लता मंगेशकर - नको तो स्त्री जन्म.

Submitted by राजे on 6 October, 2009 - 03:08

मुळात पुनरजन्म असतो की नाही हा एक वेगळा प्रश्न.

मागच्या आठवड्यात लताबाईंची मुलाखत वाचली, त्या म्हणाल्या पुनरजन्म मिळाल्यास मराठी म्हणुनच मिळावा. पण स्त्रि म्हणुन जन्म नको.

स्त्रि म्हणुन त्याना त्रास झाला असावा असे मला तरि वाटत नाही. हो दारिद्र्याचा त्याना त्रास झाला हे उभ्या महाराश्ट्राला माहित आहे, व दारिद्र्य लिंग बघुन त्रास देत नाही, दारिद्र्य आले की ते फक्त झोडपुन काढत असते, नको ते दारिद्र्य. त्यानी "मला दारिद्र्याच्या घरी जन्माला घालु नको देवा किंवा दारिद्र्य दाखवु नको देवा" असे म्हटल्यास ते जास्त पटन्यासरखे होते . आज काल स्त्रि म्हणुन उपेक्षित वैगरे प्रकार बंदच झालेत, त्याच सगळ्यात मोठ उदा. मी स्वत: (जवळुन बघतो) आहे, माझ्या वर्गमैत्रिणिच्या हाताखाली १ वर्श एच. आर. असिस्टंट म्हणुन काम करुन अनुभ मिळविला. सुरुवातीला तिला मॅडम म्हणायला, शब्द निघता निघे ना, फारच अवघड जायचं, नंतर सगळं स्विकारावं लागलं कारण ती खरचं तिथे Deserving होती. माझ्या आत्तापर्यतच्या करिअरमधे मला सगळ्यात जास्त स्त्रियाच Boss म्हणुन मिळाल्यात. कारण एच. आर. हे जवळ जवळ स्त्रियांच वर्चस्व असलेलं क्षेत्र आहे. मी स्वतः कितितरी मुलीना Marketing मध्ये Recruit केलं व त्यांचं Performance सुद्दा चांगला आहे. म्हणुन माझ्या मते स्त्रि / पुरुष हे Matter करत नाही. मग लताबाई स्त्री जन्म नको अस का म्हणतात, कळने अवघडच.

माझा पुनरजन्म
जर पुनरजन्म हा प्रकार असेलच तर मला परत याच मातीत, मराठी म्हणुन जन्म घ्यायला आवडेल. व या जन्मात अर्धवट सोडलेली कामं (जे आठवाण्याची श्क्याताच नाही ) पुर्ण करायला आवडतील. फक्त प्रश्न एवढाच की तो जन्म पुरुष म्हणुनच हवाय, याच साध सरळ कारण म्हणजे आता पुरुष म्हणुन हा जन्म मी खरच एन्जोय करतो आहे, व लता बाई सारख्या व ईतर स्त्रिंयांच्या तोडुन "नको हा स्त्री जन्म " ऐकुन ऐकुन स्त्रि जन्माचा धसकाच घेतलाय मी, काय मजाल की परत कुणी स्त्री जन्माची स्वप्न बघाव,म्हणुन पुढचा जन्म सुद्धा पुरुष म्हणुनच हवाय. आमच्या गृपमधे बरेचदा यावरुन वाद होत असतात. मुलींच म्हणन असतं की पुरुष म्हणुनच का हवय तुला पुनरजन्म, स्त्रि का नाही. मी नेहमीच वरिल उत्तर देवुन वाद टाळत असतो. मी नोकरी निमित्त जवळ जवळ जगभर हिंडलो, मला न्युझिलड फार आवडते. पण जन्म मात्र मराठी व महाराश्ट्रातच हवाय, अशी देवाकडे हट्टाची मागणी आहे. आणि तो ही पुरुष म्हणुनच.

मग तुमच्या पैकी आहे कोणी, ज्याला पुढचं जन्म लिंग बदलुन हवाय ? मलातर नको रे बाबा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्रि म्हणुन त्याना त्रास झाला असावा असे मला तरि वाटत नाही

हे तुमचे मत झाले. तुम्ही वैयक्तिकरित्या त्यांना ओळखता का?

मी असे खुप पाहिलेत ज्यांच्याकडे पाहुन मला वाटायचे, काय सुखी लोक आहेत. थोड्या ओळखीनंतर वरचा पापुद्रा थोडा निघाला आणि कळले की यांच्यापेक्षा मी जास्त सुखी....

आज काल स्त्रि म्हणुन उपेक्षित वैगरे प्रकार बंदच झालेत, त्याच सगळ्यात मोठ उदा. मी स्वत: आहे
जग त्याहीपेक्षा मोठं आहे हो... एखाद्यावर अन्याय आधी व्हायचा, आता नाही हे आपण नाही ठरवू शकत. ज्याचे जळते त्यालाच ते कळते.

