वैशाली, पुणे इथे मागच्या बागेत बसायला जागा कशी मिळवावी?

Submitted by अश्विनीमामी on 18 December, 2017 - 04:53

पुणे तिथे काय उणे, त्यात ते आमचे माहेर. फर्गुसन कॉलेज रोड त्रिभुवनातला भारी रस्ता. इथे वैशाली नामक उपहार
गृह आहे ते आपल्या सर्वांचेच लाडके आहे. प्रश्न तो नाही. प्रश्न जागा ं मिळवून आरामात खादाडी करण्याचा आहे.
पूर्वी रस्ता अरुंद होता. तेव्हा पुढे बसाय्ला चार टेबले होती तीही भरलेली नसत. हिवाळ्याच्या दुपारी तिथे बाहेर बसून बारकी हिरवी पिव्ळी पाने वार्‍याने गळत असताना निवांत बसून गप्पा मारणे व काही बाही खाणे किती ग्रेट. पण ते सूख गेले आता . कैक वर्षे झाली वैशाली व निवांत पणा हे समीकरण च लुप्त झाले आहे.

कधीही केव्हाही जा गर्दी आहेच. वीकांताला प्रश्नच नाही, वर्किंग डेला सकाळी आठ वाजता गेले तरी मागे जे गार्डन आहे तिथे जागा ं मिळत नाही. माझा प्रश्न असा आहे कि ह्या मागच्या जागेचा काय प्रॉब्लेम आहे. जरूरीपेक्षा जास्त टेबले छत्र्या आहेत व खुर्च्या कमी आहेत? लोक खुर्च्या आडवून गप्पा मारत राहतात? का हॉटेल वाले येणार्‍या
गिर्‍हाइकाचा कूल कोशंट बघून हायपर कूल लोकांनाच मागे पाठवतात व टेबल देतात? तिथे कायमच जागेची
अडचण का असावी?

आम्ही आपले नेहमी पुढच्या भागा त. पेन्शनरांबरोबर नाहीतर कोनपन जोडपी, तीन मैत्रीणींचे घोळ के, शाळकरी मुले व पालक, एक चहा घेउन कायतरी कामाचे बोलणारे जेंट्स ़ ह्यांच्यात कशी बशी जागा मिळवतो आणि दोशा ओरपतो. आता हे लोक कूल नाहीत असे मला आजिबात नाही म्हणायचे. वाद नको. पण मागे जागा मिळणारे लोक काहीतरी अपवादात्म क सुपर कूल आसतात का? हे कायम बाइकच्या किल्ल्या, कुठल्या तरी आयटी कंपनीचा बॅक पॅक, जॅकेट असे काही बाही घालून सरळ आत जातात व जागा पटकावतात. त्यांच्या मैत्रीणी पण गोडुल्या पुणेकरणी!

इथे टेबल कसे मिळवावे? काय स्ट्रॅटेजी आखावी.

बरे कॉलेजच्या पुढील गेट समो र भले मोठे स्टारबक्स आहे तिथे पार्किंग व आत बसायला भरपूर जागा आहे व असते. पण तिथे तो घी दोसा नाही साबुदाणा वडा नाही ती वैशालीची ग्लासातली कॉफी तर नाहीच्च.

बकेट लिस्ट वर आयटम क्रमांक एक ते दहा हेच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ती जागा मिळालेली आहे.माझ्या बर्थडे पार्टी सेलिब्रेशन केले होते तिथे, शेवटी वेटर लोकांनी झाल असेल तर निघता का अस विचारल तेव्हा उठलो होतो.कॉलेजात असताना जाण तर नेहमीचे होते.आता जाव वाटत नाही गर्दीमुळे.इडली फ्राय ची टेस्ट बदलली आहे खुप.

