पद्मावत - माझ्या नजरेतून

Submitted by द्वादशांगुला on 3 February, 2018 - 19:52

पद्मावत - माझ्या नजरेतून

(काल्पनिक Happy )

पद्मावत- करणी सेनेच्या नजरेत खुपणारा हा पिक्चर नुकताच याचि देहि याचि डोळा पाहिला. आता मी वाढवलेल्या किंमतीची तिकीटं विकत घेतली, वेळेत मल्टिप्लेक्सला पोहोचले, तिकडले वाढवलेल्या किंमतीचे बेचव समोसे आणि पेप्सीचा कॅन नाक मुरडत खरीदले, एक डोळा समोर ताताथय्या करणार्या कलाकारांकडे आणि एक डोळा दरवाज्याकडे (चुकून करणी सेना आली अन् तोडफोड केली तर... सबको अपनी जान प्यारी), एका हाताने समोसा तोंडात चिवडतेय, अशा कसरती करत मूव्ही पाहिली, असं खोटं मी मुळीच म्हणणार नाही. खरंतर मला अशा कसरती करत मूव्हीत मन लावणे आणि माबोवर त्याबद्दल लिहीणे जमलेच नसते. आणि खोटं बोलणं तर त्याहून नाही. आराम के साथ दिवसभर आधी ती डाऊनलोडिंगला टाकली , छानपैकी पिझ्झा बनवला, अन् पिझ्झा खात खात तिला (पक्षी- पद्मावतीला) पाहिले.

तर माझ्या टंगस्टनच्या तारेप्रमाणे चटकन उजळणार्या मेंदूने मला सांगितलं, बाळे द्वादशांगुले, तुला थिएटर प्रिंट मिळाली आहे.. त्यातही अचानक जाणार्या लायटीप्रमाणे अचानक हिंदी भाषा बदलून काही वाक्य तेलुगुत रूपांतरित झालीयेत[तरी बरं अशी वाक्यं पिझ्झातल्या साखरेएवढीच होती. (आता पिझ्झातली साखरं शोधत बसू नका. हवं असल्यास रेसिपी टाकीन कधीतरी) ]आणि मुख्य म्हणजे हिंदी वाक्यं हळू आवाजात तर तेलुगु वाक्यं हत्तीएवढ्या आवाजात ऐकू येताएत(हे संकष्टीच्या दिवशी समोर चिकन लाॅलीपाॅप ठेवण्यासारखं झालं)............. तर या एवढ्या हिमालयाएवढ्या संकटांवर मात करत मी पद्मावतीचा गड सर केलेला आहे(टाळ्या...).

चला नमनाचं घडाभर तेल पिझ्झात मुरलं,आता खरी पद्मावती. मला तरी हा पिच्चर ओटीडब्ल्यू वाटला. राजस्थानवाल्यांनी सेटची तोडफोड केल्यानं भन्साळीचाचानं बहुतेक बाम ( पक्षी- बाजीराव मस्तानी) चाच सेट जरा हलवून वापरलाय, अशी खिलजीच्या केसांएवढीच दाट शंका मला येतेय. असो. आणि इतिहास काय, भन्साळीचाचाचा सात जन्माचा वैरीच असल्यासारखा दाखवलाय. त्यांना बहुतेक बालपणी त्यांच्या इतिहासच्या शिक्षिकेनं 'तू इतिहास बदलून टाकशील' असा शाप दिला असावा. असो. तर चित्रपट सुरू होतो खिलजीपासून. आधी तो सुलतानला शहामृग देऊन त्याला त्याची मुलगी मागतो. (आवळा देऊन कोहळा काढणं-निमित्तानं म्हणीचा अर्थ तरी कळला..) मग मंगोलिया सर करतो अन् परत येऊन सुलतानचा खून करून गादीवर बसतो. ही सुरूवातच मुळात तुटलेली वाटते.

