आतुर भाग-४

Submitted by Harshraj on 19 March, 2018 - 05:24

आतुर भाग-१
https://www.maayboli.com/node/65537

आतुर भाग-२
https://www.maayboli.com/node/65561

आतुर भाग-3

https://www.maayboli.com/node/65571

अक्षदा दोन मिनिटं स्तब्ध राहिली. तिला काही सुचेनाच. प्रेम! प्रेमावरच्या कित्येक गोष्टी वाचल्या होत्या, गाणी ऐकली होती, सिनेमेसुद्धा पहिली होते. पण ते तेवढ्यापुरतंच होतं वास्तव जगात मात्र याविषयी कधीच विचार केला नव्हता. तिला काय वाटत होतं तिचं तिलाच कळत नव्हतं.

विलासचं बोलणं सुरूच होतं, "प्लिज उत्तर दे अक्षदा. नाही म्हणालीस तरी चालेल. पण निदान आपली मैत्री तरी तोडू नकोस."

पण अक्षदा गप्पच होती. ती तशीच निघून गेली. विलासानेही जाऊ दिलं. त्याला वाटलं ,'उगाच आपण प्रपोज केलं. ' तर दुसरं मन सांगत होतं, 'कदाचित उद्या सांगेल विचार करून. ' पण..कधी येणार उद्याचा दिवस?

अक्षदा रूम वर येऊन तशीच बसली. तिच्यासुद्धा मानाने तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. 'का असं केलं त्याने? किती छान नातं जुळलं होतं मैत्रीचं. आता कशी मित्र म्हणून बोलू शकेन मी त्याच्याशी लग्नाचा विचार तरी कसा करू? अजून एक वर्ष शिक्षण बाकी होतं. घरी सांगितलं तर कास्ट, वय..सगळेच प्रॉब्लेम्स होतील. पण मी का लग्नाचा विचार करतेय? खरंच आवडतोय का तो आपल्याला?' अक्षदाला स्वतःच्याच मनाची भीती वाटली. नकळत डोळ्यात पाणी आलं. विचार केला नाही तरी मनातले विचार थांबत नव्हते. शेवटी तिने ठरवलं कि, मनाचा हा कप्पा कायमचा बंद करायचा.' निश्चयी मानाने ती उठली. सायबर मध्ये जाऊन ट्रेन चा तिकीट बुक केलं. आणि उद्या विलास कसं तोंड द्यायचं याचा विचार करत, कानात हेडफोन्स लावून झोपली. तोच मेसेज आला, 'listen fm...' तिने चॅनल लावलं, तर ..'रुठ ना जाना तुमसे कहू तो ..' हे गाणं लागलं होतं. अक्षदाला पुन्हा अस्वस्थ वाटायला लागलं. पण तिचा नकार पक्का होता .

दुसऱ्या दिवशी कंपनीत तेव्हा ती गप्प गप्पच होती. विलासने नाश्त्याचं विचारलं तेव्हासुद्धा 'नको ' म्हणून त्याला टाळलं .

विलासला कसतरीच वाटलं. तीने आज त्याच्या एकही मेल ला उत्तर दिलं नाही. विलास बोलायचा प्रयत्न करायचा पण अक्षदा जुजबी उत्तर देऊन टाळायची. लंचब्रेकमध्येसुद्धा अक्षदा जेवायला आली नाही. तिचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या होत्या . ट्रेनिंग चं सर्टीफिक घ्यायचं होतं , म्हणून लंच ला नकार देऊन तिनं त्याला टाळलं

आता मात्र विलासने ठरवलं काही झालं तरी संध्याकाळी आपण हिला स्पष्टच विचारायचं. दिवसभर त्याचं कामातही लक्ष लागलं नाही .ऑफिसची वेळ संपली तसं अक्षदाने सगळ्याचा निरोप घेतला आणि विकासाकडे वळली.

तो काही बोलणार एवढ्यात म्हणाली ,"थोडं बोलायचं होतं. रुमपर्यंत चालत जाऊया ?"

विलासलाही बोलायचं होतंच . त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता . दोघे चालताच निघाले . आभाळ गच्च भरलं होतं . पावसाचं काही सांगता येत नव्हतं . अक्षदा बोलायचं म्हणाली खरं , पण गप्पच होती.

