तुम्ही कोणत्या ऑनलाईन सर्विसेस वापरता?

Submitted by योकु on 23 January, 2018 - 13:55

आजकाल आपण सगळेच भरपूर इंटरनेट वापरतो. त्यानुषंगानी वेगवेगळ्या ऑनलाईन सर्वीसेसही वापरतो, उदा. नेटफ्लिक्स. तर त्याबद्दलच्या चर्चेकरता हा धागा.
- कुठल्या सर्वीसेस तुम्ही वापरता?
- का? काय चांगलं वाटलं
- एखादी सर्वीस का सोडली/अन-सबस्क्राईब केली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Beauty services by Amazon Happy
बाकी electrician, carpenter, cleaning services, painting services, pest control असं काय काय वेळोवेळी कोणाचं चांगलं डील असेल तश्या वापरल्या आहेत.
Discount code टाकायला विसरायचं नाही. Dominos सारखा discount promo वर click केलं म्हणून discount / deal मिळत नाही.
Prime विडिओ फुकटच मिळतंय ते वापरतो. Hotstar वापरतो.
इथे खूप लोकं आजकाल quick ride वापरतात.मी अजून वापरलं नाहीए, स्वतः अनोळखी माणसाच्या गाडीत कसं बसायचं.
No broker मध्ये मला भाडेकरू म्हणून फुकटात जागा मिळाली पण घरमालक म्हणून फुकटात भाडेकरू मिळाला नाही. तीनच फोन नंबर फ्री देतात :P,
Olx खूपच चांगलं आहे quikr पेक्षा, quikr सारखे IVR call करून डिस्टर्ब करतात.
doodhwala app वापरली आहे दूध आणि इतर साठी , चांगली आहे. बहुतेक लोकल service असावी.
Swiggy पण वापरते, better options than other similar apps. पण अजिबात discount नसतं.

Olx खूपच चांगलं आहे quikr पेक्षा, quikr सारखे IVR call करून डिस्टर्ब करतात.>>>> 100% अनुमोदन
खरेदीसाठी Amazon, Banggood अजून वापरली नाही पण एकदा खरेदी करेन म्हणतो.
कॅबसाठी Ola आणि Uber यांच्यापैकी त्यावेळी ज्यांचे दर कमी असतील ते.
इलेक्ट्रॉनिक्सचा छंद असल्याने घरात (किंवा गाडीत) LED लावताना resistor किती क्षमतेचा लावायचा यासाठी ledcalc.com

फ्लीपकार्ट,अ‍ॅमेझॉन,स्नॅपडील मस्त आहेत.प्लेस ऑफ ओरिजिनही वापरली.हल्लीच टाटा क्लीक(tatacliq) वापरली.
जास्त वापरात पूर्वीस्नॅपडील,आता अ‍ॅमेझॉन आहे.फ्लीपकार्ट्ची सर्विस चांगली आहे.पण काहीवेळा किंमती आणि डिलिव्हरी चार्जेस खूप आहेत.त्यापेक्षा अ‍ॅमेझॉन,स्नॅपडील बरी आहे.१८ तारखेला एक मोबाइल घेतला.त्याची किंमत
फ्लीपकार्टवर ६९९९/-
अ‍ॅमेझॉनवर ६५९९/६५२०
टाटा क्लीकवर ६१००/-होती.मग टाटा क्लीक झिंदाबाद!

मस्त धागा.
खरेदीचं कोणतंही अ‍ॅप मी मोबाई ल वर वापरत नाही. फक्त एकदा एक पर्स अ‍ॅप वर अजून स्वस्त होती म्हणून अली एक्स्प्रेस डालो करून ती ऑर्डर टाकली आणि अ‍ॅप डिलिट केलं. बाकी ओला उबर पैकी उबर चा अनुभव उत्तम म्हणून नेहमी तेच वापरते.
बाकी अलिकडेच नायका (http://www.nykaa.com/)या सौंदर्य प्रसाधन आणि इतर बरंच काय काय मिळणार्‍या साईट वरून पर्फ्युम्स ऑर्डर केली होती. लिटरली ज्या दिवशी दुपारी ऑर्डर केली त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी
११.३० वाजता पार्सल घरी. आय अ‍ॅम हायली इम्प्रेस्ड.
सर्व्हिस फारच चांगली आहे. इच्छुकांनी जरूर लाभ घ्यावा.
बाकी मी अलि एक्स्प्रेस जितक्या वेळा वापरली आहे तितकी इतर कोणतीच नाही वापरली. डिलिव्हरी टाईम सोडल्यास बाकी सर्व उत्तम आहे.

