तुम्ही कोणत्या ऑनलाईन सर्विसेस वापरता?

Submitted by योकु on 23 January, 2018 - 13:55

आजकाल आपण सगळेच भरपूर इंटरनेट वापरतो. त्यानुषंगानी वेगवेगळ्या ऑनलाईन सर्वीसेसही वापरतो, उदा. नेटफ्लिक्स. तर त्याबद्दलच्या चर्चेकरता हा धागा.
- कुठल्या सर्वीसेस तुम्ही वापरता?
- का? काय चांगलं वाटलं
- एखादी सर्वीस का सोडली/अन-सबस्क्राईब केली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाबा कामदेव अतिशय उपयुक्त आणि माहितीपुर्ण पोस्ट.
मी पेटिएम वापरते पण भीम बद्दल इतकी माहिती नव्हती.
आता भीम पण वापरेन.
पण एक शंका. आम्हि चहाच्या टपरीवर पेटिएम ने पैसे देतो कधी कधी. भीम ने ते पण शक्य आहे का?
त्यासाठी त्या माणसाच्या बॅन्केचे डिटेल्स लागतील ना?

पण एक शंका. आम्हि चहाच्या टपरीवर पेटिएम ने पैसे देतो कधी कधी. भीम ने ते पण शक्य आहे का?
त्यासाठी त्या माणसाच्या बॅन्केचे डिटेल्स लागतील ना?>>>>
जर त्या चहावाल्याने त्याच्या भीम app मधून त्याचा QR कोड तयार करून त्याचे प्रिंट काढून दर्शनी भागात लावले असेल तर फक्त तो QR कोड स्कॅन करून पैसे देता येतील. किंवा त्याचा virtual payment address माहित असेल तर तो वापरूनही पैसे देता येतील.
Virtual Payment Address काहीसा असा असतो:
chahawala@sbi
chahawala@mahb

एखाद्या virtual payment address ला वरचेवर पैसे द्यायचे असतील तर त्याला favorite म्हणूनही मार्क करता येते. (ही सुविधा अन्य बँकच्या UPI app मध्ये आहे, BHIM मध्ये आहे की नाही हे माहित नाही.)

आणखी एक अ‍ॅप आहे वन वे .... यात एकाच मार्गाचे भाडे द्यावे लागते व ते नेहमीच्या टॅक्सीहून स्वस्त आहे... मी अ‍ॅमॅझॉन, सर्व विमानाची ,रेल्वेची,बसची ,हॉटेलांची बुकिंग ऑन लाईन करतो.

>>एखाद्या virtual payment address ला वरचेवर पैसे द्यायचे असतील तर त्याला favorite म्हणूनही मार्क करता येते. (ही सुविधा अन्य बँकच्या UPI app मध्ये आहे, BHIM मध्ये आहे की नाही हे माहित नाही.)

BHIM मध्ये पण ही सुविधा आहे

बरीच चांगली माहीती.
मी स्वतः कुठलंही अ‍ॅप वापरत नाही पैसे देवाणघेवाण करायला.
टाटा स्काय ला एचडीएफसी पेझॅप वापरून रिचार्ज केलं तर ५०% बॅलन्स पुन्हा मिळेल अशी स्कीम होती. त्यावेळी रिचार्ज करतांना, ट्रॅन्झॅक्शन फेल झालं. माझ्या अकाऊंट मधून पैसे वजा झाले आणि रिचार्ज झालं नाही. तर ते पैसे परत ऑटो-क्रेडिट व्हायला हवे; तर या अ‍ॅप्स मधे तसलं काही होत नाही. कारण नक्की कुठल्या पेमेंट गेटवेवर ट्रॅन्झॅक्शन फेल झालंय हे त्यांनाही इन्वेस्टीगेट केल्यावर समजतं. त्यानंतर मग ते पैसे मिळवायला मला बरीच खटपट/वादावादी/फोनाफोनी करायला लागली होती. थोडक्यात, मल्टिपल पेमेंट गेटवेज असलेली सिस्टिम फार काही भरवश्याची नाही असं माझं तरी सध्याला मत. त्यात आपल्याइथली 'कस्ट''मर' सर्वीस!
सो, तेव्हापासून अ‍ॅटलीस्ट माझ्यापुरतं तरी मी काय जे ऑनलाईन व्यवहार असतील ते सरळ नेट-बँकिंग मधून करतो नाही तर कार्ड-स्वाईप मशीन असेल तर ते वापरतो.