शेवटी विलासच म्हणाला ," अक्षदा , काहीतरी बोल, कालपासून किती बेचैन आहे मी , कल्पना आहे का तुला ? आता नाही बोललीस तर नक्की जीव जाईल माझा ."

शेवटी अक्षदाने बोलायला सुरुवात केली ," सर , मीसुद्धा कालपासून तुमच्याशी कसं बोलायचं हाच विचार करतेय . पण , मी खरंच तुम्हाला चांगला मित्रच मानत आले . तुमच्यापेक्षा मी वयाने लहान आहे . त्यामुळे कसं रिऍक्ट व्हावं मला कळत नाहीय.

मला अजून खूप शिकायचं आहे .आई बाबांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. त्यामुळे यासगळ्याचा कधीच विचार केला नाही आणि मला करायचाही नाही . स्पष्टच सांगायचं तर माझा नकार आहे "

"पण, मी थांबायला तयार आहे अक्षदा." विलास लगेच म्हणाला.

"नको सर, खूप विचार करून निर्णय घेतलाय मी. आणि त्यावर ठाम आहे. माझ्या आई-बाबांना मला कोणत्याचं कारणाने दुखवायचं नाहीय. प्लिज समजून घ्या.मी एका खेड्यातली मुलगी आहे. त्यांनी मला इथवर पाठवलं, तेच मी मी नशीब समजते. त्यांचा विश्वास नाही तोडू शकत. मैत्रीचा प्रश्न नाही, पण आपलं नातं पाहिल्याइतकं निखळ राहणार नाही नक्कीच."

विलासला काय बोलावं सुचत नव्हतं . दोघे तसेच चालत राहिले . रुमपर्यंत पोचले तेव्हा अक्षदाने कसेतरी बाय केले आणि आत आली . विलास मात्र तसाच उभा होता. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली . जवळ छत्री असूनसुद्धा विलासने ती उघडली नाही. तो किती वेळ चालत होता..अक्षदा दूर गेली होती कायमची...पुन्हा कधीच भेटणार नव्हती.

दुसऱ्या दिवशी अक्षदा संध्याकाळी घरी पोहचली. कॉलेज चालू व्हायला अजून आठवडा अवकाश होता. पोरगी इतक्या दिवसांनी घरी आली म्हणून आई काय काय करत होती. पण अक्षदाचं लक्ष नसायचं जास्त. दिवसभर तिला विलासाचीच आठवण यायची. कितीवेळा तर तरी झटकून टाकायची. वरवर नॉर्मल राहायची, पण एखादं गाणं लागलं कि, नकळत भावुक व्हायची.

तिला वाटलं , कॉलेज चालू झालं कि आपण नक्की विसरून जाऊ त्याला. आपण आत्ताच आलो आहोत म्हणून वाटत असेल आपल्याला.

कॉलेज चालू झालं. तिची रूममेट , जीवश्च कंठश्च मैत्रीण अंजु ,अक्षदाने तिला सगळं सांगून मन मोकळं केलं . तीसुद्धा म्हणाली , "थोड्या दिवसांनी होईल सगळं नीट. " अक्षदाला जरा हलकं वाटलं. तरीसुद्धा तीला उगीचच वाटायचं , कधीतरी विलासचा मेसेज येईल. नकळत मोबाईल पाहायची , चिडून पुन्हा विचार झटकायची . कधी वाटायचं ,'आपणच फोन करावा त्याला. मित्र म्हणून बोलायला काय . पण आपण आपल्या निश्चयात कमी पडलो तर ..नको नको ..' अक्षदाला स्वतःचीच भीती वाटायची .

कॉलेजमध्ये आता प्रोजेक्ट करायचा होता . नेटवर इन्फॉरमेशन , सब्जेक्ट सर्च करायला ती आणि अंजु सायबर कॅफे मध्ये आल्या. ब्राउजिंग करत करत अक्षदाने मेल बॉक्स ओपन केला आणि मेलबॉक्स पाहून अक्षदाला धक्काच बसला. विलासने तिला रोज गुडमॉर्निंग , फ्रेंडशिप्स च्या मेल्स पाठवल्या होत्या . अगदी आजसुद्धा . पण सगळयात जुनी मेल होती, अक्षदा सोडून आली त्याच्या दुसऱ्या दिवशीची ...

आणि सब्जेक्ट होता ..'तू गेली तेव्हा ...'

Group content visibility: 
Use group defaults