आहे काय त्या वैशालीत? Uhoh मला तर काडीमात्र अप्रूप नाही त्या वैशालीचं.
मोजून २ वेळा गेले असेन. एकदा हौसेने दोसा खायला आणि त्याला 'य' वर्षं झाली. तेव्हा ८० रुपये किंमत पाहून माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती, आणि खास अशी चव पण मला काही जाणवली नाही. दुसर्‍यांदा सकाळी खूप गर्दी असताना वेटिंग मध्ये. काय खाल्ल ते आठवत सुद्धा नव्हतं. पोट भरणे हा उद्देश होता तेव्हा. गर्दी लगबग पाहून उबग आला मला. वैशाली हे शांत निवांत ठिकाण नसून एक खानावळ बनली आहे आता.
त्यामुळे मी कायमचा रामराम ठोकला त्या दिवशी...

मी माझ्या संपूर्ण आयुष्यात २-३ वेळाच वैशालीमध्ये गेले आहे. मला ते जेवणासाठी रांग लावणे अजिबातच आवडत नाही. ओव्हरहाइप्ड आहे वैशाली.

मला मिळालीय ती जागा.पण वैशाली बद्दल भावनिक अटॅचमेंट तयार झाली नाही.
जाम कलकल आणी गर्दी वाटली. >>>> +१

वैशाली त गेल्या गेल्या थेट मागे जाउन त्यान्च्या माणसाला सान्गायचे आपण किती जण आहोत ते आणि मग वाट बघत बसायची. जर २ ते ३ जण असतील तर फार वेळ नाही लागत. >>> अगदी सेम अनुभव... बाहेरच्या बाजूला जागा मिळत असेल तरीही बागेतल्या जागेसाठी वाट बघायची तयारी असेल तर जागा मिळतेच. कधीकधी थोडं निर्लज्ज व्हावं लागतं. म्हणजे बागेकडे जायच्या दारापाशी वाटेत उभं रहायचं. सर्व्ह करायला वेटर्सना अडथळा व्हायला लागला की तेच स्वतःहून जागा करुन देतात. Wink

मायबोलीच्या रोमहर्षक इतिहासात वैशालीला स्वतंत्र स्थान आहे. पुण्यातील विविध लोकांची गट्ग तेथे झाली आहेत. अनेक लोकांना पडलेली नावेही बहुधा तेथेच पडली असतील. त्यामुळे एचपी चे मेन्लो पार्क मधले गराज किंवा तत्सम ठिकाणांचे महत्त्व वैशालीला आहे. त्यामुळे अमांना तेथे जाउन बसावेसे वाटले यात नवल नाही.

मात्र यात सर्वात जगप्रसिद्ध गटगपैंकी एक म्हणजे या लिन्क वर वर्णन असलेले.

आता एकमेकांशी फारसे बोलत नसलेले, कदाचित भांडणारे सुद्धा अनेक लोक या गटगला गळ्यात गळे घालून होते. काही शब्दशः उभे होते. मुंबईतील गँगवॉर मधल्या प्रतिस्पर्धी लोकांचे एक दोन दशके आधीचे एका टोळीत असतानाचे फोटो प्रसिद्ध होतात तसे वाटते या गटगचे फोटो पाहून आता Wink

फा,
भारी आहेत ते जीटीजी फोटोज , पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल थँक्स !
मी पण एक मोठं जीटीजी अटेंड केलय वैशाली (गार्डन )मधे. त्यावेळी झारा, जयश्री कुलकर्णी, वैभव जोशी वगैरे फेमस मंडळी होती .

