श्रीदेवी ... अर्ध्यावरच डाव सोडून गेली :(

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 February, 2018 - 03:49

श्रीदेवी आता राहिली नाही. हार्ट अटेक आला आणि त्यातच गेली. बातमी एव्हाना सर्वांना समजली असेल. पण कित्येकांना अजूनही हे पचले नसेल. व्हॉटसपवर ज्यांनी पाहिले त्यांचा खातरजमा केल्याशिवाय विश्वासही बसला नसेल. 54 वर्षे वय हे तसेही जाण्याचे नसले तरी ती 54 ची होती हेच मुळात पचवणे अवघड होते. आताही तिचा चेहरा डोळ्यासमोर येत ऐन तारुण्यात एखादा तारा निखळलाय असेच वाटतेय. कारण आजही श्रीदेवी म्हटले की चालबाज आठवतो, सद्मा म्हटले की श्रीदेवी आठवते. खुदा गवाहमध्ये अमिताभच्या ईतकीच लक्षात राहते, रूप की राणी चोरोंका राजा सारख्या टुक्कार चित्रपटातही जाणवते.. जिला लहानपणी मिस्टर ईण्डिया पाहिल्यानंतर आम्ही मिस ईंडिया म्हणायचो.. कमालीचा स्क्रीन प्रेजेन्स आणि त्याला ताकदीच्या अभिनय आणि सौंदर्याची जोड. बॉलीवूडची रुढार्थाने पहिली फिमेल सुपरस्टार - श्रीदेवी .. आता कुठे तिची सेकंड इनिंग सुरू झाली होती. ईंग्लिश विंग्लिश आणि मॉम सारख्या चित्रपटातून तोच चेहरा, तीच एनर्जी आजही दिसू लागली होती.. आणि अचानकच गेली.. म्हणूनच अगदी अर्ध्यावरच डाव सोडल्यासारखे वाटतेय.. चटका लाऊन गेली...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"आयुष्यभर ज्यानी सेवा दिली त्यांची माहिती नाही, पण २ तासाचे १०/२० चित्रपट केले , त्याने तुमची करमणूक झाली त्यांना भरभरून मात्र भरभरून प्रेम." - प्रेम असण्याविषयी चाललय कि माहिती असण्याविषयी. मुळात सेलेब्रिटीविषयी माहिती असते (जितकं प्रसिद्धी माध्यमांतून कळतं तितकच) आणी PWD च्या इंजिनियरविषयी, समोरच्या गल्लीच्या पलिकडच्या टोकाला असलेल्या भाजीवाल्याविषयी वगैरे नसते ह्या लॉजिक ला च काही अर्थ नाहीये. जर ह्या भाजीवाल्याविषयी / इंजिनियरविषयी सुद्धा अशी माहिती उपलब्ध व्हायला लागली तर त्यांनाही सेलेब्रिटीच म्हणावं लागेल.

"आजवर इतका आदर कुठल्याही सैनीकाच्या मृत्यूनंतर दिसला नाही " - देशात घडणार्या प्रत्येक ट्रॅजेडी चा संबंध सैनिक आणी शेतकर्यांशी लावलाच पाहिजे का? त्या सैनिका च्या / शेतकर्यांच्या मरणाला स्वस्त केलं गेलय ह्या असल्या तुलनेतून.

मुळात ही असली लॉजिक्स 'त्यांना म्हणावं सरळ पाकिस्तानवर एक अणुबाँब टाकून संपवून टाका' कॅटेगरीतली असतात. सकृत्दर्शनी भारदस्त वाटत असली तरी अंतर्बाह्य पोकळ.

"बाथटबभर पाण्यात जीव गेला म्हणजे मद्यपान थोडेथोडके नसणार." - त वरून ताकभात प्रकार आहे हा. काही काँप्लिकेटेड परिस्थिती असू शकेल, समोर आलय त्यापलिकडे काही असू शकेल असं नाही वाटत? मद्यपान विरोध मी समजू शकतो, पण तो अजेंडा पुढे रेटण्यासाठी हा आधार कमकुवत वाटतो.

