
ईंग्रजी नवीन वर्षाला एक हिंदू, किंवा एक भारतीय म्हणून विरोध करणे हे काही नवीन नाही. ईंग्रजी कॅलेंडरनुसार वाढदिवस साजरा करणार्यांना अचानक २७-२८ डिसेंबर उजाडता उजाडता साक्षात्कार होतो की हे ख्रिश्चनांचे नववर्ष आहे. मग अश्या मेसेजेसचे जे पेव फुटते ते ३१ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत चालू राहते. त्यानंतर मात्र मध्यरात्रीच्या भयाण गोंधळात दारूच्या पुरात सारेच वाहून जाते. १ जानेवारीची सुट्टी आदल्या रात्रीच्या हॅंगओवरसह सारेच एंजॉय करतात. पण यावेळी मात्र वारे किंचित वेगात वाहताना दिसत आहेत. ‘मेरा देश बदल रहा है’ हे फेसबूकवर सुद्धा जाणवू लागलेय. ज्या लोकांकडून, माझ्या ज्या मित्रांकडून मी कल्पनाही केली नव्हती असे कित्येक जण या ख्रिस्ती नव वर्ष विरोधात आपले प्रोफाईल पिक बदलून त्यावर गुढीपाडवा हेच आमचे नवीन वर्ष असे अभिमानाने सांगू लागले आहेत. ""कृपया मला १ जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ नका. मी मराठी माणूस आहे, ख्रिश्चन नाही."" असे मेसेज कित्येकांच्या वॉलवर दिसू लागले आहेत.
एकीकडे मराठी शाळांची दुरावस्था आणि सारेच जण आपल्या मुलांना ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकत असताना मध्येच हे मराठी प्रेम आणि हा मराठीचा अभिमान नवीन वर्ष साजरे करण्यावरून कसे उफाळून आलेय हे समजत नाही. खरेच आतून आले असेल तर चांगलेच आहे. फक्त आता कुठवर टिकतेय हे बघायचेय.
बाकी आपला ३१ डिसेंबर कसा आहे?
माझा तर बाबा असा आहे ..

(सारेच फोटो फेबूवरून)
ऋन्मेष
साधना, छान पोस्ट.
साधना, छान पोस्ट.
से नो टू वाला धागा असला तरीही... सर्वांना नूतन वर्षाच्या खूप शुभेच्छा!!
साधना,
साधना,
>>>
का सांगताहेत हा माझा प्रश्न आहे.
>>>
आणि सांगितले तर त्यात गैर काय हा माझा प्रश्न आहे
किंबहुना वर मी जे शाकाहाराचे उदाहरण दिले आहे त्यानुसार सांगणे गरजेचे नाही का की तुम्ही मांसाहार करत नाही किंवा अमुकतमुक तारखेपासून करायचे सोडून दिले आहे. किंवा मांसाहार करता पण अमुकतमुक वाराला खात नाही.
आपल्या समाजात कुणी काही साजरे करत असेल, आनंद व्यक्त करत असतील तर आपण त्याच्याकडे 'हे आमच्यात नाही' म्हणत पाठ का फिरवावी हा माझा मुद्दा आहे.
>>>
ईथे किती लोकं मुसलमानांचे सण त्यांच्यात मिळून मिसळून तितक्याच आनंदाने साजरे करतात आणि किती जण त्याकडे पाठ फिरवतात हे जाणून घ्यायला आवडेल.
गेला बाजार बकरी ईदला बकरी कापून किती जण खातात हे तरी समजेल का?
उगाच का ते सर्वधर्मसमभावाचे आपल्या सोयीनुसार ढोंग करायचे?
म्हणजे तुम्हाला दारू पित नाचत गात पार्टी करत ईंग्रजी नववर्ष साजरे करायचे आहे म्हणून फक्त तुम्हाला सर्व समाज एकत्र वगैरे आठवणार का?
