डॉक्टर कुमार१ यांच्या ग्लुकोज च्या धाग्यावरून सुचले (डॉक्टर कुमार१ यांची लेखमाला अतिशय उपयुक्त आणि वाचनीय.त्याबद्दल त्यांचे आभार). मागच्या आठव्ड्यात डायबेटीस साठी youtube वर एक Dr जगन्नाथ दीक्षित यांचा विडिओ वडिलांनी दाखवला. मधुमेहाची प्राथमिक माहिती आणि केवळ २ वेळा आहार आणि थोडा व्यायाम यावरून मधुमेह आणि वाढलेले वजन कसे आटोक्यात ठेवता येते याची अतिशय सुंदर माहिती त्यांनी सांगितली आहे. संपूर्ण विडिओ २:३० तासाचा आहे परंतु उपयुक्त माहितीचा विडिओ ४० मिनिटाचा आहे. दोन्ही लिंक खाली देत आहे.
केवळ मधुमेहींसाठीच किंवा वजन वाढलेल्यांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी हा विडिओ आहे. पाहून इतरांसोबत जरूर शेयर करावा.
४० मिनिटाचा विडिओ: https://www.youtube.com/watch?v=f9tSednbXmQ&t=12s
संपूर्ण विडिओ (२:३० तास) : https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ
नवीन धागा केवळ यासाठी उघडला कारण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी.
छान व्हिडिओ आहे.
छान व्हिडिओ आहे.
शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
क्रिप्ट, तुमचा अभिप्राय व या
क्रिप्ट, तुमचा अभिप्राय व या माहितीबद्दल आभार !
सवडीने बघतो
डॉ.जगन्नाथ दिक्षित यांचे एक
डॉ.जगन्नाथ दिक्षित यांचे एक फेसबुक पेज पण आहे.Effortless Weight loss असे शोधले केले कि मिळेल.
तिथे खुप लोकांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत.
छान व्हिडिओ आहे.
छान व्हिडिओ आहे.
शेअर केल्याबद्दल धन्यवाद. >>>> + १
माझी एक मैत्रीण ही आहारपधदत करते आणि खूप चांगले रिझल्ट्स आहेत.
मला आठवतंय डॉ, श्रीकांत
मला आठवतंय डॉ, श्रीकांत जिचकारांचा पुण्यात बालगंधर्व ला झालेला कर्यक्रम मी अटेंड केला होता. अत्यंत प्रभावी वक्त्रुत्व!व व्यासंगी व्यक्तिमत्व!!
पण त्यांच्या अकाली निधनाने हळहळ वाटली.
**संपादित**
त्यांचा मृत्यू कार अ
त्यांचा मृत्यू कार अॅक्सिडेंट मध्ये झालेला. त्याचा जीवनशैली बदलाच्या प्रयोगाशी काय संबंध?
वंदन,
वंदन,
त्यांचे अपघाती निधन झाल्याचे आत्ताच आपल्या पोस्ट मुळे कळाले. माझी माहिती (ह्रुदयविकार) ही चुकिची असल्याचे कळाले. त्यामुळे विचरलेला प्रश्न चुकिचा होता (तो आता उडवलाय)....क्षमस्व...!!
महितीबद्दल धन्यवाद....
ह्या पद्धतीचे (दोन वेळा जेवण)
ह्या पद्धतीचे (दोन वेळा जेवण) काही दुष्परिणाम आहेत का? कोणाला महिती असेल तर सांगा..
बहुतेक कष्टकरी, शेतकरी (स्वतः काम करणारे, ते फॉर्चुनर वाले वेगळे) वर्गात हीच पद्धत आहे.
अग्निपंख, दुष्परिणाम 'आहेत'
अग्निपंख, दुष्परिणाम 'आहेत' का हा प्रश्न तुम्ही विचारलाय. म्हणजे काहीतरी दुष्परिणाम आहेत हे तुम्हाला माहिती आहे असे दिसतंय. तुम्हीच सांगा.