अहो आदिसिद्धी, सैनिकांबद्दल आपल्या सर्वांनाच आदर असतो. पण तो दाखवायला त्यांच्या फेसबूकपेजला लाईक करायची गरज नसते. ना त्यांची अशी अपेक्षा असते.
एखादा सरकारी अभियंता असतो. तो लोकांसाठी घरे बांधतो, रस्ते बनवतो, शहरांना जोडतो. म्हटलं तर समाजासाठी आपल्यापरीने योगदान देतो. पण त्याला ना लोकप्रिय कलाकारांसारखे प्रेम मिळत, ना शिक्षक, डॉक्टर, सैनिकांसारखा सन्मान. पण म्हणून तो आपले कार्य करणे सोडत नाही. हे असे असते हे त्याला माहीत असते आणि त्याने ते स्विकारले असते.
मला ही कलाकार, खेळाडू विरूद सैनिक अशी तुलना नेहमीच उगाचच वाटते.

त्याना म्हणाव सरळ पाकिस्तानवर अणुबाॅब टाकून संपवून टाका- मागचे चार दिवस तिचा मृत्यू कशाने झाला यावर महाचर्चा आणि विविध सिद्धांत सतत न्यूज मध्ये पहायला मिळाले. पण जेव्हा इतर देशांच्या भ्याड हल्ल्यामधे जवानाचा नाहक बळी जातो तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना करता येतील यावर फारतर एखादा दिवस हळहळ व्यक्त होते आणि काही ठोस कारवाई होत नाही.यावर महाचर्चा क्वचित दिसते .काहीवेळा तीही नाही. यामुळे त्यांच मरण स्वस्त झालय अस दिसत. शेवटी बाॅब टाकायचा विध्वंसक विचार कशाला हवा?

ऋन्मेषदादा ही सगळी जीवनाची विविध क्षेत्र आहेत हे मलाही पटत.पण इतर क्षेत्रांना दिली जाणारी दुय्यम वागणूक मला पटत नाही. 'पायाविना शिखर नाही' हे लक्षात घेतल जावं इतकच माझं मत आहे. आणि मला एकेरी नावानेच हाक मार कारण मी तुझ्यापेक्षा खूप लहान आहे.

फेरफटका,
अतिरीक्त मद्यपान हा शब्द मुळात वरच्या पोस्टमध्ये कोणीतरी वापरलेला. मी त्यातील शक्यतेला दुजोरा दिला ईतकेच.
थोडा विचार करता लक्षात येईल जर मला मद्यपानविरोधाचा अजेंडा रेटायचा असेल तर अतिरीक्त मद्यपानाऐवजी थोड्याश्या मद्यपानानेही मृत्यु होऊ शकतो हे दाखवणे त्यासाठी जास्त योग्य ठरले असते.
मुळात मी मद्यपानाला कमीजास्त बघत नाही. मद्यपान हे मद्यपानच असते. मी थोडीशीच घेतो, मला एवढ्याने चढत नाही म्हणणारेही त्या ज्यादा कॉन्फिडन्समध्ये ड्राईव्ह करायला जातात आणि अपघात घडतात हे अनुभवले आहे.
तसेच मला मद्यपान हा दुर्गुण वाटत नाही. किंवा मद्यपान करणारे अवगुणी वाटत नाही. ते एक व्यसन आहे, कोणालाही लागू शकते. उद्या माझ्या गर्लफ्रेण्डला लागले तरी काही ती माझ्या मनातून उतरणार नाही. कारण एक व्यक्ती म्हणून ती तेव्हाही तितकीच चांगली असणार. पण ते व्यसन कसे सुटावे आणि त्यामुळे तिचे नुकसान कसे होणार नाही याची काळजी जरूर घेईन.

पण इतर क्षेत्रांना दिली जाणारी दुय्यम वागणूक मला पटत नाही.
>>>

हे मान्य.
मला तुलना करणे पटत नाही ईतकेच.
एका लोकप्रिय कलाकाराला मिळणारे प्रेम आणि एखाद्या नोबल क्षेत्रातील मान्यवराला मिळणारा सन्मान यांना एका तागडीत तोलू नये असे वाटते.
जर पुरेसा सन्मान मिळत नसेल असे वाटत असेल तर ती अपेक्षा वा खंत अश्या तुलनेशिवाय व्यक्त करावी.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर कलाकार वा क्रिकेटर्सना अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळत असेल तर त्या स्टारडमला पोहोचणे वा भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवणे ईतकेही सोपे नक्कीच नसणार. त्या पैसा आणि प्रसिद्धीसाठी स्पर्धेतही बरेच जण असणार. अंगचे गुण आणि मेहनत यांच्या जीवावर ते मिळवावे लागते.

अतिशय दुःखद घटना. ऋन्मेष या दुःखाच्या क्षणी तू अजिबात खचून आणि ढासळून जाऊ नको. सगळे मायबोलीकर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

Submitted by कल्पतरू on 26 February, 2018 - 04:49

>>> हा काय प्रतिसाद आहे?

