एक सुरेख जाहिरात...!

Submitted by यक्ष on 27 November, 2017 - 03:56

सारेगम कारवॉ ची ताजी जाहिरात पाहिलीत? मला आवडली!!
अगदी भिडणारी वाटली...
अश्या दर्जेदार जाहिराती हल्ली दुर्मिळ होत चालल्यात आणी अगदीच सुमार जाहिरातींचा अगदी सुक्काळ झालाय. एकदातरी जरूर बघण्यासारखी...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघितली, पण मला 'पर्सनली' खूप पकाउ वाटली. पाच साडेपाच मिनिटे ती गात असते एकच गाणं. आणि ती गेल्यावर त्याला तेच गाणं ऐकायची सवय आहे वगैरे फारच ओढून ताणून बळजबरी बादरायण इमोशनल एन्ड केल्यासारखा वाटला. प्रॉडक्ट उत्तम आहे, पण कस्टमर इनसाईट चा काही सर्वे केल्याचं वाटलं नाही.

आज कुछ तूफानी करते है, टाइप जाहिरातींत तर्क वगैरे काही बघायचा नसतो, पण इमोशनल वॅल्यु असलेल्या अ‍ॅडस मध्ये तर्क असायला हवा असे मला वाटते.

ऍडव्हर्टीसे काही बघितली नाही पण प्रॉडक्ट मात्र खूप छान आहे.. मी माझ्या आई-बाबा यांना गिफ्ट दिले त्यांना खूप आवडले आणि खरंच खूप चांगले आहे..

मस्त आहे जाहीरात मला आवडली Happy
एखादी शॉर्ट फिल्म बघत असल्याचा फिल आला. छान जमलीय...

नानाकळा,
पण इमोशनल वॅल्यु असलेल्या अ‍ॅडस मध्ये तर्क असायला हवा असे मला वाटते.
>>>>
मला तरी तसे वाटत नाही. बोला या देशात हिट झालेल्या किती चित्रपटांची नावे घेऊ ज्यात तर्कलेस इमोशनला ड्रामा आहे.

असे मला वाटते.
>>>>
मला तरी तसे वाटत नाही.

-------म्याटर क्लोज----------

-------म्याटर क्लोज---------- ओके Happy

आता मला जे वाटते ते कोणाला चुकीचे वाटते का हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.
जर ते कोणालाच चुकीचे वाटत नसेल तर माझ्यातर्फेही म्याटर क्लोज Happy

डेटींगच्या धाग्यावर एक मोठी पोस्ट लिहित बसलेलो, मग काही त्यावर उत्तरे.... आता तिथेच शुभरात्री बोलून आलोय, तुम्हालाही बोलतो. शब्बा खैर खुदा हाफिज Happy

यक्ष, अवांतरसाठी क्षमस्व, आणि चांगली जाहीरात शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

खुपच टचिंग अ‍ॅड आणि प्रोडक्ट पण.....

शेवट जवळपास आमच्या घरातलेच उदाहरण वाटले. (मागे पण ह्या बद्द्ल माबो वर लिहले होते). आईला गाण्याबद्दल भरपुर आवड आणि वडलाना गाणी आणि क्रिकेट सोडुन बाकी सगळ्या गोष्टीची आवड. आई रेडियोवर गाणी ऐकायची आणि वडील सुरवातिचा काळात न्युजपेपर नंतर टीव्ही बघुन करमणुक करायचे. मग आम्ही परदेशी गेल्यावर आईबरोबर थोडे फार गायनाचे प्रोग्राम बघु लागले पण आवड अशी निर्माण नाही झाली. आज आईला जाउन ५ वर्ष झाली आजुन्ही आईचा जुना रेडियो लाउन ऐकत झोपतात. त्यात कधी १९४० ची सहगल ची गाणि चालु असतात तर कधी २०१७ ची नविन गाणी . घरी एकटे असले तरी रेडियो वर गाणी चालु असतातच.

साहिलजी अगदी बरोबर!
ह्या जाहिरतीत तो मुद्दा बरोबर उतरला आहे असे मला वाटते.
विशेषतः 'विविध भारती' ही ज्यांच्या मर्मबंधातली ठेव आहे अशा व्यक्तिंना माझे म्हणणे कदाचित पटेल.
इडियट बॉक्स येइस्तोवर रेडिओच ज्यांचा श्वास होता ते रेडिओशी व जुन्या गाण्यांशी जन्मभर 'जुडलेले' असतात. माझी मोठी बहिण त्यातलीच. तिला हिंदी गाणे आवडतात व मला मराठी विशेषतः नाट्यगिते. मग लहानपणी आमची रेडिओच्या बटनांशी जुगलबंदी चालायची.
ही जहिरात ऐकतांन्ना तुम्ही नकळत त्या आठवणिंन्ना जागे करता. त्यामुळे ती भिडते!.

यात गाणी इन-आउट (ट्रांस्फर) करता येतात का?>> येतात बहुतेक. मला पण या प्रॉडक्टबद्दल वाचून घ्यावंसं वाटलं होतं. जाहिरात चांगली जमली आहे.