भाव बधीर

Submitted by सेन्साय on 5 November, 2017 - 23:32

.

.

अर्धजिवंत कलेवर सामोरि
बघण्यात मश्गुल तमाशा आहे
बधीर आहे कलियुगात माणूस
त्याचा जिवंतपणाही बधीर आहे

अस्पृहतेच्या या जाणिवा
उरात धडकी भरवणाऱ्या
सर्व काही बधीर आहे येथे
मृत्यूचा घनघोर हा अपमान आहे.

मेंदू विवेकशून्य बधीर झालेला
नात्याचा गुंता ही येथे बधीर आहे
मृत्युही बधीर कुटुंब जिव्हाळयाचा
रेशिमकीड़ा कोषात गुरफटला मात्र आहे

श्वास जगतो ईथे अस्मिता निंदरी
प्राण अवकुंठित भाव बधीर आहे
उद्वेग सात्विक रक्त प्रपात सामाजिक
जगण्याचे एकाकी रणशिंग फुंकतो आहे...

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही लिहिलय.
एका मुलीने फेबु वर् माझ्या वडिलांच्या तेराव्याला या अशा आशयाची पोस्ट् टाकलेली. आणि इतरांना टैगही केलेले. वाचुन् सुन्न् झालेलो.

धन्यवाद राहुल,मेघा,पंडितजी
आणि VB Happy

रस्त्यात जेव्हा एक्सीडेंट होवून लोक तड़फडत असतात तेव्हा काही विचित्र बधीर मानसिकता असलेले त्याचे सेल्फ़ी काढतात Sad
खुप वाईट वाटते अश्या बातम्या वाचून

क्या बात है...मनातील उद्विगनता शब्दात जाणवतीये...!
खूप सुंदर !!!