वॅलेंटाईन डे ला मौजमजा, तरुणाईला धमाल मस्ती करायची आहे म्हणून तिथे तुमची संस्कृती, आमची संस्कृती वगैरे काही नसते हे आदर्श विचार सुचणार का?
जे सण आपल्याला साजरे करायला झेपत नाही तेव्हा मात्र त्यांचा त्रास होणार, किंवा ते आपले नाहीत अशी भुमिका घेणार, तेव्हा जातीधर्माच्या भिंती आड दडून राहणार.. मला तर हा सर्वा दुटप्पीपणा, ढोंगीपणा वाटतो.
थोडक्यात आपल्याला मौजमजा संस्कृती हवी आहे. ते कबूल करावे. उगाच सामाजिक सलोखा जोपासायला वगैरेचा आव आणू नये ..
असे मला वाटते
बाकी खिस्टी मिशनरीज सामदाम वापरून लोकांना कन्व्हर्ट करतात, त्याचा निषेध म्हणून तुम्ही हे करत असाल >>>>>> मी धर्मच मानत नाही तर मला या धर्मांतराचे कसले कौतुक. बाकी से नो टू थर्टी फर्स्ट म्हणायची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात. हे देखील एखाद्याचे कारण असू शकते. आपल्याला काय
से नो टू वाला धागा असला तरीही
से नो टू वाला धागा असला तरीही... सर्वांना नूतन वर्षाच्या खूप शुभेच्छा!! Happy
>>>>
अहो, सेनो टू ३१ डिसेंबर आहे.... १ जानेवारीला नूतन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे
अवांतर - यावेळी ते नूतन आणि वर्षा उसगावकरचे जोडफोटो जास्त दिसण्यात आले नाहीत... काय माहीत आलेही असतील, मी भितीने सकाळपासून व्हॉटसप उघडलेच नाहीये
ईथे किती लोकं मुसलमानांचे सण
ईथे किती लोकं मुसलमानांचे सण त्यांच्यात मिळून मिसळून तितक्याच आनंदाने साजरे करतात आणि किती जण त्याकडे पाठ फिरवतात हे जाणून घ्यायला आवडेल.
गेला बाजार बकरी ईदला बकरी कापून किती जण खातात हे तरी समजेल का?>>>>>
ईदला शिरकुरमा कधी मिळतोय याची वाट सारेच पाहत असतात. शेजारी, ऑफिसात कोणी मुस्लिम असेल तर हक्काने शिरकुरमा मागितला जातो. मला प्रचंड आवडतो आणि तोही कुण्या मुस्लिमाने बनवलेलाच. मला रेसिपी माहीत आहे, मी कर्तेही पण त्यात ती मजा नाही.
शीरखुर्मा मलाही फार आवडतो.
शीरखुर्मा मलाही फार आवडतो.
त्यापेक्षा जास्त आवडते ती बकरी ईदची कुर्बानी दिलेली बकरी. मस्त काजूबदाम खिलवून पोसलेली. आहाहा काय चव असते त्या मटणाला. जसा आपला सत्यनारायणाचा प्रसाद भारी लागतो तसे ते मटण भारी लागते. आम्ही दक्षिण मुंबईतच राहत असल्याने त्या दिवशी आमच्याकडे कच्चे मटण ढिगाने येते. आम्ही आमचे नेहमीचे मसाले वापरून करतो. पण नेहमीपेक्षा तो चवीतला अफाट फरक नुसत्या वासानेच जाणवतो. पुढचा आठवडाभर पुरते. एकेक फोड मिठाई खाल्यासारखी मजा करत खातो मी
पण म्हणून जे हलालचे मटण आम्हाला नको म्हणून नकार देतात त्यांना मी दोष देणार नाही. फार तर सहानुभुती व्यक्त करू शकतो की तेवढ्या भारी मेजवानीला मुकतात
मला बेबी गोट चे मटण आवडते..
मला बेबी गोट चे मटण आवडते.. ईद मधले.
Happy New Year.
Happy New Year.