इथे वाचून श्रीदेवी आणि मिडिया असा सर्च मारला तर बाथ टब मध्ये पत्रकार माईक घेउन झोपलाय असा फोटो दिसला आणि जाम हसायला आलं.
मूर्खपणाच्या भांड्याला तळच नाहीये.
https://www.thenewsminute.com/article/sridevi-death-and-circus-tv-report...
टाईम्स नाउ ने लांबी, रुंदी, उंची असं व्हिजुअल केलंय. स्पीचलेस.

@च्रप्स, त्या प्रतिसादाआधी ऋन्मेषची एक प्रतिक्रिया आहे. तिला धरून असावं काहीतरी अर्थात् कल्पतरुच काय ते सांगू शकतात !

दुबईतल्या मीडीयाने सुद्धा आपल्या भारतातल्या मीडीयाची चांगली खरडपट्टी काढली दोन दिवस त्यांचा इथे आणि तिथे जो राडा चाललाय त्यासाठी.

<पण जेव्हा इतर देशांच्या भ्याड हल्ल्यामधे जवानाचा नाहक बळी जातो तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना करता येतील यावर फारतर एखादा दिवस हळहळ व्यक्त होते आणि काही ठोस कारवाई होत नाही.यावर महाचर्चा क्वचित दिसते .>
आदीसिद्धी, आर यु किडींग?
प्रत्येक वेळा अशा हल्ल्यानंतर महाचर्चा होतातच. किती तरी वेळा त्याचाच अतिरेक होताना दिसतो आणी वर कुणी तरी म्हटल्याप्रमाणे, त्याने सैनिकांचे मरण स्वस्त होत जाते.

काल ABP माझावर मोठी चर्चा होती श्रीदेवीबद्दल. अगदी तावातावाने एकमेकांशी बोलत होते, जसे श्रीदेवीच्या जाण्याने आणी तिच्या करीअरने यांचेच नुकसान झालेय. मग निखील वागळे ने म्हणे चांगलीच खरडपट्टी काढली त्यांची. की तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल तुम्हाला काय घेणे देणे पडलेय वगैरे. असे माझ्या साबांनी मला सांगीतले कारण त्या ती चर्चा बघत होत्या. मी काल सकाळी बातम्या बघीतलया त्यात जास्त उल्लेख नव्हता, पण मिडीयाने अतीरेकच केला.

मग निखील वागळे ने म्हणे चांगलीच खरडपट्टी काढली त्यांची.
<<

निखील वागळे आजकाल अबप माझा वर असतो काय !

निखील वागळे आजकाल अबप माझा वर असतो काय !>>>>>> माहीत नाही, कदाचीत दुसर्‍या चॅनेलवर मुलाखत दिली असेल त्याने. कारण आमचे साबु क्षणा क्षणाला इतके चॅनेल इतके बदलतात तितके राजकीय नेते पण पार्ट्या बदलत नसतील.

तिच्या कॉस्मॅट्*क सर्जरीपासून तिच्या डाएट आणि आता दारु किती प्यायली असेल या सगळ्याला जज करायला सज्ज , सगळे तिथे त्यावेळी हजर असल्यासारखा श्रीदेवीच्या मृत्युला डिसेक्ट करतायेत ! >>> +१ दीपांजली अनुमोदन

काल ABP माझावर मोठी चर्चा होती श्रीदेवीबद्दल. अगदी तावातावाने एकमेकांशी बोलत होते, जसे श्रीदेवीच्या जाण्याने आणी तिच्या करीअरने यांचेच नुकसान झालेय. मग निखील वागळे ने म्हणे चांगलीच खरडपट्टी काढली त्यांची. >>> तो निखिल वागळे नाही , समीरण वाळवेकर होता.

वाईट वाचले वाचुन. आणी हे श्रीदेवीच्या चहात्यांसाठी खुले आहे, म्हणून इथे छापण्याचे धाडस केले.

