Submitted by सेन्साय on 12 February, 2018 - 00:33
.
.
पागोटे छत्री दिसेना खुंटीवर
दाराबाहेरून नमस्कार
निरोप सांगे परस्पर
कर्ता पुरुष बाहेर
देवघरातल्या खुंटीवर
सोवळं मुकट्याचा वावर
भक्तिदर्शक विचार
श्रद्धावानाचे हे घर
माजघर मोरीतल्या खुंटीवर
नऊवारी गुंडाळी शंखाकार
नवपरिणितेस मनाधार
कुटुंबवत्सल मायाळू वावर
नातिगोती नि भावबंध
वाहून गेले परस्पर
आधुनिकेतेच्या वाऱ्यावर
खूंटी दिसेना भिंतीवर...
ना मनाच्या ओसरीवर !
― अंबज्ञ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम मन भूतकाळात गेलं.फार छान
एकदम मन भूतकाळात गेलं.फार छान.
धन्यवाद वृन्दा१
धन्यवाद वृन्दा१
छान जमलीय कविता. आवडली!
छान जमलीय कविता. आवडली!
धन्यवाद अक्षय
धन्यवाद अक्षय
छान!
छान!
सोवळं मुटक्याचा वावर >>>> इथे
सोवळं मुटक्याचा वावर >>>> इथे 'मुकटा' हवं.
नवपरिणितास मनाधार >>>> नवपरिणितेस
बाकी आशय अगदी पोहोचला. छान लिहिली आहे. फक्त शेवटच्या कडव्याला अपवाद असतातच. खुंटी नसली तरी वृत्ती प्रेमळ, आश्वस्त मिळू शकते.
टाइपो लक्षात आणून दिल्याबदल
टाइपो लक्षात आणून दिल्याबदल धन्यवाद अश्विनी ताई
सुचवले तसे बदल करतो
प्रतिसादाबद्दल आभार __/\__ आणि शेवटच्या कडव्याला अपवाद घरोघरी लाभोत हीच खरंतर मनापासून इच्छा आहे
मस्त आवडली.
मस्त आवडली.
शेवट भारी पण वर म्हटलेय् तसे अपवाद आहेत्.
धन्स मधुसूदन
धन्स मधुसूदन