चाईल्ड सायकॉलॉजिस्ट

Submitted by रश्मी. on 15 December, 2017 - 01:15

नमस्कार

मला पुणे व आसपासच्या परीसरातील मुलांच्या मानसोपचर तज्ञांचा पत्ता हवा आहे. माझी भाची अभ्यास अजीबात करत नाही, त्यात रसही दाखवत नाही. १० वर्षाची आहे. हुशार असुनही आता अजीबात लक्ष नाहीये अभ्यासात. घरी कसलीच अडचण नाही, कसला दबाव नाही. उलट लाडाने थोडी बिघडलीच आहे. खेळणे, टीव्ही कमी केले तरी किंवा समजावले तरी ऐकत नाहीये. मारुन प्रश्न सुटेल असे मला तरी अजीबात वाटत नाही.

मला मितान विषयी कल्पना आहे. पण माझाच मेल आय डी उडाल्याने मितानशी संपर्क साधु शकत नाही. मितान बहुतेक पुण्या बाहेर रहाते. तरी बाकी तज्ञांची माहिती असल्यास द्यावी.

धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी, अभ्यास करत नाही, त्यात रसही दाखवत नाही. हुशार असुनही आता लक्ष नाहीये अभ्यासात. ह्यासाठी चाईल्ड सायकॉलॉजिस्टची खरंच गरज आहे का याचा नक्की विचार करा. अर्थात तुम्हाला ते जास्त कळत असणार तुम्ही तिच्या जवळ असल्यामुळे पण मुलांची एक एक फेज येते. हट्टीपणा, अजिबात न ऐकणं, स्वतःला हवं तेच करणं, करवुन घेणं वैगेरे ते ही बघा.
नाहीतर आपल्याला ह्या गोष्टीसाठी अशा डॉक्टरांकडे नेताहेत हे डोक्यात नको बसायला तिच्या.

दक्षु धन्यवाद!.:स्मित:

सस्मित, मला म्हणणं पटलयं तुमचे. पण बरेच समजावुन, उदाहरणे देऊनही तिच्यात फरक पडत नाहीये. सारे येरे माझ्या मागल्या आहे. दुपारी लिहीते.

मला अनुभव नाही पण डोक्टर सीमा दरोडे ह्यांचे नाव ऐकले आहे अश्या संदर्भात. म्हणजे अभ्यास वगेरे तक्रारींसाठी.

दंगेखोरपणा , चंचल असणे यावर समुपदेशनाचा उपयोग होतो का ? वय 12 , मुलगा
तसे एकदा करून झालेय गावातल्या समुपदेशकांकडे पण उपयोग नाही झाला.

तुम्ही मानसोपचार तज्ञ विचारलेय तरी एक सल्ला देते, पहा योग्य वाटल्यास - भाचीला एखाद्या स्पर्धात्मक खेळात घालून पाहिले का? त्याने कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट डेवलप होते. माझ्या लेकीचा अनुभव आहे या बाबतीत. तिचा तसा प्रॉब्लेम असा नव्हता पण जास्त करून दाखवायची वृत्ती नव्हती. आहे ते छान आहे अशा टाइप्स.
पाचवी मधे ती रोबॉटिक्स टीम मधे गेली आणि बास्केटबॉल पण साधारण त्याच सुमारास खेळू लागली. आता सातवीत आहे. पण आता शी इज अ कम्प्लीटली डिफरंट पर्सन! जिद्द आणि फायटिंग स्पिरिट कमालीचे डेवलप झाले आहे आणि ते तिला अभ्यासात, खेळात सगळीकडेच उपयोगी पडते आहे.

Dr vidhyadhar Bapat , apte road near Shreyas hotel
Not sure but I think he specializes in dealing with young people..

नताशा, मैत्रेयी, सनव धन्यवाद प्रतीसादाबद्दल. मैत्रेयी, ती डान्स मध्ये वगैरे भाग घेते. उत्साही आहे. पण अभ्यासात कंटाळा करु लागलीय. आपण मागे पडतोय याची जाणीव नाही कारण सगळं मिळत गेलय. एका जागी बसुन अभ्यास वा इतर गोष्टी करायची आवड दाखवत नाही. होमवर्क मध्ये पण झीरो रिझल्ट येतायेत. हायपर अ‍ॅक्टिक्व्ह आहे.

