resources - HR ) डिपार्टमेंट कडे जाते . काही ठिकाणी या खात्या अंतर्गत रिक्रुटमेंट डिपार्टमेंट हि असते,

आता पुढची कामे - जसे कि जाहिरात देणे , रिस्युमे मागवणे , किंवा आधी असलेल्या प्रोफाइल बघणे , उमेदवार बोलावणे , मुलाखत ,एखादवेळी परीक्षा , पुढील मुलाखत , आणि मग योग्य उमेदवार मिळाला कि नोकरी ची ऑफर , त्या उमेदवाराने ऑफर नाकारली तर दुसऱ्या वेटलिस्ट मध्ये असलेल्या उमेदवारासाठी हीच प्रक्रिया ..

आता वाचायला हे सोपे वाटले तर हाच विचार येतो कि कम्पनी कडे एव्हडे एच आर किंवा रिक्रुटमेंट डिपार्टमेंट असताना जॉब कन्सल्टन्ट कडे का जातात ?

पूर्वी निदान हे कन्सल्टन्ट कमी होते , आणि ते स्वतःचा कॅन्डीडेट डेटाबेस तरी बनवून ठेवायचे .
मग नोकरी डॉट कॉम आणि इतर जॉब साईट आल्या आणि पैसे देऊन प्रचंड डेटाबेस बघायला मिळू लागला. ( ३ दिवस - १५० रिस्युम ला नोकरी ६५०० रुपये आकारते ) लिंकेडीन वर मिळाले तर अनेक प्रोफाइल फुकटात मिळू लागल्या . ( लिंकेडीन वर हि पैसे देऊन प्रोफेशनल सर्व्हिस आहे ) लेखक - हेमंत वाघे

मग या जॉब कन्सल्टन्ट ची गरज ?

१) हे कन्सल्टन्ट हे प्रोफेशनल असतात , हेच काम सतत करीत असल्याने ते अनेक प्रकारच्या प्रोफाइल शोधण्यात अति तज्ञ् झाले असतात .
२) अजून हि कन्सल्टन्ट स्वतचे डेटाबेस बनवतात , आणि तो विविध प्रकारे त्याचे अनालिसिस करून ठेवतात.
३) आज काळ नोकरी डॉट कॉम वर सध्या नोकरीच्या साठी उमेदवार शोधले तर हजारो प्रोफाइल मिळू शकतात , यात अनेक उमेदवार हे पूर्णतः त्या कामासाठी निरुपयोगी असू शकतात . त्यामुळे सुरुवातीची चाळणी हे अतिशय किचकट आणि कंटाळवाणे काम असते . एक्सपर्ट सर्च , स्मार्ट सर्च करून योग्य कॅन्डीडेट मिळू शकतात. तरी मी मिळालेल्या अनेक प्रोफाइल ला चाळणी लावावी लागते . लेखक - हेमंत वाघे
३) मग त्या लोकांना फोन / मेल करून त्यांना नोकरी पाहिजे का ते बघावे लागते . अनेकदा फोन करून त्यांना कम्पनी बद्दल माहिती द्यावी लागते - ती नोकरी " विकावी " लागते . आणि मग त्यांचा नवीन रिस्युम मागवून तपासावा लागतो
४) मग अजून एक चाळणी लावून यादी कम्पनीला दिली जाते .
५) नन्तर इंटरव्हू चे को ऑर्डिनेशन करणे , वेगवेगळ्या इंटरव्हू लेव्हल कॅन्डीडेट ला अपडेट करणे , आणि या प्रक्रियेतील इतर अनेक कामे कन्सल्टन्ट करतात .

कन्सल्टन्ट यासाठी फी सर्वसाधारण जागा साठी १ महिन्याचा पगार -८.३३ टक्के किंवा त्यापेक्षा थोडी कमी असू शकते . हल्ली या पेक्षा कमी फी त हि काम केलेजते . तसेच नोकरी लागलेल्या कॅन्डीडेट ची ३ ते ६ महिन्याची ग्यारेंटि असते . तो सोडून गेला तर दुसरा देण्यास मदत करावी लागते !
हे खूप ढोबळ मानाने लिहिले आहे . अजून हि अनेक सेवा यात दिल्या जातात.

