या नात्याला काय नाव देऊ ?

Submitted by अभिजीत... on 6 May, 2018 - 05:08

माझा मित्र कड्याचा दगड .... जेव्हा केव्हा मला उदास वाटत असेल किंवा मनावर ताण आला कि मी या कड्याच्या दगडावर तासंतास बसून राहायचो;जवळच असलेल्या डोंगराच्या पश्चिमेला हा दगड खूप मोठा आणि जुणा,तेथे बसले कि मला जणू स्वर्ग असेल तर असाच असेल असे वाटायचे;तिथे लागणार गार वारा मनाला प्रसन्न करणारा वाटतो तर तिथे बसून स्वतःचाच शोध घ्यायला लावणारी 'शांतता'; मनाला भारी वाटते.

खूप दिवस झाले मी कड्याचा रस्ताच विसरलो होतो पण आज तिथे गेल्याशिवाय राहवतच नव्हते म्हणून गेलो. आज असे वाटायाला लागले होत कि; "जगावं कि मरावं" हा एकच प्रश्न; जगावं तर कोणासाठी आणि का?आणि कशासाठी? बाबा देवाघरी जाऊन आज नऊ वर्ष झाली पण एकही दिवस मला पूर्वी सारखा गेला नव्हता मला आजही ते दिवस आठवतात बाबांच्या सोबत घालवलेले; किती खुश असायचो मी, पण आता एकटं असल्यासारखं वाटते. बाबा हे माझे फक्त वडीलच नाही तर मित्र म्हणून माझ्या सोबत असायचे आणि आजकालच्या या युगात मला अश्या एका मित्राची कमतरता जाणवते . म्हणतात ना , जर कुठली गोष्ट जर करायची असेल तर ते पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणारी व्यक्ती खूप महत्वाची ठरते....पण मला नेहमी प्रेरणा देणारी व्यक्ती हि काळाच्या आड गेली होती ... कुणी अशी व्यक्ती मला कोण परत आणून देईल ?...असा विचार करत मी त्या कड्याच्या दगडावर बसलो होतो. समोरच मावळणाऱ्या सूर्याच्या त्या लाल गोळ्याकडे पाहताना नजर हटत नाही इतकी सायंकाळची वेळ झाली होती . खूप वेळ झाला मोबाईल पहिला नव्हता म्हणून मोबाईल घेतला आणि दिवसभरच्या पोस्ट फेसबुक वरती पाहायला लागलो पाहता पाहता एक पोस्ट डोळ्याखालून गेली म्हणून पुन्हा मागे घेऊन ती पोस्ट बघितली तर एक फोटो होता त्यामध्ये एक लहान मुलगा ५ वर्षाचा एका मोठ्या मुलीला गुलाब देत होता; उद्या व्हेलेंटाईन डे होता त्यामुळे बहुधा त्यांनी तो फोटो पोस्ट केला होता,तो फोटो फार काही सांगत होता त्या फोटो मधील त्या मुलाचा निरागसपणा मला भावला म्हणून मी त्यांची प्रोफाईल उघडली आणि त्याचे फोटो पाहू लागलो तो जरी लहान असला तरी त्याचे फोटो खूप काही सांगून जातात त्याचे त्याच्या बाबांबरोबर लहानपणा पासून चे फोटो होते त्याची आणि त्याच्या बाबांची केमिस्ट्री खूप छानपणे फोटो मध्ये दिसत होती ते फोटो मला माझ्या भूतकाळात घेऊन गेले ... आणि ते फोटो बघत बघत कधी रात्र झाली कळलेच नाही, देवाने माझे ऐकले कि काय? आज मला ते फोटो पाहताना माझे बाबा माझ्या सोबत असल्याचा भास होत होता. खूप दिवसांनी मी खूप खुश होतो ... त्या मुलाकडे पाहून मला माझी प्रेरणा देणारी व्यक्ती हि तर नव्हे ? असा प्रश्न पडू लागला ..याचा उत्तर हो! असे ठरवायला मला वेळ लागली नाही;म्हणून मी लगेच त्याला फ्रेंड रिकवेस्ट पाठवली; त्या मुलाच नाव होत आरुष .... दिसायला सुंदर,गोंडस,निरागस खूप काही गोष्टी त्यामध्ये दिसून येत होत्या ....आता घरी जायची वेळ आली होती म्हणून मी लगेच घरच्या दिशेने मार्गस्थ झालो...

