'फेकू ' किस्से

Submitted by मार्मिक गोडसे on 27 December, 2017 - 21:38

काही लोकांना थापा मारायची बालपणापासून सवयच असते. त्यातील काहींची मोठे झाल्यावर ही सवय मोडते तर काहीजण आयुष्यभर फेकुगीरी करत राहतात. समोरचा थापा मारतो हे आपल्याला कळत असतं, परंतू आपण बऱ्याचदा त्या व्यक्तीचे वय, पद किंवा परिस्थीती बघून दुर्लक्ष करतो.अडाण्यापासून ते उच्च शिक्षितापर्यंत अशा थापा मारणारे सर्रास आढळतात. गंमत म्हणून मी प्रत्यक्ष ऐकलेले काही फेकू किस्से देतो.
किस्सा: १
आमच्या घरी नवीन फ्रिज घेवून माणसं आली त्यांच्या मागे एक पिळदार शरीर असलेला तरुणही आला. तो नेमका बाबांच्या मित्राचा मुलगा होता. बाबांनी त्याला विचारले तू ह्यांच्याबरोबर कसा काय? मी टेंपोवर ड्रायव्हर म्हणून काम करतोय सध्या, बारावी नापासाला कोणती कंपनी नोकरी देतय काका? अनेक कंपन्यांमध्ये प्रयत्न केला, प्रत्येक ठिकाणी मुलाखतीत नापास झालो. हां! एका टायर कंपनीत मुलाखतीत नापास झालो, परंतू त्या साहेबाने माझ्या शरीराकडे बघून एक जॉब देता येईल तुला ,करशील तू? एका दमात आपली कहाणी सांगून बाबांना ओळखायला सांगितलं,काय जॉब असेल सांगा? बाबा - हम्म्म.. अहो उघड्या अंगाने टायर दोन्ही हाताने वर उचलून ८ तास कंपनीच्या गेटसमोर उभं राहण्याचा जॉब होता.

किस्सा:२

एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो, लग्नही मुहूर्तावर लागले होते. आम्ही मित्र बाहेर गप्पा मारत असताना आमचा एक इंजिनिअर मित्र रिक्षातून उतरताना दिसला. हा एक नंबरचा फेकू. चार माणसं दिसली की ह्याच्या फेकुगीरीला चेव चढतो. आल्या आल्या त्याची टकळी सुरू. काय रिक्षावाले आहेत इकडचे , अक्षरशः मेंढरांसारखे पॅसेंजर कोंबतात रिक्षात. आमच्या रिक्षाला ट्रॅफिक पोलिसाने अडवले, एकेकाला रिक्षातून बाहेर उतरवले. बारा पॅसेंजर एका रिक्षात पाहून तो पोलिसही आश्चर्यचकित झाला.मी म्हटलं आता ह्या रिक्षावाल्याचं काही खरं नाही. पण कसलं काय त्या पोलिसाने रिक्षावाल्याला त्याच्या समोर सर्व पॅसेंजरला पुन्हा रिक्षात बसवून दाखवायला सांगितले. रिक्षावाल्यानेही थ्री सीटर मध्ये आम्हा बारा जणांना व्यवस्थीत कोंबले. पोलिसानेही खूष होऊन रिक्षाला दंड न करता सोडून दिले.

किस्सा: ३

असाच एक मित्र खाजगी कंपनीत कामाला आहे . त्याच्या मते त्याचा बॉस मूर्खच आहे. मालकाचा ट्रक ड्रायव्हर नेहमी गाडी दुरुस्तीच्या नावाखाली मालकाकडून पैसे घेत असतो. गाडी पंक्चर झाली, गेअर तुटला, पाटा तुटला काहीही कारण सांगून मालकाला लुटत असतो. एकदा तर त्याने गाडीचा 'मोसम तुटला ' असं सांगून मालकाकडून पैसे वसूल केले होते.

वरील प्रत्येक किस्से मी आतापर्यंत ३-४ व्यक्तींकडून अगदी असेच्या असे अगोदर ऐकलेले आहेत. त्यामुळे खरंच असे किस्से घडले असतील का अशी शंका येते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किस्सा नं.१ विषयी - चाळीस वर्षांपूर्वी शाळेत आम्ही मुलं एकमेकांची गंमत करायचो.
पहिला दुसऱ्याला विचारायचा "अरे! एक जॉब आहे, करशील का?"
दुसरा "हो, कोणता आहे रे?"
पहिला "अरे, काही कठीण नाहीए. ती MRF टायरची कंपनी आहे ना! त्याचा टायर दोन्ही हातांनी उचलून कंपनीच्या गेटवर उभं रहायचं"
दुसरं होतं "त्या century Mill चा माणूस पाठीवर पृथ्वी घेऊन उभा आहे ना!? ती त्याच्याकडून घेऊन आपल्या पाठीवर घेऊन उभं रहायचंय" Rofl

मला वाटतं तुम्ही दिलेल्या उदाहरणांना फेकूगीरी न म्हणता दोन घडींची गंमत म्हणता येईल.

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण जेव्हा एखादा तो किस्सा स्वतःच्या नावाने खपवतो तेव्हा त्याच्या सत्यतेची शंका येते. वरील तीनही उदाहरणात तुम्हाला ते जाणवेल.

मधला किस्सा मी अनुभवला आहे.मी शाळेत होते. मी , बहिण ह्या दोन शाळकरी मुली आणि ८ मोठे असे रिक्शावाल्याने रिक्शात को.म्बलेले.

We were in Himachal (this is 90s) & returning from a temple outside a small town.
no other vehicle. So didn't have any option, but to accept. Amhi saman thevayachya Jaget basalelo.
At least 9 more folks can vouch for this, since we were from same town visiting Himalay on trek