ऋ तुझा वाढदिवस तिथीने तुला तुझ्या पत्रिकेत मिळेल. तुझी पत्रिका आहे आणि ती gf च्या पत्रिकेशी जुळते की नाही आणि त्यात काय काय आहे ते तू मागे धागा काढून लिहिलं होतंस. त्यामुळे नक्की तिथे कळेल तुला.
वसईतले ख्रिश्चन मराठीच बोलतात जास्त किंवा त्यांची एक बोली आहे जी मराठीला जवळची आहे, ती ऐकायला येते. बरेच जण मराठी मिडीयममध्ये शिकलेत आधीच्या पिढीतले. तिथल्या होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मराठी मिडीयम आहे. पूर्वी काही वर्ष नालासोपारा इथे राहिल्याने जवळून बघितलं आहे सर्व.
चर्चमध्ये वेगवेगळ्या
चर्चमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये मास असतो. इंग्रजी, कोंकणी, मराठी, हिंदी. त्यातलं मराठी अतिशय सुंदर वाटतं, उच्चारही.
चर्चमध्ये वेगवेगळ्या
चर्चमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये मास असतो. इंग्रजी, कोंकणी, मराठी, हिंदी. त्यातलं मराठी अतिशय सुंदर वाटतं, उच्चारही.
>>>>
ग्रेट हे ऐकून ख्रिश्चन धर्माबद्दलचा माझा आदर वाढला. धर्म असा सर्वसमावेशक असावा. परधर्मीयांना त्यांच्या भाषेसह स्विकारणारा. त्यांच्या मातृभाषेचा आदर करणारा.
बरं. मंगळसूत्र घालणार्या
बरं. मंगळसूत्र घालणार्या ख्रिस्ती स्त्रियाही असतात .
बरं. मंगळसूत्र घालणार्या
बरं. मंगळसूत्र घालणार्या ख्रिस्ती स्त्रियाही असतात.
>>>
हे चुकीचे आहे. हे ख्रिश्चनांनी टाळायला हवे.
तुम्ही दुसरया धर्मातील बंधनकारक प्रथा आपल्या धर्मात आणू नयेत.
पोर्तुगीज लोकांमुळे वसई आसपास
पोर्तुगीज लोकांमुळे वसई आसपास काही समाजातील काही लोकं ख्रिस्ती झाले. पण तेव्हा त्यांना त्याचाच पेहराव घालायला अनुमती दिली फक्त कपड्याचा रंग लाल असावा असं सांगितलं गेलं त्यामुळे त्यांचा पेहराव तोच राहीला, दागिने पण रोज घालायचे तेच राहीले. खाण्याच्या सवयी पण त्याच, त्यात थोडं पोर्तुगीज अॅडीशन झालं. फक्त. बरीच संस्कृती जुनी अजूनही टीकवून आहेत ते. लोकसत्तेत हल्ली लेख आलेत. मधे टीव्हीवर पण दाखवलं. तिथून मराठीतून अंक निघतो सुवार्ता, दिवाळी अंक स्पेशल असतो, ख्रिसमस स्पेशल असतो. अजून हल्ली काही निघालेत मराठीतून, तिथल्या बोलीभाषेतून.
तिथल्या एका धर्मगुरुंनी संतसाहीत्यात पी एच डी केलीय, तुकाराम महाराज का ज्ञानेश्वर आठवत नाहीये त्यांचं नाव
नक्की आठवत नाहीये, फ्रान्सिस दीब्रिटो असावेत बहुतेक. वसई आणि आसपास धर्मगुरुंपासून सर्व मराठी भाषेचा आदर करतात.
https://www.loksatta.com/thane-news/christmas-celebration-in-vasai-2-160...
https://www.loksatta.com/thane-news/marathi-articles-on-christmas-magazi...
हे वाच जरुर. काही लिंक्स दिल्या. बाकी अजून लोकसत्तेत लेख आहेत,
साउथ मुंबईत राहणार्यांना वसई
साउथ मुंबईत राहणार्यांना वसई म्हणजे अंटार्टिका वगैरे!!
