
ईंग्रजी नवीन वर्षाला एक हिंदू, किंवा एक भारतीय म्हणून विरोध करणे हे काही नवीन नाही. ईंग्रजी कॅलेंडरनुसार वाढदिवस साजरा करणार्यांना अचानक २७-२८ डिसेंबर उजाडता उजाडता साक्षात्कार होतो की हे ख्रिश्चनांचे नववर्ष आहे. मग अश्या मेसेजेसचे जे पेव फुटते ते ३१ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत चालू राहते. त्यानंतर मात्र मध्यरात्रीच्या भयाण गोंधळात दारूच्या पुरात सारेच वाहून जाते. १ जानेवारीची सुट्टी आदल्या रात्रीच्या हॅंगओवरसह सारेच एंजॉय करतात. पण यावेळी मात्र वारे किंचित वेगात वाहताना दिसत आहेत. ‘मेरा देश बदल रहा है’ हे फेसबूकवर सुद्धा जाणवू लागलेय. ज्या लोकांकडून, माझ्या ज्या मित्रांकडून मी कल्पनाही केली नव्हती असे कित्येक जण या ख्रिस्ती नव वर्ष विरोधात आपले प्रोफाईल पिक बदलून त्यावर गुढीपाडवा हेच आमचे नवीन वर्ष असे अभिमानाने सांगू लागले आहेत. ""कृपया मला १ जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ नका. मी मराठी माणूस आहे, ख्रिश्चन नाही."" असे मेसेज कित्येकांच्या वॉलवर दिसू लागले आहेत.
एकीकडे मराठी शाळांची दुरावस्था आणि सारेच जण आपल्या मुलांना ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकत असताना मध्येच हे मराठी प्रेम आणि हा मराठीचा अभिमान नवीन वर्ष साजरे करण्यावरून कसे उफाळून आलेय हे समजत नाही. खरेच आतून आले असेल तर चांगलेच आहे. फक्त आता कुठवर टिकतेय हे बघायचेय.
बाकी आपला ३१ डिसेंबर कसा आहे?
माझा तर बाबा असा आहे ..

(सारेच फोटो फेबूवरून)
ऋन्मेष
रैवारी सुट्टी पण घेत जाऊ नको
रैवारी सुट्टी पण घेत जाऊ नको तू भाउ. रविवारी आराम ही ख्रिश्चन पद्धत आहे.

हिंदू धर्मात सुट्ट्या नसतात.
रविवारी सुट्टी कंपनी देते.
रविवारी सुट्टी कंपनी देते. नियम बदलणे माझ्या हातात नाही. पण तरी आपल्या माहितीसाठी सांगतो, रविवारी मी चर्चमध्ये जात नाही.
कृपया मला १ जानेवारीला नवीन
कृपया मला १ जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ नका. मी मराठी माणूस आहे, ख्रिश्चन नाही
>>>> काय लॉजिक आहे? मराठी ख्रिश्चन असतातच की.
मग 'कृपया मला रविवारी सुट्टी
मग 'कृपया मला रविवारी सुट्टी देऊ नका. मी मराठी माणूस आहे, ख्रिश्चन नाही' असं इमेल बॉसला, कंपनीच्या सीईओला, आणि एचआर डायरेक्टरला पाठवून बघ. काहीतरी परिणाम नक्कीच होईल
काहीतरी परिणाम नक्कीच होईल
काहीतरी परिणाम नक्कीच होईल
>>>
परीणाम असा होईल की मला रविवारी सुद्धा काम करायला लावतील. ५ डे वीक चा सिक्स डे वीक होईल. त्याच पगारात.
मराठी ख्रिश्चन असतातच की.
>>>>
ऐकावे ते नवलच !
मराठी म्हणजे मराठी भाषा बोलता येणे की मराठी भाषा मातृभाषा असणे? मला वाटते मराठी मातृभाषा असणे. मग एखाद्या ख्रिश्चनाची मातृभाषा कशी मराठी असेल?
ख्रिश्चनांची मातृभाषा मराठी
ख्रिश्चनांची मातृभाषा मराठी असते... माझ्या गावात होते ख्रिश्चन.. इंग्रजी नक्कीच नव्हती त्यांची मातृभाषा.
एखाद्या ख्रिश्चनाची मातृभाषा
एखाद्या ख्रिश्चनाची मातृभाषा कशी मराठी असेल?>>ख्रिश्चन हा धर्म झाला त्याचा मातृभाषेशी काय संबंध? माझ्या ओळखीची ख्रिश्चन मंडळीं ही मातृभाषा मराठी, कोकणी, मल्याळम, कोरीअन, जर्मन, इंग्रजी , स्पॅनिश असलेली आहेत.