I debated with myself whether I should put this out because of some names mentioned but i strongly felt SRIDEVI belongs to her fans more than anyone else and they deserve to know the truth
MY LOVE LETTER TO SRIDEVI’S FANS
—Ram Gopal Varma
YES like millions of you,I too believed that she was the most beautiful and desirable woman ever and we all know that she was the biggest super star of the country and ruled the silver screen as a main heroine for more than 20 years
But that’s just a part of the story. However shocked and sad I feel about Sridevi's death, it’s finally once again a rude reminder about how unpredictable, cruel,fragile and mysterious that both life and death are.
After her death ,more than you all there is definitely much more for me to say than what most people are saying now about,how beautiful she was, what a great actress she was, how her death affected them, " RIP"s etc etc
That’s because I had an opportunity to be close to her in the course of my two Films with her Kshanakshanam and Govinda Govinda. Sridevi's life is a classic case of how a celebrity’s persons actual life is completely different from how the rest of the outside world perceives it.
For many, Sridevi's life was perfect . Beautiful face, great talent, seemingly stable family with two beautiful daughters. From outside everything looked so enviable and desirable... But was Sridevi a very happy person and did she lead a very happy life?
I know her life from the time I met her . I saw with my own eyes how her life was like a bird in the sky till her father’s death and then became like a bird in a cage due to her overprotective mother
In those days actors used to be only paid in mostly black money and due to fear of tax raids her father used to trust friends and relatives and everyone of them betrayed her the moment her father died. Coupled with this the ignorant mother made many wrong investments in litigated properties and all those mistakes combined made her almost penny less by the time Boney came into her life
He himself was in huge debts and all he could afford was to give her a shoulder to cry on
Her mother became a mental patient because of a wrong surgery on her brain in USA and somewhere along the way her younger sister Srilatha eloped and got married to their neighbours son. The mother before dying put all properties in sridevis name but her sister put a case on Sridevi claiming that her mother was insane and not in her senses when she signed the will
So in effect the woman desired by millions in the world was all alone and almost penny less in the world except for one Boney
Boney ‘s mother portrayed her as a home breaker and publically punched her in the stomach in a five star hotel lobby for what she did to Boney’s first wife Mona
In this entire period except for the short glimmer of English vinglish Sridevi has been pretty much an extremely unhappy woman. The uncertainty of the future,the ugly turns and twists in her private life left deep scars in the super stars sensitive mind and there after she was never at peace.
She went through so much in her life and due to her early career entry as a child artiste,life never gave her time to grow up at a normal pace. More than the external peace, her internal mental state was of a high degree of concern and this forced her to look at her own self .
She was the most beautiful woman for so many people. But did she think she was beautiful ? Yes she did ,but every actresses nightmare is age and she was no exception. For years she was doing ocassional cosmetic surgeries the effects of which can be clearly seen
She always came across as a little uptight but that’s because she built a psychological wall around her as she was scared of anybody to really see what's going on within her. She was panicky about anybody knowing what her insecurities were.
Not because of her fault, but because she was thrust with fame from a very young age it never gave her a chance to be independant and be what she could really be and what she really wanted to be
She had to put on the make up and be somebody else not just infront of the camera,but also to put a psychological make up to hide her real self behind the camera.
She was being constantly directed by the motives of her parents,her relatives, her husband and to an extent even her own children .. She was scared whether her daughters would be accepted or not like most star parents do
Sridevi is actually a child trapped in a woman’s body ..she is naive as a person, but suspicious because of her bitter experiences which is not a very good combination . Keeping the speculations on her death aside I generally don't say " Rest In Peace" after people die, but in her case I want to really say this because I very strongly believe that she would finally and truly rest in peace now for the first time in her life because she died
From my personal experience with her, the only time I ever saw her in peace was in front of the camera that too only between Action and Cut ..That’s because she could cut off the harsh reality and escape into her own fantasy world
That’s why now I am sure she will be at peace forever because she’s finally far far away from what gave her and was giving her so much pain
RIP Sridevi, but I assure u that the world won’t rest in peace for doing this to you
We the fans and your near ones have given you only suffering by making you slog in every which way ever since you were a child but you gave us only joy and happiness. Yes it’s not a fair deal but it’s too late to do anything now .
I now have visions of you flying like a free bird across heavenly land scapes with true peace and happiness in your eyes.
I don’t believe in reincarnation but I truly want to believe in it now because we fans in our next birth deserve to experience you once again and this time we will try our best to make amendments and make ourselves worthy enough to deserve you
Please give us that one chance Sridevi because we all truly love you
I can go on writing like this but I can’t stop my tears any more... RGV

राम गोपाल वर्माच्या फेसबुक वरुन साभार!!

कहर म्हणजे दुबईला हाॅटेलच्या रूममध्ये काय झाले असेल याचे नाट्यरूपांतर. मराठी कलाकार जे तिला कधी भेटलेही नव्हते, तेे काय तिच्याविषययी चर्चा करत आहेत वेगवेगळ्या वाहिन्यांवर उदा विवेक सांगळे, रूचिता जाधव, शुभांगी लाटकर अपवाद रोहिणी हट्टंगडी. आता तिचे मामा आणि मावशीचे मिस्टरही गौप्यस्फोट करत आहेत म्हणे. तापल्या तव्यावर पोळी भाजण्याचे प्रकार आहेत सगळे.

