पुरातन अवशेष - ओळख आणि चर्चा

Submitted by वरदा on 11 February, 2012 - 10:10

एवढ्यातल्या एवढ्यात दोन-तीन प्रचिंच्या बाफवर मंदिरांच्या, मूर्तींच्या अवशेषांबद्दल मला मत विचारण्यात आलं. प्रत्येक वेळा अशा शंका त्या बाफवरून माझ्यापर्यंत किंवा इतर तज्ज्ञांपर्यंत पोचतीलच असं नाही, म्हणून हा नवा बाफ.

ज्याला/ जिला एखाद्या प्राचीन/मध्ययुगीन अवशेषांबद्दल माहिती हवी असेल, त्यांनी इथे छोटं प्रचि किंवा त्याचा दुवा डकवावा (यात देऊळ, मूर्ती, शिल्प, नाणी, वीरगळ, शस्त्रास्त्रं, खापरं, लेख, स्थापत्याचे अवशेष असं काहीही येऊ शकतं).

मी सर्वज्ञ नक्कीच नाही. मला जेवढी शक्य आहे तेवढी माहिती मी देईनच, आणि जे मला येत नाही त्याची ओळख पटवणारी इतर लोकं इथे निश्चितच असतील. तेव्हा आपल्या सर्वांच्या (माझ्यासकट) ज्ञानात काहीनाकाही भर पडेलच! त्या निमित्ताने आपण आपल्या आसपास काय सांस्कृतिक वारसा आहे हे थोडंसं सजगपणे पाहू लागलो तरी वारसा संवर्धनाच्या दृष्टीने खूप महत्वाचं पाऊल पडेल..... शिवाय एका अत्यंत प्राथमिक पातळीवर, थोडंसं विस्कळित का होईना, पण अज्ञात अवशेषांचं एक डॉक्युमेंटेशन सुरू होईल अशी आशा आहे.

काही मराठीतून उपलब्ध असलेली बेसिक पुस्तके -
१. प्राचीन भारतीय मूर्तीशास्त्र (नी. पु. जोशी)
२. प्राचीन भारतीय कला (म. श्री. माटे)
३. पुराभिलेखविद्या (शोभना गोखल)
४. प्राचीन भारतीय नाणकशास्त्र (म. के. ढवळीकर)
५. महाराष्ट्र: इतिहास - प्राचीन काळ - स्थापत्य व कला (अ.प्र. जामखेडकर)
६. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार (कल्पना रायरीकर व मंजिरी भालेराव)

यातील शेवटची दोन पुस्तके अलिकडची आहेत व सहजी उपलब्ध आहेत. पहिली चार ही महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने काढली होती. त्यातील नाणकशास्त्र व पुराभिलेखविद्या ही कॉन्टिनेन्टलने पुनर्प्रकाशित केली आहेत. बाकीची मिळणं जरा दुरापास्तच आहे.
आणखी लक्षात येतील तशी इथे यादी टाकेन. उद्देश असा की ज्यांना रस आहे त्यांना ती पुस्तके वाचून स्वतःच अनेक गोष्टी उलगडतील. Happy

त.टी.
१. खूप प्रचि आल्याने सर्व्हरवरील ताण वाढेल हे खरं आहे, पण जर वाहतं पान झालं तर डॉक्युमेन्टेशनच्या दृष्टीने अडचण येईल. यावर उपाय सुचवल्यास आभारी राहीन.

२. कृपया इथे हिंदू संस्कृती वि. मुस्लिम आक्रमक, जातीय व इतर सामाजिक भेदाभेद, स्वघोषित संस्कृतिरक्षक वि. स्वघोषित बुप्रावादी असे वाद घालू नयेत अशी नम्र विनंती. त्यासाठी इतर बाफांची रणांगणं झाली आहेतच. या बाफाची समिधा त्यात टाकू नये. त्यापेक्षा या उपक्रमात सहभागी झालात तर सांस्कृतिक वारसा संवर्धनाला थोडाफार का होईना हातभार लागेल.
तसेच मला इथे ताजमहाल आणी अशाच वास्तू हिंदू आहेत का आणखी काही यावर चर्चा नको आहे. ज्यांना अशा वादांत रस आहे त्यांनी कृपया नवा धागा उघडावा. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वीरगळ यावर मिसळपाव या सन्केतस्थळावर प्रचेतस यान्चाअएक लेख वाचला आहे. तो जिज्ञासुनी वाचाव.