तुमचा शेवटचा प्रश्न.....पुढचं जन्म लिंग बदलुन हवाय ?
मला बदलुन वगैरे काहीच नको. मला हा ग्रहच नको. इकडे येणेच नको आता.. बास देवाने आता या चक्रातुन सुटका करायचे मनावर घ्यावे आणि त्यासाठी लागेल तेवढे सुकर्म माझ्या हातुन घडवावे... आणि माझ्या हातुन ते घडले नाही तर कुठेतरी रानावनात राहणा-या पक्षी/जनावराचा जन्म द्यावा.. माणसाचा तर नकोच आणि स्त्रीचा तर नकोच नको.

मामी संभाळुन.. हे हॉलीवुडवाले पोरं दत्तक घेतात भराभरा आणि मग घटस्फोट झाल्यावर त्यांचे काय करतात देव जाणे. एकाने तर चक्क दत्तक घेतलेल्या पोरीशी लग्नही केले.

मला नक्की काय लिहिलय ते समजलेलंच नाही. लताबाईनी पुढचा जन्म स्त्री जन्म नको म्हणणं हे त्यांच वैयक्तिक मत आहे. त्याचा आणि इतर स्त्रियाचा काय संबंध??

बास देवाने आता या चक्रातुन सुटका करायचे मनावर घ्यावे आणि त्यासाठी लागेल तेवढे सुकर्म माझ्या हातुन घडवावे... आणि माझ्या हातुन ते घडले नाही तर कुठेतरी रानावनात राहणा-या पक्षी/जनावराचा जन्म द्यावा.. माणसाचा तर नकोच

सहमत..... हेच मत माझेही... Happy .....

पण लतादीदीना शुभेच्छा.. त्याना पुढचा जन्म पुरुषाचा मिळावा... आणि पृथ्वीराज कपूर ते शाहीद कपूर व्हाया दिलीपकुमार, देव, राजेश खन्ना, अमिताभ, राजेन्द्र कुमार ( म्हणजे कोण हे विचारु नये )... अक्षयकुमार , अक्षय खन्ना ( म्हणजे कोण हे विचारण्यास हरकत नाही.. ) ... सुनिल शेट्टी .. ... यानाही त्यानी आवाज द्यावा................ Happy

<<आणि माझ्या हातुन ते घडले नाही तर कुठेतरी रानावनात राहणा-या पक्षी/जनावराचा जन्म द्यावा.. माणसाचा तर नकोच >>
असे नका म्हणू हो. परत जन्म मिळाला तर माणसाचाच मिळावा. मनुष्यप्राण्याला देवाजवळ जायची सर्वात जास्त संधि आहे. तुम्ही देवाकडे प्रर्थना केलीच आहे, सुकर्म घडव. देव घडवेल ते.

मला पुढचा जन्म मिळाला तर अगदी हाच मिळू दे!! फक्त ज्या काही चुका झाल्या त्या लक्षात असू दे, म्हणजे त्या न करता, याहून चांगले जीवन जगीन नि जवळच्या लोकांना त्रास होऊ देणार नाही. (मायबोलीवरील लोकांसकट)

मनुष्यप्राण्याला देवाजवळ जायची सर्वात जास्त संधि आहे. >>>>>>>>>>>

बाकीच्याना देवा 'जवळ' जावे लागत नाही, कारण ते साक्षात देवस्वरूपच असतात... माणूसच घाणेरडा असल्याने देवापासून सतत दूर असतो ...... त्यामुळे जरा चांगले केले की आता मी देवा'जवळ' जाणार म्हणून शेफारतो..... Sad असे मत असणारे काही लोक असतात, ती इच्छा खास अशा लोकांचे प्रतिनिधित्व करते... माणूस सर्वश्रेष्ठ की मानवेतर हा वाद न संपणारा आहे, पण आता इथेच संपवूया.... हा बीबी खास लता आणि स्त्रिया याना केन्द्रीत करुन लिहिलेला आहे............

nandini2911
<<मला नक्की काय लिहिलय ते समजलेलंच नाही >> हा हा हा. चांगला पुरावा दिलात. आता चर्चा करायला स्कोपच नाही.