कुणी क्लब फॅक्टरी चा लाभ घेतला आहे का? अनुभव टाका.

ऑनलाईन सर्वीसेस मध्ये दोन पैसे:
- उबर प्रेफरेबल ओवर ओला, कारण - ओवरऑल अ‍ॅप एक्स्पिरिअन्स जास्त चांगला आहे. अर्थात जिथे एक नाही मिळत तिथे दुसरी वापरतो
- अ‍ॅमेझॉन प्राईम. नेक्स्ट डे डिलीवरी आणि प्राईम विडिओ कंटेट मस्त आहे, नेटफ्लिक्स होतं आधी पण नंतर मग बंद केलं...
इथेही गोष्टी विकत घेताना बाकी साईट्स कंपेअर केल्या जातातच आणि जिथून स्वस्त पडेल तिथून घेतल्या जातात. तरी, ढोबळमानानं, इलेक्ट्रॉनिक्स फ्लिपकार्ट वरून, कपडे मिंत्रा आणि बाकी गोष्टी अ‍ॅमेझॉन वरून येतात. किराणा सामान, भाजी इ बिग बास्केट. शक्यतो सगळ्या ऑर्डर्स सिओडी असतात.
- कॅशिफाय वर जुन्या इलेक्ट्रॉनिक्स विकल्या. यांचाही अनुभव चांगला. एका हाती वस्तू द्या आणि लगेच बँक अकाऊंट्ला पैसे जमा करतात हे लोक्स.
- अ‍ॅपल म्युझिक. उत्तम कलेक्षन हवं ते गाणं, जॉनर मिळतं. क्वालिटीही मस्त असते. आधी सावन वापरत होतो पण हे जास्त उजवं वाटलं. पहिले ९० दिवस फुकट आहे.

free mp3 music downloader ( dev:fast code, windows)या अॅपवरून बरीच गाणी घेतो. स्टेरिओ असतात. हिंदी आणि परदेशी दोन्ही आहेत.

ओनलाइन खरेदीसाठी साइट्ससाठी धागा आहे का? मी उगाच लिहितो आहे इतर साइट्सबद्दल

ऑनलाईन म्युझिक सर्वीस आहे. सावन/गाना सारखंच आहे, इंटरनॅशनल काँटेट मला जास्त आवडला म्हणून सावन बंद केलं. वापरायला ही सोपं आहे सावन पेक्षा.

मी सी ओ डी ऑप्शन कधी वापरला नाहिये कारण बर्‍याच वेळेला माझे शेजारी पार्सल रिसिव्ह करतात मग त्यांच्याकडे पैसे ठेवा, उगिच चुकामूक झाली तर हेलपाटे नकोत म्हणून मी पैसे कायम आधी देते.
सी ओ डी म्हणजे नक्की काय? तुम्ही प्रॉडक्ट उघडून पाहून मग पैसे द्यायचे का? Uhoh कि फक्त सिरिव्ह करून?
आणि उघडून पाहून पैसे द्यायचे असतील आणि प्रॉडक्ट नाही आवडलं तर तिथल्या तिथे परत देऊन टाकायचं का? Uhoh

मी, ओला, उबर, मेगा कॅब्स वापरतो, पेटिएम वापरतो, अ‍ॅमझॉन, इबे, फ्लिपकार्ट, स्नॅप डिल.
हे बहुतेक सर्वजण वापरत असतील.
अजून दुसर्‍या सर्व्हिसेस सांगण्या सारख्या आहेत त्या म्हण्जे:
१. फ्लाईट रडार. याचा उपयोग खास करुन तुम्ही कुणाला रिसिव्ह करायला जात असाल, अथवा कुणी तुमच्याकडे विमानाने येत असेल तेव्हा होतो. विमानाने टेक ऑफ घेतल्या पासून ते लॅंड होईपर्यंत त्याची लाईव्ह पोझीशन दिसते.