(No subject)
वसईतल्या ख्रिश्चन कम्युनिटीबद्दल ऋ ला अजिबात माहीती नाही याबद्दल मलाही थोडं आश्चर्य वाटलं, कारण मराठी पेपरमध्ये वगैरे मी फार लहानपणापासून वाचलंय, बालपण डोंबिवलीत त्यामुळे वसई अगदी जवळ नव्हतं तेव्हा.
मराठी पेपरमध्ये वगैरे मी फार
मराठी पेपरमध्ये वगैरे मी फार लहानपणापासून वाचलंय >> आता, 'ऋ काही वाचत नसतो, कारण ऋ ला वाचायला लोक येतात' अश्यासारख्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे.
Bha
Bha
पूर्ण दक्षिण भारतात तमिळिअन
पूर्ण दक्षिण भारतात तमिळिअन आंध्रा आणी केरळाइट ख्रि स्चन मी स्वतः पाहिले आहेत त्यांच्या घरी राहिले पण आहे.
तमीळ बोलतात, गावाकडचे व शहरी तेलुगु बोलतात. राज शेखर रेड् डी एक्स सीएम व त्यांची फॅमिली काही रेड्डी कुटुंबे आहेत रा राजा ख्रिस्तुडु व इतर तेलुगुतून प्रार्थना आहेत केरळा त तर गल्लो गल्ली मेरी ख्रिस्ताच्या बारक्या मूर्ती व तिथे दिवे लावलेले असतात आपल्या बांद्र्यासारखेच. सर्व सण उत्साहात साजरे होतात. सर्व भाषांतून प्रारथाना होत असतात. सर्मन मलयालम मधून असते. गॉड ऑफ स्मॉल थिंग वाचले नाही का? ओपनिंग सीन चर्च मध्येच आहे.
आमच्या व्हेट च्या तिथे. ती ख्रि स्चन आहे, येशू चा हातात कोव ळे गोड कोकरू घ्येतलेला फोटो आहे तिथे मी सुद्धा अनेक वेळा प्रार्थना केली आहे. सेंट फ्रान्सिस ऑफ असिसि हा प्राणि मात्रांचा संत मानला जातो मग मी प्रेयर करणा रच.
वारंगळ, वैलंकन्नी माता इथे प्रसिद्ध चर्चेस आहेत .
मंगळसूत्र घालणार्या ख्रिस्ती
मंगळसूत्र घालणार्या ख्रिस्ती स्त्रियाही असतात.>>>>
माझा एक मित्र ख्रिश्चन आहे. त्याच्याकडून समजलेली त्यांची आणखी एक प्रथा अशी. एका ठराविक कालावधीत ते महिनाभर पूर्ण शाकाहार घेतात. त्यानंतर एक दिवस घरात गोडा-धोडाचे पदार्थ बनवून येशूला अर्पण करतात. आणि त्यादिवशी (आपल्याप्रमाणे) खाली मांडी घालून बसून केळीच्या पानात जेवतात. (त्याने नेमके शब्द सांगितले होते, पण आता मला ते आठवत नाहीत, त्याबद्दल क्षमस्व!) (त्याने परवानगी दिल्यास त्याचा या कार्यक्रमातील फोटो येथे टाकेन!)
भास्कराचार्य
भास्कराचार्य
पण खरे आहे, मी कमीच वाचतो.
वसईच्या ख्रिश्चन संस्कृतीबद्दल वाचले नाही पण एका नाताळच्या सणाला अनुभवले आहे. एका मित्राच्या ओळखीच्या फादरने त्याला नाताळ निमित्त वसईतील चर्चमधील कार्यक्रमाला बोलावले होते. आमच्या डोळ्यासमोर तोकड्या स्कर्टमधील गोरयापान मारीया, ज्युलिया, ख्रिस्तियाना, तानिया, रीटा, मार्गारीटा, सेलेना, एंजेलिना नामक ख्रिश्वन मुलींची रांगच तरळली आणि आम्ही त्या मित्रासोबत टकाटकमध्ये कपड्यांना ईस्त्री वगैरे करत रात्री अकराच्या सुमारास वसईला पोहोचलो. पण....