सिनिअर पोस्ट ला गुंतागुंत जास्त असल्याने फी जास्त असते. CEO किंवा डायरेक्टर किंवा व्हाईस प्रेसिडेंट अशा पद साठी ती २० ते ३० टक्के हि जाऊ शकते . अनेकदा या कामासाठी वेगळे स्पेशालिटी कन्सल्टन्ट असतात आणि ते एका वेळी फार कमी असाइनमेंट वर काम करीत असतात. प्रचंड पगारामुळे कमी असाइनमेंट मध्ये फी पण बक्कळ मिळू शकते .

आता लक्षात आले असेल कि अनेक कम्पनित कन्सल्टन्ट ला टाळून जाऊ शकत नाही . काही वेळा कम्पनी ने प्रमाणित केले असेल तर कम्पनी साठी कन्सल्टन्ट च जाहिरात हि देतात .

तसेच अनेक वेळा
१) कन्सल्टन्ट रेस्युमे सुधारून देतात . नवीन कसा लिहावा ते सांगतात.
२) जर उमेदवार ( candidate ) जर प्लेस होण्यासारखा असेल तर काही कन्सल्टन्ट बोलावून इंटरव्हू तयारी हि करून घेतात
३) काही वेळा कन्सल्टन्ट चांगला करिअर सल्ला देऊ शकतात . लेखक - हेमंत वाघे
४) कन्सल्टन्ट रेस्युम ठेवून घेतात . चांगला रॅपो असेल तर एकदा बोलल्या नन्तर काही काळाने जॉब चा कॉल आल्याची अनेक उदाहरणे आहेत .

आज काळ डॉकटर प्रमाणे कन्सल्टन्ट हि स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट बनू लागले आहेत . अनेक जण फक्त ठराविक इंडस्ट्री च सांभाळतात . फक्त आय टी साठी काही आहेत आणि काही जण तर आय टी मधील विशिष्ट कसेतरी जसे कि सॅप वर च काम करणारे आहेत . फक्त सिनिअर जागा त्या पण विशिष्ठ इंडस्ट्री तीळ बघणारे पण आहेत ( मी अशाच एका कन्सल्टन्ट कडे काम केले होते) लेखक - हेमंत वाघे

आता सर्वात महत्वाचा प्रश्न - उमेदवारासाठी कन्सल्टन्ट ची फी किती असते ? काय खर्च येतो ?
शून्य - काहीही नाही.

माहितीतील चांगले कन्सल्टन्ट उमेदवाराकडून काहीही फी घेत नव्हते . सर्व फी ते कंपनी कडून घेतात .

आता काही लोक टोकन फी , रजिस्टरेशन फी म्हणून काही रक्कम घेतात - खरे तर ती हि देवू नये . शेकडो फुकट काम करणारे कन्सल्टन्ट आहेत.
तर जे नोकरी शोधात आहेत त्यांना चांगल्या कन्सल्टन्ट च फोन येवो आणि चांगली नोकरी मिळो ! लेखक - हेमंत वाघे

पुढील भागात नोकरी शोधण्यातील अनेक विषयावर लिहिण्याचा इरादा आहे . तरी आपल्याला काय पाहिजे ते लिहा . आशा आहे कि मी काही तरी उपयोगाचे लिहीन.

धन्यवाद
हेमंत वाघे
hemantwaghe@gmail.com
https://naukrishodh.blogspot.in/

Group content visibility: 
Use group defaults

माहितीपूर्ण लेख.
प्रत्येक पॅरा नंतर लेखक हेमंत वाघे लिहिलंय ते लेखाची निनावी चोरी होऊ नये म्हणून ना?

"प्रत्येक पॅरा नंतर लेखक हेमंत वाघे लिहिलंय ते लेखाची निनावी चोरी होऊ नये म्हणून ना?"
होय - श्रेय नेहमीच द्यावे आणि आपले असेल तर घेताना लाजू नये या मताचा मी आहे Wink

रेझुमे कसा लिहावा?
नक्कीच - त्यावरच लिहीत आहे -
असेच विषय सुचवा - बरेच मनात घोळत आहेत
धन्यवाद

वाचतोय.