हा काल किंवा भैरवाचे रूप आहे. हे शैव मंदिर आहे. नेमकी मूर्तीशास्त्राविषयी तांत्रिक माहिती शैव आगम माहित असलेल्या कुणा जाणकाराला विचारायला लागेल.

चांगला धागा, वरदा.

गद्धेगाळ म्हणजे काय?
खूप वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी शेतात त्यांच्या प्रिय कुत्र्याची/बैलाची समाधी बांधून घेतलेली. त्या दगडी समाधीवर अशीच प्राण्यांची कोरलेली आकृती आहे.

IMG20171116143648_1.jpg
हे शिल्प मन्दिरावर आहे.कशाचे आहे? कारण मराठ्वाड्यातिल परभणी मधील चारठाणा येथे जवळपास ७ मन्दीरावर हे शिल्प आहे.तसेच खान्बावर उलटे नाग आहेत.
IMG20171116144509.jpg

हे नागदंपती किंवा तत्सम शिल्प वाटतं आहे. पण त्यात फार काही खास नाही. अनेक मंदिरांवर अशी शिल्पे असतात, खांबांवरची नक्षी म्हणून. दुसर्‍या फोटोत आहे ती ही अगदी टिपिकल स्तंभशीर्षावरची नक्षी आहे. ही मंदिरं १३-१४व्या शतकातली वाटत आहेत.

https://www.bbc.com/marathi/india-41875553
साताऱ्यात 2 लाख वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन मानवी संस्कृतीचा शोध.

इतक्या प्राचीन काळी महाराष्ट्रात मानवी वस्ती होती हे ऐकून खूपच आश्चर्य वाटले.
पण एक शंका आहे: आधुनिक मानव हा २ लाख वर्षे पृथ्वीवर आहे असे समजले जाते. पण ह्या लेखात असे म्हटले आहे की सातार्‍याजवळ सापडलेले अवशेष साडेतीन लाख वर्षे जुने आहेत. ह्यात काहीतरी चूक वाटते.

वर जे उलट्या नागाचे शिल्प आले आहे तर अशा प्रकारची शिल्पे हे यादवकालीन मंदिरांचे वैशिष्ट्य असते!! त्यामुळे यादवकालीन मंदिरा अशा प्रकारच्या उलट्या नागांच्या चिन्हांची सजावट केलेली दिसून येते!

Submitted by दिगोचि on 3 November, 2016 - 16:28
कुकडेश्वर जुन्नर जवळ. कोणाला ह्या देवतांची नावे माहित आहे का?

ही वेताळाची शिल्पे आहेत बहुदा!! शक्यतो गावाच्या वेशीवर अशा प्रकारची शिल्पे आढळून येतात!! अगदीच देवता नसली तरी गावातले लोक यांची पण पूजा करतात!!

शंतनू परांजपे,
ती वेताळाची शिल्पे नव्हेत. कुकडेश्वर हे शैव मंदिर आहे आणि त्या मंदिराचा ही शिल्पे एक भाग होती. वरती त्यांचे ढोबळ आयडेन्टिफिकेशन मी दिले आहेच

भृंगी म्हणून शिवाचा एक गण असे!! त्याची आहेत ती शिल्प! माझ्या एका मूर्तीशास्त्राचा अभ्यास असलेल्या मित्राकडून समजलेली गोष्ट!!

बदामी लेण्यांत एक शिवाचे शिल्प आहे त्यात एक अस्थीपंजर आकृती आहे (फोटोत डाव्या कोपर्‍यात, नंदीच्या मागे). तेथील फलकावर त्याचा उल्लेख कालभैरव असा आहे. त्यामुळे वरदाचे म्हणणे योग्य वाटतंय.

मी कालभैरव म्हणजेच शंकर असे समजत होतो. पण या लेणीनुसार शंकर आणि कालभैरव हे भिन्न आहेत. त्याबद्दल अधिक माहिती आहे का?

@वरदा माहितीबद्दल धन्यवाद. आज तुमचा प्रतिसाद वाचनात आला. माझ्याकडे एक बांगडी चा तुकडा (हस्तिदंत किंवा दगड ), एक वीट व एक धातूच्या पाईप सारखी वस्तू आहे. जुन्नर जवळ सापडलेली. सवड मिळाली कि फोटो अपलोड करतो. जाणून घ्यायला आवडेल कुठल्या काळामधील आहेत.