मग पद्मावतीची एन्ट्री. ती हरणाची शिकार करत असते. पण बाण लागतो पहिली पत्नी- नागमतीसाठी मोती घ्यायला आलेल्या राजा रतनसिगला अन् तो घायल होतो तिच्या सौंदर्यानं.मग काय , ती बनते त्याची राणी आणि जाते वाळवंट फुलवायला.मग घूमर साॅग ( एडिटेड). असेच गोडाधोडाचे दिवस जातात नि इथून सुरू होतो संघर्ष(पद्मावती vs खिलजी अन् द्वादशांगुला vs तेलुगु मधेमधे). याची ठिणगी बनतो राघव चेतन. तो अपमानित होऊन चितोडमधून हाकलला जातो अन् तो जाऊन मिळतो खिलजीला. खिलजीला पद्मावतीच्या सौंदर्याबद्दल सांगतो. मग काय , तिला मिळवण्याच्या इच्छेनं चितोडवर चाल करतो. मात्र रतनसिंग रात्री आगीनं त्याच्या छावण्या जाळतो.( जली को आग कहते है, बुझी को राख कहते है, हेच आठवलं) त्याच
चं अन्न संपतं.(तरीही खिलजीसमोर टेबलभरून अन्न कुठून येतं हे मला न सुटलेलं कोडं आहे .) मग इथे खिलजी लढवतो डोकं. तो मैत्री दाखवून किल्ल्यावर जातो, आन् खुळ्यासारखा बोंबलतो- मला राणीला बघायचंय. आढेवेढे घेत त्याला दाखवतातही, पण आरशातून मोजून तीन सेकंद.

खिलजी रतनसिंगला त्याच्या छावणीत बोलवतो पाहुणचाराला. अन् त्याला बंदी बनवतो. पद्मावतीला पत्र पाठवतो, तू ये , मग राजाला सोडतो( एक्स्चेंज ऑफर). ती आठशे दासींच्या पालखींत जाते नि खिलजीच्या बायकोच्या मदतीनं रतनसिंगला सोडवून घेऊन जाते. इकडे पालख्यांतले दासी बनून आलेले सैनिक खिलजीच्या सैतानांबरोबर युद्ध करतात.

राजा राणी सुखरूप गडावर पोहोचतात(ये तो होना ही था). संतापलेला खिलजी आक्रमण करतो. यावेळी तोफांसहीत( जाम लवकर आठवल्या). खिलजीचा लेफ्ट हॅन्ड( पक्षी- मलिक )मागून बाण मारून रतनसिंगला मारतो. अन् इकडे स्त्रियांचा भव्य जोहार.यामध्ये दीपिका फार छान दिसतेय. चलो, पिच्चर देख लिया आपने वाचके. ( पक्षी- वाचून).

रणवीरची अन् दीपिकाची अॅक्टिंग भन्नाट झालीय. फक्त पिच्चर विखुरल्यासारखा वाटतो. तर माबोकरांनो, भन्साळीचाचांचा इतिहास पाहायचा असेल तर पहा. दीपिकाचे फॅन असाल तर नक्की पहा.रणवीरचे असाल तर आवर्जुन पहा. शाहिदे असाल तर खरंच पहा. आणि सर्वांचे असाल तर डरो मत सोडूच नका बघणे. चला. जय एकलिंगजी की.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तो मैत्री दाखवून किल्ल्यावर जातो, आन् खुळ्यासारखा बोंबलतो- मला राणीला बघायचंय. आढेवेढे घेत त्याला दाखवतातही, पण आरशातून मोजून तीन सेकंद>>>>>

राणीच्या जागी कुणी दुसरी दाखवली असती तर त्याला कळले असते का?

किंवा पत्नीच्या ऐवजी दाखवली म्हणून त्या बाई ला पत्नीचा दर्जा देणे आले,म्हणजे नागमतील अजून कंपिटिशन
उगाच कशाला ,

त्यांच्या उसुलांच्या विरुद्ध असेल ते ...