दुसरा दिवस उजाडला मला त्या दिवसाच्या सुरवातीलाच आज काहीतरी वेगळे जाणवत होता ,तो दिवस माझ्या रोजच्या दिवसासारखा नव्हता मला खूप प्रसन्न वाटत होत मला रात्री पाहिलेले फोटोची आठवण झाली म्हणून मी मोबाइल घेतला आणि फेसबुक उघडले तर आरुष माझा फेसबुक वरती मित्र झाला होता, पण मला तो माझा जिवलग मित्र बनवायचा होता ;आता मला त्याच्या बद्दल माहिती मिळवणे गरजेचं वाटू लागलं होत म्हणून मी आरुष ला मेसेज केला त्याच उत्तर मला काही दोन दिवस मिळाले नाही. मला असे वाटत होते कि त्याचे बाबा काय म्हणतील तू इतका मोठा आणि हा लहान तू कशी मैत्री करशील? आणि तो मोठ्या घरातला आपण अशे लहान,तर असे फेसबुक वरून आपले कोण मित्र बनेल काय? त्याच्या घरचे काय म्हणतील वगैरे वगैरे प्रश्न मला पडू लागले होते .... शेवटी मला उत्तर आलं आणि हळू हळू आमचे बोलणे होऊ लागले एक दोन दिवसामधून एक उत्तर असे मिळू लागले तरी मी जाम खुश होतो ... बोलण्यातून असे जाणवले कि आरुष चाईल्ड ऍक्टर आहे आणि त्याचे हे फेसबुकवर त्याचे बाबा बोलत असतात कारण तो खूप लहान होता अजून हे करायला ... माझे आता आरुषच्या बाबांशी रोज बोलणे होऊ लागले होते मी त्यांना काका असे म्हणू का? असे बोललो आणि त्यांनी हि होकार दिला मी त्यांना सांगितले होते कि मी तुमच्या मुलाचा फॅन आहे म्हणून मी त्याला मित्र बनवू इच्छितो ? त्यांनी याकडे पहिल्यांदा दुर्लक्ष केले. पण काही दिवसांनी मी त्यांना त्याचा मोबाईल नंबर मागितला आणि आरुषशी बोलायचा आग्रह केला तेव्हा त्यांनी सुरवातीला नाही बोलले पण नंतर दिला आणि त्यांनीच मला पहिला फोन करून तुझ्या मित्राशी बोल असे सांगितले आणि आमच्या मैत्रीला सुरवात करून दिली... या सर्व काळात मला आरुषचा लळा कधी लागला कळलाच नाही रोज त्याला पाहिल्याशिवाय मी झोपत नव्हतो . आता कधीतरी आरुषच्या बाबांशी माझे बोलणे होत होते. मला आता त्याला बघायची आणि भेटायची खूप इच्छा होत होती म्हणून मी त्याला भेटायचं असे ठरवले, महिनाआखेर होती खिश्यात पैसे हि नव्हते पण जायचे ठरवले कि ठरवले म्हणून असतील तेवढे पैसे घेऊन मी नगरला रात्रीच निघालो मनात एकच इच्छा होती त्याला लांबून तरी पाहायचे असा विचार करत माझा प्रवास कधी संपला कळलंच नाही मी नगरच्या बसस्थानकात उतरलो सकाळची वेळ होती मी सहज आरुषच्या बाबांना मेसेज केला काय! कुठे आहात? म्हणून तेव्हा मला कळलं ते सर्वजण बाहेर गावी गेलेत म्हणून; मी त्यांना सांगितले, 'काही नाही सहज विचारलं!' आणि मी माझ्या नशिबाला कोसणं देत तिथेच स्तब्ध बसून राहिलो. थोड्या वेळाने विचार आला त्यांचे घर तरी पाहून येऊ म्हणून निघालो, घराचा अचूक पत्ता माहित नव्हता पण बोलण्यातून आलेल्या पत्त्यावर जाऊन तरी येऊ म्हणून पत्ता विचारत विचारत फिरू लागलो शहर तसे मोठं होत पण सापडेल या आशेने फिरत होतो. त्याच्या त्या भागामध्ये पोहचलो खरं पण अचूक घर माहित नव्हते ..यासर्वांमधे दुपार कधी झाली कळलं नाही भूक खूप लागली होती म्हणून काही तरी खावे म्हणून एका टपरी वर गेलो आणि तेव्हा माझ्या लक्षात आले आपण आरुषला भेटायच्या नादात पैसे जवळ नव्हते तरी आलो कि तिथे जाऊन बघू काहीतरी; पाहिले तिथे तर जाऊ या उद्देशानं आलो होतो ... तिथे माझा कोणी मित्र पण नव्हता आणि कोण नातेवाईक हि आणि असते तरी मी कोणाला त्रास दिला नसता. आरुषच्या बाबांना तर सांगायचा प्रश्नच येत नाही असा विचार कारत होतो .