मी आजवर माबोवर लिहिला नाही का हा अनुभव? नसेल तर थोडक्यात सांगायचा नाही. यावर स्वतंत्र धागा यायला हवा.. जमल्यास विकेंडला लिहितो!
तुर्तास विषयाला अनुसरून ईतकेच की ईंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. आपल्यातील काही जणांचे धर्मांतर केले. म्हणून हे मराठी भाषिक ख्रिश्चन.
तर ख्रिश्चनांनी मराठी भाषा स्विकारली नसून काही मराठी भाषिकांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे.
ज्यांनी तो नाही स्विकारला त्यांना मी मराठीच आहे सांगत 31 डिसेंबरला नकार द्यायचा अधिकार आहे.
{ज्यांनी तो नाही स्विकारला
{ज्यांनी तो नाही स्विकारला त्यांना मी मराठीच आहे सांगत 31 डिसेंबरला नकार द्यायचा अधिकार आहे.}
अजून पुरेसे प्रतिसाद आले नाहीत का? की पुढच्या ३१ डिसेंबरपर्यंत चालवायचाय धागा?
नवीन वर्षाचं calendar आणू नका. पंचांगच पहा. दैनंदिन वापरात तिथी लिहा. वाढदिवसतर तिथीप्रमाणेच.
पुढे जाऊन कपडे बदला. धोतर, कुडतं, बंडी घाला. टोपी किंवा अन्य शिरस्त्राण मस्ट.
मराठी पेपरमध्ये वगैरे मी फार
मराठी पेपरमध्ये वगैरे मी फार लहानपणापासून वाचलंय >> आता, 'ऋ काही वाचत नसतो, कारण ऋ ला वाचायला लोक येतात' अश्यासारख्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे. >>>
पुढे जाऊन कपडे बदला. धोतर,
पुढे जाऊन कपडे बदला. धोतर, कुडतं, बंडी घाला. टोपी किंवा अन्य शिरस्त्राण मस्ट.>> आणूमोदन. कप्डे बदलून पुढे जा. जास्त रेफेरन्स साठी गफ्रे बरोबर भाउ दाजी ला ड मुझीअम ला जाउन तेथील फुल नौ किलोचे चिलखत व साउथ
मुंबईतील ओरिजिनल लोक्स कसे ़ कपडे घालत असत ते पुतळे बघून घ्या.
बरं. मंगळसूत्र घालणार्या
बरं. मंगळसूत्र घालणार्या ख्रिस्ती स्त्रियाही असतात .>>>> मी मंगळसुत्र घालणार्या मुस्लिम बायका सुद्धा पाहिल्या आहेत. भलेही त्या त्यात श्रद्धा बघत नसतील पण विवाह झाला आहे म्हणून हा दागिना घातलाय अशी त्यांची समजूत असावी. आणी मुस्लिम नवरे, सासवा सुद्धा त्यात हरकत घेत नाहीत/ नसावेत. महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त आहे. मात्र महाराष्ट्राबाहेर जास्त न फिरल्याने बाकी माहीत नाही.
मुस्लिम असो वा ख्रिश्चन, ज्या प्रांता त रहातात तेथिल बोली बोलतातच. बांगलादेशचेच बघा. मुस्लिम बहुसंख्य असुनही मातृभाषा म्हणून ते बंगालीच बोलतात. माझ्या नवर्याचा मुस्लिम मित्र हैद्राबादचा, त्यामुळे घरात नाश्त्याला कायम डोसा, चटणी व इडलीच असते.
बरं. मंगळसूत्र घालणार्या
बरं. मंगळसूत्र घालणार्या ख्रिस्ती स्त्रियाही असतात.
