नकी-३

Submitted by द्वादशांगुला on 19 January, 2018 - 04:32

हा नकी कथेचा शेवटचा भाग असेल.
नकी भाग-१
https://www.maayboli.com/node/64829नकी भाग-२
https://www.maayboli.com/node/64900

नकी-३ (अंतिम भाग)

सूर्य मावळतीला आला होता. नकी अजून मुसमुसत होती. हुंदके देत होती. तिला काही सुचेनासं झालं होतं. तिला बक्कीचं असं अचानक जाणं सहन झालं नव्हतंच, पण त्यापेक्षाही कित्येक पटीने तिला धक्का बसला होता, तिच्या टोळीच्या वागण्याचा. बक्की -जिनं टोळीच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा केली नाही, तिचं गलितगात्र शव यांनी ओरबाडून खावं? नकीला घृणा वाटत होती या सार्यांची. परत त्या सार्यांची तोंडं बघायची इच्छाही नव्हती तिची. विमनस्क अवस्थेत ती शून्यात बघत बसली होती.

इतक्यात तिला कसलीशी चाहूल लागली. तिनं झपकन मागे वळून बघितलं. मागून भाल्या येत होता, त्याची शेपूट खाली टाकून. तेही दरवेळेसारखं तोंड उघडं ठेवून जिभ बाहेर कढत 'हॅ हॅ हॅ हॅ' आवाज न काढता. बहुधा वाईट वाटलं असावं त्याला. त्याच्या चालण्यावरून, देहबोलीवरून हेच जाणवत होतं. नकीशी फटकून वागलो ,याचं त्याला वाईट वाटत असावं. पण त्याची मनःस्थिती जाणून घ्यायला नकी कुठं तयार होती? त्याला पाहून नकीचं पित्त खवळलं. नकीच्या चेहर्यावर राग, तिरस्कारमिश्रित भाव होते. तिचा राग उफाळून आला होता. तिचे रापलेले मळकट गाल रागाने लाल झालेहोते. चिमुकल्या डोळ्यांत किंचित पाणी आणि समोरच्याला जणू खाक करून टाकेल एवढा विखार होता, पहिल्यांदाच. तिचे काळपट ओठ रागाने थरथरत होते. तिची वेड्यावाकड्या काळ्या पडलेल्या नखांसह बोटेही थरथरत होती .

तिला एवढ्या रागात पाहून भाल्या चक्रावलाच. तिने खाताना मध्येच लुडबुड केल्यास क्षणिक रागाने तिला ढकलणे काही भाल्यासाठी नवीन नव्हते. मात्र आजचे तिचे वागणे भाल्यासाठी पूर्णपणे नवीन व गोंधळात टाकणारे होते. नकी का रागावलीय हे त्याला कळेना.
भाल्यानं मान तिरकी केली. सावकाश चालत तिला न्याहाळत तो तिच्यापाशी गेला. तिचा थरथरणारा हात चाटू लागला. त्याच्या जिभेच्या ओल्या स्पर्शाने नकी भानावर आली. काही कळायच्या आत अचानक तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली,

"जाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"

तिचा मोठा आवाज शांतता चिरत गेला. आसपासच्या घरट्यातले पक्षी पंख फडफडत ओरडत उडाले. भाल्या तिच्या अचानक ओरडण्याने दचकला. चार पावलं मागे सरला. नकीचा श्वास वाढला होता. काही कळायच्या आतच तिने विरूद्ध दिशेने धाव घेतली, बहुधा कधीच परत न येण्यासाठी .............!

तसं पाहता त्या रानटी कुत्र्यांची बक्कीच्या शवाशी वागणुक पूर्णपणे नैसर्गिक होती. त्यांच्या जगात ती शम्य होती. पण नकीला कुठं कळत होतं हे? ती जरी त्या रानटी कुत्र्यांतली एक बनली होती, तरी होती माणूसच ना....!
●●●

ती गुहा, ते रान, तो अविश्वासानं तिच्याकडं बघणारा भाल्या , सारं सारं मागे पडलं होतं. नकीनं वेगळ्याच जंगलात प्रवेश केला होता. नकीला एक ओढा दिसला. भरपेट पाणी प्यायली ती. ताजंतवानं वाटलं तिला. मनातलं मळभ दूर केलं तिनं. राहायची तजवीज केली तिनं एका सुरक्षित वळचणीला. पोटातले कावळे कावकाव करू लागले तशी तिनं ओळखीची कंदमूळं हुडकून खाल्ली.