पण आधी पोट भरू मग पाहू काही तरी; जेवढे पैसे होते त्यामध्ये पोटामध्ये जरा भर घातली आणि बसस्थानकात येऊन बसलो आणि विचार करू लागलो आरुषला पाहायला तरी मिळायला हवं होत ... २ वाजले होते घरी परत जायचे होते पण कसे कोणाला त्रास देण्यापेक्षा आपणच काही तरी करू आणि जाऊया असे ठरवले. जवळच असलेल्या दुकान, हॉटेल,टपरी याची पाहणी केल्या असता मला असे आढळून आले कि बसस्थानकाच्या जवळच असलेले एका छोट्या हॉटेल मध्ये गर्दी खूप होती म्हणून तिथे गेलो तर हॉटेल मालकाची त्यांची खूप धावपळ चालली होती. मी तिथं खूप वेळ उभा आहे म्हणून त्या मालकाने विचारले; काय पाहिजे? म्हणून, मी काही नको फक्त जरा काम होत तुमच्याकडे, असे बोललो! त्यांनी बोल पटकन! असे बोलले म्हणून मी त्यांना माझी अडचण सांगितली आणि तुम्हाला कामात मदत करू का? असे सांगून टाकले .. जरा वेळ त्यांनी मला काहीच उत्तर दिले नाही, मी तिथेच काही वेळ उभा होतो ;त्यांनी आता मला आत बोलावले आणि चालेल बोलले मी लगेच तिथे बॅग ठेऊन त्यांना कामात मदत करू लागलो २ तासानंतर गर्दी वाढली मी हि आचेने काम करतो हे पाहून त्या काकांना बरे वाटले मला सुद्धा मजा येत होती काही वेळाने गर्दी कमी झाल्यावर त्या काकांनी मला जवळ बोलावले आणि बोलले हे बघ मला माहित नाही तू कुठून आलास आणि का? पण मला तुझ्या सांगण्यात आणि बोलण्यात मला काहीतरी विशेष वाटले म्हणून मी तुला होकार दिला आणि तुही मला खूप मदत केलीस. माझी आज तब्येत बरी नव्हती बर झालं तू आला ते! हे बघ आता हि शेवटची गाडी आहे हे पैसे घे आणि नीट जा ? मला खूप आश्यर्य वाटले त्यांनी मला जास्तच पैसे दिले होते. मी त्यांना बोललो इतके नको घरी जाण्यापुरतेच द्या पण ते म्हणाले असू दे लागतील तुला कसली अडचण अली तर माझ्या डोळ्यात पाणी आले होते त्यांचे आभार कसे मानू हे काळत नव्हते ... तेवढ्यात ते ,'जातो मी खूप काम आहे मला' असे बोलून हॉटेल मध्ये निघून गेले ..... अजून हि जगात देव माणसे असतात असा विचार करत मी ... गाडीत जाऊन बसलो घरी जाताना खूप छान वाटत होत .. आरुषला पहिले असते तर अजून खुश झालो असतो जर कोणाला भेटायचे असेल तर तो कुठे जरी असला तरी त्याला पैसे जवळ असावे असे काही नाही. हा अनुभव घेऊन मी घरी पोहचलो ....

