स्ट्रेस बस्टर- लिहीते व्हा.

Submitted by पाथफाईंडर on 9 March, 2018 - 21:39

दैनंदिन जीवनात (नेहमीचे +आभासी )वावरताना अनेकदा एखादा प्रसंग अथवा एखादी व्यक्ती आपल्याला त्रासदायक ठरते. होणारा त्रास / त्रागा त्याठिकाणी व्यक्त होऊ शकत नाही. ती घुसमट व्यक्त होण्यासाठी हे वाहते पान.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिहिणे हे स्ट्रेसबस्टर आहे.
पण ते पब्लिकली प्रकाशित करणे स्ट्रेसबस्टर असेलच असे नाही.
कारण मग त्यावर प्रतिक्रिया येतात. त्यांना कसे सामोरे जायचे, कसे हॅन्डल करायचे याची तुम्हाला आयड्या नसेल तर ईथे लिहून आपले स्ट्रेस वाढवूही शकता.
त्यामुळे बघा जरा विचार करून ईथे लिहा. हि चेतावणी समजा ....

आनंद कल्पना आहे. Happy तसेही इथे मदत करा "कोणाशी तरी बोलायचय" असे अनेक धागे निघतात. पण ते वाहते नसतात अन ट्रेल रहातो लिहीणारे हातचे राखून लिहीतात म्हणून ही सोय.

@च्रप्स वर आनंद ने दिलेली शक्यता विचारात घेता (आयडी उडायची) एवढा टोकाचा प्रतिसाद देऊ नये.

<< लिहिणे हे स्ट्रेसबस्टर आहे.
पण ते पब्लिकली प्रकाशित करणे स्ट्रेसबस्टर असेलच असे नाही.
कारण मग त्यावर प्रतिक्रिया येतात. त्यांना कसे सामोरे जायचे, कसे हॅन्डल करायचे याची तुम्हाला आयड्या नसेल तर ईथे लिहून आपले स्ट्रेस वाढवूही शकता. >>

------ धाग्यावर येणार्‍या प्रतिक्रियांमुळे स्ट्रेस वाढत असेल तर त्या वाढलेल्या स्ट्रेसवर एक धागा काढायचा.... Happy
धागे - धागे विणता विणता धागे वाचणार्‍यांना स्ट्रेसच्या खाईत ढकलायचे.

एक महिन्या आधी ब्रेकअप झालंय..त्यात लॉकडाऊन..ना सगळ्यांसमोर रडता येत ना दुःखी होऊन बसता येत..सतत हॅपी फेस करून मिरवायला लागत..किती ताण आलाय काय सांगू..खूप दूर जाऊन जोरात ओरडून ओरडून रडून सगळ मन मोकळ करून टाकावं वाटत पण काही करू शकत नाही

रात्रीच्य झोपेचे १२ वाजलेत..
आमची boss cute असली तरी एका point ला energy down होतेच!
आणि तेव्हाच तिला खेळायचं आणि रडायचं असतं Biggrin

सगळ मन मोकळ करून टाकावं वाटत पण काही करू शकत नाही
नवीन Submitted by अमृताक्षर on 9 May, 2020 - 19:06
>>>

जब वुई मेट पाहिला असेल तर त्यातील गीत करीना कपूर सारखे करा.. फोन करा, शिव्या घाला. रडा. ओरडा. जे तुम्हाला आणि तुमच्या केसला सुटेबल असेल ते करा. आणि हलके व्हा..

एक महिन्या आधी ब्रेकअप झालंय..त्यात लॉकडाऊन..ना सगळ्यांसमोर रडता येत ना दुःखी होऊन बसता येत..>>
लॉकडाऊनमध्ये लेकराबाळांना घेऊन घराकडे पाय ओढत जाणार्या लोकांचा विचार करा. तुमचं दु:ख काहीच वाटणार नाही तुम्हाला.

कंपनीनं ऑलरेडी यावर्षी हाइक मिळणार नाही, म्हणून जाहीर केलंच होतं. पण तरीही पर्फॉर्मन्स बँड रीलीज केलेत. इतकी मेहनत करूनपण चाटूगिरी करणार्‍यांना चांगले आणि मला वाईट बँड मिळालाय. रीजेक्ट करून काही फायदा नाही. आता, सॅलरीवर काहीही फरक पडणार नाही, जॉब राहिलाय हेच काय कमी आहे, असं म्हणून आहे त्यात खूश रहायचं की या बँड देण्यामुळे पुढे प्रमोशनला येणार्‍या बाधेचा विचार करून डोक्याची मंडई झाली आहे... एकंदरीत , सध्या जॉब सोडता येत नाही आणि प्रामाणिकपणे मेहनत करूनही हाती काहीच लागत नाही या अवस्थेत दिवस जाताय Sad