आ अब लौट चलें

Submitted by अस्मानी on 10 December, 2017 - 23:10

श्रद्धा, फारएन्ड, पायस वगैरे प्रभ्रुतींना माझी विनंती आहे की ह्या चित्ररत्नाचा एकदा रिव्ह्यू लिहावा.
खेडेगावातून शहरात जाणार्या बस च्या accident मधून वाचलेला मनुष्य थेट अमेरिकेत करोडपती बनणे, भारतात नोकरी मिळवण्यापेक्षा बेकार माणसाला अमेरिकेचा व्हिसा मिळणे सोपे जाणे, करोड्पती माणसाने एका फटक्यात सगळे सोडून भारतात परत जायला निघणे आणि त्याच्या आर्य पतिव्रता पत्नीने त्याच एका फटक्यात त्याला क्षमा करणे वगैरे अनेक महान सांस्क्रुतिक गोष्टी आहेत ह्यात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्र Lol

अक्षय खन्नाच्या डोळे आणि भुवयांच्या ठेवणीमुळे तो कायम करूण वाटतो. अगदी आनंदी प्रसंगात सुद्धा ,काहीतरी दुःख लपवून बोलतोय असे वाटते.

त्याचा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे त्याचे केस,
याने चांगल्या दर्जाचे विग्स वगैरे का वापरले नाहीत देव जाणे,
अगदी या मूवी मध्ये देखील त्याचे मिडल parting आणि चप्प बसणारे विरळ केस पाहून विचित्र वाटते.

मला अक्षय खन्ना कायम निगेटिव्ह रोल्स मधेच आवडला. protagonist roles मधे सिम्बा म्हणतात तसा तो करुण, बिचारा वाटतो. for example हमराज.

गजगामिनी बघितला पण पूर्ण डोक्यावरून गेला. कोणाला हुसेन यांना त्यातून काय सांगायचे होते हे कळल्यास प्लीज समजावून सांगा.

लोल नाना. जया बच्चन च्या उत्स्फुर्त अभिनयाकरता नक्कीच पाहणार. डबिंग गॅप मुळे मजा येते ट्रेलर पाहताना.

1999साली खन्ना साहेब कॉम्प्युटरचा फडतुस डिप्लोमा करुन आम्रविकेत प्रवेश मिळवतात याचा अर्थ क्लिंट्नने परप्रांतियांचा प्रश्न वाढवला असा होतो.ट्रंपुलीला ह्या पिच्चरची माहीती दिल्यास नक्कीच फायदा होईल.
याचा बाप बलराज अमेरिकेत कितीसाली गेला याचे काही रेकॉर्ड नसल्याने त्याचा शोध घायचा प्रयत्न करन्यात अर्थ नाही.
दुसरं एक काँबिनेशन म्हणजे अमेरीकेत भटजिगीरी व पोलिस ड्युटी ही सत्कार्यं एकत्र करणारा परेश रावल.आजही आम्रविकेत असले काँबिनेशन शोधून दिल्यास मी त्या माणसाला शंभर काउंट्या इनाम जाहीर करेन.
असो,पण मौसमी चटर्जी आपल्याला लै आवडते,ती आहे यात हीच जमेची बाजू.पण तिला खादीची साडी आणि लांब बाह्याचे ब्लाऊज घालून म्हातारे दाखवायची गरज नव्हती.पंजाबी ड्रेस चालला असता.तिचे ते ओवरलॅप असलेले साईड टुथ तिलाच मस्त शोभतात.तिची चिरफाड नको करायला.

परदेस वरुन आठवलं. इथे अगदीच अवांतर आहे पण तरी लिहिते. Happy
मला गाना डॉट कॉम वर परदेस मधलं एकही गाणं सापडत नाहीये. किती दिवस शोधतेय.
कुणाला माहित आहे का? मदत करा प्लीज.
नवीन धागा काढायला सांगु नका एवढ्यासाठी. दुसरा कुठला योग्य धागा असेल हे विचारण्यासाठी तर सुचवा.

असो,पण मौसमी चटर्जी आपल्याला लै आवडते,ती आहे यात हीच जमेची बाजू.पण तिला खादीची साडी आणि लांब बाह्याचे ब्लाऊज घालून म्हातारे दाखवायची गरज नव्हती.पंजाबी ड्रेस चालला असता. >>>> घातला होता ना तिने पंजाबी ड्रेस काही सिन्समध्ये.

हो, ते पांढरे कपडे वगैरे पहिल्या सीन पुरतेच आहेत मला वाटते. नंतर पंजाबी मध्ये आहे ती, पण एक शाल मध्ये लपेटल्यामुळे नीट कळत नाही.

पहिल्या सीन मध्ये , काही तरी "जीवन मै रंग न होते तोजीवन कितीना सुना लगता, " वगैरे डायलॉग मारून अक्षय आणि आलोक नाथ एकाचवेळी मान वळवून मौसमी कडे बघतात, ते भयानक कृत्रिम वाटते.

पहिल्या सीन मध्ये , काही तरी "जीवन मै रंग न होते तोजीवन कितीना सुना लगता, " वगैरे डायलॉग मारून अक्षय आणि आलोक नाथ एकाचवेळी मान वळवून मौसमी कडे बघतात, ते भयानक कृत्रिम वाटते.
नवीन Submitted by सिम्बा on 16 December, 2017 - 15:13
>>>
हा हा हा!!
आज तेरे बाबुजी होते तो बहोत खुश होते" हा डायलॉग बर्याचदा आहे त्यात.

या हूकलेल्या अक्षय खन्नाचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे,दिसायला टूकार असला तरी याला हिरविणी लै जबराट मिळाल्या सुरवातीला.पैकी डोली सजाके रखना नावाच्या महाटूकार सिनेमात पण बराच चिरफाडीचा मसाला आहे.मी फक्त नगमाची बहिण ज्योथिकासाठी हा सिनेमा बघायला गेलो होतो.किस्सा हम लिखेंगे गाण्यात कसली सोबर आणि क्यूट दिसली आहे ती,नगमापेक्षा मला ती उजवी वाटते.

Pages