या सारखे खूप काही घटना माझ्या आणि आरुषच्या मैत्री मध्ये झाल्या आणि होतील ... आज याला एक वर्ष झाले अजून पण आरुषला भेटलो नाही अजून, त्याला भेटण्याची संधी खूप वेळा आली त्याच्या घरचे हि बोलतात येऊन जा घरी आरुषला भेटून जा. पण का माहित नाही,अजून माझी हिम्मत होत नाही. त्याला भेटून त्याच्या घरच्यांना काय सांगणार कि तुमच्या मुलावर माझा जीव आहे म्हणून मी त्याला माझा लहान भाऊ-मित्र सर्वस्वच मानतो पण त्यांना हे खूप अतिशयोक्ती वाटेल म्हणून मी अजून त्यांना भेटलो नाही .... फोन वरती आरुष माझ्याशी इतका छान बोलतो ना! कधी येणार आमच्याकडे म्हणून पण मीच जात नाही कारण नात्याला जरा वेळ दिला ना तर आपुलकी वाढते असे मला वाटते... मागिलचं आठवड्यात पहिल्यांदा आरुषच्या बाबांशी भेटलो खूप वेळ आम्ही एकत्र होतो चांगले बोलणे झाले ... मला आता अंदाज आला आहे कि मी आरुषशी भेटू शकतो त्यांच्या घरचे हि मला आता चांगलेच ओळखतात .... रोज आमचे बोलणे होत असते ..ते सर्व जण आता पुण्याला शिफ्ट होणार आहेत मी हि त्यामुळे पुण्यात नोकरी कारवी या उद्देशाने काम बघत आहे ...त्याआधी आरुषचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला मी जरूर येईन असे वचन दिले आहे कारण मी गेल्या वर्षभर त्यांना ओळखतो पण अजून भेटलो नाही काका तर बोललेत... वाढदिवसाला नक्की यायच नाहीतर आमच्याशी बोलू नकोस म्हणून!, जर वेळेस काही तर कारण सांगतोस यावेळी नाही काय चालणार ?

मी त्या दिवसाची खूप वाट बघतोय कधी येईल तो दिवस. माझ्या आयुष्यातील खूप महत्वाचा दिवस असेल तो ... आरुषला जेव्हा भेटेल तेव्हा त्या लहान आरुषशी मी काय बोलू?काय म्हणू त्याला .. कि, तुझ्या आई-बाबां व्यतिरिक्त मी अशी व्यक्ती आहे कि सर्वात जास्त तुझा विचार करते ... या लहान बाळाशी काय बोलू हेच मला अजून कळले नाही...

खरंच मी खूप वाट पाहतोय त्या दिवसाची व त्या नंतरच्या दिवसांची काय होईल आमच्या नात्याचं ..... आणि अश्या

या नात्याला काय नाव देऊ ? खरं तर देऊच नये......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. Happy
या नात्याला काय नाव देऊ ?>>>> छान निखळ मैत्री म्हणू शकता तुम्ही. कारण मैत्रीला वयाची, स्थलकाळाची परिसीमा नसते.

सोप्पंय. याला स्टॉकर असे म्हणता येईल.
माझ्या लहान मुला/ मुलीशी असे कुणी अनवॉन्टेड ओळख काढण्याचा प्रयत्न केला तर मला भयंकर अनकम्फर्टेबल वाटेल! हेतू काहीही असू देत. घराचा माग काढत जाणे हे तर स्केअरी आहे.

छान लिहीलंय Happy
द्वादशांगुला यांच्याशी सहमत !
निखळ निरपेक्ष मैत्री असे नाव देता येईल. Happy

विभिन्न वयोगट आणि आधी संपूर्णपणे अनोळखी असतानाही पुढे जाऊन एक छानशी मैत्री होते/होऊ शकते हे नक्की.