<<< हे कन्सल्टन्ट हे प्रोफेशनल असतात , हेच काम सतत करीत असल्याने ते अनेक प्रकारच्या प्रोफाइल शोधण्यात अति तज्ञ् झाले असतात . >>> छान, विनोदी आहे. हे लोक म्हणजे बहुतेक वेळा फक्त दलालीचे काम करतात, त्यांना जॉब प्लेसमेंट करून कमिशन कमावण्यात जास्त रस असतो. काही दिवसांनी यांची गरज कमी होईल कारण मोठ्या कंपन्यात आता रेझ्युमे निवडायचे काम बहुतेक वेळा सॉफ्टवेअरने करतात.

प्रत्येक पॅरा नंतर लेखक हेमंत वाघे लिहिलंय ते लेखाची निनावी चोरी होऊ नये म्हणून ना?>>>>नशीब अजून जास्त डिटेल्स नाही दिले नायतर प्रत्येक शब्दानंतर हेमंत वाघे दिसला असता

@ उपाशी बोका
आपल्या इतके हुशार लोक बहुदा इंडस्ट्रीत नसणार .
नाहीतर बघा ना या छोट्या छोट्या कम्पन्या आहेत टाटा मोटर्स , विप्रो , महिंद्रा , Honeywell, L&T Technology Services and HDFC Life त्या ना त्यांचे जवळजवळ सर्वच रिक्रूटमेन्ट चे सर्वच काम बाहेरील कन्सल्टन्ट कडे देत आहेत . यालाच RPO - recruitment process outsourcing असे म्हणतात .
हि बातमी पहा

https://economictimes.indiatimes.com/jobs/companies-outsourcing-talent-a...

" काही दिवसांनी यांची गरज कमी होईल कारण मोठ्या कंपन्यात आता रेझ्युमे निवडायचे काम बहुतेक वेळा सॉफ्टवेअरने करतात. "
पण टाटा मोटर्स , विप्रो , महिंद्रा , Honeywell, L&T Technology Services या सर्व कम्पन्याची सॉफ्टवेअर डिव्हिजन आहे ना ? टीसीएस नक्की करते काय ? बाय द वे टीसीएस पण कन्सल्टन्ट करून रिक्रुटमेंट करते ..
विप्रो पण सॉफ्टवेअर मध्ये असावी असे वाटते
मग त्या कम्पन्या ना रेझ्युमे निवडायचे सॉफ्टवेअर माहित नाही ??

>>" काही दिवसांनी यांची गरज कमी होईल कारण मोठ्या कंपन्यात आता रेझ्युमे निवडायचे काम बहुतेक वेळा सॉफ्टवेअरने करतात. "<<

यात थोडं तथ्य आहे. सध्या इवन रिक्रुटर्स्/हेडहंटर्स हि असले सॉफ्टवेर्/पार्सर्स वापरतात, किवर्ड्स शोधण्याकरता.

महत्वाचं हे आहे कि याची पुढची पायरी म्हणजे आरपिए (रोबाटिक्स प्रोसेस ऑटोमेशन). या अंतर्गत कुठल्याहि वर्कफ्लोच ऑटोमेशन करणं शक्य होणार आहे. बर्‍याचशा एच्सीएम प्रॉडक्ट कंपन्यांच्या (वर्कडे, एसएपी सक्सेस्फॅक्टर इ.) प्रॉडक्ट रोडमॅप मध्ये हे फिचर अस्णं स्वाभाविक ठरणार आहे...

>>" काही दिवसांनी यांची गरज कमी होईल कारण मोठ्या कंपन्यात आता रेझ्युमे निवडायचे काम बहुतेक वेळा सॉफ्टवेअरने करतात. "<<
थोडं तथ्य आहे. हे खरे आहे . पण उपाशी बोका यांनी सांगितले तसे हे "दलाल" सम्पायला लागले नाहीत
शेअर केलेली बातमी बघा
ज्या कम्पन्या सर्व प्रोसेस आउटसोर्स करीत आहेत त्या सर्व कम्पन्या चे फार फार मोठे सॉफ्टवेअर विभाग आहेत . भारतातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कम्पनी आहेत त्या

२००० साली नेट मुले सेल्स मन ची गरज सम्पली आता मिडलमन का लागतील असे लेखक येत होते
आज २० वर्ष नन्तर लढाई नव्हे इतकी सेल्स च्या लोकांची गरज आहे . आज हि चांगल्या सेल्समन ला नोकरी मिळते .. आणि बऱ्याच ठिकाणी गरज आहे .