यक्ष. इट्स ओके. समजगैरसमज
यक्ष. इट्स ओके. समजगैरसमज असतातच. चालायचंच. तुम्ही ते विधान केल्याने व मी उत्तर दिल्याने तुमच्यासारख्या अनेक चुकीची माहिती मिळालेल्यांना या निमित्ताने खरी माहिती तर मिळाली. वाईटातून चांगलं घडतं ते असं
अग्निपंख, दुष्परिणाम 'आहेत'
अग्निपंख, दुष्परिणाम 'आहेत' का हा प्रश्न तुम्ही विचारलाय. म्हणजे काहीतरी दुष्परिणाम आहेत हे तुम्हाला माहिती आहे असे दिसतंय. तुम्हीच सांगा.>>
माहिती आहे असं नाही, पण एक शंका वाटते आहे, काही डायटेशियन थोडं थोडं खा पण जास्त वेळ खा, म्हणजे पचन बिघडत नाही असं सांगतात. लोक डायट म्हणजे एकदाच जेवण किंवा, एकदा जेवण आणी एकदा सॅलड असं कही करतात आणि त्याने पचनावर परिणाम होउ शकतो असं काहीसं आहे का?
सरजी. कृपया वरील पैकी एक
सरजी. कृपया वरील पैकी एक विडिओ पूर्ण बघा. तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील.
या बाबतीत डायटेशियन वीस वर्षे मागे पडले आहेत. खाण्याच्या वेळा आणि इन्सुलिन सिक्रिशन याचा संंबंध बर्याच संशोधनातून पुढे आला आहे. दिवसातून सहा वेळ थोडं थोडं खा असं सांगणे हा अत्यंत चुकीचा प्रचार आहे. ते म्हणजे रोग्याला मरणाच्या दारात ढकलत नेण्यासारखे आहे.
It depends person to person.
It depends person to person.
काही लोकांना 6 वेळ थोडे थोडे खाऊन , तर काही लोकांना इंटर्मिततेनंत फास्टिंग ने फरक पडतो. Generalize नाही करू शकत. ट्राय करूनच कळते.
तुमच्याकडे काही पुरावा असेलच?
तुमच्याकडे काही पुरावा असेलच?
पुरावा मी आहे. मी
पुरावा मी आहे. मी इंटेमित्तान्त फास्टिंग केले पण 6 वेळा थोडे थोडे खाऊन जास्त इफेक्ट जाणवला.
सिम्पल आहे, एकदम जास्त खा.. जेवढे जरूरी आहे तेवढे बॉडी घेणार आणि बाकीचे फॅट मध्ये कन्व्हर्ट करणार.
Bodybuilders जे लेस than 10% bodyfat जातात ते 6 टाइम्स मिल घेतात.. लिमिटेड.
ब्रोसायन्स!!! अॅज
ब्रोसायन्स!!! अॅज एक्स्पेक्टेड.
Its nt bro science. Its my
Its nt bro science. Its my experience.
Bro science is when you tell your bro and he tells 10 others and he tells 100 others. Then people start believing.
होप यु नो that ☺️ उगाच टर्म्स टाकू नका माहिती आहेत म्हणून. मला 6 टाईम्स थोडे थोडे खाऊन फरक पडला मी तेच कॅन्टीन्यू करणार !
ब्रोसायन्स!!! अॅज
ब्रोसायन्स!!! अॅज एक्स्पेक्टेड.>>
नक्कि कोणतं ब्रोसायन्स आहे? दिक्षित म्हणताहेत ते की च्रप्स म्हणताहेत ते?
एक मिनीट, ब्रोसायन्स चा नक्की
एक मिनीट, ब्रोसायन्स चा नक्की अर्थ काय असतो? सांगोवांगीच्या गोष्टी?
Broscience is the predominant
Broscience is the predominant brand of reasoning in bodybuilding circles where the anecdotal reports of jacked dudes are considered more credible than scientific research.
chrps, I don't want to fight
chrps, I don't want to fight you bro! but when it comes to health and fitness, please try to state facts based on research. your own personal experiences are not scientific proofs. and as far as the common public is concerned, it picks up on easily what their friend or familiar guy says, more than what the science says. always be aware about that fact.