व्हॉटस्सपावरून ......
.......

टबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू!

सदर - सडेतोड 
निखिल वागळे

मौत का बाथटब आणि श्रीदेवी

Thu , 01 March 2018

सडेतोडनिखिल वागळेNikhil Wagleश्रीदेवीSridevi

२४ फेब्रुवारी २०१८च्या रात्री दुबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलात बाथटबमध्ये बुडून सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू झाला.

त्याच रात्री भारतीय टीव्ही पत्रकारितेनं अखेरच्या घटका मोजायला सुरुवात केली. पुढच्या ७२ तासांत त्याच टबमध्ये या पत्रकारितेचाही मृत्यू झाला.

या मृत्यूचा मागोवा घ्यायचा असेल, तर श्रीदेवीच्या निधनाची बातमी भारतातल्या बहुसंख्य टीव्ही चॅनेल्सनी कशी दिली हे तपासावं लागेल. सुरुवातीला या गुणी अभिनेत्रीच्या मृत्यूचे कोणतेही तपशील उपलब्ध नव्हते. जिथं मृत्यू झाला त्या दुबई पोलिसांनीही काही सांगितलं नव्हतं. तरीही श्रीदेवीचा मृत्यू कार्डिअ‍ॅक अरेस्टनं झाल्याची बातमी सर्वप्रथम ‘टाइम्स नाऊ’नं दिली. मेंदू गहाण ठेवलेल्या इतर चॅनेल्सनी त्यांची री ओढली. पत्रकारितेचा पहिला मूलभूत नियमही पाळण्यात आला नाही. बातमी आल्यानंतर योग्य व्यक्तींकडून त्याची शहानिशा करणं हे वार्ताहराचं कर्तव्य असतं. पण अशी कोणतीही शहानिशा पोलिसांकडून किंवा श्रीदेवीच्या कुटुंबियांकडून न करता ‘ब्रेकिंग न्यूज’चा भडिमार करण्यात आला. श्रीदेवीच्या अकाली मृत्यूनं चॅनेलवाले जणू चेकाळले होते.

मग अधिक तपशीलाच्या अभावी टेलिव्हिजनचा जुना हातखंडा वापरण्यात आला. काही गृहितकं धरून चर्चांना सुरुवात झाली. कार्डिअ‍ॅक अरेस्ट कशामुळे होतो, हे सांगणारे तज्ज्ञ डॉक्टर ज्ञान देऊ लागले. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची जोड मिळाली. श्रीदेवी वैफल्यग्रस्त झाली होती, आपलं वाढतं वय लपवण्यासाठी किंवा सौंदर्य टिकवण्यासाठी ती उपचार घेत होती, त्यासाठी तिनं परदेशात जाऊन शस्त्रक्रियाही करून घेतल्या होत्या वगैरे चर्चेला उत आला. काही चॅनेल्सनी अशा अनैसर्गिक शस्त्रक्रियांमुळेच श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचं निदान करायला मागेपुढे पाहिलं नाही. दुबई पोलिसांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट अजून यायचा आहे, याचंही भान या अतिउत्साही चॅनेलवाल्यांना राहिलं नव्हतं.

यशावकाश हा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट प्रसिद्ध झाला आणि श्रीदेवीचा मृत्यू हृदयविकाराच्या अकाली झटक्यानं झालेला नाही हे स्पष्ट झालं. पण हार मानतील ते चॅनेलवाले कसले. त्यांनी आपल्या कथेला नवं वळण दिलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला होता. बाथटबमध्ये गेल्यावर तिची शुद्ध हरपली आणि नाकातोंडात पाणी जाऊन तिची अखेर झाली. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये तिच्या शरीरात दारूचा अंशही सापडल्याचं म्हटलं होतं. चॅनेलवाल्यांना हे कोलीत पुरेसं होतं. दारू प्यायल्यामुळे श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचं कुभांड त्यांनी रचलं आणि त्यानुसार पुढच्या कहाण्या तयार करण्यात आल्या.

