आ अब लौट चलें

Submitted by अस्मानी on 10 December, 2017 - 23:10

श्रद्धा, फारएन्ड, पायस वगैरे प्रभ्रुतींना माझी विनंती आहे की ह्या चित्ररत्नाचा एकदा रिव्ह्यू लिहावा.
खेडेगावातून शहरात जाणार्या बस च्या accident मधून वाचलेला मनुष्य थेट अमेरिकेत करोडपती बनणे, भारतात नोकरी मिळवण्यापेक्षा बेकार माणसाला अमेरिकेचा व्हिसा मिळणे सोपे जाणे, करोड्पती माणसाने एका फटक्यात सगळे सोडून भारतात परत जायला निघणे आणि त्याच्या आर्य पतिव्रता पत्नीने त्याच एका फटक्यात त्याला क्षमा करणे वगैरे अनेक महान सांस्क्रुतिक गोष्टी आहेत ह्यात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर,
यात एक गरबा song आहे, त्याचे शूटिंग RK स्टुडिओ चेंबूर ला झाले होते. मी ते बघायला गेलो होतो Happy

त्यात नाचून नाचून अक्षयला काखेत घाम आला, म्हणून कुर्ता वाळवायलात्याला पंख्यासमोर काखावर करून बसवले होते Happy
अगदी शूटिंग सुरू असताना सुद्धा या फिल्मी लोकांच्या खाजगीपणाच्या कशा चिंधड्या उडतात त्याची एक झलक पाहायला मिळाली.

नोटेड. पण अस्मानी मला वाटले तुम्हीच लिहीले असेल किमान थोडेफार. लिहा की.

सिम्बा Lol सीन कितीही इण्टरेस्टिंग असला, तरी प्रत्यक्षात शूटिंग हा महाबोअर प्रकार असावा असेच वाटते शूटिंग चे सीन्स पाहिले की.

बाय द वे याचे एक गाणे आरके मधे चित्रीत होणे हा ही योगायोग दिसतो. कारण आर के प्रॉडक्शन्स च्या जिस देश मे गंगा बहती है मधे याच ओळींचे गाणे होते.

मला पण असेच वाटले की अस्मानी यांनी काही तरी लिहीले असेल Lol

फा, अरे यात काय योगायोग नाही कारण आरके प्रॉडक्शन चाच चित्रपट आहे हा. ऋषी कपूर ने दिग्दर्शीत केलेला एकमेव चित्रपट Lol

मी मध्यंतरी हा पिक्चर बघायला सुरुवात केली खरी त्या अक्षय आणि सुमन रंगनाथनच्या (ओताशी अनाता म्हणे :राग:) गाण्यामुळे. पण अशक्य आहे बघणं. पहिला अर्धा तास बघून बंद केला.

त्यातलं आ अब लौट चले हे शीर्षकगीत ऐकायला चांगलं आहे पण. आणि ऐश्वर्या त्या गाण्यात एकदम छान दिसते, साधाच निळा सलवार कमीज आणि अगदी साधा लूक. पण तिला शोभून दिसतो. अक्षय तिच्यापुढे अगदीच ठोकळा वाटतो पण!

कोणीतरी अमेरिकेत राहून कंटाळून परत भारतात निघतोय आणि आत्मकथा लिहतोय असे समजून हा धागा ओपन केला..

पिच्चर महाबोर आहे. टिपिकल बॉलीवुड मसाला.
काय ती ऐश्वर्या, सुमन रंगनाथन आणि अक्षय खन्ना.
तिघेही रोजंदारीवर काम करणारे कलाकार दिसतात. त्यातल्या त्यात सुमन तरी बरी दिसतेय.
पण हे दोघे तर खरंच पिचलेले दिसतात.
आणि तो गरब्याचा नाच गाणं म्हणजे भयानक आहे.

<<<<<ओताशी अनाता म्हणे :राग:>>>> Uhoh म्हणजे काय ? मी ते अजुनपर्यंत हाकाशिकानाका ओयो हाकाशिकनाका असं ऐकते. Happy

तिघेही रोजंदारीवर काम करणारे कलाकार दिसतात

जाम हसले या वाक्याला!!
ते अत्ताशिअनाताएशुवा जानेजाहाहाहा गाणे तर अती भयंकर आहे.
कॉलिन्ग चिरफाड एक्स्पर्ट्स!!

फारएन्ड, मला नाही हो तुमच्याइतकी छान चिरफाड करता येत. खरंच. म्हणून तर तुम्हा चिरफाड एक्सपर्टस ना पाचारण करतेय.

सस्मित, ती जॅपनीज भाषा आहे. आणि जॅपनीज मध्ये ओताशी नसून वाताशी आहे. वाताशी अनाता इश्शो वा... अशी सुरुवात आहे गाण्याची म्हणजे यू अँड मी टूगेदर.
दुसरी भाषा वापरायची तर निदान बरोबर तरी वापरावी.

...ती जॅपनीज भाषा आहे. आणि जॅपनीज मध्ये ओताशी नसून वाताशी आहे. वाताशी अनाता इश्शो वा... अशी सुरुवात आहे गाण्याची म्हणजे यू अँड मी टूगेदर....>>>>
हा! इतक्या वर्षांनी समजली ही काय भानगड आहे ती.