अग्निपंख. दिक्षित स्वतः
अग्निपंख. दिक्षित स्वतः डॉक्टर आहेत. त्यांच्या प्रयोगाचा पेपर मान्यताप्राप्त जर्नलमध्ये प्रसिद्ध झालाय. त्याबद्दल त्यांनी वरील विडियोमध्ये सविस्तर सांगितले देखील आहे. बाकी त्यांच्या चळवळीची माहिती उपलब्ध आहेच. स्वतः तपासून पाहू शकता.
च्रप्स, तुमच्याकडून आइएफ करतांना चुका झालेल्या असू शकतात ही शक्यता लक्षात घेतली आहे का?
छान व्हिडिओ आहे.
छान व्हिडिओ आहे.
शेअर केल्याबद्दल धन्यवाद.>>> +१.
डॉ. दिक्षितांचा हा व्हिडियो पहाण्याआधी काही दिवसांपूर्वी ब्रेफा आणि २ जेवणे यामधे काहीही न खायला सुरुवात केली होती. परंतु ४०-४५ मिनिटे फिरून आल्यावर मला थरथरायला झाले.आल्यावर पाणी प्यायले .साखरेविना चहा आणि २ बिस्किटे खाल्ली.मग मला बरे वाटले. मला डायबेटीस किंवा बी.पीचा त्रास नाही.फक्त माझ्यासाठी हा फंडा ठीक नाही इतकेच वाटले.
इंटरमिटंट फास्टिंग किंवा
इंटरमिटंट फास्टिंग किंवा दिवसातून ६-७ वेळा खाण्याने कदाचित वजन आटोक्यात येत असेलही (नक्की माहीत नाही) परंतु डॉ दीक्षित म्हणतात त्याप्रमाणे जितके वेळा खाऊ तितके वेळा रक्तात इन्सुलिन स्रवेल आणि त्यामुळे पेशींची इन्सुलिन receptivity कमी होऊन डायबेटीस होण्याचा धोका वाढेल. दिवसातून २ वेळा खाण्याचा मूळ उद्देश शरीराला दिवसभरात लागेल तेवढेच इन्सुलिन पुरवणे आणि त्यायोगे मधुमेहाचा धोका कमी करणे हा आहे. यामुळे वजन आटोक्यात राहील ही दुसरी जमेची बाब.
क्रिप्ट,
क्रिप्ट,
हा धागा काढल्याबद्दल प्रथम तुमचे धन्यवाद.
मला खूप फायदा झाला. त्याबद्दल थोडेसे
मी बर्यापैकी (माझ्या वयाच्या मानाने) व्यायाम करायचो/करतो. पण कुठलेही डाएट सलग व टिकाउ पद्धतीने करता येत नव्हते. साखर, भात बंद. कर्बस कमी असा माझा आहार असला तरी वजन काही कमी होत नव्हते. किंवा कमी होउन परत वाढत होते.
मी २५ फेब्रुवारीला तुमचा लेख वाचल्यावर डॉ. दिक्षितांचा विडिओ पाहिला व २६ फे.. पासून फक्त दोन वेळा खाण्याचा दिनक्रम चालू केला. तीन महिन्यात माझे वजन ६ किलोने कमी झाले आहे. मला स्वतःला फरक १५ दिवसात जाणवायला लागला. आता लोकांना जाणवणारा बदल दिसायला लागला आहे.
माझा अनुभव असा
१. मी दुपारी १ वाजता व रात्री ९ वाजता जेवतो.
२. या दोन्ही वेळेस कुठलाही आहार घेतो. बंधन नाही. मधे फक्त बिनसाखरेचा दूध असलेला चहा. ५ -६ वेळा.
३. सुरुवातीस ५-६ दिवस मला सकाळी आहाराची आठवण यायची. आता सवय झालीय.
४. माझे वजन आधिच खूप जास्त असल्याने चरबीच्या रुपात साठवलेली उर्जा खूप आहे. त्यामुळे सकाळी काही न घेता एकदम दुपारी जेवल्याने काही त्रास झाला नसावा.
