हनुमान जयंती

Submitted by प्रमोद् ताम्बे on 14 April, 2014 - 20:19

हनुमान जयंती
hanumaan.jpg
'हनुमान' म्हणजे बल,पराक्रम,नम्रता,बुद्धिमत्ता,सेवा यांचा आदर्श ! हनुमानाला रुद्राचा अवतार मानले जाते.तसेच मरुत किंवा वायूचा पुत्र म्हणून त्याला 'मारुती' ही म्हणतात. शक्ती,भक्ती,पराक्रम यांचा आदर्शवत अशा या दैवताची जयंती आज सर्वत्र मोठया धुमधडाक्यात साजरी होते.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर, अगदी अगदी!

हा घ्या विजयदुर्ग सागर किनार्‍यावरील एका लहानश्या गावात गावकर्‍यांनी एका रात्रीत उभा केलेला एक हनुमान!

जय मारुतीराया!

आज दुपारी १.१२ वाजता पौर्णिमा संपेल, तोवर हनुमान जयंती आहे. सर्वांना सर व माझ्याहीतर्फे हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

VIJAYDURG 189.JPG

जय हनुमान ज्ञान गुन सागर, जय कपिस तिहु लोक उजागर
रामदूत अतुलीत बल धामा, अन्जनी पुत्र पवन सुत नामा|

मनोजवम मारुत तुल्यवेगम जितेन्द्रियम बुद्धीमताम वरिष्ठ्म
वातात्मजम वानययुथ मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये!

सर्वाना हनुमान जयन्तीच्या शुभेच्छा.:स्मित:

_/\_

गामा साहेब,

तुम्हाला तुमची भक्ती सिद्ध करायला ४ मिनिटे उशीर झाला. दुपारी १.१२ वाजता पौर्णिमा व हनुमान जयंती संपली.

आता हा सरांचा धागा आपण पुढल्या हनुमान जयंतीसाठी जपून ठेवूयात. ह्यात दोन चित्रेपण आहेत.

जयंती वेळ संपली तरी उत्सव नि शुभेच्छा दिवसभर चालतात ना? >>>
हो आमच्या गावी जत्रा भरली आहे. दर्शन सुरु आहे. एका बाजुस महाप्रसाद चालु आहे आणि रात्री ८ वाजता वाजत नाचत पालखी निघेल ती संपुर्ण गावात फिरवुन उद्या सकाळी ६ वाजता पुन्हा मंदिरात आणतील.

माझ्या आजोळी शिरढोण (वासुदेव बळवंत फडके, याच गावचे), खूप छान मारुतीचे मंदिर आहे आणि पालखीचा मान आजोळच्या 'लागू' घराण्याकडे होता आता चुलत मामांनी पालखी गावाला दिली आणि घरही विकले पण लहानपणीचा तो उत्सव डोळ्यासमोर उभा राहतो.

उत्सवाला नाही जायला जमत पण मारुतीच्या दर्शनाला कधीतरी जातो आम्ही.

सात चिरंजीवांपैकी हनुमान अजून जिवंत आहेत त्यामुळे हनुमान जयंती न बोलता हनुमान जन्मोत्सव बोलायला सुरवात करावी. जयंती आपण त्यांची साजरी करतो ज्यांचा मृत्यू झाला आहे.

पहिल्याच वाक्यात चूक आहे, सात चिरंजीवांपैकी हनुमान अजून जिवंत आहेत म्हटले तर बाकीचे सहा जिवंत नाहीत असा अर्थ होतो.

बाकी हे ह्यावर्षीचे नवे व्हाट्सएपीय फॅड म्हणायचे...आता काही वर्षे तरी न चुकता वाचायला मिळेल.

एकतर ते "महाकाव्य" त्यात "जन्मलेले" ते चिरंजीव. अन त्यांच्या जयंत्या मयंत्या. अन त्यावरून मारामार्‍या.
चालू द्या.

बाकी हे ह्यावर्षीचे नवे व्हाट्सएपीय फॅड म्हणायचे...>>> करेक्ट साधनाताई, बाजारात नवीन फॅड आलंय म्हणायचं.
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

पहिल्याच वाक्यात चूक आहे, सात चिरंजीवांपैकी हनुमान अजून जिवंत आहेत म्हटले तर बाकीचे सहा जिवंत नाहीत असा अर्थ होतो>>>>>>हो बाकीचे जीवन्त नाहीतच, फक्त हनुमान जिवंत आहेत.

तरून जो जाईल सिंधू अपार,
असा हा एकच श्री हनुमान.

सुर्योदयी हा वीर जन्मला,
त्रिशत योजने नभी उडाला,
समजुनिया फळ रवीबिंबाला ,
धरू गेला भास्वान,
असा हा एकच श्री हनुमान

सगळे जिवंत नाहीत, बिभीषण व्यास वैगरे द्वापारयुग त्रेतायुग मध्ये निघून गेले असं ऐकून आहे.

व्यास, कृप, अश्वत्थामा सगळे कुरुक्षेत्राच्या लढाईत होते, तो द्वापारयुगाचा शेवट आणि कालियुगाची सुरुवात. आणि ते गेले हे कुठे ऐकलंत?