रुगवेद,

तुम्ही मुलगी असता, तुमच्या वयाच्या ११ व्या वर्षी तुमचे वडील गेले असते आणि आई आणि चार भावंडांची पालन्पोषणाची जबाबदारी तुमच्यावर पडली असती तर तुम्हाला त्या काय म्हणतात हे कदाचित कळले असते. आज लता मंगेशकरांचे यश हे बर्‍याच जणाना खुपते. पण त्यांच्या आयुष्यात त्याना सगळे चांगलेच लोक भेटले असतील असे वाटते का? एकटी मुलगी, बाई असली तर वाईट नजरेने पहाणार्‍यांची संख्या काय कमी असते. त्यातुन चित्रपट क्षेत्रातील स्त्री ला त्या काळात कसे समजले जायचे हे सगळ्याना माहित आहे. या सर्वातुन मार्ग काढुन आपल्या गुणवत्तेला धक्का न लागु देता त्या यशस्वी झाल्या पण त्यासाठी त्याना ज्या दिव्यातुन जावे लागले असेल हे तुम्हाला ठाउक आहे का? नसेल कदाचित त्याना परत या सगळ्यातुन जायचे असेल्..त्यात काय चुक त्यांची?

आणि तुम्ही लता मंगेशकर आणि इतर स्त्रीया बोलल्या यावरुन तुमची मते ठरवता का?
स्त्री किंवा पुरुष कोणीही असले तरी प्रथम एक चांगला माणुस होणे महत्वाचे आहे.

पुढचा जन्म कुणालाही मिळणार नाही. जे आहे, जसे आहे, त्यातच आनंद माना. Happy

लता मंगेशकरांचे हे असे मत असेल (मला शंका आहेच), तर त्यांचे तसे मत तयार होण्याला काय कारण आहे? त्यांनी असे का म्हणावे ? परिस्थितीला कोण जबाबदार आहे?

स्त्रि म्हणुन त्याना त्रास झाला असावा असे मला तरि वाटत नाही.
---- माझी फार मोठी हरकत आहे या वाक्याला... Angry

चांगला पुरावा दिलात. आता चर्चा करायला स्कोपच नाही.
>> कसला पुरावा?? माफ करा, पण यात चर्चा करण्यालायक काहीच नाहिये. लता मंगेशकर या व्यक्तीचे एक वैयक्तिक मत आहे आणि त्याच्या मताचा पूर्ण आदर देखील आहे. तुम्हाला पुनर्जन्म हा पुरूष म्हणून हवाय हे तुमचे वैयक्तिक मत आहे त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही.

मात्र आज काल स्त्री उपेक्षित वगैरे राहिलेली नाही हे तुमचे वाक्य तुम्ही किती मोठ्या जगाचा विचार करताय ते लक्षात येतय. जगभर फिरून आल्यानंतर देखील तुम्हाला स्त्रीची उपेक्षा अजून दिसलेली नाही. यापेक्षा दुसरा मोठा विनोद काय?? आणि त्याचा लताबाईच्या एखाद्या विधानाशी बादरायण संबंध जोडून "मी स्त्रियाना किती मान देतो. हल्ली स्त्रिया किती पुढे गेल्यात तरीपण त्याना स्त्रीचा जन्म नको. असे का??" हे जे विधान तुम्ही केलय ते निव्वळ हास्यास्पद आहे.

एक अशीच आठवलेली घटना. पत्रकार असताना मुलीना नाईट ड्युटी लावू नका आणीई लावलीच तर आमच्याशी चर्चा करून लावा, अशी विनंती सर्वच मुलीनी केली होती. (नाईट ड्युटी म्हणजे दिवसाचे रिपोर्टिंग संपल्यावर ऑफिसमधे थांबणे, जर कुठे एखादी ईमर्जन्सी आल्यास तिथे जाणे आणि रिपोर्टिंग करणे) तेव्हा एक कलीग तावातावाने भांडत होता. त्याच्या मते, जर मुलीना पगार आमच्या इतका मिळतो मग काम पण आमच्याइतकेच करावे. वादावादी चालू असताना, स्त्री श्रेष्ठ की पुरूष असा विषय आला.

तो कलीग म्हणे, "पुरूष जे काम करू शकतात ते स्त्रिया करू शकत नाहीत."
एक मुलगी म्हणाली "पण स्त्रिया जे करू शकतात ते पुरूष नाही करू शकत"
"प्लीज आता मुले जन्माला घालतात गरोदरपणा हे सांगू नकोस. ते निसर्गाने दिलय"

ती मुलगी ताडकन म्हणाली "नऊ महिन्याचे गारोदरपण लांब राहिले आधी दर महिन्याचा आमचा त्रास सहन करून तेरा तेरा तास काम करून दाखवा. मग पुढचे बोलू"!!!!

पण हा मुद्दा तितकाच निरर्थक आहे या ठिकाणी, ते पण निसर्गदत्त आहे.

माझं वाक्य एवढ्याच बाबीशी संबंधित आहे. आता माझ्याशी स्त्री-पुरुष समता यावरुन वाद घालू नये.