५. जवळ जवळ महिन्यातले निम्मे दिवस घरा बाहेर असतो. तरीही मला हा दिनक्रम अविरत चालू ठेवण्यास जास्त सोपा वाटतो आहे. मुख्य म्हणजे आहारावर कुठलही बंधन नाही. त्यामुळे प्रवासात सुद्धा काहिही अडचण नाही. मी खूप प्रवास करतो. उलट वेगवेगळ्या प्रकारच्या आहाराची चव बिनदिक्कत घेता येते.
६. घरी आमच्या मंडळींनाही माझा हा प्रकार सोयिस्कर वाटतो आहे. त्यांना कसलीही कटकट नाही. काही विषेश करायला लागत नाही.
या तीन महिन्यात मी अनेक पार्ट्यांना गेलो होतो. रंगित पाणी नेहमी प्रमाणे चालू आहे. (ते बंद केले असते तर वजन अजून दोन किलोने नक्की कमी झाले असते
). टर्की आणि इग्लंडला १५ दिवस गेलो होतो. २-३ लग्नाला पण उपस्थित राहीलो. आंबे चालू आहेत. ( आता अपराधी भावना न होता). पण तरीसुद्धा वजन सतत थोडे थोडे कमी होत आहे. माझी रक्तातील साखर कमी झाली आहे १२२ ची ९२. (रँडम). आणि मुख्य म्हणजे मला स्वतःलाच चांगल हलक वाटत आहे. जुने चांगले चांगले शर्ट बसायला लागेले आहेत.
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी या दिनक्रमाचा (डाएट नाही) प्रयत्न करून बघावा असे मी सुचवेन. (प्रकृतीनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित)
अजून तीन महिन्यांनी परत येउन पुढची प्रगती सांगेन.
पुन्हा एकदा धन्यवाद क्रिप्ट आणि डॉ. जगन्नाथ दिक्षित.
आपल्या डॉक्टर किंवा
आपल्या डॉक्टर किंवा डायटीशियनचा सल्ला न घेता स्वतःच्या मनाने खा खा खाऊन एका दिक्षितांच्या भक्ताने कशात काही नसतांना आपली अवस्था प्री-डायबेटीक करुन घेतली. दिवसातून दोनच वेळा खायचंय, मग काय त्या दोनवेळेला काहीही आणि कितीही खाल्ल तरी चालतं असा त्याचा ठाम विश्वास होता. नीम हकिम खतरा ए जान म्हणतात. इथे लोक स्वतःच स्वतःचे हकिम होत चालले आहेत.
दिवसातून दोनच वेळा खायचंय, मग
दिवसातून दोनच वेळा खायचंय, मग काय त्या दोनवेळेला काहीही आणि कितीही खाल्ल तरी चालतं असा त्याचा ठाम विश्वास होता. >> एक बिन्डोक मूर्खपणा.
इथे लोक स्वतःच स्वतःचे हकिम होत चालले आहेत. >> हाही एक बिन्डोक मूर्खपणा.
सारासार विचार बुद्धी शाबूत असली तर असला मूर्खपणा होत नाही, हेला.
एक प्रश्न: मला हायपर Acidity
एक प्रश्न: मला हायपर Acidity चा त्रास आहे, दिवसातून जर दोन वेळा खाल्लं, आणि मधल्या वेळेत काही खाल्ले नाही तर Acidity चा प्रचंड त्रास होतो, तर मला हि पद्धत उपयोगी पडेल का,
पहिला व्हिडीओ चालत नाही. बघा
पहिला व्हिडीओ चालत नाही. बघा बरं.
एक प्रश्न: मला हायपर Acidity
एक प्रश्न: मला हायपर Acidity चा त्रास आहे, दिवसातून जर दोन वेळा खाल्लं, आणि मधल्या वेळेत काही खाल्ले नाही तर Acidity चा प्रचंड त्रास होतो, तर मला हि पद्धत उपयोगी पडेल का........भरपुर पाणि पिल्याने त्रास कमी होतो
Pages