सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८ - सांस्कृतिक कार्यक्रम रूपरेषा

Submitted by धनश्री on 14 March, 2018 - 11:30

सिअॅटल् महाराष्ट्र मंडळाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची ही रूपरेषा.

कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक:- वामन हरी पेठे ज्वेलर्स
माध्यम प्रायोजक:- मायबोली

दिनांकः- शनिवार, १७ मार्च २०१८

ठिकाणः- Bellevue High School
10416 SE Wolverine Way, Bellevue, WA 98004

कार्यक्रमांची माहिती आणि साधारण वेळापत्रकः
सकाळी ८ वाजता नावनोंदणी केलेल्या सभासदांना तिकीटे आणि कार्यक्रमाची भेटवस्तू मिळेल. त्यांना स्मरणिका देखील घेता येईल.
०८:३० - ०९:१५ - सकाळची न्याहारी
०९:४५ - ११:४५ - उद्घाटन सोहळा - या सोहळ्याचे २ भाग आहेत. पहिल्या भागात नृत्यनाटिका आनंद तरंग आणि दुसर्‍या भागात मंडळाच्या २५ वर्षांचा आढावा सादर होईल.
दुपारी १२:०० - १:३० - राजेशाही सुग्रास भोजन - पुरणपोळीचा साग्रसंगीत बेत आहे मंडळी!!
दुपारी २:०० ते ५:०० - वसंत कानेटकर लिखीत "प्रेमाच्या गावा जावे" हे नाटक सिअ‍ॅटलचे कलावंत सादर करतील.
संध्याकाळी ५:०० ते ७:०० - हलके जेवण/न्याहारी
आणि ७ वाजता कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण महेश काळे यांचा "सूर निरागस हो" हा संगीतसोहळा सादर होईल.

कार्यक्रमाची तयारी जोरदार चालली आहे. सविस्तर वृत्तांत, गमती जमती हे पुढे येईलच. Happy

Program Outline
08:00-09:00 — Registration starts
08:30-09:15 — Breakfast
09:45-11:45 — Opening ceremony: Colorful opening ceremony with a musical dance-drama set to the theme of celebrating Rajeshahi thaat and grandeur of our region. Recounting memories of the past 25 years of SMM.
12:00-01:30 — Lunch: A sumptuous lunch with taste and specialties of Maharashtrian cuisine.
02:00-05:00 — Naatak: Vasant Kanetkar’s famous light comedy play “Premachya Gava Jave”. Directed by Subhag Oak with local talents. This is a SMM co-production with Xperiments.
05:00-06:30 — Light dinner: Street food catered by local Indian Food trucks.
07:00-09:30 — Grand Finale : “Sur Niragas Ho”, an acclaimed vocal music program by national award winner singer Mahesh Kale of “Katyar kaljat ghusali” fame. He will be accompanied by many talented artists from all over the USA.

sj_whp.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users