>>आता एकमेकांशी फारसे बोलत नसलेले, कदाचित भांडणारे सुद्धा अनेक लोक या गटगला गळ्यात गळे घालून होते. काही शब्दशः उभे होते. मुंबईतील गँगवॉर मधल्या प्रतिस्पर्धी लोकांचे एक दोन दशके आधीचे एका टोळीत असतानाचे फोटो प्रसिद्ध होतात तसे वाटते या गटगचे फोटो पाहून आता>> Lol

फा! जिटिजि फोटो भारी !! आता एकमेकांशी फारसे बोलत नसलेले, कदाचित भांडणारे सुद्धा अनेक लोक या गटगला गळ्यात गळे घालून होते. काही शब्दशः उभे होते. मुंबईतील गँगवॉर मधल्या प्रतिस्पर्धी लोकांचे एक दोन दशके आधीचे एका टोळीत असतानाचे फोटो प्रसिद्ध होतात तसे वाटते या गटगचे फोटो पाहून आता> smiley36_0.gif

त्यामुळे एचपी चे मेन्लो पार्क मधले गराज किंवा तत्सम ठिकाणांचे महत्त्व वैशालीला आहे. त्यामुळे अमांना तेथे जाउन बसावेसे वाटले यात नवल नाही.>> यस्स. सै बोला. स्थानमहात्म्य आहे. तसं तर डोसे सर्वत्र मिळतात. मी पण घरी परफेक्ट बनवते. पण त्या हवेत तिथे खाणे ह्याला महत्व आहे. मी तर गरवारेत शिकले त्यामुळे वैशालीत काही प्रेम कहाणी वगैरे नाही. अहो फर्ग्स मध्ये शिकत होते ७३- ७५ मध्ये तेव्हा पुढचा भाग रस्ता रुंदीत गेला नव्हता. मुलग्यांनी जायचे खायचे व मुलींसोबत जायचे असे दोन भाग होते त्याला इस्ट बर्लिंन व वेस्ट बर्लिन असे नामकरण होते. अनेकांनी लिहीले आहे त्याप्रमाणे अहोंचा एक फेवरिट वेटर पण होता विजय नावाचा. मग कोर्टिंगच्या काळात आम्ही दोघे गेल्यावर हा विजय जरा झाकली मूठ सव्वा लाखा ची टाइप वागायचा. ही ही.

माझी असोसिएशन जास्तच पूर्वीची आहे . वैशाली ला लागोन असलेल्या बोळात एंडला माझी मैत्रीण राहायची. तो मोठा बंगला व त्या तिघी बहिणींची स्वतंत्र बेड रूम, तिची परीसारखी आई. हे मला फार नाविन्याचे होते. तिचयाकडे अभ्यासाला जाताना व येताना वैशाली लागायचेच. व तिथून आत बाहेर करणारे ते सुपर कूल डूड्स व अप्रतीम आत्मविश्वासू सुं दर्‍या बघून फार भारी वाटायचे. माझ्या डोळ्यासमोर तो मागचा बाग एरिआ अस्तित्वात आला व पूर्वी तिथे बसून निवांत खाल्ले आहे.

तेव्हा डोसा खायला आम्हाला पूना कॉफी हाउस मध्ये नेत. नो अपील देअर.

अमा! सगळ्यात आधी लिहायची पोस्ट तुम्हि आत्ता लिहताय... पण भारीये वर्णन! आयटीपुर्व काळातल पुण भारिच होत नाहितरी.

सगळे एवढे निगेटीव्ह लिहित आहेत.. पण एक गोष्ट लक्षात घ्या, की ज्या ठिकाणी उभं रहायला सुद्धा नीट जागा मिळत नाही गर्दीच्या वेळेस..

वैशाली अजून आहे तसंच आहे. गर्दी वाढली असली तरी. मागे बागेत बसायचं असेल तर हाती भरपूर वेळ ठेउन जायचं. आजूबाजू ला असलेली प्रेक्षणिय स्थळ पाहता टेबल कधी मिळून जातं, ते कळतच नाही

अरूण पण नशीब हे आपल्या मनाप्र्माणे चालत नाही हा साक्षात्कार जो पुलंना यत्ता चौथीत दामले मास्तर (ते आपले दामले मास्तर नव्हेत. पण असतीलही. काय माहीत) पुन्हा आल्यामुळे झाला तसा तुला नेहमी होत असेल ना? म्हणजे टेबल ची वाट पाहताना प्रेक्षणीय स्थळांमुळे वेळ जातो पण राह बनी खुद मंझील प्रमाणे जेव्हा टेबल उपलब्ध होते तेव्हा टेबल हे दुय्यम झालेले असते Wink