टेलिव्हिजन हे दृकश्राव्य माध्यम आहे. बातमी सादर करणाऱ्यानं फक्त बोलून चालत नाही, तर त्याला बळ देतील अशी दृश्यंही (व्हिज्युअल्स) लागतात. श्रीदेवीच्या मृत्यूबाबत अशी दृश्यं मिळणं निव्वळ अशक्य होतं. पण आमचे बेभान चॅनेलवाले हार कशी मानणार? कॉम्प्युटर ग्राफिक्सची मदत घेऊन त्यांनी काल्पनिक दृश्यं तयार केली. ‘आजतक’ या हिंदी वाहिनीनं आपल्या पडद्यावर ‘मौत का बाथटब’ तयार केला. ‘एबीपी न्यूज’नं या बाथटबच्या बाजूला रेड वाईनचा ग्लासही दाखवला. ‘सीएनएन आयबीएन 18’नं आपल्या पडद्यावर टबमध्ये बुडालेली श्रीदेवीच साकार केली. ‘टीव्ही 9’ या वाहिनीनं टबमध्ये बुडालेल्या श्रीदेवीला पाहणारा बोनी कपूरही सोबत दाखवला. तोपर्यंत ‘एबीपी न्यूज’च्या डोक्यात स्पर्धेची झिंग पूर्णपणे चढली असावी. त्यांनी संध्याकाळी सातच्या आपल्या बातमीपत्रात मृत्यूपूर्वीची पंधरा मिनिटं श्रीदेवी बाथरूममध्ये काय करत होती, याचा अहवालच सादर केला! ‘रिपब्लिक’ आणि ‘टाइम्स नाऊ’ ही इंग्रजी चॅनेल्सही मग मागे राहिली नाहीत. अपवाद फक्त ‘एनडीटीव्ही’ आणि काही अंशी ‘इंडिया टुडे’ या टीव्ही चॅनेल्सचा.

या कपोलकल्पित कथांना आणि तर्कवितर्कांना पुढच्या ४८ तासांत नुसतं उधाण आलं. दारूचा एक प्याला आणि अँटी डिप्रेसन्ट गोळ्यांमुळे असा मृत्यू होऊ शकतो, हे चॅनेलवर बसलेले तज्ज्ञ डॉक्टर सांगू लागले. माणसं दारू का पितात इथपासून वैफल्यग्रस्तांनी दारू प्यायल्यामुळे काय होऊ शकतं इथपर्यंत चर्चा सुसाटल्या. एवढं सगळं झाल्यावर भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी मागे कसे राहतील? त्यांनी ‘दाऊद आणि चित्रपटसृष्टी यांच्या संबंधांची चौकशी करा’ अशीच थेट मागणी केली. श्रीदेवीचा या सगळ्याशी संबंध काय असा प्रश्नही त्यांना कुणी विचारला नाही. एएनआय नावाच्या वृत्तसंस्थेनं स्वामीमहाशयांचा हा बाईट घेतला आणि सर्वांना पाठवून दिला. तो भारतभरच्या चॅनेल्सनी दाखवला. पत्रकाराचं काम फक्त पोस्टमनचं नाही, एखादा नेता वादग्रस्त विधान करत असेल तर त्याला विचारपूर्वक प्रतिप्रश्न करायला हवा, हे किमान शिक्षण या वृत्तसंस्थेच्या पत्रकारांना कुणी दिलं नसावं. अर्थात, त्यांना एकट्याला दोष कशासाठी द्यायचा? हल्ली बहुसंख्य पत्रकारच ‘मी तर हमाल भारवाहू’ या वृत्तीनं काम करत आहेत.

दक्षिणेकडच्या एका चॅनेलनं तर या सगळ्यावर कडी केली. त्यानं आपल्या पत्रकाराला थेट टबमध्येच उतरवलं आणि टबमधूनच त्यानं या घटनेचं रिपोर्टिंग केलं. संजय लीला भन्साळीचा ‘पद्मावत’ प्रदर्शित झाला, तेव्हा काही हिंदी चॅनेल्सच्या वार्ताहरांनी पद्मावतीचा पोषाख घालून थेट महालातून रिपोर्टिंग केलं होतं. तुम्ही पत्रकार की अभिनेते, असा प्रश्न त्याही वेळी विचारण्यात आला होता. श्रीदेवीच्या निमित्तानं ही नाटकी वृत्ती कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकते हे स्पष्ट झालं आहे. खरं तर अशा पत्रकारितेला ‘न्यूज जर्नलिझम’ का म्हणायचं हाच खरा प्रश्न आहे. टबमधली ही पत्रकारिता पाहिल्यावर ट्विटरवर एका दर्शकानं नेमकी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘रिपोर्टर बाथटबमध्ये शिरला. त्यानं तिथून रिपोर्टिंग केलं. तो जिवंत राहिला, पत्रकारिता मात्र मेली!’