हो होऊ शकेल किंवा एखाद वेळी फार फार उशिरा होईल ..

>>भारतातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कम्पनी आहेत त्या<<
कबुल; पण त्यातल्या एकाचं तरी एच्सीएम स्पेस मध्ये स्वत्;चं वेल एस्टॅब्लिश्ड प्रॉडक्ट आहे का? किंवा मी वर लिहिलेल्या कंपन्यांचं प्रॉडक्ट त्यांच्या वापरात आहे का?

वेळ लागेल या मताशी सहमत. सेल्सचंच उदाहरण तुम्ही दिलंय म्हणुन सेल्स्फोर्स (डाट कॉम) ने आणलेली क्रांती बघा; तसंच काहिसं ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे...

" फक्त दलालीचे काम"
मग त्यात काही वाईट आहे, की ते कमी प्रतीचे आहे? म्हणजे अमुक काम श्रेष्ठ , तमुक कनिष्ठ असे काही असते का? इमानदारीने काम करून यशस्वी होत असतील तर त्यात वाईट काय?
जो तो आपापल्या परीने काम करत असतो, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातच जर कुणाला नोकरी लावून देण्याचे, कुणाला हवा तसा नोकर देण्याचे समाधान असतेच.
कुठलाहि खरेदी विक्रीचा धंदा करणारे दलालीच करत असतात. स्वतःचे तयार कपड्याचे दुकान आहे म्हणजे स्वतः कापूस पिकवतात नि कपडे शिवून तयार करतात का?
दुसर्‍या माणसाच्या कायदेशीर धंद्याला नावे ठेवू नयेत.
तुम्ही कधी केली आहे का दलाली अशी? जमेल असे वाटतंय? इतर धंदे, नोकरी सोडून दलाली करून पहा. मग सांगा.

कन्सल्टंट चे काम महत्वाचे असते.मुळात उपलब्ध असलेल्या हजारो च्या डाटा मधून आपल्याला हवे असलेले, शेवटपर्यंत जातील असे 30 शोधून काढणे हे कौशल्याचे काम असते.ते नीट न केल्यास या 30 मधले काही जण पहिला संपर्क केल्यावर स्किलसेट मिस मॅच मध्ये गळतात.कधीकधी शब्द सारखे असले तरी 'जावास्क्रिप्ट म्हणजे जावा नव्हे आणि 3डी डिझाईन म्हणजे 3डी ऍनिमेशन पेक्षा खूप वेगळे' इतके ज्ञान अनुभवानेच मिळवावे लागते.
इतके करून शेवट च्या स्टेज ला माणूस 'दुसरी चांगली ऑफर मिळाली' किंवा 'आताच्या कंपनीने पैसे वाढवून दिले' म्हणून जॉईन होतच नाही.
लिंकडीन मुळे कामाचे स्वरूप बदलले असले तरी प्रोफाइल इरिलिव्हन्ट होत नाहीये.