@शंतनू विकिपीडिया नुसार भृंगी शिवभक्त ऋषी होता, भुंगा होऊन शिव पार्वती च्या मध्ये आला आणि त्याला शाप मिळाला मातेकडून मिळालेले सगळं झडून जाईन. म्हणून त्याची फक्त हाडे राहिली. (हाडे पित्याकडून येतात ) नंतर उ:शाप मिळून त्याला तिसरा पाय टेकू म्हणून मिळाला. शिल्पांमध्ये त्याला दाखवताना ३ पाय व दाढी दाखवली जाते. अर्थात जाणकार जास्त माहिती देतीलच.

@शंतनू विकिपीडिया नुसार भृंगी शिवभक्त ऋषी होता, भुंगा होऊन शिव पार्वती च्या मध्ये आला आणि त्याला शाप मिळाला मातेकडून मिळालेले सगळं झडून जाईन. म्हणून त्याची फक्त हाडे राहिली. (हाडे पित्याकडून येतात ) नंतर उ:शाप मिळून त्याला तिसरा पाय टेकू म्हणून मिळाला. शिल्पांमध्ये त्याला दाखवताना ३ पाय व दाढी दाखवली जाते. अर्थात जाणकार जास्त माहिती देतीलच.>>>

धन्यवाद!!!

कुणाला वीरगळ बद्दल माहिती हवी असेल तर मी इथे लेखमाला लिहू शकतो. माझ्याकडे चिकार माहिती आहे विरगळ आणि गद्धेगळ बाबत!!

चिडकू, तो बांगडीचा तुकडा वगैरे फोटो इथे टाकलेत तर आवडेल बघायला. जुन्नरची वसती किमान दोनहजार वर्षे मागे जाते. तेव्हा ती बांगडी शंखाची (पांढरी आहे ना?) असेल.
कुठून मिळाला हेही लिहाल का तपशीलात? Happy

Rofl
गधेगळ वाले वरदा यांच्या धाग्यावर येऊन "माझ्या एका मित्राने सांगितले" वरून ज्ञानदान करताना!!
मायबोली! हेच पहायचे राहिले होते..

तिकडल्या धाग्यावर या टंटनूला जरा जास्तच प्रेमात घेत होतो, हे उमजले. आता यांचा गधेगळ उभारावाच लागेलसे दिसते Lol

गधेगळ वाले वरदा यांच्या धाग्यावर येऊन "माझ्या एका मित्राने सांगितले" वरून ज्ञानदान करताना!!
मायबोली! हेच पहायचे राहिले होते..
तिकडल्या धाग्यावर या टंटनूला जरा जास्तच प्रेमात घेत होतो, हे उमजले. आता यांचा गधेगळ उभारावाच लागेलसे दिसते..>>

ज्यांना स्वतःचे नाव लिहायलाही लाज वाटते अशांनी मध्ये मध्ये तोंड खूपसु नये.. माझी संस्कृती मनुष्याची आहे तुमच्यासारखी पशूची नाही त्यामुळे तुम्ही जरी सभ्यतेच्या सर्व सीमा पार केल्या असतील तरी मी करणार नाही कारण माझ्यावर संस्कार चांगले आहेत..

संदीप डाके, चारठाणा आणि कंधार येथील पुरावशेषांवर नुकतेच डॉ. अरुणचंद्र पाठक (माजी संचालक, महाराष्ट्र गॅझेटीअर्स डिपार्टमेन्ट) यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ते आवर्जून वाचा.

रोचक माहीती आहे तुमचि वरदा.....टवणेसर लोकसत्तेतला लेख interesting......माधव ))))भैरव ही आर्याच्या पुर्वी ईथल्या अनार्यांची देवता असावी नंतर शंकर हि देवता लोकप्रीय झाल्यावर भैरवाला त्याचाच अवतार देवून तीला आर्य अनार्य या मिश्र संस्क्रुतीत समाविष्ट केल असाव...अस बर्याच देवता बद्दल झालय...अय्यापा ,खंडोबा या .देवतांचे यांनांही असेच सामील करुन घेतलय.....बर्याच देवी रूपाच ही असच झालय.......रेणूका , व बर्याच ठिकाणच्या लक्ष्मी रुपातल्या देवतांचेहि असेच सामीलीकरण झालय

Pages