आणि तुमचा नाही का अ.आ.. तुम्हाला तर रेड कार्पेटच असेल,, तुम्ही तर त्यांचे नेहमीचे कस्टंबर.. Happy

आता जायला हवे परत. किती वर्ष झाली असतील जाऊन. डेक्कन परिसरातल्या कॉलेजात शिक्षण घेतलेल्या जनतेचा वैशाली हा जिव्हाळ्याचा विषय आहे. स्थानमहात्न्य आहेच. बर्‍याच आठवणी असतात . डेजचे सेलिब्रेशन, रिझल्ट्सचे सेलिब्रेशन, वेगवेगळ्या स्पर्धांसाठीच्या निमित्ताने केलेल्या चर्चा, वादविवाद ई. ई. बरेच काहीबाही असते. Happy

मला आवडतं वैशाली, बसायलाही नेहेमी जागा मिळतेच. मी स.प.ची त्यामुळे कॉलेजजीवनात वैशालीशी संबंध आला नाही कधी. पण नंतर अनेकदा आला. आताही आम्ही कॉलेजच्या मैत्रीणी भेटतो ते वैशालीतच Happy पंधराएक दिवसांपूर्वीच भेटलो होतो. गार्डनमध्येच जागा मिळाली होती अमा. माबोची तर कित्येक गटग वैशालीतच झाली आहेत. त्यानंतर कोणाच्या डोक्यातून ते हार्वेस्ट क्लब आलं कोण जाणे! गटग=वैशालीच! Proud

अजून एक सांगते, अमा, तुम्ही एकट्या गेला होतात. एक किंवा दोनच जण असतील तर त्यांना गार्डनमध्ये कधीच जागा देत नाहीत. त्यांच्याकरता पुढची दाटीवाटीची जागा फिक्स आहे. किमान चार जण असतील तरच गार्डनकरता एलिजिबल होता तुम्ही.

किमान चार जण असतील तरच गार्डनकरता एलिजिबल होता तुम्ही.>> असं आहे तर. मग काळाचा महिमा अनुसरुन
स्टारबक्सात निवांत बसावे.

वैशाली हे आरामात मित्र मंडळी जमवुन गप्पा मारण्यासारखे ठिकाण मला कधी वाटले नाहि. ते म्हणजे रांग लावा, दुसरे कधी खाणे संपवुन निघताहेत हे पाहात बसा आणी आपले खाणे लोकांच्या नजरा ' कधी उठतायेत ! ' ह्यात डुबवुन पटपत संपवुन खा असे ठिकाण वाटते.
त्यामुळे लिस्ट मधुन कटाफ झाले आहे, गेलोच तर विकएड तर एकदम बाद, विक डेज मध्ये च. पण आता एवढे औप्शन असताना तिथे जाण्यात काहि प्रयोजन वाटत नाहि.
तीच कथा अभिषेक ची.

मल्टिस्पाइस हे संध्याकाळच्या व गंधर्व हे सकाळच्या गटगची चॉइस गेल्या काही वर्षात झाले आहे हे खरे आहे. पण हार्वेस्ट क्लब मधे सुद्धा बरीच गटग झाली आहेत. मीच किमान ४-५ ला होतो.