फक्त दलालीचे काम म्हणजे त्यात काही वाईट आहे, की ते कमी प्रतीचे आहे असे मी कुठे म्हटले आहे? दलाल म्हणजे जो इकडचा माल तिकडे करून पैसे कमवतो तो. यात काहीही वाईट नाही. पण <<< हे कन्सल्टन्ट हे प्रोफेशनल असतात, हेच काम सतत करीत असल्याने ते अनेक प्रकारच्या प्रोफाइल शोधण्यात अति तज्ञ् झाले असतात . >>> या संदर्भात हे वाचून बघा. विवाहमंडळासारखे काम आहे ते, त्यांना मी अति तज्ञ् म्हणणार नाही. Taleo सारखी सॉफ्टवेअर आजकाल हे काम सर्रास करतात. Human capital is just another type of resource. खरी स्ट्रॅटेजी एंप्लॉयर बनवत असतो. मुळात एंप्लॉयर हे काम आउटसोर्स करत आहेत कारण तो त्यांचा कोअर बिझनेस नाही म्हणून. एंप्लॉयरच्या दॄष्टीने अशा कंसल्टंटना पैसे देणे is just cost of doing business. उलट तुम्ही थेट एंप्लॉयरकडे गेलात तर साइनऑन बोनस मिळण्याची शक्यता जास्त असते कारण अशा वेळी कंसल्टंटना पैसे द्यावे लागत नाहीत. रेफरलने एखादा उमेदवार मिळाला तर एंप्लॉयरला अजून आवडते कारण अशी व्यक्ती टिकण्याची शक्यता जास्त असते म्हणून, शिवाय ते स्वस्त पण पडते. एम्प्लॉई रेफरल बोनस म्हणूनच तर देतात. पण एंप्लॉयरने दारात उभे तरी करावे म्हणून या दलालांची गरज पडते. मी स्वतः गेले २२ वर्षे एच.आर.बरोबर या संदर्भात काम केल्यामुळे थोडीफार तरी कल्पना आहे, असा माझा अंदाज आहे.

मालधक्यावर सल्लागार लागत नाहीत. Happy मालधक्यावर कामगार नेणारे वाहन आणि घाउक नोकरी जुळवणारी आंतरजालीय संस्थळे सारखीच. :).

पण तज्ञ नोकरी सल्लागाराची गरज असते याचे मुख्य कारण महत्वाच्या पदांसाठी योग्य व्यक्ति मिळणे कठीण होत आहे. जशी जशी पदश्रेणी उच्च होत जाते त्याच्या पटीच्या प्रमाणात चुकिच्या निवडीमुळे होणारे नुकसान लवकर टाळणे महत्वाचे व अगत्याचे असते. अंतर्गत उमेदवार किंवा माहितीतला उमेदवार समोर असेलच असे नाही. असला तरी त्याचा विचार होईलच असे नाही. तसेच कधी कधी व्यवस्थापनाला एखाद्या पदाबद्दल माहिती जाहीर करायची नसते. नोकरी सल्लागाराकडे एखाद्या क्षेत्रातील उपलब्ध उमेदवारांचा संच असू शकतो. प्रतिस्पर्ध्याकडील एखादी वरवर सुस्थितीत व समाधानी वाटणारी व्यक्ति प्रत्यक्षात अस्वस्थ असू शकते . तिची व तिच्या अपेक्षांची गुप्त माहिती सल्लागाराकडे आयती असू शकते.
चांगल्या नोकरी सल्लागाराचे महत्व त्यामुळेच खूप वाढलेले आहे. अगदी लग्नसंस्थेतील मध्यस्तांसारखेच. अर्थात उडदामाजी काळे गोरे असतातच. म्हणून तुमची निवड कार्यप्रणाली सक्षम हवी.

तुम्ही वर म्हणालात ते बरोबर आहे. उच्च पदाच्या लोकांसाठी नोकरी सल्लागाराची गरज लागते, विशेषतः अश्या लोकांना खेचण्यासाठी जे कदाचित अ‍ॅक्टिवली नोकरी शोधतही नाहीयेत. पण या धाग्याचा विषय तो नाहीये बहुधा. अनेकदा या कामासाठी वेगळे स्पेशालिटी कन्सल्टन्ट असतात आणि ते एका वेळी फार कमी असाइनमेंट वर काम करीत असतात, असे लेखकाने स्वतःच म्हटले आहे वर.

एखाद्या छोट्या कंपनीला मोठ्या व्यक्ती सीईओ किंवा तत्सम पदावर हव्या असतील तर काय करतात?
तर्राट जोकर साहेब - या विषयावर मी थोडे सविस्तर लिहीन - आणि अनेक मोठ्या होणार्या कंपन्या ना हा प्रश्न पडतो . अनेक दा काही कंपनी नि लोकांना कमी पगारात यायला भाग पाडून त्यांना मोठे हि केले आहे! सविस्तर लिहीन एकदा ..