२. मेडप्लसः यात आपण औषधे, किराणा - जनरल स्टोअर वस्तु ऑनलाईत ऑर्डर करु शकतो व स्वतः आपल्याला सोयीस्कर असलेल्या मेडप्लस स्टोअर मधुन कलेक्ट करु शकतो. अथवा होम डिलिव्हरी घेउ शकतो. तसेच हवे असलेले औषध कुठल्या मेडप्लस स्टोअर मध्ये उपलब्ध आहे हे बघता येते आणि लगेच हवे असल्यास तिथे जाऊन घेता येते.

सी ओ डी म्हणजे नक्की काय? तुम्ही प्रॉडक्ट उघडून पाहून मग पैसे द्यायचे का? Uhoh कि फक्त सिरिव्ह करून?
आणि उघडून पाहून पैसे द्यायचे असतील आणि प्रॉडक्ट नाही आवडलं तर तिथल्या तिथे परत देऊन टाकायचं का? >>>>> मी अ‍ॅमेझॉन प्रिफर करते या साठी, कारण फक्त तेच COD मध्ये प्रोडॅक्ट ऊघडुन दाखवुन, आवडले अन आपण घेतले तर पैसे घेतात बाकीचे नाही, म्हणजे माझा असा अनुभव आहे.

स्नॅपडील वर एकदा एक बाहुली मागवली होती फायबर ची होती बहुतेक, जेव्हा आली तेव्हा पॅकेट खुप सॉफ्ट लागले म्हणुन खोलायला सांगीतले तर नाही बोलले तसीच परत केली अन अ‍ॅमेझोन वरुन मागविली तेव्हा पैसे देण्या आधी खोलुन बघीतली तर स्पंज अन कापुस
भरला होता आतमध्ये, अन प्रोडॅक्ट डिस्क्रिपशन मध्ये फायबर अन प्लास्टीक लिहीले होते मग ती पण परत दिली पैसे न देता. रीटर्न ची कटकटच नाही.

देवकी मी लिप्स्टिक्स नाही घेतल्या. कशा वाटल्या? >>>> कोणत्या ब्रँडच्या घेतल्या अन ग्लॉसी की मॅट हेही सांगा, मला पण घ्यायच्या आहेत.

मानव तुमची पोस्ट आवडली.
पेटिएम मी पण वापरते. खूपच चांगले आहे. सर्वात मस्त म्हणजे ५ मिनिटात फोन रिचार्ज वगैरे करता येतो.
माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलच्या बिलाचा नेहमी ऑनलाईन भरताना पासवर्ड चुक असतो आणि मग तो एक सेफ्टी क्वेश्चन असतो त्यात ही तिने घोळ घालून ठेवला असल्याने ते बिल प्रत्यक्षच भरावे लागायचे. एकदा मी तिला पेटिएम ने भरून दिले. तेव्हापासून ते काम माझ्या गळ्यात आले आहे Happy
बसल्या बसल्या होते सर्व Happy

VB -- ओह अच्छा सी ओ डी म्हणजे सगळेच प्रॉडक्ट उघडून पहायला मुभा देतील असं नाही. ह्म्म्म! कळलं.
मला सुदैवाने आत्तापर्यंत ऑनलाईन खरेदीचा उत्तम अनुभव आहे फक्त एक ती शॉपक्लूज नावाची साईट सोडल्यास. बेक्कार म्हणजे निव्वळ बेक्कार.
मोबाईल चार्जिंग ला लावायला एक स्टँड मिळते अर्धवट उघड्या सोपकेस सारखे त्याला एक मोठे छिद्र असते त्यातून चार्जर सॉकेट मध्ये घालायचा आणि खालच्या भागावर मोबाईल ठेवायचा. १९९ रुपयांचं प्रॉडक्ट इतकं भिकार होतं. अक्षरश: १० रुपड्याचं पण नसेल.
मग मी तिथून परत काहीच घेतलं नाही. इव्हन तिथला डिस्प्ले पण असा रोडसाईड सारखा वाटतो.

कॅश ऑन डिलिव्हरी हा ऑप्शन चांगला आहे कारण आधीच पैसे भरले आणि डिलीवरी देणाऱ्या माणसाने पत्ता अवघड आहे म्हणून कंटाळा केला आणि पार्सल परत पाठवले तर कॅश बॅक घ्यायला द्राविडी प्राणायाम करायला लागतात

मी फक्त अ‍ॅमेझॉन वाली. Happy
नाय्का (म्हणायचं की नीका?) चांगली आहे. कस्मेटिक्स वैगेरेसाठी पण एकंदर त्या वस्तु वापरत नसल्याने नाही ओर्डर केलं काही. ऑफिस कलीग्ज मागवतात बरंच. चांगला अनुभव आहे त्यांचा.