अस्मानी Happy वेळ मिळाला तर नक्की लिहितो. आणि तुम्ही सुद्धा न घाबरता, बिनधास्त चिरफाड करण्याचा प्रयत्न करा. हा सिनेमा इतका वाईट आहे कि तुम्ही पूर्ण २ तास ५७ मिनिटे ४० सेकंद पाहिला तर बसलेल्या धक्क्याने सुद्धा अगदी सराईतपणे चिरफाड करू शकाल. Lol

तोवर काही मुद्दे देऊन ठेवतो.
१) १९९८ मध्ये आर के स्टुडिओला ५० वर्षे पूर्ण झाली. त्या आनंदात हा सिनेमा बनवायला घेतला आणि पुढच्या वर्षी रिलीज केला. राज कपूर वारल्यानंतर थोरल्या रणधीरने हिना बनवला/पूर्ण केला. मग धाकल्या राजीवने प्रेम ग्रंथ लिहिला. तर मधला ऋषी म्हणाला कि मी का म्हणून मागे राहू? मग त्याला दिग्दर्शनाची जबाबदारी दिली गेली, सिनेमा बनवला, रिलीज केला. त्याला मिळालेला प्रतिसाद असा काही होता कि १८ वर्षे झाली अजून आर के वाल्यांचा नवीन सिनेमा बनवायचा धीर होत नाही Proud
२) यात अक्षय खन्ना नक्की कोणत्या व्हिसावर अमेरिकेत आला आहे हा संशोधनाचा विषय आहे.
३) डंकिन डोनट्सची टोपी घातलेली ऐश्वर्या एका कॅफेमधे वेट्रेस म्हणून काम करताना दाखवली आहे पण त्या कॅफेत विकायला एकही डोनट नाही (ब्लर शॉटमुळे नक्की कुठली कॉफी विकायला होती ते दिसले नाही पण डंकिन डोनट्सची वाटली नाही).

वोताशी अनाता >> Lol उलगड्याबद्दल धन्यवाद सायो! माझा अंदाज आहे कि जसे या सिनेमातले "तेरे बिना एक पल" हे नूर जहाँच्या "तेरे बिना एक पल वी" वरून ढापले आहे तसेच ते वोताशी अनाता पण कुठून तरी उचलले असावे आणि मूळ गाण्यातच ते (चुकीचे) जपानी शब्द असावेत. अन्यथा संपूर्ण सिनेमाचा आणि जपानचा दूर दूर पर्यंत संबंध नाही.

"तेरे बिना एक पल वी" >>> वरच्या जपानी संदर्भामुळे हे सुद्धा मला तेरे बिना एक पल Wii असेच वाटले Happy

अख्ख्या चित्रपटात एकच गोष्ट आवड्ली आणि पटली. सुमन रंगनाथन अक्षय ला म्हणते, " तुम क्या हो? तुम्हारी औकात क्या है?"
हे वाक्य त्यालाच नाही तर अख्ख्या सिनेमाला लागू आहे.

याहीपेक्षा भयंकर बॉबी देओल आणि ऐश्वर्याचा पिक्चर आहे(नाव आठवून द्या.)
त्याची चिरफाड नक्की व्हावी.त्यात नुसरत फतेह अली चे फेमस गाणे आहे.

ती जॅपनीज भाषा आहे. आणि जॅपनीज मध्ये ओताशी नसून वाताशी आहे. वाताशी अनाता इश्शो वा... अशी सुरुवात आहे गाण्याची म्हणजे यू अँड मी टूगेदर.>>> Uhoh Lol हे कधीच समजलं नसतं. धन्य्वाद.
पण जपनीज भाषा का मधेच? माहितीये प्रश्न फारच लॉजिकल आहे. पण ते इंडियन. आहेत अमेरीकेत. मग जपानचा कुठे काय संदर्भ येतो?
त्यापेक्षा मला जे
हाकाशिकनाका ओयो हाकाशिकनाका इशु आ
जानेजा आ आ आ
ऐकु येत होतं तेच बरं होतं. Happy

और प्यार हो गया च्या वेळी ऐश्वर्या कडे लर्निंग लायसन्स होतं. त्यामुळे सम्जुन घ्या लोक्स.

'और प्यार हो गया' ची सर्वच गाणी सुंदर आहेत. मेरी सांसो में बसा है तेरा ही एक नाम्म्म..... नुसरतकाकांनी म्युझिक दिलंय पिच्चरला..

त्यात नाचून नाचून अक्षयला काखेत घाम आला, म्हणून कुर्ता वाळवायलात्याला पंख्यासमोर काखावर करून बसवले होते Rofl Rofl Rofl

बाकी शिणुमा पण महान आहे Lol

<< सस्मित, ती जॅपनीज भाषा आहे. आणि जॅपनीज मध्ये ओताशी नसून वाताशी आहे. वाताशी अनाता इश्शो वा... अशी सुरुवात आहे गाण्याची म्हणजे यू अँड मी टूगेदर.

हे आत्ताच वाचलं , मी सुद्धा ओताशी अनाटा गात होते अनेक वर्षे Biggrin

वा मस्त चर्चा.. sorry.. चिरफाड सुरु आहे.. Happy
तिघेही रोजंदारीवर काम करणारे कलाकार दिसतात>> हे भयंकर विनोदी आहे..

आता अक्षय खन्नाच्या चित्रपटांची चिरफाड सुरू आहेच तर त्याचा माधुरी सोबतचा मोहोब्बत सुध्दा चिरफाडीकरता घ्या. हो तोच तो ..ओ बेबी.. डोन्ट ब्रेक माय हार्ट वाला. यात एक कपूर खानदानचा चिराग सुद्धा आहे :). या सिनेमाच तिकीट फुकट मिळुन सुद्धा एक तास सुद्धा पहवला गेला नाही..
त्या नंतर दिल चाहता है येईपर्यंत त्याचे सिनेमे पहायची हिम्मत झाली नाही

त्याच जपानी गाण्यात सुमन रंगनाथनसुद्धा 'जिंदगी का मजा' बद्दल बोलते. परदेसच्या अपूर्वची मैत्रीण असावी.

Pages