श्रीदेवीच्या मृत्यूचे हे धिंडवडे पाहून मला आश्चर्यही वाटत नाही किंवा धक्काही बसत नाही. २००० सालापासून या देशात खाजगी टीव्ही चॅनेल्सचं अमाप पीक आलं आहे. तो सगळा इतिहास पुन्हा धुंडाळला तरी श्रीदेवीसारख्या घटना वारंवार सापडतील. अगदी सुरुवातीच्या काळात घडलेली प्रिन्स बोअरवेलमध्ये पडण्याची घटना घ्या किंवा आरुषीचं खून प्रकरण घ्या, प्रत्येक वेळी देशातल्या बहुसंख्य टीव्ही चॅनेल्सनी असा बीभत्सपणा दाखवला आहे. खरं तर ‘आजतक’सारख्या टीव्ही चॅनेलचे पहिले संपादक हिंदीतले जानेमाने पत्रकार सुरेंद्र प्रताप सिंग होते. दूरदर्शनच्या एका वाहिनीवर अर्ध्या तासाचा कार्यक्रम म्हणून सुरू झालेलं ‘आजतक’ प्रचंड लोकप्रिय झालं ते त्यांच्या धाडसी, शोध पत्रकारितेमुळे. दूरदर्शनच्या बातम्यातल्या सरकारी रटाळपणाला एस.पी. सिंग यांनी फाटा दिला आणि सोप्या भाषेतली लोकाभिमुख पत्रकारिता सुरू केली. एकच उदाहरण देतो. गणपती दूध पितो या बातमीनं देशभरात धुमाकूळ माजला होता. विविध राजकीय नेते, कार्यकर्ते, विचारवंत, शास्त्रज्ञ आपापल्या प्रतिक्रिया देत होते. पण एस.पी. सिंग यांनी आपल्या वार्ताहराला पाठवलं एका सर्वसामान्य चर्मकाराकडे. त्यानं आपल्या आयुधातून ही केशाकर्षणाची प्रक्रिया सोपेपणानं समजावून सांगितली. संपादकाचा दृष्टिकोन कसा महत्त्वाचा ठरतो, हे त्या दिवशी पुन्हा एकदा स्पष्ट झालं. दुर्दैवानं एस.पी. सिंग यांचं अकाली निधन झालं. ‘आजतक’ आणि इतर चॅनेल्स पूर्णवेळ आग ओकू लागल्या तेव्हा ते या जगात नव्हते.

त्यांच्या नंतरच्या संपादकांनी या चॅनेल्सना वाह्यात करमणुकीच्या स्वस्त व्यासपीठांचं स्वरूप दिलं. हे संपादक बिनडोक आहेत किंवा त्यांना दृष्टी नाही असा आरोप मी कधीही करणार नाही. तसं असतं तर, एक वेळ त्यांनी हे अज्ञानापोटी केलं असं म्हणून त्यांना माफ करता आलं असतं. पण बुद्धिवान माणसं जेव्हा बाजारू वृत्तीनं वागू लागतात, तेव्हा त्यांना सहजासहजी माफ करता येत नाही. ते आपल्याबरोबर सगळ्या समाजालाही बाजारूपणाच्या गर्तेत भिरकावून देतात. श्रीदेवीच्या निमित्तानं या बाजारूपणाचा जुनाच चेहरा नव्यानं समोर आला आहे इतकंच.

माझ्या मते, भारतीय टीव्ही पत्रकारितेच्या या अध:पतनाची पहिली जबाबदारी या चॅनेल्सचं नेतृत्त्व करणाऱ्या संपादकांची आहे. सुरुवातीच्या काळात मोठ्या संख्येनं टीव्ही चॅनेल्स सुरू झाल्यानं पत्रकारितेचा पुरेसा अनुभव नसलेल्या व्यक्ती संपादक बनल्या. तरुण पत्रकारांना संपादक बनावंसं वाटतं यात काही गैर नाही. कोणत्याही व्यवसायात सर्वोच्च पदापर्यंत पोचण्याची आकांक्षा ही असतेच. पण संपादकपदाबरोबर एक जबाबदारीही येते. निव्वळ लोकानुनय करणं हे पत्रकारितेचं काम नाही. भारतीय पत्रकारितेला डॉ. राजा राममोहन राय यांच्यापासून सामाजिक बांधिलकीचा एक इतिहास आहे. स्वातंत्र्य आंदोलनात हा वारसा जपला गेला आणि स्वातंत्र्यानंतर पहिली काही वर्षं तरी त्याच मार्गानं संपादक गेले.

