इडली चिली

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 November, 2017 - 01:41

बर्‍याचदा आपल्या घरी केलेल्या ईडल्या उरतात. सारख्या त्याच खायला कंटाळा येतो (सगळ्यांनाच येतो असे नाही) म्हणून थोड्या वेगळेपणाने त्यांना संपविण्याचा एक चायनीज मार्ग.

इडलीचे तुकडे कापून
कांदा जरा जाडाच कापून घ्या
सिमला मिरचीचे तुकडे
आल-लसूण बारीक कापून

रेड चिली सॉस
ग्रिन चिली सॉस
टोमॅटो सॉस
सोया सॉस

चवीपुरते मिठ
तेल

कृती :
इडलीचे तुकडे तेलातून तळून घ्या. छान कुरकुरीत होतात.

मोठ्या कढईत किंवा खोलगट तव्यामध्ये तेल गरम करायचे. गॅस मोठा ठेउन त्यावर चिरलेले आल-लसूण टाकून थोड परतून लगेच कांदा टाकायचा.

थोडे परतून सिमला मिरची टाका.

आता ती थोडी परतून त्यात थोडे थोडे चारही सॉस टाका.

मोठ्या गॅसवर भराभर परतवून त्यावर इडली तुकडे घाला व चांगले एकजीव होईपर्यंत परतवा. वरून थोडेसे मिठ घाला. गॅस बंद करा. झाली इडली चिली.

टिपा :
जास्त तेलाचा वापर टाळायचा असेल तर इडलीचे तुकडे फ्राय न करताच टाका.
ह्यात अजून कोबी, कांद्याची पात व तुमच्या आयडीया नुसार भाज्या घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान .ह्यालाच आम्ही चायनीज इडली म्हणतो घरी.सगळे असतील नसतील ते सॉस, कांदा , कोबी, सि,मीटाकुन मस्त लागते.

मस्त आयडीया.
मलाही उरलेल्या इडल्या आवडत नाहीत.

@जागू
पाककृतींसाठी कृपया "पाककृती" हा लेखन प्रकार वापरा.( "लेखनाचा धागा" नाही.) त्यामुळे वर्गीकरण आपोआप होणे सुलभ होते.

अरे भारी रेसिपी. फोटो पण सॉलिड.

नुसती फ्राय इडली पण छान लागते फोडणीत लसूण, आले, मिरची तुकडे घालायचे आणि जरा जास्त तेलावर खरपूस परतायची मग थोडी मिरपूड भुरभूरवायची आणि कोथिंबीर टाकायची.

वेबमास्टर बदल केल्याबद्दल धन्यवाद.

जाई, अन्जू धन्यवाद.
अश्विनी हो ग. फोटो इथे लोड करण्याच्या प्रॉब्लेममुळे बरेचसे लिखाण राहून गेल आहे.

wow

मस्त आहे रेस्पी!
नुसती इडली तळली तर ती फार तेल पीत बस्ते तेलात. शॅलो फ्राय केलं तरी हा इफेक्ट साधता येईल.
अगो, तळकी इडली + मीठ + काळं मिरी पूड लय भारी जमतं...

भारी रेसिपी!! आणि फोटो सुद्धा !!
पण.. तुमच्याकडे इडल्या उरतातच कश्या ?
आमच्याकडे कितीही करा संपतातच.. शेवटी पातेलं वाजवून सांगावं लागतं आता पीठ संपलं शेवटचा घाणा/साचा लावलाय वगैरे Sad

मस्त प्रकार आहे हा...
मी बालाजी आणि बरच काही काही बघायचं म्हणुन टूरवर गेली होती तेव्हापासुन साऊथ इंडियन पदार्थांच नावच टाकुन दिलं ..
आताशा पूर्ण दोसा खाऊ शकते.. इडली अजुनही एक च्या वर जात नाही घशाखाली.. हिक बसलीए..
आणि ही टूर मी २००४च्या दरम्यान केलेली.. अजुनही हे हाल..
पण हे करुन पाहिल.. घरी इडल्या बनतात त्या माझ्या वाटणीच्या बाजुला काढून Wink

अंजली जास्त केल्या की उरतात. माझ करण जरा सढळ हस्तेच असत Lol

टिना कर ग नक्की आवडेल तुला

धनुडी धन्यवाद.

हो ग! मी पण अगदी सढळ हातानेच .. पण जास्त इडल्या केल्या कि जास्त खातात .. आहे ना पीठ, मग घाल अजून
इडली फ्राय किंवा अजून काही ते नेक्स्ट टाइम कर (म्हणजे कधीच नाही Sad )
पण आता मी लपवूनच ठेवेन म्हणते Proud