मला मानसोपचार तज्ञ म्हणजे समुपदेशक म्हणायचे होते. जसे मायबोलीवर मितान ने लिहीले आहे.

दक्षिणा, माझा मेल आय डी उडालाय चूकुन त्यामुळे तुझी मेल बघता येत नाहीये. शक्य असेल तर माझ्या विपु मध्ये लिहु शकशील का?

सस्मित, मी प्रयत्न करतेय घरच्याना सांगायचा. कारण जेव्हा मुलांना काही कष्ट न घेता सहज गोष्टी मिळत गेल्या की ते हट्टी आणी आत्मकेंद्रीत होत जातात. सगळेच तसे असतात किंवा होतात असे नाही पण काही नाही तर निदान अभ्यासात तरी मागे पडता कामा नयेत. घरी तिच्यावर काही तू वर्गात पहिली येच किंवा इतकेच मार्क्स मिळव अशी सक्ती अजीबात नाहीये. पण निदान वेळच्या वेळी अभ्यास, होमवर्क तरी कम्प्लीट असले पाहीजे ना. तिथेच सर्व गोंधळ आहे.

मला मानसोपचार तज्ञ म्हणजे समुपदेशक म्हणायचे होते. >>> मग सायकॉलॉजिस्ट नाही, कौन्सलर शब्द हवा ना.. माझे ईंग्रजी ईतके चांगले नाही, आणि या विषयातील ज्ञानही...

बाकी अभ्यासाची आवड नाही असे बरेच मुलांशी होत असावे. पण घरून आपले अभ्यास टाळायचे लाड चालणार नाहीत याची कल्पना असल्याने अशी मुले अभ्यास करतात. आपल्या केसमध्ये हे मिसिंग असावे. हा एक अंदाज ... @ धाग्यातला प्रश्न - मला कोणी चांगली संबंधित व्यक्ती ठाऊक नाही. ईथे माहिती मिळाली तर बरेच आहे, ओळखीतल्या एका मुलाला सुद्धा याची गरज आहे असे वाटते.

>>माझी भाची अभ्यास अजीबात करत नाही, त्यात रसही दाखवत नाही. १० वर्षाची आहे. हुशार असुनही आता अजीबात लक्ष नाहीये अभ्यासात. <<

या वयाचा मुलांत हा बिहेव्योरल पॅटर्न आढळतो. एडिएचडि च्या काहि टेस्टस असतात, त्या करुन घ्या. सायकॅस्ट्रिटच्या ऑफिसमध्ये या टेस्टस होतात. तिचा आय्क्यु टॉप पर्सेंटायल मध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाहि....

>दक्षिणा, माझा मेल आय डी उडालाय चूकुन त्यामुळे तुझी मेल बघता येत नाहीये
तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमधे जाऊन दुसरा नवीन ईमेल बदलता येत नाहीये का? अर्थात जुन्या पत्त्यावरच्या ईमेल दिसणार नाही पण भविष्यात तरी हा प्रश्न सुटेल.

राज, ऋन्मेष धन्यवाद. वेबमास्टर आवर्जुन दखल घेतल्याबद्दल तुमचे पण आभार. मी माझ्या प्रोफाईल मध्ये योग्य बदल केलाय. दक्षिणा तू मला परत मेल पाठव प्लीज.

राज तुम्ही म्हणताय ती टेस्ट करुन पाहु कारण मला पण उत्सुकता आहे. तिचे उपजत ज्ञान अफाट आहे. अगदी लहान वयात टेक्निकल नॉलेज पण उत्तम आहे. पण पाया पक्का असला की ती स्वतच प्रगती करु शकेल. जेणे करुन पुढे कुठलेच दडपण येणार नाही.

रश्मी,
तुम्ही तुम्ही तुमच्या भाची साठी कोणती treatment दयाल ते मला please, please सांगाल का? माझ्या मुला साठी याचा खूप उपयोग होईल, मुलाच्या आक्रस्ताळेपणा बद्दल मी मुलांचे संगोपन मध्ये लिहिले आहे.

माझा संपर्क क्रमांक क्रमांक संपर्क मधून आहे

हो राजेंद्र. मी जरुर सांगेन. मी नवीन आय डी पण (ईमेल साठी ) तयार केला होता, पण वेळ निघुन गेल्याने तो पण अडकुन बसलाय. त्यामुळे फक्त विपु मधूनच संपर्क होऊ शकतो.