
ईंग्रजी नवीन वर्षाला एक हिंदू, किंवा एक भारतीय म्हणून विरोध करणे हे काही नवीन नाही. ईंग्रजी कॅलेंडरनुसार वाढदिवस साजरा करणार्यांना अचानक २७-२८ डिसेंबर उजाडता उजाडता साक्षात्कार होतो की हे ख्रिश्चनांचे नववर्ष आहे. मग अश्या मेसेजेसचे जे पेव फुटते ते ३१ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत चालू राहते. त्यानंतर मात्र मध्यरात्रीच्या भयाण गोंधळात दारूच्या पुरात सारेच वाहून जाते. १ जानेवारीची सुट्टी आदल्या रात्रीच्या हॅंगओवरसह सारेच एंजॉय करतात. पण यावेळी मात्र वारे किंचित वेगात वाहताना दिसत आहेत. ‘मेरा देश बदल रहा है’ हे फेसबूकवर सुद्धा जाणवू लागलेय. ज्या लोकांकडून, माझ्या ज्या मित्रांकडून मी कल्पनाही केली नव्हती असे कित्येक जण या ख्रिस्ती नव वर्ष विरोधात आपले प्रोफाईल पिक बदलून त्यावर गुढीपाडवा हेच आमचे नवीन वर्ष असे अभिमानाने सांगू लागले आहेत. ""कृपया मला १ जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ नका. मी मराठी माणूस आहे, ख्रिश्चन नाही."" असे मेसेज कित्येकांच्या वॉलवर दिसू लागले आहेत.
एकीकडे मराठी शाळांची दुरावस्था आणि सारेच जण आपल्या मुलांना ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकत असताना मध्येच हे मराठी प्रेम आणि हा मराठीचा अभिमान नवीन वर्ष साजरे करण्यावरून कसे उफाळून आलेय हे समजत नाही. खरेच आतून आले असेल तर चांगलेच आहे. फक्त आता कुठवर टिकतेय हे बघायचेय.
बाकी आपला ३१ डिसेंबर कसा आहे?
माझा तर बाबा असा आहे ..

(सारेच फोटो फेबूवरून)
ऋन्मेष
नवीन वर्षाचं calendar आणू नका
नवीन वर्षाचं calendar आणू नका. पंचांगच पहा. दैनंदिन वापरात तिथी लिहा. वाढदिवसतर तिथीप्रमाणेच.
पुढे जाऊन कपडे बदला. धोतर, कुडतं, बंडी घाला. टोपी किंवा अन्य शिरस्त्राण मस्ट.
>>>>>>
हे म्हणजे मी मांस मटण खाऊन जीव हत्या करणार नाही असे कोणी म्हटले की तू वनस्पती सुद्धा खाऊ नकोस, त्या सुद्धा सजीवच असतात असे म्हटल्यासारखे झाले.
असे टोकाला पोहोचण्यात काय अर्थ आहे?
तेच..... ३१ डिसेंबरला
तेच..... ३१ डिसेंबरला वर्षअखेर म्हणायचे नाही पण १ जानेवारीला नविन वर्षाची सुरुवात म्हणायचे का? Uhoh
>>>>>
अय्यो तो जोक होता हो
आमचे नवीन वर्ष गुढीपाडवाच !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! +७८६
ह्याच धाग्यासाठी अजुन एक कलम
ह्याच धाग्यासाठी अजुन एक कलम ऐड करता येईल किंवा सेपरेट निघेल ..
रॉ मटेरिअल ( सौजन्य फेसबुक पोस्ट)―
" ३१ डिसेंबरला १९९ देशांत फटाके फुटतात तेव्हा आनंद देतात
मात्र दिवाळीत भारतात फुटतात तेव्हाच कसे बरे प्रदूषण करतात"
>>>>>
धन्यवाद अंबज्ञ,
पण मला जे मुद्दे स्वत:ला पटतात त्यावरच मी धागा काढतो. आणि हा मुद्दा पटत नाही.
३१ डिसेंबरला थोड्या काळासाठी आकाशात फटाके फोडतात. आपले दिवाळीत कित्येक रात्री मावळल्यापासून रस्त्यावर नुसता धुमाकूळच चालू असतो. किंबहुना ३१ डिसेंबरला रस्त्यावर फटाके फोडणारेही आपलेच लोकं
शेवटी ठरले काय? आज 2 तारीख
शेवटी ठरले काय? आज 2 तारीख आहे
>>>>
आज बासी ईद सारखे बासी न्यू ईयरच्या शुभेच्छा देणारेही पाहिलेत. लोकांनी सारे धर्म एकत्र करून टाकलेत.
तर आमच्या कॉलेज मधील एका मुस्लिम मुलाने मंदिरा समोर अंगात आल्याचे सोंग आणले.
>>>>
मुस्लिम मुलगा मंदिरात, आणि दर्शनासाठी ईतका उतावीळ?
प्रेमप्रकरण तर नाही ना
जोक्स द अपार्ट, आमच्या फ्लोअरवर मागे एक बोरी मुसलमानांचे कुटुंब राहायचे. त्यांची कॉलेजगोईंग मुले, मुलगा व मुलगी, यांना सार्वजनिक गणपती बघायची खूप हौस होती, ते मला सोबत न्यायचे. मी नास्तिक उंदराला टपली मारून यायचो आणि ते गणपतीच्या चरणावर माथा ठेवून यायचे. मुंबई हे खरेच कमाल शहर आहे. जोपर्यंत ईथे भावना भडकावल्या जात नाहीत तोपर्यंत सारेच किती गुण्यागोविंदाने राहत असतात.