येथे हे अवांतर आहे पण मला यानिमित्ताने चिनूक्स यांचा खालील धागा आणि त्यातून केलेलं आवाहन आठवलं. Happy
आनंदवनातील मुलामुलींशी पत्रमैत्री

निरर्थक नाते आहे. नाव वगैरे द्यायचे राहू दे. ताबडतोब त्या मुलाचा विचार डोक्यातून काढून टाका. आत्ता. या क्षणापासून.
हे थोडेसे कटू वाटेल. पण ते आवश्यक आहे. कसे ते सांगतोय पुढे.

ज्या वयात भावनिक जडणघडण होत असते, जेंव्हा आईवडिलांचा आधार महत्वाचा असतो त्या वयात त्यांना गमावण्याचे दु:ख खूप मोठे असते हे समजू शकतो. दुर्दैवाने तुम्ही तुमच्या वडिलांना गमावलेत. आणि नऊ वर्षांनी सुद्धा त्यांना मिस्स करत आहात. पण म्हणून "आपले आपल्या वडिलांशी जसे संबंध होते तसेच कुणाचेतरी त्यांच्या वडिलांशी आहेत म्हणून त्यांच्यात मन गुंतवणे" हे अर्थहीन आहे. तुम्हाला चांगल्या मित्राची वा मार्गदर्शकाची गरज आहे जे वडिलांची पोकळी काही प्रमाणात भरून काढतील. ती गरज या नात्यातून नक्कीच भागवली जाणार नाही. कशासाठी मागे लागला आहात त्याच्या? यातून जवळीक साधत त्यांच्या अनुमतीशिवाय त्याच्या घरापर्यंत माग काढलात हे अयोग्य केलेत.

असो. लिखाणातून आपण संवेदनशील आहात हे जाणवते. पण त्या संवेदनशीलतेला विधायक वळण द्या. भरपूर वाचन करण्यात वेळ घालवा आणि करियर करण्यावर भर द्या. व्यक्तींमध्ये गुंतू नका. चांगल्या विवेकवादी विचारांमध्ये गुंता.

तुमच्या मनातील विचार सहज सोप्या शब्दांत मांडलेत..... Happy
प्लिज वाईट वाटून घेऊ नका,पण यावर माझं मत देते....
तुम्हाला आरुष बद्दल जी आपुलकी/प्रेम /माया वाटते ते एका लिमिट पर्यंत ठीक आहे,पण तीच तुमची प्रायॉरीटी नका होऊ देऊ न...
इनामदार सरांचा प्रतिसाद पॉजिटिव्हली घ्या(खूप छान समजावलं आहे त्यांनी)...आणि लवकर यातून बाहेर पडा...
शुभेच्छा!!! Happy

इनामदार सरांचा प्रतिसाद पॉजिटिव्हली घ्या(खूप छान समजावलं आहे त्यांनी)...आणि लवकर यातून बाहेर पडा...+1

एक कळल नाही, ५वर्ष्याच्या मुलाचे फेस्बुक अकांउन्ट? आणि तो त्यात त्याचे सगळे फोटो/माहिती टाकतो??

ललितलेखन आहे का समस्या आहे?

बाबांचा आधार आणि अनोळखी मुलाचा लळा ह्या खूप वेगवेगळ्या भावना आहेत. लेखातल्या माणसाची यात गल्लत होते आहे.

या सर्व काळात मला आरुषचा लळा कधी लागला कळलाच नाही रोज त्याला पाहिल्याशिवाय मी झोपत नव्हतो .
>>> ओबसेशन... नुसत्या फोटोवरून तुम्हाला तो आवडतोय... धीस इस गोइंग इन व्हेरी wrong डायरेक्शन. स्टॉप इत इमिडिटली प्लिज.

ते सर्व जण आता पुण्याला शिफ्ट होणार आहेत मी हि त्यामुळे पुण्यात नोकरी कारवी या उद्देशाने काम बघत आहे
>> टू मच मॅन.

ललित आणि काल्पनिक असेल तर इग्नोर मारा.

<< व्यक्तींमध्ये गुंतू नका. चांगल्या विवेकवादी विचारांमध्ये गुंता.व्यक्तींमध्ये गुंतू नका. चांगल्या विवेकवादी विचारांमध्ये गुंता.>>
----- सहमत

ईंटरेस्टींग आहे !

लोकं एखाद्या शाहरूख वा आमिताभच्या दर्शनासाठी तासनतास त्यांच्या बंगल्याबाहेर ताटकळत उभे राहतात.

