ज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य प्रश्न

Submitted by डॉ रवी१ on 27 January, 2018 - 11:09

ज्येष्ठत्वामुळे अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, उदाहरणार्थ डोळ्याचे, ह्रदयाचे, अस्थि, सांधे, दात, मूत्रपिंड, यांचे, मधुमेह, रक्तदाब-वाढीचा, मेंदू व मानसिक –हासात्मक विकार इ.त्यास आहार, विहार, व्यायाम यासंबंधी, नेहमी आरोग्य तपासणी आवश्यक आहे.आपण क्रमाक्रमाने यथावकाश या प्रश्नांसंबंधी चर्चा करुया.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) कोमट मिठाच्या पाण्याने डोळे रोज धुणे, गुळण्या करणे याने फार फायदा होतो.
२) अर्धा कप दूध आणि अर्धे केळं खाल्याने हातपाय दुखायचे बंद होतात.
३) प्रत्येक जेवणाबरोबर अर्धा चमचा/दोन चिमटी त्रिपळा चूर्ण घेतल्याने खोकला/दमा होत नाही, बिपी वाढत नाही - असलेले कमी होते.

चांगला विषय डॉ. रवी.

पुढिल माहितीच्या प्रतिक्षेत.

प्रोस्टेट संबंधीचे आजार टाळण्यास काय करता येइल?

प्रोस्टेटचे विकार सहसा टाळता येणे कठीण असतात, कारण वय कोणाला रोखता येत नाही नं!
पण जास्ती वाढू लागल्यास वेळोवेळी तपासणी करुन घ्यावी हे उत्तम! सर्वांची प्रोस्टेट्स वाढतात, पण
कमी जास्ती प्रमाणात, ब-याचदा कमी प्रमाणात वाढलेली असतात. त्यांचा थोडासा त्रास सुरु झाल्यास डॉ कडून
तपासणी केल्यास पुढचा त्रास वाचू शकतो, हे मात्र निश्चित.

*तसा अनुभव आहे का Srd?*
- हो.

रोग दाबून टाकणारी औषधे घेण्यापेक्षा शरीरातील त्याज्य वस्त बाहेर पडणाय्रा वस्तूंचे सेवन,मदत करणारी गोष्ट करणे उपयुक्त असते.

साधासुधा ताप असल्यास साखर घातलेले गरम पाणी एकेक तासाने कपभर घेत रहावे. पाचसहा तासांनी ताप उतरू लागतो. थकवा न येता काम होते. एकदम गोळ्या घेण्याची घाई करू नये. शरीराची विरोधक शक्ती मारू नये.

काही होमेओपथिक औषधामुळे ताप दाबला जात नाही, तर तो प्रतिकारशक्ती वाढत जावून ताप जाऊ शकतो.
तुम्ही म्हणता ते बरोबर असेलही, पण त्याला शास्त्रीय आधार असायला हवा. अनेक लोकांच्यावर वापरून सिद्ध
व्हायला हवे असते. Srd, तुम्हाला याचा अनुभव किती लोकांच्यावर वापरून आहे?

**पण त्याला शास्त्रीय आधार असायला हवा.**

- हे मी घरी ट्राइ केलेलं आहे आणि वृद्धांचे आरोग्य यासाठी चालणार आहे याचे कारण वेळ त्यांच्याकडे असतो,औषधं घेऊन कुठे परीक्षेला जाणं,नोकरीत रजा न घेणं हे अपेक्षित नसतं. तापामध्ये जी अशुद्ध द्रव्ये तयार होतात ती पाच सहा तासांच्या पेयानंतर लघवी सुरू होऊन बाहेर पडू लागतात आणि बरे वाटू लागते. शिवाय आपल्या साध्या दुखण्यांवर सोपे उपाय आपल्याकडेच आहेत ही भावना तयार होते.
एका डॅाक्टरकडे पेशंट गेल्यावर तो कधी असे उपाय सांगू शकणार नाही त्याला हे खरं आहे.
होमिओपथी औषधे आहेत हे खरं आहे परंतू इथे ट्रीटमेंट सांगणे बरोबर नाही.

**इतरांचे अनुभव~~**

बरोबर. त्यामुळे हे मी आश्रमातले ( डॅक्टराने सांगावे असे) उपचार म्हणत नाही तर घरात असणारे वृद्ध आहेत त्यांनी स्वत: करून अनुभव घ्यायला हरकत नाही.