गोव्यात कोकणी, वसई,अ. नगर
गोव्यात कोकणी, वसई,अ. नगर भागातले मराठी मातृभाषा असलेले अनेक किरीस्ताव माझ्या प्रत्यक्ष ओळखीतले आहेत
आणि धर्म बदललास की काय
शाखा सोडून इतर कोणाचा फोटो लावलायस म्हणजे समजायचं तरी काय
@ऋ
@ऋ
असे धागे दरवर्षी येतात आणि जातात. दुसरा प्रकार असतो संकल्पांचा.
नवीन वर्षांत एकही धागा न काढून माबोकरांना त्रास देणार नाही असा संकल्प करायचा विचार आहे का?
■ "मराठी आहे मराठीच राहणार,
■ "मराठी आहे मराठीच राहणार, नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्यालाच देणार"
असं कोणी बोललं तर त्याला त्याचा वाढदिवस विचारा...15 माघ शके 1935 वगैरे बोलला तर ठीक नाहीतर 2 थुतरीत हाणून "हॅपी न्यू इयर" म्हणा!
#वैताग_तिच्यायला.
सौजन्य व्हॉटस एप
वाल्याला नारदमुनींनी राम राम
वाल्याला नारदमुनींनी राम राम म्हणायला सांगितलं. त्याने मरा मरा म्हटलं.
तसंच जे लोक ३१ डिसेंबर ही आमची वर्ष अखेर नाही आणि १ जानेवारी नववर्षदिन नाही असं म्हणतात ते मरा मरा म्हणत राम रामच म्हणत असतात.
व्यत्यय यांच्या थॉटचे एक्स्टेंशन-
अशा लोकांवर नीट वॉच ठेवावा. ते आपला वाढदिवस कसा साजरा करतात, ते डोळ्यांत तेल घालून पाहावे.
१. इंग्रजी तारखेप्रमाणे करतात की तिथीप्रमाणे?
२. केक कापतात की औक्षण करून घेतात?
३. सगळ्या मोठ्या लोकांना वाकून नमस्कार करतात की नाही?
दैनंदिन जीवनात कोणाला शेकहँड तर करत नाहीत ना, या सगळ्याचं ऑडिट करावं.
15 माघ शके 1935 वगैरे बोलला
15 माघ शके 1935 वगैरे बोलला तर ठीक नाहीतर 2 थुतरीत हाणून "हॅपी न्यू इयर" म्हणा! >>>
बायदवे,रुन्मेश गेल्या वर्षी
बायदवे,रुन्मेश गेल्या वर्षी तुम्ही "नविन वर्षानिमित्त कोणता संकल्प केला" असा काहितरी धागा काढलेला न???
मग जर तुम्ही गुडीपाडव्यालाच निव इयर सेलिब्रेट करता मग तो धागा गुडीपाडव्याला न काढता १जाने कि ३१ डिसें. च्या वेळी कसा कै काढलेला??? कि या वर्षीपासुन अस ???
नौटंकीबाज लोक असतात
नौटंकीबाज लोक असतात
ज्यांना करायचा नाही त्यांनी
ज्यांना करायचा नाही त्यांनी नका करू.. इतरांनि तुम्हाला विश करायच्या आधीच त्यांना थोबाडीत मारल्यासारखे मला विश करू नका म्हणून सांगत तुम्ही स्वतःला का वेगळे पाडताय?
आणि हे सेलिब्रेट करणारे तसेही कोंबडीवरच ताव मारून करणारेत ना सेलिब्रेट? की चर्चमध्ये जबरदस्ती जावे लागते?
हल्ली काय ऐकावे ते नवलच ऐकायला मिळते. तुमचे (अ)विचार हजारो जनांसमोर मांडायच्या फुकट सोयी उपलब्ध असल्याने प्रत्येक सण आला की हा माझा सण नाही म्हणून बोंब मारतो. जणू यांनी तो सण आपला म्हटला तर यांचा धर्म बुडणार किंवा परका म्हटला की यांचा धर्म तरणार.
हल्ली प्रत्येकजण आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत हे दाखवण्याचा व ठसवण्याचा भयानक प्रयत्न करतोय. आपण दुसऱ्यांसारखे वागलो तर आपली ओळख पुसली जाते हे एक भयानक विकृत समीकरण प्रत्येकाच्या डोक्यात फिट झालेय. समाज म्हणून हे किती चूक हे आता काळ दाखवतोय.