फारच वाईट अनुभव रे योकु Sad
मी परवा क्लब फॅक्टरी ला पेटिएम ने पैसे भरले. पण त्यांच्याकडे जे आयटम स्टॉक मध्ये नव्हते त्याचे पैसे लग्गेच रिटर्न आले आणि अजून एका आयटम चे दुसर्‍या दिवशी.
तु पेटिएम वापर.
आणि मी पेटिएम मधुन व्यवहार केला की मला एच डि एफ सी लग्गेच एसेमेस करते की व्हाय युज आदर वॉलेट्स
व्हेन यु हॅव पेझॅप Uhoh यांना सगळी वितंबातमी असते आपली च्यायला.

मशीन लर्निंग, ऑग्मेंटेड रिआलिटी, डीप लर्निंग अल्गोरिदम्स हे शब्द गूगल करून पाहा. मशीन लर्निंग मुळे अगदी एका एका शब्दाचा हे लोक्स आपला ट्रॅक ठेवतात.

@ विक्षिप्त_मुलगा > मी पेटीएम तर वापरतोच आणि भीम देखिल वापरतो, भिम वापरून एका स्टोरवाल्याकडे भीम अ‍ॅप्प व त्याचा क्युआर कोड आह, तिथं.
पण एकदा ज्याच्याकडं भीम अ‍ॅप्प अथवा व्हर्च्यल पेमेंट अड्रेस नव्ह्ता मग त्याच् एच्डीएफ्सी खाते नं आणि आयएफसी कोडनी भीम अ‍ॅप्प द्वारे पैसे दिले ते त्याला मिळाले होते दुसर्‍या केस मध्य दुसर्‍या बँकेसाठी, असंच वापरलं तर नाही झालं! एकात तर पैसे देखिल परत आले नाहीत.
विचित्र अनुभव !

लॉजिक नुसार भीम अ‍ॅप्पनं समोरच्या कडं हे अ‍ॅप्प नसलं तरीही खाते क्र आणि आयएफ्सी कोड वापरून करता यायला हवं !
पण समोरच्याकडे खाते क्र आणि आयएफ्सी कोड हाताशी असतीलच असे नाही. इथं पेटीएम सारखं फोन नं टू फोन नं सोपं पडतं

उत्तर भारतात भीम बरंच वापर्तात असं ऐकून आहे. महाराष्ट्रात एवढं प्रमाण कमी का ?

भीमच्या फॉर्मॅट्मुळे कदाचित,

भीमवरून कुठल्याही एजन्सीला पाठवलेले पैसे हे त्यांचा यु पी आय लिंक्ड असलेल्या बँक अकाउंटमधे पैसे जातात
भीममधे ट्रान्झॅक्शन सक्सेस असा मेसेज येतो तो अगदी नंतर पैसे परत आले तरी बदलत नाही
ज्या बँक अकाउंटमधे पैसे जातात ती बँक आपले प्रश्न सोडवायला बांधील नसते
एजन्सीवाले सांगतात भीम कस्टमर केअरशी बोला, भीम कस्टमर केअर वाले पैसे पोचलेत ह्यावर ठाम असतात, आपल्या बँकेकडेही काही ठोस उत्तर नसते

हा स्वानुभव असल्यामुळे, बिल पेमेंटसकरीता भीम सुटेबल नाही हे माझे मत तयार झाले आहे.

हे सगळे अनुभवताना भीम कस्टमर केअरचा एकदा फीडबॅक घ्यायला फोन आला होता तेव्हा सगळे खोदून विचारले तर त्याने कबूल केले की थर्ड पार्टी पेमेंटससाठी अजून सिस्टीम फुल प्रुफ नाही. १५ फेब्रुवारी पासून होईल तेव्हा प्रयत्न करा.

चहा वगैरेसारख्या फुटकळ गोष्टींसाठी अ‍ॅपने पैसे पाठवणं, वेळेच्या बाबतीत किती सयुक्तिक आहे?
म्हणजे तेवढे पैसे मोजून देणं (प्रोव्हायडेड ग्राहकाकडे नेमके सुटे पैसे आहेत) आणि ते अ‍ॅपने पाठवून टपरीवाल्याला मिळाल्याचा संदेश येणं , यात किती वेळाचा फरक पडतो?
हा सवयीचा भाग आहे, हे मान्य. अगदी लहान व्यावसायिकही अ‍ॅपने पैसे घेतात, हे छानच आहे. मला सरकारी दूध केंद्रावर पेटीएमचं पोस्टर दिसतो. तिथली विक्रेती म्हणाली, की काही काही लोक पेटीएमने पैसे देतात. मला अजून कोणी दिसलेले नाहीत, असे पैसे देताना.
सुट्या पैशांची समस्या असेल तिथे हे उपयुक्त ठरेल.