पण टेलिव्हिजनच्या गेल्या दोन दशकांत हा वारसा अक्षरश: धाब्यावर बसवण्यात आला आहे. आपलं चॅनेल लोकप्रिय करणं, त्याची प्रेक्षकसंख्या वाढवणं हे संपादकाचं कामच आहे. पण त्यासाठी पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासायचा का हा खरा प्रश्न आहे. टीआरपीसाठी वाह्यातपणा करा असा सल्ला या संपादकांना चॅनेलच्या मालकांनी दिला असेल तर संपादकांनी त्याचा निषेध करून आपले राजीनामे भिरकावायला हवेत.

२००७ ते २०१४ एका मराठी चॅनेलचा मी संपादक होतो आणि असा दबाव माझ्यावर व्यवस्थापनानं कधीही आणला नाही. चांगले कार्यक्रम करून चॅनेल लोकप्रिय होत असेल तर व्यवस्थापनानं हरकत घेण्याचं काहीही कारण नाही. पण ज्या संपादकांचा चांगल्यावर विश्वास नाही तेच असे उपद्व्याप करतात. स्वस्तात यश मिळवण्याचा हा उद्योग मात्र पत्रकारितेला महागात पडतो.

संपादकांबरोबरच मी प्रेक्षकांनाही जबाबदार धरतो. श्रीदेवीच्या मृत्यूनंतरचा चॅनेल्सचा वाह्यातपणा प्रेक्षकही चवीचवीनं पाहत होते. एका अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची विकृत इच्छा या मागे आहे. चॅनेलवाले याच इच्छेला खतपाणी घालत होते. जी चॅनेल्स असा विकृतपणा करतात ती आम्ही पाहणार नाही, असा निग्रह किती प्रेक्षकांनी केला? केवळ श्रीदेवीच्या निमित्तानंच नाही, तर एरवीही राजकीय बातम्या देताना ‘रिपब्लिक’ किंवा ‘टाइम्स नाऊ’सारखी चॅनेल्स पत्रकारितेचा गळा घोटतात. या चॅनेलवर आम्ही जाणार नाही आणि त्यांच्या गुन्ह्यात सहभागी होणार नाही, असा निर्णय किती पाहुणे घेतात? ज्या चॅनेल्सनी श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातम्या मिटक्या मारत सांगितल्या, तीच आज देशातली सर्वाधिक पाहिली जाणारी चॅनेल्स आहेत. म्हणूनच संपादक म्हणू शकतात की, प्रेक्षकांना जे पाहिजे तेच आम्ही दाखवतो! म्हणजे या गुन्ह्यात चॅनेलवाले आणि प्रेक्षक समसमान भागीदार आहेत. (त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे, या वेळी मराठी चॅनेल्सनी, एखादा अपवाद सोडता, एवढा बीभत्सपणा केला नाही).

प्रश्न असा आहे की, या परिस्थितीत या गुन्ह्याबद्दल कोण कुणाला शिक्षा देणार? म्हणूनच म्हणतो, श्रीदेवीच्या अंत्ययात्रेबरोबर टीव्ही पत्रकारितेचीही अंत्ययात्रा निघाली आणि आपण सगळ्यांनी तिला खांदा दिला!

...........................................

लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.

‘रिपब्लिक’ किंवा ‘टाइम्स नाऊ’सारखी चॅनेल्स पत्रकारितेचा गळा घोटतात" अरे लब्बाडा!!!

मी चक्क निखिल वागळे नाव वाचूनही लेख पुर्ण वाचला. ह्यानी कित्येक वर्षांनी सेन्सिबल लिखाण केलाय
पण खरच हे लिहायचा अधिकार निखिलला आहे?

निखिल वागळेला अधिकार आहे का नाही ते सोडा. पण जे लिहिलंय त्यात १००% तथ्य आहे.
सगळा प्रकार चीड आणणारा होता.

आता मी वर हेडर पोस्ट पाहिले तर त्यात देखील हार्ट अटेक, कार्डिअ‍ॅक अरेस्टनं मृत्यू झाल्याचे दिले आहे. अर्थात यात धागाकर्त्याचीही चूक म्हणता येणार नाही. जी बातमी समजणार तीच पुढे जाणार. कुठल्याही बातमीची शहानिशा आपण न्यूजवरच करतो. पण त्यांनाच अचूक बातमी देण्याऐवजी पहिली बातमी देण्याची झिंग असेल तर करणार तरी काय.

Pages