- कुठल्या सर्वीसेस तुम्ही वापरता? : मायबोली
- का? काय चांगलं वाटलं : छान वाटतं. आपल्या माणसांत आल्यासारखं.
- एखादी सर्वीस का सोडली/अन-सबस्क्राईब केली? : आजकाल फार नाही वापरत, पण अनसब नाही केली अजून तरी. एक पाच पन्नासवेळा आयडी डिलीट झाला असेल तितकाच. Wink

Lipsticks Lakme Ani mebelene chya ghetalya.Lakme Compact hi the ale
Changale ahet..
VB,
Mat finish nahi ghetalya ani ekadam glossy asaatat tya pan nahi ghetalya..Brown shades mazya avadeechya aslyamule Tyat tya shades milalyachya,,mhanun order kelya.

ट्रॅव्हल्स : ओला / उबर, ब्ला ब्ला कार, रेडबस. ओला अनेकदा वापरावे लागते कारण ऑटोचा ऑप्शन आहे. वैयक्तिकरीत्या उबर आवडते - खासकरून मुंबईमध्ये.

हॉलिडे बुकींग - गो आयबिबो

शॉपिंग : अमेझॉन, ओ एल एक्स.. फ्लिपकार्ट एकदा वापरले परंतु प्रोडक्ट दोन महिन्यात मालफंक्शन झाले. रीफंड घेतला पण आता वापरावेसे वाटत नाही.

सिनेमा बुकींग : बुक माय शो आणि टीकेट न्यू दोन्ही वापरले. हँडलिंग फीस दोन्हीकडे साधारण सारख्याच आहेत पण टीकेट न्यू मधे सीट ले ऑउट गोंधळात पाडणारा आहे असा अनुभव आला एकदा. हँडलिंग फीस कमी असलेले कोणते अ‍ॅप असेल तर सांगा.

पेमेंट्स : सगळ्या बँकांची अ‍ॅप्स प्लस पेटीएम वापरतो. भीम वापरून एकदा वीज बिल भरले परंतू पैसे वजा झाले तरी महवितरणला जमा झाले नव्हते. दोन महिन्यांनी रीव्हर्स झाले. दरम्यानच्या काळात दोन वेळा सब डिव्हीजन ला जाऊन बिल कमी करून आणावे लागले. भीम अजून पुरते फुल प्रुफ नसावे असा एक समज झाला आहे.

गाना : फक्त स्ट्रीमींग करून ऐकणे प्रेफरेबल आहे सद्या. अ‍ॅपल म्युझिक पण ९० दिवसांकरीता फुकट वापरले.

गॅस बुकींग : भारतगॅसचे अ‍ॅप सुरुवातीपासून वापरत होतो. सद्या 'उमंग' नावाचे सरकारी ऑल इन वन अ‍ॅप वापरतो. दोन्हीकडे अनुभव छान. उमंग अधिक आवडले कारण त्यात आपल्या पॅन, आधार, पासपोर्ट पासून सगळे डिटेल्स लिंक्ड होतात

प्रवास करण्यासाठी वेगवेगळे पर्यायी मार्ग (ट्रेन, बस, मेट्रो) त्यांची वेळापत्रकं, फेअर, हे आहेत . यासाठीच वापरलंय.

आता पाहिलं तर नाटकांच्या खेळांची माहिती, अँब्युलन्स बुक करायची सोय, जवळच्या पोलिस स्टेशनचे नंबर्स इत्यादीही आहे.

यांची पुणे आणि दिल्ली व्हर्शन्स ही आहेत.
m-indicator
लोकसत्तेत आत्ताच हे अ‍ॅप बनवणार्‍या मराठी युवकाबद्दल लिहून आलं होतं.

*"भीम" ऍप - Bharat Interface for Money..*
- By Omkar Dabhadkar
गेल्या ३ दिवसांत ३ छोटे बिझनेस इन्कम आणि मुलाच्या ट्रीटमेंटचा एक खर्च झाला. चारही व्यवहार प्रयत्नपूर्वक डिजीटल घडवून आणले. चारीवेळा डिजीटल पेमेंटचा सल्ला देतातच समोरून "ठीके, पेटीएम करूया?" हाच पहिला प्रतिसाद आला. चारीवेळा माझ्याकडून "मी पेटीएम नाही, भीम वापरतो" असं उत्तर गेलं - आणि चौघांनी - "आम्ही भीम वापरत नाही" असं सांगितलं.