माझं कार्ड पेमेंट दुकानात एकदाच फेल गेलं. मला पैसे गेल्याचा एसेमेस आला पण मशीनमध्ये फेल गेलेला दिसला. मी नियमित गिर्‍हाईक आणि आमची बँक-ब्रँचही एकच असल्याने, नंतर सॉर्ट होतंय का ते पाहू असं म्हणता आलं. त्याने बँकेत जाऊन चौकशी केल्यावर माझ्या कार्डला पैसे रिफंड होतील, असं कळलं. आणि तसे ते झालेही. मग जाऊन तेवढ्याचं कॅश पेमेंट केलं. अजूनही तिथे कार्डनेच पैसे देतो.
ऑनलाइन बिल पेमेंटमध्येही एकदाच ट्रान्झॅक्शन फेल गेलेलं. ते पैसेही काही करावं न लागता परत मिळाले.

मग जाऊन तेवढ्याचं कॅश पेमेंट केलं.>>>

बर्‍याचदा विक्रेते थांबत नाहीत. त्यांना फेल गेलेल्या ट्रान्झॅक्शनचे पुन्हा रोख पैसे द्यावे लागतात. इथे आपला संयम सुटतो. शिवाय काहीवेळा आपोआप पैसे येतात पण काही वेळा खूप मगजमारी करावी लागते.

किरकोळ गोष्टींसाठी अ‍ॅपने पे न करण्याबद्दल सहमत आहे भरत. मला वाटते छोट्या विक्रेत्यांना नोटबंदीच्या काळात ह्या मार्गाकडे वळणे भाग पडले असावे.

चहा वगैरेसारख्या फुटकळ गोष्टींसाठी अ‍ॅपने पैसे पाठवणं, वेळेच्या बाबतीत किती सयुक्तिक आहे? --> भरत तुमचं वाक्य तसं बरोबर आहे. कारण मीच नीट लिहिलं नाहिये Happy वेळ वाचवणे वगैरे साठी अ‍ॅप ने पैसे नाही देत आम्ही.
पण सुट्ट्या पैश्यांचा खूप प्रॉब्लेम होतो. बर्‍याचदा बिल ६४ रुपये, ५७ रुपये असे झाले की वरचे २-३ रुपये रोज रहायचेच. आणि ते लक्षात पण रहायचे नाही. मी आणि माझी एक मैत्रिण असे आम्ही रोज २ चहा, काही खाणं पिणं असे आमचे ६०-७० रु. रोजचे बिल होते. मग आम्ही २-३ दिवसातून एकदा ते एकत्रच पे करतो किंवा कधी कधी रोज पण देतो.

मला वाटतं भीमच्या बाबतीत समोरच्या खाते क्र व आयएफेसी कोड असला तरीही व्हर्च्यल पेमेंट अड्रेस तयार करावा लागतो.
काही बँका खातेदारांचा व्हर्च्यल पेमेंट अड्रेस स्व:तच तयार करतात कि काय याची कल्पना नाही ( मी ज्याला एचडीएफ्सीला यशस्वीरित्या पे केले होते त्यांनं स्वःत हर्च्यल पेमेंट अड्रेस तयार नव्ह्ता केलेला) बहुधा याच कारणामुळं फेल होत असेल. मी सध्यातरी भीम वापरायचं थांबवलंय.

खुप घाई नसल्यास पेटीएमने पैसे देतो. दुकानदार देखील सहकार्य करतात इन्क्लुडिंग चहावाले, फळवाले इ. , एचपीच्या पेट्रोल पंपावर नेहमी पेटीएमने पे करतो. ०.७५% कॅशबॅक देखिल मिळतो, इतर काही पेटीएम व्यवहारावर देखीलकॅशबॅक कॅशबॅक मिळतो, आता पर्यंत काहीच अडचण आलेली नाहीय.