हो, ह्यांनी ठेका घेतलेला उसुलांचा... चुकीचे उसूल चुकीच्या जागी पाळण्याचा..

सिम्बा अन् साधनातै, दोघांचंही म्हणणं पटलं.

राणीच्या जागी जर दुसरी कोणी आणून ठेवली असती, तर बहुतेक खिलजीला कळलंही नसतं. पण इतिहास झाला इतिहासजमा. काही म्हणतात तिला दाखवलं होतं पाण्याच्या पात्रात. काही म्हणतात खिलजीनं तिचं चित्र पाहिलं होतं. खरं खोटं देव जाणो.

चरप्स, पद्मिनीच नावाची कोणी असेल नसेल.. पण 13व्या शतकात जे घडत होते तो इतिहास टळत नाही. 13व्या शतकात मानापमानाच्या कल्पनांनी डोके फिरवून घेऊन माणसांनी स्वतःच्याच प्रांताविरुद्ध इतरांना उकसवले. आपला ज्यांनी अपमान केला त्यांची राखरांगोळी झाल्याशिवाय मनातली बदलेकी आग विझणार नाही यावर विश्वास ठेवला.. इंग्रजीत एक म्हण आहे, don't cut your nose off to spite your face. पद्मावत बघून एवढे कळले तरी पुरेसे होईल.

आपला ज्यांनी अपमान केला त्यांची राखरांगोळी झाल्याशिवाय मनातली बदलेकी आग विझणार नाही यावर विश्वास ठेवला.>>>>

वाक्यात भूतकाळ न वापरता वर्तमानकाळ वापरला असतात तरी प्रतिसाद फिट्ट बसला असता,

>>>>>. 13व्या शतकात मानापमानाच्या कल्पनांनी डोके फिरवून घेऊन माणसे स्वतःच्याच कुटुंबियांविरुद्ध गुन्हे करतात. आपला ज्यांनी अपमान (?) केला त्यांची राखरांगोळी झाल्याशिवाय मनातली बदलेकी आग विझणार नाही यावर विश्वास ठेवतात.. >>>>

पायरेटेड कॉपी पाहिलीत असे पब्लिकली लिहू नका. मला वाटते तो कायद्याने गुन्हा आहे. जाणकार प्रकाश टाकतील.

त्याचं काय आहे डाऊनलोड सब करतें है लेकीन बताता कोई नही
>>> नाही करत हो सगळे. मुळात तुम्ही थिएटर प्रिंट बघितली ते पण पायरेटेड, वर इकडे येऊन खुले आम सांगताय.. वर म्हणताय सगळेच डाउनलोड करतात. हे जरा जास्त होतय.
रूनमेश शी सहमत..

आणि भन्साळीने कसला इतिहास बदललाय.. तुम्हाला माहीत नाही का हा इतिहास नाहीय आणि काल्पनिक गोष्ट आहे. एका काव्यावर आधारित.
आता करणी पण मागे हटले आहेत, कौतुक करतायत पिच्चर चे.

हा इतिहास आहे की नाही यावर दुमत आहे. जर माझं वक्तव्य आक्षेपार्ह असेल तर कट करते ते. आणि भन्साळींसारखा डिस्क्लॅमर देते - याचा आणि वास्तवाचा काडीमात्र संबंध नाही. मग ठीक. Happy

बदल केलाय. चूक दाखवून दिल्याबद्दल ऋन्मेष आणि च्रप्स तुम्हाला मनापासून धन्यवाद. Happy
मी दिलगिरी व्यक्त करते. आणि हो, मूव्ही युट्युबवर पण आलीय म्हणजे माझी चूक गुन्हा म्हणता येणार नाही.

पिझ्झातली साखर ..!!
लिहिण्याची पद्धत लय भारी आहे...!

पिझ्झातली साखर ..!!
लिहिण्याची पद्धत लय भारी आहे...!>>>> धन्यवाद.... Happy विनोदाचं कधीमधीच सुचतं ,पण...