मंदिरात देव नसतो तरी तासनतास उन्हात त्याच्या मुर्तीच्या दहा सेकंदाच्या दर्शनासाठी उभे राहतात.

मी स्वत: आयुष्यात कित्येकदा आवडणारया मुलीची फक्त एक झलक मिळावी म्हणून तासभर ताटकळत तिच्या मार्गात उभा राहिलो आहे.

तर हे हुमायून नेचर आहे.

फक्त यातून पुढे काही विपरीत घडणार नाही. तुम्हाला वा त्याला, त्याच्या घरच्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी घेत त्यानुसार आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवा.

शुभेच्छा Happy

ललितलेखन आहे का समस्या आहे?

बाबांचा आधार आणि अनोळखी मुलाचा लळा ह्या खूप वेगवेगळ्या भावना आहेत. लेखातल्या माणसाची यात गल्लत होते आहे.
>>> +१११

खरंच मनापासून धन्यवाद!... तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबाबत..... माफ करा मला अजून काही अनुभव नाही लेखनाबाबत कि हे सर्व तुमच्यापुढे ललितलेखन मध्ये मांडायांचे कि कशामध्ये मला फक्त तुमच्या सारख्या हुशार आणि विचारवादि माणसांपुढे मांडायची होती ती हि समस्या नाही ... तर सल्ला म्हणून हवा होता ... माझ्या जे मन मध्ये होत ते तुम्हाला सांगितले .. आरुषला भेटण्या अगोदर हे खूप महत्वाचे होते म्हणून .... हे काही ललित किंवा काल्पनिक नाही...

"आपले आपल्या वडिलांशी जसे संबंध होते तसेच कुणाचेतरी त्यांच्या वडिलांशी आहेत म्हणून त्यांच्यात मन गुंतवणे" हे अर्थहीन आहे. तुम्हाला चांगल्या मित्राची वा मार्गदर्शकाची गरज आहे जे वडिलांची पोकळी काही प्रमाणात भरून काढतील>>>>>>> इनामदार काका तुम्ही बोलताय ते अगदी खरंय पण तो चांगला मित्र आणि मार्गदर्शक हे आरुषचे बाबाच आहेत त्यामुळे हे नातं निरर्थक म्हणता येणार नाही ... त्याच्याशी मैत्री नाही मिळाली तरी त्याच्या बाबांनी केलेली मदत आणि सल्ले यातून मला एक चांगला माणूस मिळाला ...

माझ्यामध्ये एका वर्षांमध्ये आलेले बदल सर्वच बाबतीत ते मग असे लिखाण असेल किंवा अजून खूप सारे बदल .... आणि जवळच्या माणसाकडून मिळवलेली शाबासकी ... हि या नात्याची पावती आहे असे मला वाटते ... पण काही तरी चुकत नाही ना म्हणून तुमच्या सर्वांचे सल्ले घेत होतो... मनापासून आभार मानतो...तुमच्या सर्वांचे...

दोन लहान मुलांची आई म्हणून मला लेख वाचुन जरा काळजीच वाटली.
आवरा स्वतःला एवढंच म्हणेन>>>>>>>>>स्मिताजी, आईला काळजी वाटणे साहजिकच ...पण मला माहित नाहि मि त्याला भेटेन कि नाहि..... म्हनुण तर एक वर्ष झालेय आवरतोय स्वतःला ......आणि यापुढे हि असेच होईल....

तुमच्याशी सर्वाशी सहमत..... भेटायचे असेल तर देव त्याला एक दिवस माझ्याकडे घेऊन येईल....मी विसरायचा प्रयत्न करतो....खरंच मनापासुन धन्यवाद.....

हे सर्व मला संवेदनशिल वगैरे न वाटता काळजीचे वाटते आहे. हा लेख लिहून तुम्ही प्रोफाईल फोटोही त्या मुलाचा टाकलाय. हे चुकिचे आणि चिंताजनक सुद्धा आहे. हे सर्व सत्य आहे असे तुम्ही लिहिले म्हणून स्पष्ट प्रतिसाद दिलाय.