अरे निष्ठुर

Submitted by र।हुल on 8 November, 2017 - 10:31

अरे निष्ठुर!
मुक्तीच्या मार्गावर
मायेचे काटे पेरलेस काय?
तुझ्या स्वार्थीपणाचा तिटकारा करू,
की तुलाच झिडकारून लावू?
पण पुन्हा तुझ्याचसमोर झुकावं लागतंय ...
हे मायावी,
तोडूनी सगळी बंधनं
जेव्हा मिळवेन चैतन्य
अनाहताचे ऐकता गुंजन
तुला जाब विचारेन,
झालास समाधानी?
माझी पिळवणूक करून...
―र।हुल/८.११.१७

Group content visibility: 
Use group defaults

मुक्तीच्या मार्गावर
मायेचे काटे पेरलेस काय?>>> हो आणि स्वतःचं नुकसान करुन घेतलं..