स्पेसएक्स - मंगळ ग्रहावर पहिल मानवी पाउल ...

Submitted by morpankhis on 18 January, 2017 - 10:37

स्पेस एक्स, टेस्ला मोटर्स आणि मस्क :

मंगळ ग्रहावर जर पहिला मानव कोणी नेईल तर असा विश्वास वाटतोय ते काम स्पेसएक्स (SpaceX) च करेल...

मी अगदी सुरवाती पासुन मस्क साहेब व ते करत असलेल्या कामचा फॅन आहे...
त्यांच्या पेपाल च्या स्थापने पासुन ते SpaceX पर्यंत चा प्रवास मला तरी थक्क करतो..

स्पेसएक्स विषयी थोडसः
- हि जगातील पहिली खाजगी स्पेस कंपनी आहे जी रॉकेट बनवते व सॅटेलाईट सोडते..
- स्पेसएक्स हि पहिली व अत्तातरी एकमेव स्पेस कंपनी आहे जी यशस्वी पणे रॉकेट चे पहिले स्टेज परत लँड केले आहे व करते
- रॉकेट चे पहिले स्टेज ते पुर्नवापरासाठी आणनार आहेत... ज्याने सॅटेलाईट लाँच खुप स्वस्त होइल..

स्पेसएक्स च्या रॉकेट लाँच चे यूट्युब वर वेब सेशन असते जे मी केव्हाच चुकवत नाही..
स्पेसएक्सच पुढच पाउल हे ह्युमन स्पेस फ्लाईट आहे.. आणि त्याना पुढे मंगळ ग्रहावर मानव पाठवायचा आहे... आणि महत्वाच म्हणजे ते सगळ खाजगी कॅपिटल वापरुन करतायत...

मस्क व त्याचे मुलाखतीचे यूट्युब वर चे जवळपास सगळे विडिओ पाहुन झाले.. Happy

टेस्ला मोटर्सः
- हि पहिली सक्सेसफुल आणि मोठ्या संख्ये मध्ये कमर्शीयली फुल साईज इलेक्ट्रिक कार बनवनारी कंपनी आहे.. बाकी खुप सार्‍या कंपनीने इलेक्ट्रिक कार तयार केल्या आहेत पण ते कमर्शीयली तेवढ्य मोठ्या प्रमानात नाही बनवल्या..वा यशस्वी केल्या....

लिहण्या सारख खुप आहे.. पण तुम्हीच त्याचे विडिओ पहा...नक्किच खुप आवडतील...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

I'm a huge fan of Elon Musk! But I think SpaceX isn't running only on private investment. They do get federal funding. Correct me if I'm wrong.

नाही जिज्ञासा ति पुर्ण खासगी कंपनी आहे.. त्याना जे फेडरल पैसे मीळतय ते फंडींग नसुन स्पेस स्टेशन वा सॅटेलाईट सोडल्यवर दिले जाणारे पैसे आहेत.. नासा हि त्यांची कस्ट्मर आहे ....

गेल्या आठवड्यात एक प्रकारे इतीहास घडला म्हणायला हरकत नाही.
SpaceX हि जगातील पहीली स्पेस कंपनी आहे ज्यानी ... लँड केलेल रॉकेट परत एकदा वापरुन दुसर्‍यांदा सॅटेलाईट सोडल व तेच रॉकेट परत लँड केले ....

रॉकेट लँडींग हे पराशूट ने नसुन पॉवर लँडींग आहे...

काल फॅल्कन हेवी ( सध्या जगातील सर्वात हेवी रॉकेट) च प्रक्षेपण खुपच मस्त होत..
- त्याचे दोनी बुस्टर परत लॅन्ड होतानाचा सिन ... खुपच मस्त..
- त्या रॉकेट द्वारे त्याने त्याची टेस्ला कार मंगळ ग्रहावर सोडली... ते फुटेज पण काय अनबिलिव्हेबल..
ज्या मध्ये रेड कार, तो स्पेसमॅन आणि मागे पॄथ्वी.. जस्ट अमेझीन्ग....

येस, पाहिलं काल यूट्यूब वर. हे प्रत्यक्षात येऊ घातलंय. लाँचर्स पुन्हा वापरता येतील तर फार कमी खर्चात या गोष्टी होतील.

अरे मस्त धागा काढलात. ये बोले तो धागा. मी पण फार फॅन आहे मस्क साहेबांची. ती पूर्ण फॅमिलीच जबरदस्त आहे.
लॉच होता तेव्हा खूप टेन्शन येइल व बीपी हाय होईल म्हणून बघितले नाही. पहाटे सक्सेस फुल झाल्याची बातमीवाचून मग हुश्श झाले. आज सर्व विडीओ पाहिले व स्टार मॅन लाइव बघत आहे. किती कूल ना. त्यात एक मेड बाय ह्युमन्स ऑन अर्थ अशी बारकी पाटी इंजिन वर लावलेली आहे. व एक कारची मिनि प्रति कृती विथ मॅन हॉटव्हील्स सारखी पण समोर ठेवली आहे. लाइव्ह फीड मध्ये पण फार मनोरंजक प्रतिसाद येत आहेत. ह ह पुवा. मुलाखत पण चांगली दिली आहे. ते बिचारे कॉस्टिंग वगैरे नीट समजावुन सांगत होते. अर्ध्या लोकांना ते काय बोलत आहेत समजले नसावे. रॉकेट समोरचे चॅलेंजेस पण नीट समजावून सांगत होते. ट्रू सीइओ मटेरिअल. हे प्रेसिडेंट का होत नाहीत. मी पण् पोस्टाने माझे मत पाठवेन.

@अमा....

मी तर किती दिवस वाट पहात होतो.. केव्हा सोडनार ते फॅल्कन हेवी म्हणुन...
विचार होता स्पेस सेंटर ला जाउन लाइव्हा पहाव.. पण म्हंटल हा पठ्ट्या स्वताच म्हणतोय टेस्ट फ्लाईट आहे.. !! Happy
पण पुढच एखाद तरी प्रक्षेपण तिथेच जाउन पहायच आहे..

काल ऑफीस मध्ये सगळा ग्रुप असा घोळका करुन फुल स्क्रीन वर ते लाइव्ह पहात होतो..
लॉन्च, लॅन्ड व ते रॉकेट फेरीन्ग ओपन झाल्यवर कारच प्रक्षेपण व मागे पॄथ्वी.... सगळच जस्ट अमेझिन्ग....

लोक काउंट डाउन करत होते ते किती भारी. मी पण केले. आणी दोन बूस्टर अगदी सेफ नीट उतरले हाउ ग्रे ट इज दॅट.
आणि देअर इज अ ड्रोन शिप. मस्क रिअल आयर्न मॅन वाट्तो नै का. ते काळ्या पार्श्व भूमी वर अर्थ मग पुढे लाल गाडीत स्टारमॅन असे इलस्ट्रेशन काढून बघ णार आहे. क्रेझी थिंग्ज कम ट्रू असे वाक्य खाली लिहायचे. ए आय बी ने मीम आणले पण कारवर . इन्स्टाग्राम वर बघा. आय अ‍ॅम सो एक्साइ टे ड.

@रावी...
तुम्ही जर तुनळी (Youtube) वर Faclon Heavy अस सर्च केल तर तुम्हाला सगळे विडीओ मिळतील..