महाकवी कालिदास

Submitted by kokatay on 24 March, 2018 - 17:19

२१ मार्च ला विश्व कविता दिवस होता, त्यानिमित्याने मला महाकवी कालीदास ह्यांच्या बद्दल आणि उज्जयनी बद्दल लिहावेसे वाटले.
उज्जैन, मध्यप्रदेशात दर वर्षी कार्तिक शुक्ल एकादशी पासून कालिदास समारोह सुरु होतो. कालिदासांच नावं घेतल कि मला माझ माहेर आठ्वत! मध्यप्रदेश च शहर उज्जैन हे कालिदासांच शहर आहे, मी माझी मास्टर्स डिग्री इथूनच केली होती. इथे राहूनच मला कालिदासांच वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या कार्याची माहिती मिळाली.

उज्जैन (उज्जयिनी) (अवंतिका) भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक प्रमुख शहर आहे. क्षिप्रा नदीच्या किनारी वसलेले ह्या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी येथे होती. या शहराला मंदिरांचे शहर असेही म्हणतात कारण शहराच्या परिसरात असलेली अनेक प्राचीन, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण हिंदू मंदिरे आहेत.

दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यात जगभरातून भाविक येथे जमा होतात. भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महांकालेश्वर हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहे. तसेच, मंगळ या ग्रहाचे मंगळनाथ मंदिरही येथे आहे. मध्यप्रदेशातील सर्वात मोठे शहर इंदूर हे उज्जैनपासून केवळ ५५ कि. अंतरावर आहे.

उज्जैन ची राजकुमारी विद्योत्तमा ही खूपच हुशार आणि शास्त्र तज्ज व्यक्ती होती. शास्त्रोक्त वादविवाद मध्ये तिला कोणी पण हरवू शकत नव्हत. तिने हा प्रण धरला होता कि जो तिला शास्त्रोक्त वादविवाद मध्ये हरवेल, त्याच माणसाशी ति लग्न करेल. काही लोक तिच्यावर संतप्त होते आणि तिला धडा शिकवायला म्हणून त्यांनी एका अशिक्षित माणसाला ज्याला कि कुठल्याही प्रकारच काहीच ज्ञान नव्हतं, पकडलं आणि त्याला सांगितलं कि तुझ लग्न एका राजकुमारी शी होऊ शक्त, तुला आम्ही सांगू ते करावे लागेल. तो माणूस हो म्हणाला! राजकुमारी ला सांगितले कि तो तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं फक्त हातवारे करूनच देईल कारण काही कारणास्तव तो मौन व्रतात आहे. राजकुमारी नी ते मान्य केले.
राजकुमारी ला आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली आणि तिचं लग्न झालं, पण तिला लगेचच कळल कि तीची फसवणूक झाली आहे आणि रागवून तिनी तिच्या पतीला सोडून दिलं. तो माणूस मग उज्जैन च्या गड्कालिका देवळात येऊन बसला आणि देवी ची पूजा प्रार्थना केली. त्यानी हे प्रण घेतलं कि तो जितकं शक्य होईल तितकं ज्ञान अर्जित करेल. आणि आपल्याला मिळाले महाकवी कालिदास!
अर्थातच ही गोष्ट सर्वात लोकप्रिय आहे पण त्यांनी स्वतः कुठे ही त्यांच वास्तव्य किवा त्यांच्या खाजगी जीवना विषयी लहिलेलं नाहीये.
त्यांनी “ कुमारसंभव “ मेघदूत , रघुवंश , माल्वीकाग्नीमित्र , अभिग्यान शाकुंतल , रीतुसंवहार, विक्रमोर्वशीयम , असं अप्रतिम काव्य आणि साहित्य जगाला दिलं. भारतातच नव्हे तर विदेशात सुदा त्यांना एक महान लेखक- कवी म्हणून ओळखलं जातं. “ अभिज्ञान शाकुंतल “ हे सर्वात आधी इंग्रजी मध्ये रुपांतरीत केलं गेलं. एक महत्वाची माहिती म्हणजे अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया स्टेट युनिवरसिटी बर्कली चे प्रोफेसर आर्थर विलियम राईडर हयांनी संस्कृत ते इंग्रजी रुपांतर केलं.
उज्जैन ला कालिदास अकॅडमी आहे आणि दर वर्षी तिथे “ कालिदास समारंभ “ असतो . त्या समारोह मध्ये विभिन्न कला , संगीत, साहित्य प्रतीयोगिता असतात. ह्या सामारोहातून भारता ला मोठ मोठे कलाकार ही मिळतात. मला आठवतं कि मी शाळेत असताना महान चित्रकार एम. एफ. हुसेन ह्यांना पण पारितोषिक मिळालं होतं आणि तेव्हापासूनच जग त्यांना एक चित्रकार म्हणून ओळखू लागलं.
मला कधी-कधी असं वाटतं कि जीवनात आलेल्या अडचणी, ठोकताळे हेच आपल्याला सफलता मिळवून देण्यात मदद करतात. देवी सरस्वती चा आशीर्वाद जसा महाकवी कालिदास ना मिळाला , तसाच तुम्हा आम्हास मिळो आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी सद्बुद्धी मिळो, हिच देवी चरणी प्रार्थना!
ऐश्वर्या कोकाटे, संपादिका
मराठी कल्चर एंड फेस्टिवल्स .com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. मुळात कालिदास हे साहित्यक्षेत्राचं दैवतच. कालिदासांविषयीच्या माहितीत भर पडली.

कालीदासाबद्दल एक गोष्ट ऐकली आहे -
कालीदासाची बायको विद्वान व कालीदास तेव्हढा शिकलेला नव्हता, बोलण्यात चतुर नव्हता. एकदा त्याच्या बायकोने त्याला सर्व लोकांसमोर विचारले "अस्ति कश्चित्वाग्विलसः ? "
तो अपमान सहन न होऊन कालीदास घराबाहेर पडला. अनेक वर्षे तपश्चर्या (अभ्यास?) करून ज्ञान मिळवले.
मग त्याने "अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा " अशी सुरुवात करून कुमारसंभव
"कश्चित्कांता विरहगुरुणा स्वाधिकारत्प्रमत्तः "अशी सुरुवात करून मेघदूत
"वागर्थाविव संपृक्तौ वागर्थं प्रतिपद्यये"अशी सुरुवात करून रघुवंश
अशी व इतर अनेक महाकाव्ये लिहीली. व तो प्रसिद्ध झाला.

( बायको बहुतेक तोंड काळे करून कुठेतरी लपून बसली!)

वाह !!!
उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम्।
दण्डिनः पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणाः॥

पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः ।
अद्यापि तत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव ॥

<<<@नन्द्या४३ बायको ला सोडल्यावरच ते महान झाले !>>>
म्हणूनच गेले ३० वर्षे प्रयत्न करतो आहे! पण आमच्या नशिबी नाही!
लोक म्हणाले अरे, ती सुटली तरी तू काय तपश्चर्या करणार होतास का? नुसता दारू पिऊन झोपला असतास.
म्हणून आता फक्त म्हणायचे - बायकोने निकम्मा कर दिया गालीब, वर्ना हम आदमी थे कामके!

@नन्द्या४३...क्या बात है ! इसी बात पर दो पंक्तिया :
ना कटूंगी,ना जलूँगी,ना मिटूंगी,ना मरूँगी
मैं थी, मैं हूँ,मैं ही रहूँगी......ऐश