आणि तुमचा नाही का अ.आ.. तुम्हाला तर रेड कार्पेटच असेल,, तुम्ही तर त्यांचे नेहमीचे कस्टंबर >>>>> येस्स. रेड कार्पेट नाही, तरीपण आमची पहिली पसंती वैशालीलाच

अजून एक सांगते, अमा, तुम्ही एकट्या गेला होतात. एक किंवा दोनच जण असतील तर त्यांना गार्डनमध्ये कधीच जागा देत नाहीत. त्यांच्याकरता पुढची दाटीवाटीची जागा फिक्स आहे. किमान चार जण असतील तरच गार्डनकरता एलिजिबल होता तुम्ही.
<,
ओह यस, गुड पॉइंट पूनम.
आम्ही कायम गृपने गेलोय आणि तिथे सुद्धा फक्त गृप्॑च असतात त्यामुळे टेबल मिळालं नाही असं कधीच झालं नाही कारण नेहेमीच गार्डन मधे बसलोय.
आता आठवतय, कपल्स्/एक्टेदुकटे आत बसतात, मला वाटायचं प्रायव्हसी म्हणून !
बाकी गर्दी आवडत नसेल तर वैशाली इज नॉट फॉर यु, हे म्हणजे खंडाळ्याला पावसाळ्यात जाऊन पाउस आवडत नाही म्हणण्यासारखं झालं Happy

खंडाळ्याला पावसाळ्यात जाऊन पाउस आवडत नाही म्हणण्यासारखं झालं Happy >> खंडाळ्यात पावसाळ्यात जाउन धक्काबुक्की आणि गर्दी आवडत नाही म्हणण्यासारखं झालं असं हवं ना? Wink Proud

अजून एक सांगते, अमा, तुम्ही एकट्या गेला होतात. एक किंवा दोनच जण असतील तर त्यांना गार्डनमध्ये कधीच जागा देत नाहीत. त्यांच्याकरता पुढची दाटीवाटीची जागा फिक्स आहे. किमान चार जण असतील तरच गार्डनकरता एलिजिबल होता तुम्ही. >> Not True. कितीदा तरी आम्ही दोनच जण गेलो आहोत. पण कायम गार्डन मधेच जागा मिळालेली आहे. मी इतका विचार केला नव्हता ह्याचा. गार्डन म्हणजे कुल ह्याचा पण विचार केला नव्हता. एक तर प्रचंड डास चावतात तिथे आणि चिकटून लोक उभी रहातात अगदी. असो पण तो एक फेमस वेटर होता तिथे? नाव लिहून घ्यायला? त्याला एका मराठी मुव्ही मधे पण पाहिल होत पण मागच्या वर्षी देशात गेले होते तेव्हा वैशाली मधे तो दिसला नाही. सगळे नवीन वेटर्स..

फारएण्डा.. एकदम बरोबर, सध्या जरा मायबोलीकरांचे वैशालीचे प्रेम कमीच झाले आहे.. पण पूर्वी फारच होते.. माझी मायबोलीकरांची पहिली भेट अशीच वैशालीत झाली होती अचानकच.. मी मित्रांबरोबर गेलो होतो तर फ, केपी, राकु आणि बहुतेक मयुरेश होते.. तेव्हापासूनच मायबोली वरचा वावर वाढला माझा..

वैशालीत नाही पण वाडिया कॉलेजजवळच्या कॅफे डिलाईट मधे (प्लास्टीकचा) साप सोडून एकदा काही मुलांनी जागा मिळवली होती. वैशालीत ट्राय करून बघा.

आज FDA ने धाड टाकली आहे. "अस्वच्छता आहे म्हणून". खरे खोटे माहीती नाही पण खरे असेल तर हायजीन हायजीन करणारे कमी होतील अन बसायला जागा नक्की मिळेल.

हॉटेल आवडत असेल तर भटारखाने बघू नये.
उकडलेले किंवा तळलेले अन्न अग्नी संस्कार अन्नजंतू आणि व्हाम्पायर दोघांनाही शुद्ध करतात असे मानून आवडते अन्न मिटक्या मारत खावे.

कढईतले तेल तापले आहे का बघायला कपाळावरील घाम निपटून टाकणार्या कोपर्यावरच्या टपरीवरचे सामोसे मी मागच्या आठवडय़ापासून वर्ज्य केले आहेत.