पेटीएम आणि भीम मधले फार महत्वाचे फरक लोकांना माहिती नसल्याचा हा परिणाम आहे. फरक माहित नसल्याने लोकांचं नुकसान होत आहे.

*पेटीएम हे ई वॉलेट आहे. आपण त्याद्वारे व्यवहार करतो तेव्हा पेटीएम करन्सीमध्ये व्यवहार होतात. परंतु ती करन्सी रुपयांमध्ये बदलायची असेल तर चार्ज द्यावालागतो.* म्हणजे, वरील ३ बिझनेस व्यवहार मी पेटीएम द्वारे केले असते, तर माझ्या करंट अकाऊंट मधून पैसे काढण्यासाठी आधी मला पेटीएम कॅशचं रूपीज मध्ये रूपांतर करण्याचा चार्ज भरावा लागला असता.
*ह्या कमिशनवरच पेटीएम उभं आहे. हे कमिशन प्रत्येक व्यवहारासाठी १.९९ रूपये + जीएसटी इतकं आहे. महिन्यात ५०० व्यवहार केले तर हजार रूपये पेटीम दक्षिणा जाते. (व्यापाऱ्यांसाठी हे विशेष महत्वाचं आहे.)*

*पण - भीम - हे ई वॉलेट नव्हे.* तर आपल्या सामान्य बँकांमध्ये परस्पर व्यवहार करून देणारी पेमेंट सिस्टीम आहे. म्हणजेच भीम द्वारे होणारे व्यवहार, बँक अकाऊंट ते बँक अकाऊंट, थेट रूपयांतच होतात. वरील ३ व्यवहारांत भीमचा वापर केला तर क्लायंटच्या अकाऊंट मधील पैसे माझ्या बिझनेस अकाऊंट मध्ये जमा होतात. *कुठलाही एजंट (पेटीएमसारखा) मध्ये नसतो.*

*आणि ही व्यवहाराची सुविधा पूर्णपणे फु-क-ट आहे...!*

पण बिझनेसमध्ये फक्त फुकट असून भागत नाही. त्वरित आणि पारदर्शक असायला हवं. पेटीएम व्यवहार हातासारशी, चटकन होतात. लगेच मेसेज, पॉप अप येतात. भीमचं काय?

तर -
*भीमद्वारे होणारे व्यवहारसुद्धा "तितकेच" फास्ट होतात.* *तश्याच नोटिफिकेशन्स येतात, फटाफट.*
*नो डिले, उलट पेटीएम वॉलेट ते बँक अकाऊंट पैसे ट्रान्सफर होण्यासाठी १ दिवस लागतो. भीमला एक सेकंद.*

आणखी एक महत्वाचा फायदा - पेटीएम सारख्या ई वॉलेट्सद्वारे व्यवहार करायचे असतील तर पैसे "पाठवणाऱ्याकडे" आणि "घेणाऱ्याकडे" - दोघांकडे ते असणं आवश्यक आहे. पण भीमचं तसं नाही. पैसे पाठवणाऱ्याकडे भीम असणं पुरेसं आहे. ज्याला पाठवायचे आहेत,ऽ त्याचा बँक अकाऊंट नंबर आणि ifsc code घ्यायचा, भीमद्वारे पैसे पाठवायचे. विदीन अ सेकेंड, रक्कम इकडून तिकडे जमा होते. नेट बँकिंगवर लॉगिन करणे, बेनिफिशिअरी सेव्ह करणे वगैरे कटकट नाही. मुलाच्या ट्रीटमेंटचे पैसे तसेच पाठवले मी.

*दोघांकडे भीम असेल तर अतिउत्तम.* तुमचा मोबाईल नंबर आणि/किंवा तुम्हाला आवडेल तो (आणि अव्हेलेबल असेल तो) upi पिन ठेवायचा. मग अकाऊंट नंबर, ifsc code लक्षात ठेवायची गरज नाही. "मोबाईल नंबर@upi" किंवा "तुमचा कोड@upi" ही तुमची id झाली. ही id टाकून तुम्हाला चटकन पैसे पाठवता येतात.