नकी इथे रूळली होती. तिनं अजून कोणता प्राणी मारून खायला सुरूवात न केल्यामुळे या रानातल्या प्राण्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. तरीही कोणी तिच्या मागे लागलं की लपून बसायची. कुत्र्यांत राहून तिचं नाक दूरचा वासही ओळखू शके. राहून राहून तिला बक्की,भाल्या, बिट्ट्या, मन्या,चंदू, डूरू, पिमी, नीनी,भुरी, ढेरू आणि गोंडस पिलावळीची आठवण यायची. रडत राहायची ती मग. परतीचा रस्ता तरी कुठं माहीत होता तिला..!!

एक दिवस खाणं शोधत असताना ती जरा लांब आली होती. नकीला अचानक एक अनोळखी वास स्पष्टपणे जाणवला. ती सावध झाली. ती अधिक हुंगू लागली. वासाच्या विरूद्ध दिशेने पळाली अन् एका दगडामागे लपून बसली. कुतूहलानं समोरची पायवाट न्याहळू लागली. थोड्याच वेळात काही नकीच्या दिशेने येणार्या आकृत्या तिच्या दृष्टिक्षेपात आल्या.

काही माणसं होती ती...! तो गिरीभ्रमण करायला आलेल्या १०-१२ लोकांचा ग्रुप होता . सोबत एक गाईडही होता. हसत- खिदळत , फोटो काढत ते चालत होते. गाईड मार्गदर्शन करत होता. इतक्यात नकी त्यातल्या कणाच्यातरी लक्षात आली

. ती व्यक्ती ओरडली, " हेऽय गाईज , सी दॅट....!!"

तो गाईड उद्गारला, " ए मोगली गर्ल......!! मी हीला इथे याआधी कधीच पाहिलं नाही....."

या लोकांच्या विक्षिप्त दिसण्यामुळे, प्रतिक्रियांमुळे नकी चुळबुळू लागली. गाईड एव्हाना पोलिसांना फोन लावत होता. हे लोक नकी काहीही करत नसल्याचे पाहून तिला हाका मारत होते, जवळ बोलवत होते.
तिला बिस्कीटांचं आमीष देत होते. नकी हळूहळू मागे सरकत होती. दात विचकत गुरगुरत होती. त्या लोकांनी फेकलेली बिस्कीटं, चपात्या, वेफर्स, चाॅकलेट काही ती खाईना. मग त्यातल्या कोणीतरी तिच्या दिशेला गावात विकत घेतलेला रानमेवा फेकला. तो तिनं हुंगला न् खाल्ला.

एवढ्याला पोलिसही आले होते सोबत एक रेस्क्यू टीम घेऊन. पहिल्यांदा तिला त्यांच्याकडची फळं खा घातली. त्यांनी नकीच्या नकळत तिला घेराव घातला. नकी घाबरली अन् पळू लागली. पण त्या फळांनी आपला असर लवकरच दाखवला होता. नकीला गुंगी येऊ लागली. ती लवकरच बेशुद्ध झाली.

तिला शुद्ध आली तेव्हा ऐका दवाखन्यात होती . तिला एका अनाथाश्रमात पाठवलं गेलं अन् मग कोणीतरी तिला दत्तक घेतलं. तिच्यात बरीच सुधारणा झाली होती. अखेर नकीला एक परिवार मिळाला होता, माणसातला.

●●●समाप्त●●●

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आबासाहेब , वावे प्रामाणिक प्रतिसादाबाबत धन्यवाद.
पहिलीच कथा आहे ही ... पुढच्या वेळी लक्षात ठेवीन.

छान आवडली कथा. तीनही भाग आजच वाचले.. उत्सुकता वाढवणारी वेगळी कथा Happy

सरधोपट शेवटाबाबत मात्र सहमत.. अगदी त्या दोन लाईनीत केलेल्या पुनर्वसन उल्लेखाला टाळून ते वाचकांवरच सोडले असते तरी चालले असते.. मनुष्यांशी तिचे झालेले इंटरअ‍ॅक्शनचा प्रसंग खुलवून तिथेच कुठेतरी थांबवता आली असती तरी चालले असते.. हे माझे मत.. असंच उगाचच Happy

लिहीत राहा.. लिखाणशैली अजून अजून चांगली होत जाईल .. पुलेशु

प्रामाणिक प्रतिसादाबाबत धन्यवाद ऋन्मेऽऽष! आपण सुचवलेला शेवट योग्य वाटतो.

लिहिताना जरा आणखी मोठी करावी कथा, असं होतं मनात. खरंतर शेवट आणखी वेगळा करायचा होता. पण पुढील भाग परत केव्हा टाकेन याची शाश्वती नव्हती, परीक्षा सुरू असल्याने. आणि वर हा भाग चक्क झोपेच्या गुंगीत लिहिलेला. म्हणून माझेही ह्या भागाबाबत चांगले मत नाही. आणि हो, हा सरधोपटपणाचा आरोप मला मान्य आहे. पुढच्या वेळेला दक्षता घेईन नक्की.