{{{ मी नास्तिक उंदराला टपली
{{{ मी नास्तिक उंदराला टपली मारून यायचो }}}
उंदीर नास्तिक असला म्हणून लगेच त्याला टपली मारायची गरज नाही.
नास्तिक ऊंदीर नाही हो मी
नास्तिक ऊंदीर नाही हो मी ऊंदीर आहे
अय्यो तो जोक होता हो Happy>>>
अय्यो तो जोक होता हो Happy>>>>> आता तो जोक आहे का? आधि सांगायचे ना. हेच गोल गोल बोलणे छान आहे
या इसयावर आता फुड्च्या
या इसयावर आता फुड्च्या इस्विसनात भेटू, जॅन२०१९ मधी
...३१ डिसेंबरला थोड्या
...३१ डिसेंबरला थोड्या काळासाठी आकाशात फटाके फोडतात.
ते जित्क्या सन्ख्येत फोडतात तेवडे फटाके आपल्या दहविस मोठ्या शहरांना पुरतिल. न्युजिलंड ची दृशये बघितलि, पन्नास शम्बर मजलि उंचिइत्की उंच रोषणाई नुसती आग आग आनि आग, धुर दिसत नाही उचिवरचा तर डोल्या आड मसणपाड
बिनडोक, नक्की किती काळात किती
बिनडोक, नक्की किती काळात किती फटाके फुटतात, किती प्रदूषण होते, वातावरणाची पातळी किती खालावते याचे तुलनात्मक आकडे मिळतील का? कारण आपल्याकडच्या लोकांना परदेशात जे घडते ते सारे भारी असेच वाटते. पण फटाके फोडून सण साजरे करण्यात आपला हात धरणारा दुसरा कोणी नसावा असे मला वाटते. ईथे दिवाळीलाच नाही तर लग्नाला, निवडणूकांना, क्रिकेट मॅचला , काही नाही तर एखाद्या नेत्याच्या आगमनाला, अगदी नको नको त्या समारंभांना फटाके फुटतात.
ईथे दिवाळीलाच नाही तर लग्नाला
ईथे दिवाळीलाच नाही तर लग्नाला, निवडणूकांना, क्रिकेट मॅचला , काही नाही तर एखाद्या नेत्याच्या आगमनाला, अगदी नको नको त्या समारंभांना फटाके फुटतात.>>>> कधी कधी उरलेले फटाके संपवण्यासाठीही फटाके फोडले जातात
फटाक्यांच्या बाबतीत बाळ ऋ ला
फटाक्यांच्या बाबतीत बाळ ऋ ला अनुमोदन..
कुठल्याही प्रकारचे सेफ्टी मेजर्स घेतल्याशिवाय रस्तोरस्ती, गल्लीबोळात कुणीही कसेही फटाके फोडतोय, गाड्या रस्त्यावर लावलेली हजारची माळ संपायची हताशपणे वाट बघत उभ्या आहेत, हातात सुतळी बॉंब, अनार फोडणारे महापुरुष, लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या भाजण्याची संख्या यातले किती न्यूझीलंड किंवा अन्य देशात नोंदवले जातात याबद्दल माहीती घ्यायला आवडेल.
कधी कधी उरलेले फटाके
कधी कधी उरलेले फटाके संपवण्यासाठीही फटाके फोडले जातात Happy
>>>
हो ना... मला तर वाटते कि तुळशीचे लग्न त्याचसाठी केले जात असावे.. दिवाळीतले फटाके संपवायला
क्काय त्या फटाकड्यांच कुतुक
क्काय त्या फटाकड्यांच कुतुक करताअय तिक्डे ट्रम्पुबाळ अन चिनगु बाळ मोठ्ठा फटाका फोडाय्च बोल्ताहेत
टीव्हीवर पाहिलेली सरकती बातमी
टीव्हीवर पाहिलेली सरकती बातमी - नव्या वर्षातली आज पहिली संकष्टी.
नव्या वर्षातली आज पहिली
नव्या वर्षातली आज पहिली संकष्टी >>
भारी आहे..
अवांतर - आज दुपारी बाहेर चिकन बिर्याणी आणि आता रात्री घरी तिच्याच अंड्याचे ऑमलेट खाऊन ख्रिस्ती वर्षातील पहिली संकष्टी साजरी केली.
ऋ, भीमा कोरेगाव का पेटलंय
ऋ, भीमा कोरेगाव का पेटलंय धागा सापडत नाही. उडवला का? पेटला होता का?
ऋ, भीमा कोरेगाव का पेटलंय
ऋ, भीमा कोरेगाव का पेटलंय धागा सापडत नाही. उडवला का? पेटला होता का?>>>
बहुतेक admin महोदयांनी उडवला आहे.
बहुतेक admin महोदयांनी उडवला
बहुतेक admin महोदयांनी उडवला आहे >>> आहे अजुन https://www.maayboli.com/node/64858 घ्या.
राहुलका, हे पान पहायची
राहुलका, हे पान पहायची परवानगी नाही. असं येतंय तिथे.
तुम्हि चालू घडामोडी - भारतात
तुम्हि चालू घडामोडी - भारतात चे सभासद आहात का ? मला तर पान उघडता येत आहे.
तुम्हि चालू घडामोडी - भारतात
तुम्हि चालू घडामोडी - भारतात चे सभासद आहात का ?> बहुतेक नाही.
Pages