एवढंच नव्हे, ज्याला पैसे पाठवायचे आहेत तो समोर असेल तर upi पिन किंवा अकाऊंट, ifsc ची देखील गरज नाही. QR कोड स्कॅन करून थेट पैसे पाठवता येतात!

*आणखी एक खास गोष्ट - भीमद्वारे पैसे "मागवता" सुद्धा येतात. म्हणजे एखाद्या माणसाकडून पैसे यायचे असतील तर "send" रिक्वेस्ट पाठवायची. त्याने मंजूर केली की पैसे जमा.*

खरंतर, १० रुपयांच्या मिरची पासून १०,००० च्या मोबाईल पर्यंत सर्व व्यवहार सहज करता येईल इतकं सुंदर साधन आहे हे. पण
*सरकारने त्याची म्हणावी तशी जाहिरात, ओळख करून दिली नाही. त्यामुळे लोकांना भीम ही गोष्ट माहितीच नाहीये.* किती सोपं आहे आणि किती फायदेशीर आहे हे माहीत नसल्याने लेस कॅश इकॉनॉमीचं हे ब्रह्मास्त्र तसंच भात्यात पडून आहे.

हे सर्व लिहिण्यामागे पेटीएम किंवा तत्सम ई वॉलेटवर आकस अजिबात नाही. लोकांना माहिती नसलेला भीमचा पर्याय माहिती व्हावा बस्स हाच आणि एवढाच हेतू आहे.

*लेस कॅश इकॉनॉमी आवश्यक आहे, ह्यावर कुणाचंच दुमत नाही. अगदी रिक्षावाला सुद्धा आजकाल पेटीएमचे स्टिकर लावून फिरत असताना, त्याहून चांगला, सुटसुटीत आणि लोकांचे पैसे वाचवणारा हा पर्याय आहे.* *त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यात सरकार कमी पडतंय.आपण ती कसर आपल्या परीने भरून काढुया, "भीम" बद्दल जागरूकता वाढवू.*

'बाबा कामदेव' यांची Paytm vs भीम ही पोस्ट वाचली, परंतु ती पटली नाही. कारण यातील Paytm च्या बाबतीत दिलेल्या बाबी या paytm अगदी नवीन म्हणजे बाल्यावस्थेत असतानाच्या आहेत. आता Paytm ही सुद्धा एक बँक झाली आहे, आणि Paytm app मध्ये सुद्धा BHIM (UPI) समाविष्ट (integrate) करण्यात आले आहे. खालील screenshot पहा (लाल चौकट)
Paytm app मध्येच SBI चे saving a/c जोडले आहे. (हिरवी चौकट)
BHIM प्रमाणेच Paytm मधूनही payment request पाठवता येते (जांभळी चौकट): WhatsApp Image 2018-02-03 at 11.20.31 PM.jpeg

आता BHIM पेक्षा Paytm चे फायदे! (टीप:- मी Paytm कंपनीत कामाला नाही, मला हे फायदे सांगण्यासाठी Paytm कडून cashback मिळणार नाही! केवळ चांगले app आहे म्हणून सांगतो आहे.)
Google Play store वरील rating (दि. ०३/०२/२०१८ रोजी रात्री ११:३६ (२३:३६) वाजता):
BHIM - 4.1
Paytm - 4.4

BHIM app मध्ये Metro चे तिकीट काढण्याची सोय नाही, जी Paytm मध्ये आहे.
Paytm मध्ये मेट्रोचे तिकीट काढल्यावर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर QR कोड येतो, जो मेट्रो स्टेशनवरील AFC (Automatic Fare Collection) gate वर असलेल्या स्कॅनरवर स्कॅन केल्यास गेट उघडते आणि प्रवास करता येतो. अधिक माहितीसाठी खालील चित्रे पहा:
WhatsApp Image 2018-02-03 at 11.22.18 PM (2).jpegWhatsApp Image 2018-02-03 at 11.22.18 PM (1).jpegWhatsApp Image 2018-02-03 at 11.22.18 PM.jpeg

धन्यवाद . मीही फोरवर्ड केलेले आहे. या निमित्ताने दोन्ही एपचा अधिक परिचय झाला. मग पेटीम ला पैसे कुठून मिळतात.?

Pages