तीसेक वर्षांपूर्वी माटुंगा महेश्वरी उद्यान येथे नायक यांचे cafe Mysore नावाचे हॉटेल होते. अजून आहे की कल्पना नाही. पण तेव्हा त्यांच्या प्रत्येक टेबलावर एक छोटी प्लास्टिकची पाटी ठेवलेली असायची. ज्यावर लिहिलेले असायचे 'you are always welcome to see our kitchen.'

त्यानंतर इतक्या वर्षांत अशी पाटी कधी कुठे मला दिसली नाही.

आजच सकाळ मधे वाचले की पुन्यातील गलिच्छ हॉटेलमधे वैशाली, रुपाली यान्ची गणना एफडीएने केली आहे. जोपर्यन्त या हॉटेलान्चे भतारखाने व त्यात काम करणारे स्वच्छ झाले आहेत असे एफडीए सन्गत नाही तो पर्यन्त तेथे जाऊ नये. मी स्वतः तसे करणार आहे.

काय ते वैशालीचं कौतुक...

सिंबाचा आम्रपाली अनुभव Happy
मीअनु, Proud

ममो,
८५ पैसे डोसा? अबब... कुठला काळ? वय कळायचं अश्याने( हॉटेलाच नाही..) ह. घ्या.

आम्हाला बंगलोरात्ला डोसा आवडति. यम्टीआर...

वाडेश्वर बरय त्या रुपाली वैशाली पेक्षा..

एफ डी ए अत्यंत भ्रष्ट खाते आहे. इंडीयन नोनी नावाचे एक एमएलएम द्वारा विकले जाणारे एक औषध ९९ रोग दूर करते असा दावा केला जात होता. मी त्यांच्या माहितीपत्रकासहीत तक्रार केली. आठवड्याने नोनीच्या पुण्यातल्या मुख्य वितरकावर धाड टाकल्याची बातमी आली. दोनच दिवसांनी नोनीची पानभरून जाहीरात आली. नोनी फूड सप्लीमेंट आहे त्यामुळे एफडीए ने परवानगी दिलेली आहे वगैरे.

रेस्टॉरंटसना एफडीए कडून तपासणी करून घ्यावी लागते. पण त्यांचे इन्स्पेक्टर्स फक्त हप्ते घेतात. पुणे विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी काही वर्षांपूर्वी सर्व्हे केला होता तेव्हां ९९% हॉटेल्स गलिच्छ असल्याचे आढळले. सर्वात अस्वच्छ कोशिंबीर, लोणची इ आढळले . त्यानंतर एकदा कारवाई झालेली आणि ही दुसरी. ही पण बहुतेक दाखवण्यासाठी झाली असावी किंवा नवीन साहेब आला असावा. हे डिपार्टमेंट बंदच करून टाकावे. ते नसल्यासारखेच आहे.

गेल्या महिन्यात पुण्याला गेलो होतो. एकदा सकाळी साडे सातला वैशालीत गेलो मागे बागेत जागा मिळाली बसायला लगेच. सोमवार की मंगळावर होता.
मी सहसा आशिष प्लाझात उतरतो, मग एकदा वैशाली आणि एकदा शबरीत थाळी, एक फिश थाळी म्हणुन आहे तिथेच तिथे फिश थाळी घेतोच. तिथेच सुर्वेज प्युअर नॉनव्हेज आहे , आधी कुणाकडून तरी याचे नाव ऐकले म्हणुन गेलो पण निराशा झाली.

गर्दी आणि उगाचच डोक्यावर घेतलेली हॉटेल टाळा.
काही वेगळी गुणवत्ता किंवा चव नसते.
लालबाग चा राजा नवसाला पावतो म्हणून गर्दी .
असा प्रकार असतो

हॉटेल सोडा . ज्या घरात नोकर चाकर असतात जेवण बनवायला .
तिथे पण फक्त प्लेट स्वच्छ असते.
सजावट असते.
बाकी सर्व राम भारोसे.
पण दृष्टी आड.
जे नजरेत येत तितकच स्वच्छ जे नजरेत येत नाही ते अत्यंत घाणेरडे

Pages