हल्लीच पॉकेटवर एक लेख वाचायला मिळाला. लेखक अमेरिकन ज्यू होता व ख्रिसमस अजिबात साजरा करायचा नाही, ख्रिसमस ट्रि तर बिग नो नो हे बाळकडू तो जन्मापासून पित होता. ख्रिसमस ट्रि घरात म्हणजे आपली ज्यू म्हणून ओळख पूर्ण मोडीत यावर त्याचा ठाम विश्वास होता कारण तसेच शिकवले होते. त्याची गर्लफ्रेंड आधार्मिक होती पण तिने ज्यू बनायचा निर्णय घेतला. तिच्या त्या ज्यू बनायच्या प्रोसेस मध्ये तिच्याबरोबर हा सुद्धा सामील होता. त्या निमित्ते त्याने स्वतःचेच धर्मग्रंथ अभ्यासाले. ती जरी आधार्मिक होती तरी तिच्या घरी ख्रिसमस साजरा व्हायचा करण तीच एक वेळ असायची जेव्हा सगळ्यांना सुट्टी असायची व म्हणून सगळे एकत्र भेटू शकायचे. लेखकाने त्याचा प्रवास ख्रिसमस ट्रि अज्जिबात नको पासून घरात ट्रि आणण्यापर्यंत कसा झाला हे थोडक्यात लिहिलेय.
लेख वाचून आश्चर्य वाटले. जगभरचे लोक, कुठल्याही धर्माचे असेनात का, केवळ त्यांचा धर्म अमुक सांगतो म्हणून आजूबाजूला जे आनंद, उत्सव साजरे होतात त्याच्याकडे पाठ फिरवून बसू शकतात. दुसऱ्यांच्या आनंदात, उत्साहात सामील झालो तर आपण आनंदी होऊ असे त्यांना अजिबात वाटत नाही पण आपली अमुक धर्मीय म्हणून ओळख तात्काळ पुसली जाणार याची खात्री मात्र वाटते. आयुष्यात आनंदी होण्यापेक्षा अमुक धर्मीय म्हणून ओळख जास्त महत्वाची आहे.
आणि आनंदही झाला. नाते संबंधात जवळीक निर्माण व्हावी म्हणून धर्म थोडावेळ बाजूला ठेवला तर काहीही बिघडत नाही, जीवपेक्षाही प्रिय असलेली अमुक धर्मीय म्हणून ओळख पुसली जात नाही हे लेखकाला कळले व ते इतरांनाही कळावे म्हणून त्याने लेख लिहिला.
साधना, आवडला प्रतिसाद.
साधना, आवडला प्रतिसाद.
माझ्या मित्राने फेसबुक वर सेम
माझ्या मित्राने फेसबुक वर सेम असेच प्रो पीक लावला आहे
आणि त्याचा काल रात्री फोन आलेला "31 साठी कोणता बार-पब चांगला आहे, माहिती दे.!"
चांगला मित्र आहे म्हणून योग्य माहिती दिली दुसरा असता तर... जौद्या
साधना, couldn't agree more !
साधना, couldn't agree more !
साधना यांचेशी चक्क सहमत.
साधना यांचेशी चक्क सहमत.
*
हिंदू धर्मात सुट्ट्या नसतात. Biggrin Biggrin
<<
असतात.
बांधकाम्/लाकूडकाम इ. काढून पहा. अमावस्येला हत्यारांची पूजा करून काम बंद असतं.
अठवड्याची पगार सुटी असते, ती त्या त्या गावच्या "बाजाराचा वार" प्रमाणे बदलते.
आता मीही अमावस्येला आलेले हिंदुत्ववादी पेशंट, त्यांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत म्हणून न तपासायचा निर्णय घ्यायचा विचार करतो आहे.
साधना छान प्रतिसाद.
साधना छान प्रतिसाद.
saynoto31december ईंग्रजीत का?
आणि ग फ्रे असणही ईंग्रजी पध्दतच ना ?? :प
saynoto31december ईंग्रजीत का
saynoto31december ईंग्रजीत का?
नाहीतर त्या ३१ डिसेंबरला कळणार कसं?
साधना प्रतिसाद आवडला.
साधना प्रतिसाद आवडला.
छान प्रतिसाद साधना.
छान प्रतिसाद साधना.