इबे वरून मी एकदा हेडफोन्स चे रिप्लेसमेंट कुशन्स मागवले होते. वेळेत मिळाले. पण वेबसाईट ब्राऊझिंग अनुभव फार काही सांगण्यासारखा नाहीय. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट उजवे याबाबतीत

नायका वरून अजून एक पार्सल मागवलं होतं.
परवा ऑर्डर केली होती. आज पार्सल पोहोचलं.
मागच्या वेळी तर काल ऑर्डर केली आणि आज सकाळी ११ वाजता पार्सल आलं असं झालं.

भीम हे डेबिट कार्ड सारख आहे..पैसे लगेच वजा होतात अकौन्ट मधुन. पेटिम मधे क्रेडिट कार्ड वापरुन पैसे टाकुन वापरता येतात.

लेटेस्ट - अ‍ॅमॅझॉन प्राईम म्युझिक. ज्यांच्याकडे प्राईम मेंबरशिप आहे, त्यांनी फक्त प्राईम म्युझिक अ‍ॅप डाऊनलोड करून साईन इन करा. भरपूर कंटेट आहे. सगळं म्युझिक एचडी क्वालीटीमध्ये स्ट्रीम करता येईल आणि ऑफलाईन वापराकरता डाऊनलोडही करता येईल.

प्राईम म्युझिक बद्दल अगदी सहमत! खूप आवडते मला! भरपूर गाणी आहेत. (अर्थात अनलिमिटेड घेतले तर अजुन मिळतील.. पण प्राईमवर जे मिळतं ते मला इनफ आहे) इंग्लिश व हिंदी दोन्हीची भरपूर गाणी आहेत. मला शोधायला पण सोपे जाते इथे.. का कोण जाणे.

एकंदरीत अमेझॉन इकोसिस्टीम जास्त आवडते मला. आम्ही शॉपिंगला तर प्राईम वापरतोच. शिवाय प्राईम म्युझिक, प्राईम रिडींग(फुकट लायब्ररी म्हणाता येईल), प्राईम फोटो क्लाऊड (अनलिमिटेड फोटो स्टोअरेज), प्राईम व्हिडीओ (सध्या तर भरपूरच मुव्हीज आले आहेत बॉलिवूड, मराठी इत्यादी), किंडलवर नीलसाठी फ्रीटाईम (ज्यात भरपूर अ‍ॅप्स , पुस्तके, व्हिडिओज आहेत लहान मुलांसाठीचे) .. ह्या सगळ्याचा आमचा डेली वापर होतो. १०० पैकी १०० मार्क्स!

अरे वा! इथे फोटो आणि प्राईम म्युझिक अनलिमिटेड नाही आलं अजून. अ‍ॅपल म्युझिक सोडावं काय?
किंडल ला पूर्ण मार्क्स...! Happy

I am getting lot of information here about On Line Shopping. Thank you all. I want to share my recent online shopping experience with World Art Community. Although the name is big but the delivery services they are using is so bad . T Most of the Online shopping companies offer free delivery on and above 500/-. But World Art Community charging Rs. 50 to Rs. 100 for each item selected. Inspite of charging so much they are using simple Register Parcel services which takes more than 10 days to delivery in Mumbai and Navi Mumbai. This is in case of my item ordered which is not yet delivered after 12 days promised. Nor they are ready to refund my money. So friends be care ul while purhasing on this site.

I am getting lot of information here about On Line Shopping. Thank you all. I want to share my recent online shopping experience with World Art Community. Although the name is big but the delivery services they are using is so bad . T Most of the Online shopping companies offer free delivery on and above 500/-. But World Art Community charging Rs. 50 to Rs. 100 for each item selected. Inspite of charging so much they are using simple Register Parcel services which takes more than 10 days to delivery in Mumbai and Navi Mumbai. This is in case of my item ordered which is not yet delivered after 12 days promised. Nor they are ready to refund my money. So friends be care ul while purhasing on this site.

Super daily ची सर्वीस खूपच छान आहे daily needs (bakery, dairy products) साठी. मी दोन महिन्यांपासून वापरतेय एप्लिकेशन.

गुगल पे सगळ्यांसाठी आहे आणि थोडया रकमेसाठी किंवा अनोळखी लोकांना पैसे द्यायला उपयोगी आहे. सुरुवातीला मला बरेच रिवॉर्ड म्हणजे बक्षीस पैसे मिळाले पण आता अजिबात मिळत नाहीत, कितीपण मोठी रक्कम हस्तांतरित केली तरी. आमच्या ऑफिस मध्ये बर्थडे कॉन्ट्री किंवा इतर छोट्या गोष्टींसाठी हल्ली हेच वापरतात.

Pages