>>>
हे चुकीचे आहे. हे ख्रिश्चनांनी टाळायला हवे.
तुम्ही दुसरया धर्मातील बंधनकारक प्रथा आपल्या धर्मात आणू नयेत.>>>>> अय्यो रामा! ऋन्मेष, ह्या बाबतीत कुठलाच भारतीय तुझे ऐकणार नाही, मग भलेही तो किती कट्टर का असेना. मी बरीच उदाहरणे पाहिली आहेत अदला बदलीची आणी श्रद्धेची. श्रावण सोमवारी तुफान गर्दीमुळे दर्शन मिळेना, तर आमच्या कॉलेज मधील एका मुस्लिम मुलाने मंदिरा समोर अंगात आल्याचे सोंग आणले. लोक आश्चर्याने बाजूला सरकले तोपर्यंत तो मुलगा आणी त्याचे मित्र आत जाऊन दर्शन पण घेऊन आले. गंमत म्हणजे मग देवी अंगात येते, शंकर कसा येईल अशा विचाराने नंतर लोक खजील झाले. आजही ते आठवले तरी हसु येते.
मंगळसूत्र घालणार्या ख्रिस्ती
मंगळसूत्र घालणार्या ख्रिस्ती स्त्रियाही असतात >>> मी मंगळसुत्र घालणार्या मुस्लिम बायका सुद्धा पाहिल्या आहेत. >>> हुसेन दलवाई यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की आमच्याकडे चिपळूणजवळच्या मुस्लीम समाजात मंगळसुत्र घालण्याची पद्धत आहे, पण हीच्या गळ्यात दिसलं नाही म्हणून तिथे आश्चर्य व्यक्त केलं. त्यांची आणि त्यांच्या बायकोची मुलाखत होती, बायको म्हणाली असलं कुठलंही जोखड मला मान्य नाही म्हणून मी नाही घालत. त्यांची बायको हिंदू आहे.
अहो, सेनो टू ३१ डिसेंबर आहे..
अहो, सेनो टू ३१ डिसेंबर आहे.... १ जानेवारीला नूतन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे Happy>>>>
तेच..... ३१ डिसेंबरला वर्षअखेर म्हणायचे नाही पण १ जानेवारीला नविन वर्षाची सुरुवात म्हणायचे का?
हा रंग काळा नाही, हा रंग पिवळा नाही, हा रंग गुलाबी नाही असे गोल गोल बोलण्यापेक्षा स्पष्टपणे हा रंग पांढरा आहे असे म्हणावे.
बाकी गोल गोल बोलण्यात तू पटाईत आहेस
शेवटी ठरले काय? आज 2 तारीख
शेवटी ठरले काय? आज 2 तारीख आहे
मी आजवर माबोवर लिहिला नाही का
मी आजवर माबोवर लिहिला नाही का हा अनुभव? नसेल तर थोडक्यात सांगायचा नाही. यावर स्वतंत्र धागा यायला हवा.. >>
ह्याच धाग्यासाठी अजुन एक कलम ऐड करता येईल किंवा सेपरेट निघेल ..

रॉ मटेरिअल ( सौजन्य फेसबुक पोस्ट)―
" ३१ डिसेंबरला १९९ देशांत फटाके फुटतात तेव्हा आनंद देतात
मात्र दिवाळीत भारतात फुटतात तेव्हाच कसे बरे प्रदूषण करतात"
हरे राम पुन्हा नवीन धागा.
हरे राम पुन्हा नवीन धागा.
मात्र दिवाळीत भारतात फुटतात
मात्र दिवाळीत भारतात फुटतात तेव्हाच कसे बरे प्रदूषण करतात>>> कारण भारताची लोकसंख्या अफाट आहे आणि प्रत्येकाला फटाके उडवायचे असतात. ते ही भरपूर. कमी फटाके= मनोरंजन, जास्त फटाके = प्रदूषण

Pages