मी कुठल्याच धर्माची रिचुअल्स फॉलो करत नाही सर्वांच्या मूलभूत तत्वांचा अभ्यास कायम करत असते. आनंदीच असते. आता नवे वर्श वगैरे काही नाही. बाकी सर्व उरलेले दिवस. अशी मनोधारणा आहे. पण लोक त्रासलेले असतात थोडे यान्त्या निमित्ताने एंजॉय केले तर काय बिघडते.
मुंबईत नुकत्याच झालेल्या घटने मुळे या पार्टी करणा र्या मुलामुलींची काळजी वाट्ते. ते सर्व सुखरूप घरी पोहोचते व्हावेत अशीच माझी प्रार्थना असते. व स्त्रिया मुलींवर अत्याचार होउ नयेत ही एक. पार्टी पीपल प्लीज चेक व्हेदर द व्हेन्यू इज फायर सेफ्टी कंप्लायंट.
मुंबईत रात्री पोलीस तैनात असणार आहेत. व उबर ओला डायवरांना स्पेशल ट्रेनिन्ग देण्यात आले आहे असे वाचले.
मी एक दागिना बनवायला घेतला आहे तो बनवणार रात्री आणि नेट फ्लिक्स बघणार. हेप्पी न्यू इअर.
भारतीय लोकमानसात उत्सवप्रियता
भारतीय लोकमानसात उत्सवप्रियता असल्याने ते प्रत्येक उत्सव अगदी मनापासून साजरा करतात... धर्माच्या आणि सीमांच्या मर्यादा त्यांना उत्सव साजरे कारण्यापासून राखण्यास असमर्थ ठरल्याचे आजवर दिसून आले आहे. त्यामुळे, नववर्षाचे स्वागत गुडीपाडव्याला करायचे कि, १ जानेवारीला.. .हा ज्याच्या त्याच्या संतोषाचा आणि समाधानाचा भाग.. अर्थात, कोणताही उत्सव साजरा करत असताना एकाद्याचे अंधानुकरण करण्याच्या नादात आपण आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य विसरून आपल्या जीवनरचनेत न शोभणारे कृत्य तर करत नाही ना? याचा विचार होणे गरजेचे वाटते.
साधना यांचेशी चक्क सहमत>>>>>>
साधना यांचेशी चक्क सहमत>>>>>>
आपण किती किती बाबींमध्ये स्वतःलाच बंदिस्त करून घेतो. आपण मोकळे आहोत, परखड आहोत हे आपल्याला वाटत असतानाच किती बंदिस्त असतो याचे प्रतिबिंब तुमच्या ह्या वाक्यात आहे. अर्थात मीही यातून सुटलेले नाहीय.
<आपण आपल्या संस्कृतीचे
<आपण आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य विसरून आपल्या जीवनरचनेत न शोभणारे कृत्य तर करत नाही ना? >
आपली संस्कृती सर्वसमावेशक, नव्या नव्या गोष्टींचे स्वागत करणारी आहे असे मला वाटते.
शाहरुख चा फॅन आहे भासवून
शाहरुख चा फॅन आहे भासवून रणबीरचा फोटो टाकणे
या कृतीचा मी जाहीर निषेध करतो आणि श्री रूनमेश यांची फॅनक्लब मधून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी असा प्रस्ताव मांडतो. सहमतीदारांनी अनुमोदन द्यावे
साधनाताई : छान प्रतिसाद...
साधनाताई : छान प्रतिसाद...
मी दोन्ही आनंदाने साजरा करतो..
31st असो वा गुढीपाडवा काय फरक पडतो.
आनंद साजरा करणं महत्वाचं...
31st साजरा केल्याने माझं मराठीप्रेम किंवा मराठीपणा कमी होत नाही...
साधना ,
साधना ,
Submitted by साधना on 31 December, 2017 - 10:03>>>
प्रतिसाद आवडला
कोणताही उत्सव साजरा करत
कोणताही उत्सव साजरा करत असताना एकाद्याचे अंधानुकरण करण्याच्या नादात आपण आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य विसरून आपल्या जीवनरचनेत न शोभणारे कृत्य तर करत नाही ना? याचा विचार होणे गरजेचे वाटते.>>>>>
नवीन वर्षाचे स्वागत एकमेकांना भेटून करणे ही आपलीच संस्कृती आहे. याच्यात आपल्या जीवनरचनेत न शोभणारे कोणते कृत्य दिसते? तुमचा रोख सुरापान व मांसभक्षणाकडे असेल तर तेही आपल्या संस्कृतीत आहे.
Pages