ऋग्वेद,
स्त्री जन्माचा धसका घेण्याइतका तो वाईट नाहिये. कसं असतं की आपण सद्यस्थितित आनंद मानायला शिकलो की नविन काही प्रयत्न करू नयेत असं वाटतं, त्यामुळे तुम्हाला पुढचा जन्मं ही पुरूषाचा हवाय. त्यात काही गैर नाही पण त्यात काही योग्य आहे असं ही काही नाही. दोन्हीची फायदे-तोटे आहेतंच की..

nandini2911 ,

माझा मुद्दा एवढाच आहे,
लताबाई सारख्या महान स्त्री नी (इतरांची गोश्ट वेगळी) स्त्री जन्माबद्दल दाखवलेली उपेक्षा/अनास्ता, आणि त्या वरुन मला पडलेला प्रश्न. याच्यापलीकडे काहीच नाही, तरी तुमाला वाटत असेल की मला असा प्रशन पडलाच का ? तर मला क्षमा करा, यापुढे मला असे काही प्रश्न पडलेत तर ते मी ईथे मांडणार नाही.

<<"मी स्त्रियाना किती मान देतो. हल्ली स्त्रिया किती पुढे गेल्यात तरीपण त्याना स्त्रीचा जन्म नको. असे का??" हे जे विधान तुम्ही केलय ते निव्वळ हास्यास्पद आहे. >> ईथे मानाचा प्रश्न्च नाही, उगिच उताविळ होण्यापेक्षा मी काय लिहले व त्याचा बोध काय निघतो तो समजुन घेण्याचा प्रयत्न करा. उगीच वाटेल ते लिहु नका. तुम्ही नको तिथे भांडन करायचा प्रयत्न कशाला करताय? तुम्हाला याची सवय आहे का ? असेल तर कृपया दुस-या कुणालातरी शोधा त्या साठी, पण प्लिज मला क्षमा करा व परत प्रतिसाद लिहुन हा वाद वाढविण्यापेक्षा इथेच थाम्बवु या.

उगीच वाद नको मला.

लताबाईंना रफीसाब नाही तर किशोरदा ह्यांना गायला मिळालेली गाणी आपल्याला पुढल्या जन्मी गायला मिळावी किंवा अमिताभ बच्चन सारख्याला आवाज द्यावा असे वाटत असेल Happy

स्त्री जन्माचा धसका घेण्याइतका तो वाईट नाहिये >>>> इतका वाईट नाहीये म्हणजे काय ?

इतका वाईट नाहीये म्हणजे काय ?
... त्याना म्हणायचे असावे की अगदी नक्कोच्च असे म्हणण्याइतका वाइट नाहीये.पुन्हा मिळाला तर चालु शकेल.

<<स्त्री किंवा पुरुष कोणीही असले तरी प्रथम एक चांगला माणुस होणे महत्वाचे आह>>

१०० अनुमोदन. या एका वाक्यावरुन सगळा वाद गुंडाळला जाउ शकतो.

Ho nakkich stricha janma punha nako, strila faqta external harrasementlach tond dyava lagat nahi, tichi gharat kiti kamavati asali tari avahelanch hote, tiche dusre problems sudha astat

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
पुढचा जन्म कोणता मिळावा/मिळू नये हा विचार करण्यापेक्षा विधात्याने हे जे सुंदर आयुष्य दिले आहे त्याचा पुरेपूर उपभोग घ्या आणि आपले आयुष्य सत्कारणी लावा...

रामकृष्णहरी ! मागे लतादिदींची लोकप्रभात मुलाखत आली होती. कुणीतरी एक संगीतकार ( त्यांना नाव माहीत होते, म्हनजे नंतर लक्षात आलेच आवाजावरुन ) त्यांना रात्री बेरात्री फोन करुन त्रास द्यायचा, नाव तर सांगायचाच नाही, आधी ह्यांनी फोनवर प्रतीसाद देवुन कोण आहे हे विचारले तरी तिकडुन काहीच उत्तर नसायचे.

शेवटी एके रात्री असाच ३ वाजता फोन आल्यावर त्या संतापुन म्हणाल्या उत्तर देत नसलास तरी कोन आहे हे ओळखलेय, मुडदा बशीवला तुझा मेल्या. त्या दिवस म्हणजे रात्रीपासुन तो माणुस फोन करणे बंद झाला.

प्रसंग लतादिदींशी संबंधीत आहे, तसाच स्त्रियान्शी पण कारण ती स्त्री किंवा मुलगी निरपराध असली तरी तक्रार केली की तीच दोषी ठरते, मग तो तुझीच छेड कशी काढतो, बाकी मुली आहेतच, तुच कशावरुन त्याच्याकडे बघत नसशील वगैरे. स्त्रियांची दु:क्खे तुम्ही विचार करु शकत नाहीत अशी आहेत.

वर नंदिनीने उदाहरण दिले आहेच. बाकी नंतर.

.