आरती गणपतीची

Submitted by कनू on 24 August, 2017 - 07:28

नमस्ते मित्र मैत्रिणींनो,

ही गणपतीची आरती माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी रोज म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.
तुम्हाला आवडल्यास तुम्हीही म्हणू शकता.

जय देव जय देव जय ओंकार रूपा
आरती ओवाळिता नुरविशी पापा || धृ ||

विश्वस्वरूपा तुजला स्थापू मी कोठे
आवाहन करू कैसे संमंतपी थाटे
तव निज महिमा आठविता तर्को दधि आटे
पाहुनी अद्भुत शक्ती आदर बहू वाटे || १ ||

अपार महिमा तुझा न कळे कवणासी
धर्म विचारी थकले गम्य न परी त्यासि
तीर्थाटन करिती रामेश्वर काशी
परी न च शांती लाभे चंचल चित्तासी || २ ||

काया वाचा मनहि तव सेवे लागो
जो तू सत्पथ दाविसी त्या मार्गे वागो
तव गुण चिंतनी मन्मनी आनंदे जागो
सज्जन संगती देई वर निशिदिनी मागो || ३ ||

नरहर गोविंद मायदेव
७-१०-१९२६

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आरती.
एक शंका- संमंतपी म्हणजे काय?